Marathi Bible Reading |Palm Sunday of the Lord Passion | 24th March 2024

रविवार   दि. २ मार्च  २०२४

  ✝️ 

( झावळ्यांचा रविवार)

 "हा यहुदयांचा राजा आहे."

✝️ 
“माझ्या परीक्षांमध्ये टिकून राहिलेले तुम्हीच आहा; जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हांला नेमून देतो; तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्याय करावा.
 
✝️ 

ख्रिस्तसभा आज झावळ्यांचा रविवार साजरा करीत आहे.  'हा यहुदयांचा राजा आहे.आपण सुद्धा प्रभू येशूला  आपला तारणारा, मुक्तीदाता आणि राजा म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. 

✝️
पहिले वाचन : यशया ५०:४-७
वाचक  : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“उपमर्द व छिः थू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही, कारण माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते."

यशया म्हणतो शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला शिष्याची जिव्हा दिली आहे. तो रोज सकाळी मला जागे करतो, शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत; मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छि: थू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून तोंड चुकवले नाही.
प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही; मी आपले तोंड गारगोटीसारखे केले; माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Isaiah 50:4-7

The Lord God has given me the tongue of those who are taught, that I may know how to sustain with a word him who is weary. Morning by morning he awakens; he awakens my ear to hear as those who are taught. The Lord God has opened my ear, and I was not rebellious; I turned not backwards. I gave my back to those who strike, and my cheeks to those who pull out the beard; I hid not my face from disgrace and spitting. But the Lord God helps me; therefore I have not been disgraced; therefore I have set my face like a flint, and I know that I shall not be put to shame.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र २२:८-९,१७-२०,२३-२४
प्रतिसाद :   माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?

१) मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात.
 ते वाकुल्या दाखवतात, ते थट्टेने डोके हलवतात.
 त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला,
 तो त्याला मुक्त करो;तो जर त्याचा आवडता असेल
तर तो त्याला सोडवो. 

२) कुत्र्यांनी मला वेढले आहे,
दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे.
 त्यांनी माझे हातपाय विंधिले आहेत.
 मला आपली सर्व हाडे मोजता येतात.. 

३) ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात. 
ते माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात. 
हे परमेश्वरा, तू दूर राहू नको; 
हे माझ्या सामर्थ्या, माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर ! 

४) मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नामाची कीर्ती वर्णीन,
 “अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, त्याचे स्तवन करा;
याकोबचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे गौरव करा. 
इस्राएलचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा.'

Psalm Psalm 22:8-9, 17-18a, 19-20, 23-24

My God, my God, why have you forsaken me?

Psalter Week-II All who see me deride me;
they curl their lips, they toss their heads: 
"He trusted in the Lord, let him save him; 
let him release him, for in him he delights." R 

For dogs have surrounded me; 
a band of the wicked besets me. 
They tear holes in my hands and my feet; 
I can count every one of my bones. B

They divide my clothing among them, 
they cast lots for my robe. 
But you, O Lord, do not stay afar off; 
my strength, make haste to help me! R

I will tell of your name to my kin, 
and praise you in the midst of the assembly; 
"You who fear the Lord, give him praise; 
all descendants of Jacob, give him glory;
 revere him, all you descendants of Israel. R

दुसरे वाचन : फिलिपे  २:६-११
वाचक: पौलचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
  “त्याने स्वत:ला लीन केले; ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले. " 

ख्रिस्त येशू, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही; तर त्याने स्वत:ला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाने होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही क्रुसावरचे मरण स्वीकारले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वत:ला लीन केले. त्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading: Philippians 2:6-11

Christ Jesus though he was in the form of God, did not count equality with God a thing to be grasped, but emptied himself, by taking the form of a servant, being born in the likeness of men. And being found in human form, he humbled himself by becoming obedient to the point of death, even death on a cross. Therefore God has highly exalted him and bestowed on him the name that is above every name, so that at the name of Jesus every knee should bow, in heaven and on earth and under the earth, and every tongue confess that Jesus Christ is Lord, to the glory of God the Father.

जयघोष     

ख्रिस्ताने मरण आणि तेही क्रुसावरचे मरण स्वीकारले,
येथपर्यंत तो आज्ञाधारक झाला. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले
  
Acclamation: .

 Christ became obedient to the point of death, even death on a cross. Therefore God has highly exalted him and bestowed on him the name that is above every name.



शुभवर्तमान   मार्क १४:१-१५:४७
वाचक :"मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःखसहन" 

वल्हांडण व बेखमीर भाकरी ह्यांच्या सणाला अजून दोन दिवसांचा अवकाश होता आणि त्याला कपटाने कसे धरावे व जिवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते; कारण ते म्हणत होते, "आपण हे सणात करू नये, केले तर कदाचित लोकांत दंगल होईल."

तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी जेवायला बसला असता कोणी एक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान् सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली; तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. तेव्हा कित्येकजण आपसांत वैतागून म्हणाले, “ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली? कारण हे सुगंधी तेल तीनशेपेक्षा अधिक शेकेलास विकून ते गोरगरिबांना देता आले असते." अशी ते तिच्याविषयी कुरकुर करीत होते. परंतु येशू म्हणाला, "हिच्या वाटेस जाऊ नका; हिला त्रास का देता ? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच
तुमच्याबरोबर असतात आणि पाहिजे तेव्हा तुम्हाला त्याचे बरे करता येते, परंतु मी तुम्हांबरोबर नेहमीचा आहे असे नाही. हिला जे काही करता आले ते हिने केले आहे; हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लावले आहे. मी तुम्हांला सत्य सांगतो की, सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल." 

नंतर त्या बाराजणांपैकी एकजण म्हणजे यहुदा इस्कार्योत त्याला हा मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्यांच्याकडे गेला. त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला पैसे देऊ केले, तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोयीस्कर संधी पाहू लागला.
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारीत असत; त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, "आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे ?" मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, "नगरात जा म्हणजे कोणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल; त्याच्यामागून जा; तो आत जाईल तेथल्या घरधन्याला सांगा, गुरुजी म्हणतात, मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरायची जागा कोठे आहे? मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हांला दाखवील; तेथे आपल्यासाठी तयारी करा." मग शिष्य निघून नगरात गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. मग संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर आला आणि ते बसून भोजन करीत असता येशू म्हणाला, "मी तुम्हांला नक्की सांगतो, तुमच्यापैकी एकजण मला धरून देईल, तो आज माझ्याबरोबर जेवणारा आहे." ते खिन्न झाले व एकामागून एक त्याला विचारू लागले, "मी आहे काय तो?" तो त्यांना म्हणाला, "बाराजणांपैकी एकजण म्हणजे जो माझ्याबरोबर ताटात हात घालीत आहे तोच. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा; परंतु जो माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार ! तो माणूस जन्मला  नसता तर ते त्याला बरे झाले असते."
ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, "घ्या, हे माझे शरीर आहे." आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, "हे (नवीन) करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हांला खचित सांगतो की, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षांचा उपज पिणारच नाही.'
मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले. नंतर येशू त्यांना म्हणाला, "तुम्ही सर्वजण अडखळून पडाल; कारण असे लिहिले आहे की, मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल. तरी माझे पुनरूत्थान झाल्यावर तुमच्याआधी मी गालिलात जाईन." पेत्र त्याला म्हणाला, "जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही." येशू त्याला म्हणाला, "मी तुला खचित सांगतो, आज म्हणजे ह्याच रात्री, कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील." तरी तो मोठ्या आत्मविश्वासाने बोलत राहिला, 'आपणांबरोबर मला मरावे लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही." सर्वजणही तसेच म्हणत होते. नंतर ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा." त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यांना म्हणाला, "माझ्या जिवाला मरणप्राय अति खेद झाला आहे; तुम्ही येथे राहा आणि जागृत असा." मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली की, शक्य तर ही घटका माझ्यावर टळून जावो; आणि तो म्हणत होता, "आब्बा, बापा, तुला सर्व काही शक्य आहे; हा प्याला माझ्यापासून दूर कर; तरी माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो." मग तो येऊन पाहतो तो ते झोपी गेले आहेत; तेव्हा तो पेत्रला म्हणाला, "शिमोन, झोपी गेलास काय ? घटकाभरही तुझ्याने जागृत राहवले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे." त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. मग परत येऊन पाहतो तो ते झोपी गेले आहेत; त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेना. पुन्हा तिसऱ्या खेपेस तो त्यांना म्हणाला, तुम्ही अद्यापि झोप व विसावा घेता काय? पुरे झाले; घटका जवळ आली आहे; पाहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे." 
तो बोलत आहे इतक्यात बारांपैकी एकजण म्हणजे यहुदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व पुढारी ह्यांच्याकडची एक टोळी तरवारी आणि सोटे घेऊन आली. त्याला धरून देणाऱ्याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, "मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे; त्याला धरा आणि त्याला नीट बंदोबस्ताने घेऊन जा." तो आल्यावर लागलेच त्याच्याकडे गेला आणि "गुरुजी!" असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्या लोकांनी येशुवर हात टाकून त्याला अटक केली. तेथे शेजारी जे उभे होते त्यांच्यापैकी एकाने तरवात उपसली आणि प्रमुख याजकाच्या चाकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "एखाद्या लुटारूवर तरवारी आणि सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरायला बाहेर पडला आहा काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुम्हांबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावे म्हणून हे असे घडत आहे." तेव्हा ते सर्व त्याला  सोडून पळून गेले. तेव्हा कोणी एक तरूण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरुन त्याच्यामागून चालला होता, त्यांनी त्याला धरले. परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्यांच्यापासून उघडाच पळून गेला.

नंतर त्यांनी येशूला प्रमुख याजकाकडे नेले आणि सर्व मुख्य याजक, वडीलमंडळी व शास्त्री एकत्र जमले. पेत्र दुरून त्यांच्यामागून चालत आत म्हणजे प्रमुख याजकाच्या वाड्यातील अंगणात गेला आणि कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला. मुख्य याजक व सर्व न्यायसभा येशूला जिवे मारण्याकरिता त्याच्याविरूद्ध पुरावा शोधत होते; परंतु तो त्यांना मिळेना. बऱ्याच जणांनी त्याच्याविरूद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना. काही जण उभे राहून त्याच्याविरूद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले, “हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे तीन दिवसांत उभारीन," असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले. परंतु त्याच्या ह्याही साक्षीत मेळ नव्हता.तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभे राहून येशूला विचारले, "तू काहीच उत्तर देत नाहीस काय ? हे तुझ्याविरूद्ध साक्ष देतात हे काय?" तथापि तो उगाच राहिला. त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, "धन्यवादिताचा पुत्र जो ख्रिस्त तो तू आहेस काय?" येशू म्हणाला, "मी आहे आणि तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघांसह येत असलेला असा पाहाल." तेव्हा प्रमुख याजक आपले कपडे फाडून म्हणाला "आपणांला साक्षीदारांची आणखी काय गरज ? हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे. तुम्हाला काय वाटते ?" तेव्हा तो मरणदंडास पात्र आहे असे सर्वांनी मिळून ठरवले. मग कित्येकजण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून आणि त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, " आता दाखव आपले अंतर्ज्ञान !" आणि कामदारांनी त्याला चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले.

इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासीपैकी एक तेथे आली आणि पेत्रला शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हणाली, "तूही त्या नाझरेथकर येशूबरोबर होतास.” परंतु तो नाकारून बोलला, "तू काय  म्हणतेस ते मला ठाऊक नाही आणि समजतही नाही." ह्यावर तो बाहेर देवडीवर गेला. इतक्यात कोंबडा आरवला. मग त्या दासीने त्याला तेथेही पाहिले आणि जे लोक जवळ उभे होते, त्यांना ती पुन्हा सांगू लागली, "हा त्यांच्यापैकीच आहे." तरी त्याने पुन्हा नाकारले. मग काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्रला पुन्हा म्हणाले, "तू खरोखरच त्यांच्यापैकी आहेस; कारण तू गालिली आहेस." परंतु तो शापोच्चारण करून आणि शपथा वाहून म्हणू लागला, "ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहा  त्याला मी ओळखत नाही." त्याचवेळी दुसऱयांदा कोंबडा आरवला. तेव्हा "कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे जे येशू पेत्रला म्हणाला होता, ते त्याला आठवले. तेव्हा त्याचे अवसान सुटले आणि संकोच न करता मोठा गळा काढून तो रडू लागला. (मग पहाट होताच वडीलमंडळी आणि शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक आणि सबंध न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलातच्या स्वाधीन केले. तेव्हा पिलातने त्याला विचारले, "तू यहुद्यांचा राजा आहेस काय?" त्याने त्याला उत्तर दिले, "आपण म्हणता तसेच. मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप ठेवत होते. पिलातने त्याला पुन्हा विचारले, "काय ? तू काही उत्तर देत नाहीस? पाहा, ते तुझ्यावर किती तरी आरोप ठेवत आहेत.” तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही; ह्यावरून पिलातला आश्चर्य वाटले.

सणाच्या दिवसात ज्या एखाद्या कैद्याची लोक त्याच्याकडे मागणी करीत त्याला तो त्यांच्याकरीता सोडून देत असे. तेव्हा बंडातील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर तुरूंगात बांधून ठेवलेला बरब्बा नावाचा कोणी एक माणूस होता. लोकसमुदाय पुढे येऊन पिलातला विनवू लागला की, आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे. त्याने त्यांना उत्तर दिले, "तुमच्याकरिता मी यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय ?" कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याच्या ध्यानात येऊ लागले. परंतु त्याला सोडण्याऐवजी बरब्बाला आम्हांसाठी सोडा असे मागणे करण्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायाला चिथावले. तेव्हा पिलातने त्यांना फिरून विचारले, "तर मग तुम्ही ज्याला यहुद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे ?" "त्याला क्रुसावर खिळून टाका"अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली." पिलातने त्यांना म्हटले, "का बरे ? त्याने काय वाईट केले आहे?" तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, "त्याला क्रुसावर खिळून टाका." तेव्हा लोक समुदायाला खूष करावे ह्या हेतूने पिलातने बरब्बाला त्यांच्याकरिता सोडून दिले आणि येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरिता शिपायांच्या स्वाधीन केले.

मग शिपायांनी येशूला कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली. नंतर त्यांनी त्यांच्या अंगावर जांभळे वस्त्र चढवले आणि काट्यांचा मुकूट गुंफून त्याला घातला आणि ते मुजरा करून त्याला म्हणू लागले, "हे यहुद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!" त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारले; त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले. अशी त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून जांभळे वस्त्र काढून त्याचे स्वत:चे कपडे त्याला पुन्हा घातले आणि क्रुसावर खिळण्याकरिता ते त्याला बाहेर घेऊन गेले. तेव्हा शिमोन नावाचा कोणी एक सिरेनीकर म्हणजे आलेक्सांद्र व रूफ ह्यांचा बाप, हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा क्रूस वाहण्याकरिता वेठीस धरले. मग त्यांनी त्याला गुलगुथा (म्हणजे कवटीची जागा) येथे आणले आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षरस प्यायला दिला; परंतु त्याने तो घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला क्रुसावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा ह्यासाठी त्यांवर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले. त्यांनी त्याला क्रुसावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. "यहुद्यांचा राजा" असा त्याच्यावरील दोषारोपाचा लेख वर लावला होता. त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू एक उजवीकडे आणि एक डावीकडे असे क्रुसावर खिळले. मग जवळून जाणाऱ्या येणाच्यांनी डोकी हलवीत त्याची अशी निंदा केली "अरे ! मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, आपला बचाव कर, क्रुसावरून खाली ये!" तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसात थट्टा करीत म्हणाले, "त्याने दुसर्यांचे तारण केले; त्याला स्वत:चा बचाव करता येत नाही. इस्राएलचा राजा ख्रिस्त ह्याने आता कुसावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू." त्याच्याबरोबर  क्रुसावर जे खिळलेले होते ते देखील त्यांची निंदा करीत होते. 
सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, "एलोई, एलोई, लमा सबखथनी ?" म्हणजे "माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?" तेव्हा जवळ उभे राहणार्यांपैकी कित्येकजण हे ऐकून म्हणू लागले, "पाहा, तो एलियाला हाक मारत आहे." आणि कोणी एकाने धावत जाऊन 31 आंबेने स्पंज भरला आणि वेताच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला आणि म्हटले, "असू द्या, एलिया ह्याला खाली उतरविण्यासाठी येतो की काय हे पाहू." मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभंगला. मग त्याने अशाप्रकारे प्राण सोडला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून, म्हटले, "खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता!"
काही स्त्रियाही दुरून पाहत होत्या, त्यांच्यामध्ये मग्दालिया मरिया, धाकटा याकोब आणि योसेफ ह्यांची आई मरिया व सलोमी ह्या होत्या; तो गालिलात असताना ह्या त्याच्याबरोबर जात व त्याची सेवा करीत असत. ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर येरुशलेमला आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या.  
ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती, हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाथाचा आदला दिवस होता; म्हणून अरिमथाईकर योसेफने हिंमत धरून पिलातकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले; हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता. तेव्हा तो इतक्यात कसा मेला ह्याचे पिलातला नवल वाटले आणि त्याने शताधिपतीला बोलवून घेऊन त्याला विचारले, "त्याला मरून बराच वेळ झाला की काय?" शताधिपतीकडून ते कळल्यावर त्याने ते शव योसेफच्या स्वाधीन केले. त्याने तागाचे वस्त्र विकत आणले आणि त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्याभोवती गुंडाळले; मग त्याला खडकात खोदलेल्या कबरीत ठेवले आणि कबरीच्या तोंडाशी धोंड लोटून बसवली. त्याला कोठे ठेवले हे मग्दालिया मरिया आणि योसेची आई मरिया ह्या लक्ष लावून पाहत होत्या.


प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:

The Passion of Our Lord Jesus Christ According to Mark 14: 1-15:47

Narrator: It was now two days before the Passover and the Feast of Unleavened Bread. And the chief priests and the scribes were seeking how to arrest Jesus by stealth and kill him, for they said,

Crowd:,............................................................................................


 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:प्रायश्चित्त काळातील पाचव्या रविवारची उपासना वाचने आपल्यासमोर एक आव्हान ठेवतात. ज्याप्रमाणे प्रभू येशूने इतरांसाठी आपले जीवन अर्पण केले त्याप्रमाणेच आपणही स्वतःसाठीच न जगता स्वार्थ व मी पणाच्या परिघातून बाहेर पडून आत्मत्यागी जीवन जगण्यासाठी सदैव तत्पर असायला हवे. आजची वाचने प्रभू येशूच्या आगामी मृत्यूवर लक्ष केंद्रीत करतात. आजच्या पहिल्या वाचनात देव न्यायाच्या जुन्या कराराच्या जागी पापांची क्षमा करणारा नवीन करार अंमलात आणिल ह्याविषयी यिर्मया संदेष्टा स्पष्ट करतो. यिर्मयाने भाकीत केलेला हा नवीन किंवा नूतनीकरण केलेला करार प्रभू येशूचे जीवन, मृत्यू आणि पुनरूत्थान याद्वारे पूर्ण झाला. आजचे दुसरे वाचन प्रभू ख्रिस्ताच्या महान बलिदानाची आठवण करून देते. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला सांगतो, "आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे." आता दुःखात काय गौरव आहे? त्याला अटक, शिक्षा आणि ठार मारले जाणार आहे तरीही तो त्याच्या गौरवाबद्दल बोलत आहे. विजय व अनंतकाळचे जीवन पाहण्यासाठी प्रभू येशूने वेदना आणि अडचणींच्या ढगांच्या पलिकडे पाहिले. त्याचे दुःख आणि मृत्यू अनेकांना जीवन देईल हे त्याला माहीत होते, त्यामुळे दुःखाच्या तात्पुरत्या परिस्थितीमुळे निराश होण्याऐवजी त्याला सार्वकालिक जीवनाच्या प्रामाणिक प्रतिफळामुळे प्रोत्साहान आणि प्रेरणा मिळाली, म्हणून प्रभू येशूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना अनंतकाळचे जीवन देण्यासाठी त्याचे दुःख व जीवन अर्पण केले. दुर्दैवाने आपल्यापैकी बरेचजण या मार्गाचे अनुसरण करणे पसंत करत नाहीत. प्रभू येशू मात्र आपल्याला जीवनाच्या मार्गावर बलवान होण्यासाठी आमंत्रित करतो. तो जिथे आहे तिथे आपण असावे अशी त्याची इच्छा आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, विश्वाचा राजा, तुझ्या वैभवात सहभागी होण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन.

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या