सामान्यकाळातील सहावा रविवार
दि. ११ फेब्रुवारी २०२४
✝️
"माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो."
Jesus said to him, "I will; be clean."
प्रभू येशूच्या स्पर्शाने आणि त्याच्या इच्छेने तो कुष्ठरोगी बरा झाला. आपण पश्चाताप करुन व आपले सर्वकाही परमेश्वराठायी समर्पित करुन त्याच्या सामर्थ्यशाली इच्छेवर सोपवून दिले तर आपल्या जीवनातसुद्धा चमत्कारी परिवर्तन घडू शकते. आपण आज आपला विश्वास पडताळून पाहू या आणि आपल्या जीवनावर चिंतन करु या. आपल्या इच्छेप्रमाणे घडावे असे आपणाला अनेकवेळा वाटत असते, आणि त्याप्रमाणे आपण प्रार्थना व विनंती करीत असतो, मात्र परमेश्वराला आपल्या जीवनात त्याच्या इच्छेप्रमाणे परिवर्तन घडवायचे असते. म्हणूनच आपल्या सर्व विनंत्या आपल्या जीवनाचे समर्पण करुन परमेश्वरावर सोपवाव्यात.
आपल्या जीवनात प्रभूच्या इच्छेप्रमाणे कृपा प्राप्त झाल्यावर आपण गप्प न बसता देवाची सुवार्ता परविण्याचे कार्य करायला हवे. अनेक माणसांना
देवाचा स्पर्श व्हावा आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडावे म्हणून आपल्या
प्रार्थनेची गरज आहे.
✝️
पहिले वाचन : लेवीय १३:१-२.४५-४६
वाचक : लेवीय या पुस्तकातून घेतलेले वाचन
महारोग्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी.
परमेश्वराने मोशे आणि अहरोन ह्यांस सांगितले: “एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल आणि तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या यजक पुत्रांपैकी एकाकडे न्यावे.
ज्या महारोग्याच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावे. त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावे, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि 'अशुद्ध, अशुद्ध' असे ओरडत जावे. जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी.
First Reading :Leviticus 13:1-2.44-46
The LORD spoke to Moses and Aaron, saying, "When a person has on the skin of his body a swelling or an eruption or a spot, and it turns into a case of leprous disease on the skin of his body, then he shall be brought to Aaron the priest or to one of his sons the priests. He is a leprous man, he is unclean. The priest must pronounce him unclean; his disease is on his head. "The leprous person who has the disease shall wear torn clothes and let the hair of his head hang loose, and he shall cover his upper lip and cry out, 'Unclean, unclean.' He shall remain unclean as long as he has the disease. He is unclean. He shall live alone. His dwelling shall be outside the camp.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३१:१-२,५,११
प्रतिसाद : प्रभो, तू माझे आश्रयस्थान आहेस; तू संकटापासून माझे रक्षण करशील.
१ ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे,
ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य!
ज्याच्या हिशेबी परमेश्वर अधर्माचा दोष लावीत नाही
आणि ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य !
२ मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले;
आपला अधर्म मी लपवून ठेवला नाही.
"मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन"
असे मी म्हणालो,
तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.
३ अहो धार्मिकहो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा;
अहो सरळ मनाचे जनहो,
तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.
Psalm 32:1-2, 5, 11 (7)
R. You are a hiding place for me;
you surround me with cries of deliverance.
Blessed is he whose transgression is forgiven,
whose sin is remitted.
Blessed the man to whom the Lord imputes no guilt,
in whose spirit is no guile. R.
To you I have acknowledged my sin; my guilt I did not hide.
I said, "I will confess my transgression to the Lord."
And you have forgiven the guilt of my sin.
Rejoice in the Lord, exult you just!
Ring out your joy, all you upright of heart!
दुसरे वाचन :१ करिंथकरास १०:३१-११:१
वाचक : पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा."
तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. यहुदी, हेल्लेणी आणि देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळविणारे होऊ नका. तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांना संतोषवितो आणि त्याचे तारण व्हावे म्हणून स्वतः चे हित न पाहता पुष्कळजणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.
Second Reading:
1 Corinthians 10:31-11:1
Brethren: Whether you eat or drink, or whatever you do, do all to the glory of God. Give no offense to Jews or to Greeks or to the church of God, just as I try to please everyone in everything I do, not seeking my own advantage, but that of many, that they may be saved. Be imitators of me, as I am of Christ.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
A great prophet has arisen among us, and God has visited his people.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क १:४०-४५
वाचक : मार्क लिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"लगेच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो शुद्ध झाला."
एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, "आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा." तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, "माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो." तेव्हा लगेच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला सक्त ताकीद देऊन लगेच पाठवून दिले आणि सांगितले, "पाहा, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्याला प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर." पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यात राहिला. तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mark 1:40-45
At that time: A leper came to Jesus, imploring him, and kneeling said to him, "If you will, you can make me clean." Moved with pity, he stretched out his hand and touched him and said to him, "I will; be clean." And immediately the leprosy left him, and he was made clean. And Jesus sternly charged him and sent him away at once, and said to him, "See that you say nothing to anyone, but go, show yourself to the priest and offer for your cleansing what Moses commanded, for a proof to them." But he went out and began to talk freely about it, and to spread the news, so that Jesus could no longer openly enter a town, but was out in desolate places, and people were coming to him from every quarter.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला मोशेच्या नियम- शास्त्राप्रमाणे समाज बहिष्कृत करण्यात येत असे. पीडित व्यक्तीने समाजापासून दूर स्वतःच्या राहाण्याची व खाण्याची व्यवस्था करायची असते. लोकांसमोर येताना त्याने स्वतःला 'अशुद्ध, अशुद्ध' असे घोषित करावे. कुष्ठरोगाने पीडित असलेल्या लोकांकडे द्वेषभावनेने पाहाण्यात येत असे, सर्वांपासून त्यांचे संबंध जवळजवळ तुटलेले असत आणि वेदनामय मरण त्यांच्या वाट्याला येत असे. ह्या मरणापासून त्यांची सुटका होणे कठीण असे. परंतु आजच्या शुभवर्तमानात आपण पाहातो की, एक कुष्ठरोगी आशेने प्रभू येशूजवळ येतो, कारण त्याचा विश्वास होता की प्रभू येशू त्याला बरे करील. प्रभू येशूसमोर गुडघे टेकून त्याला विनंती करण्यामध्येच त्याचा प्रभूवरील विश्वास प्रकट होतो. कुष्ठरोगी प्रभू येशूला म्हणतो, "आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा." प्रभू येशूला त्याची दया आली आणि त्याने त्याला स्पर्श करून म्हटले, "माझी इच्छा आहे, शुद्ध हो" आणि लागलीच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. कुष्ठरोग्यांना कोणीही स्पर्श करीत नसे, पण प्रभू येशूने त्याला स्पर्श करून दाखवून दिले की तो देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूने फक्त त्याच्या शरीराचे बाह्य कुष्ठच घालवले नाही, तर त्याच्या अंतर्यामाला स्पर्श करून त्याचा आत्मादेखील शुद्ध केला. प्रभू येशू आपणा सर्वांना देखील स्पर्श करून आपल्या अंतःकरणातील पापांचे कुष्ठ शुद्ध करू इच्छितो. प्रभूजवळ येण्यास, त्याच्यासमोर गुडघे टेकून त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्यास आपण तयार आहोत का?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या कृपेचा स्पर्श आम्हाला व्हावा आणि आमचे जीवन परिवर्तन व्हावे म्हणून तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला धैर्य व प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या