Marathi Bible Reading | Saturday 3rd February 2024 | 4th Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील ४ था सप्ताह

शनिवार   दि ३ फेब्रुवारी  २०२४

  ✝️ 

ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला   . he had compassion on them, because they were like sheep without a shepherd; and he began to teach them many things.
✝️

संत ब्लेसचा  सण 

एकदा एका मुलाच्या घशात मासळीचा काटा अडकला होता. त्यामुळे तो मुलगा तडफडून मरण्याची शक्यता होती. त्या मुलाला बिशप ब्लेस ह्यांनी वाचवले. त्यावेळेपासून घशाच्या विकारांपासून मुक्ती मिळावी म्हणून संत ब्लेस ह्यांचा धावा केला जातो. दोन मेणबत्त्यांचा क्रूस करून तो भाविकांच्या गळ्यावर ठेवत धर्मगुरू त्यांना संत ब्लेसचा आशीर्वाद देतात.
मध्ययुगीन काळात तो इतका प्रसिद्धीस आलेला होता की एकट्या रोम शहरात ३० ख्रिस्तमंदिरांना संत ब्लेसचे नाव देण्यात आलेले आहे. लोकर कमावणारे, मेण गोळा करणारे, बांधकाम करणारे आणि वैद्य इत्यादींच्या १४ पवित्र सहाय्यक व आश्रयदात्या संतांपैकी तो एक मानला जातो
✝️
प्रभू येशू आपल्या शिष्यांसोबत अविरतपणे देव राज्याची सुवार्ता घोषवित फिरत होता. काही शिष्यांना येशूने कामागिरीवर पाठविले होते. अशा  परिस्थितीत विसावा घेण्यासाठी सर्वजण जमले असता सर्वांनी आपआपल्या कार्याचा आढावा प्रभूयेशू समोर सादर केला.  प्रभू येशूने सर्व शिष्याना रानात एकांनी जाऊन विसावा घेण्यास  सांगितले. विसावा घेतल्यामुळे पुन्हा नव्याने कार्य करण्यास शक्ति व प्रेरणा मिळते.

 येशू विसावा घेण्यास गेला असता लोक आधीच त्याठिकाणी पोहोचले होते. येशूच्या मागे चालणाऱ्यांनी आशेचा दीप पाहिला, करूणेचा व मोयेचा स्पर्श अनुभवला. त्यांना जणू मार्गदर्शक व खरा नेता सापडला. प्रभूने त्यांची आर्तता जाणली आणि 'येशूला त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे  होते.' जीवनाचा मार्ग सुकर बनावा यासाठी प्रबोधन व मार्गदर्शनाची गरज असते. प्रभूयेशू तर गुरुंचा गुरु आणि देवपुत्र तारणारा आहे. तो करूणा सागर आहे. सर्वदा आपली काळजी वाहणारा मेंढपाळ आहे.
✝️  

पहिले वाचन राजे ३:४-१३
वाचक :   राजाच्या पहिल्या  पुस्तकातून घेतलेले वाचन

“आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे."

राजा शलमोन गिबोन जेथे यज्ञ करावयास गेला, ते सर्वात मोठे उच्च स्थान होते. तेथल्या वेदीवर शलमोनने एक सहस्र होमबली अर्पिले. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनला दर्शन दिले; देवाने त्याला म्हटले, “तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन." शलमोन म्हणाला, "तुझा सेवक माझा बाप दावीद याच्यावर तुझी मोठी दया असे; तो तुझ्यासमोर तुझ्याशी सत्याने, धर्माने आणि सरळ चित्ताने वागला. तुझ्याजवळ त्याच्या प्रीत्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसावयास त्याला तू पुत्र दिला; वस्तुस्थिती अशीच आहे. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे; त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य आणि अगणित आहेत. यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे म्हणजे मला बऱ्यावाइटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे ?"
शलमोनने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. देव त्याला म्हणाला, "तू दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितली; म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धीमान आणि विवेकी चित्त देतो; तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही आणि पुढे होणार नाही. एवढेच नव्हे तर तू मागितला नाहीस असा आणखी एक वर मी तुला देतो, धन आणि वैभव ही तुला देतो; तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजांमध्ये तुझ्यासमान कोणी असणार नाही."
 प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading 1Kings 3:4-13
In those days: Solomon went to Gibeon to sacrifice there, for that was the great high place. Solomon used to offer a thousand burnt offerings son that altar. At Gibeon the Lord appeared to Solomon in a dream by night, and God said, "Ask what I shall give you." And Solomon said, "You have shown great and steadfast love to your servant David my father, because he walked before you in faithfulness, in righteousness, and in uprightness of heart towards you. And you have kept for him this great and steadfast love and have given him a son to sit on his throne this day. And now, O Lord my God, you have made your servant king in place of David my father, although I am but a little child. I do not know how to go out or come in. And your servant is in the midst of your people whom you have chosen, a great people, too many to be numbered or counted for multitude. Give your servant therefore an understanding mind to govern your people, that I may discern between good and evil, for who is able to govern this your great people? It pleased the Lord that Solomon had asked this. And God said to him, "Because you have asked this, and have not asked for yourself long life or riches or the life of your enemies, but have asked for yourself understanding to discern what is right, behold, I now do according to your word. Behold, I give you a wise and discerning mind, so that none like you has been before you and none like you shall arise after you. I give you also what you n ot asked,both riches and honour, so that no other king shall compare with you, all your days.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र ११९:९-१४
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, तुझे नियम मला शिकव. 

१) तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील ?
तर तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. 
अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; 
तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.

२) मी तुझ्याविरूद्ध पाप करू नये म्हणून 
मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. 
हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; तुझे नियम मला शिकव 

३.) मी आपल्या मुखाने
तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयाचे निवेदन करतो.
 तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपदा, 
असे मानून मी अत्यानंद करतो

Psalm 119: 9-14 

O Lord, teach me your statutes.

How shall a youth remain pure on his
By obeying your word. R

I have sought you with all my heart;
let me not stray from your commands. R

I treasure your word in my heart,
lest I sin against you. R

Blest are you, O Lord; 
teach me your statutes. R 

With my lips have I recounted 
all the decrees of your mouth. R 

I rejoice in the way of your precepts, 
as though all riches were mine. R
जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आलेलुया !
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.

 My sheep hear my voice, says the Lord; and I know them, and they follow me.

Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   मार्क ६ :३०-३४

वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. "

प्रेषित येशूजवळ जमा झाले आणि आपण जे जे केले आणि जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "तुम्ही रानात एकान्ती चला आणि थोडा विसावा घ्या." तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवावयास देखील सवड होईना. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकान्ती गेले. लोकांनी त्यांना निघताना पाहिले आणि पुष्कळजणांनी त्यांना ओळखले आणि तेथल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.

प्रभूचे हे शुभवर्तमान 

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mark 6:30-34

At that time: The apostles returned to Jesus, and told him all that they had done and taught. And he said to them, "Come away by yourselves to a desolate place and rest a while." For many were coming and going, and they had no leisure even to eat. And they went away in the boat to a desolate place by themselves. Now many saw them going and recognised them, and they ran there on foot from all the towns, and got there ahead of them. When he went ashore he saw a great crowd, and he had compassion on them, because they were like sheep without a shepherd; and he began to teach them many things.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनप्रभू येशूने जेव्हा लोकांचा मोठा समुदाय पाहिला तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. आपणास परमेश्वराचा मार्ग दाखवण्या- साठी आणि शिकवण्यासाठी चांगल्या मेंढपाळांची आवश्यकता भासते. जर मेंढपाळ चांगले नसतील तर मेंढरे भटकू शकतात, म्हणून प्रभू येशूला अशा भटकलेल्या मेंढरांचा कळवळा आला. प्रभू येशू स्वतः उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी स्वतःचा प्राण देतो. प्रभू येशूने आपल्या बलिदानाने ही सर्व मेंढरे एका छत्राखाली (चर्च) एकत्र आणली आहेत. संत पेत्र प्रभू येशूला आपल्या आत्म्याचा मेंढपाळ आणि संरक्षक म्हणून संबोधितो. प्रभू येशूने आपल्या मेंढरांना एकत्र करण्याचे काम त्याच्या अनुयायांवर सोपवले आहे आणि प्रभूच्या मेंढरांना एकत्र आणणे व एकत्र ठेवणे हे पवित्र कार्य आहे. एक उत्तम मेंढपाळ म्हणून प्रभू येशू आपणास आपल्या जीवनाच्या लढाईमध्ये साहाय्य, सामर्थ्य आणि आश्रय देण्यास सदैव तयार असतो. आपण सदैव प्रभू येशूच्या कृपेवर व साहाय्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
प्रार्थना :  हे करुणासागर प्रभू, आमच्या अंत:करणात तुझी करूणा जागृत ठेव, आमेन.


✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या