Marathi Bible Reading | Wednesday 20 March 2024| 5th week of Lent

 उपवासकाळातील पाचवा  सप्ताह 

बुधवार  दि.२० मार्च  २०२४

  "तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील."

"If you abide in my word you are truly my disciples, and you will know the truth, and the truth will set you free

✝️  

शद्रख, मेशख आणि अबेदनगो हे परमेश्वराचे खरे भक्त त्यांना जळत्या भट्टीत  टाकण्यात आले परंतु देवाच्या दुताने त्यास सुरक्षितपणे वाचविले. सत्य कधीच नष्ट होत नाही. परमेश्वर सत्य आहे आणि ह्याच सत्यावर विश्वास ठेवून अब्राहम वतन भूमिच्या शोधात प्रवासाला निघाला होता. सत्याच्या मार्गावरून जात असताना तो स्थिर होता कारण परमेश्वर त्याच्या सोबत होता.  त्याने सत्य स्वीकारुन श्रद्धेचा प्रवास केला. यहुद्यांनी येशूला देवपुत्र म्हणून स्वीकारावयास व त्याची शिकवण देवपित्यापासून आहे हे सुद्धा स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच यहुदी येशूचा घात करावयास पाहत होते. अशावेळी प्रभूने त्यांना सांगितले की, 'सत्य तुम्हाला समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील.  खरे ख्रिस्तीपण देवाची वचने आत्मसात करुन त्याप्रमाणे आचरण करण्यात आहे. ख्रिस्त प्रभू तारणारा आहे हे शाश्वत सत्य आहे व तो सर्व प्रकारच्या बंधनातून आम्हाला मुक्ती देणारा प्रभू आहे. प्रभू येशू स्वत: म्हणाला आहे की, 'मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.'
ह्या प्रायश्चित काळात आपल्या सर्वांना सत्य स्वरुप प्रभू येशू ख्रिस्ताची खरी ओळख वाहावी म्हणून प्रार्थना करूया.  

✝️

पहिले वाचन :  दानिएल ३:१४-२०,२४-२५.२८
वाचक : दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन

नबुखद्नेस्सर म्हणाला, "अरे शद्रखा, मेशखा अबेद्नगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करत नाही व मी स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे ; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातातून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे ?" शद्र्ख, मेशख् व अबेद्नगो यांनी राजाला उत्तर दिले "महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हांला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत भट्टीतून सोडवावयाला समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोपवील. ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही." हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेद्नगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, भट्टी नेहमी पेक्षा सातपट तप्त करा. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ट पुरुषांना आज्ञा केली की शद्रख, मेशख व अबेद्नगो यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका.

नंतर नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला तो आपल्या मंत्र्यांस म्हणाला "आपण अग्नीत तिघा जणांना बांधून टाकले ना?" त्यांनी राजाला उत्तर केले, “होय सरकार, खरे आहे" तो म्हणाला, “पाहा, चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते, त्यांस काहीएक इजा पोहोचली नाही; चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. '

तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेद्नगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यानी आपले देह अर्पिले; त्यांना त्याच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे; त्याला धन्यवाद !"
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Daniel: 13:41c-62

Daniel 3:14-20, 91-92, 95

In those days: King Nebuchadnezzar said, "ts the Shadrach. Meshach, and Absedreges, that you do not seve gods or worship the golden image that I have we w you are ready when you hear the sound of the heen, pipe bre trigon, harp, bagpipe, and every kind of musa, to fall down and worship the image that I have made well and gessd. But a you do not worship, you shall immediately be cast imbo a burning bery furnace. And who is the god who will deliver you out of my hands?" Shadrach, Meshach, and Abednego answered and said bo the king, "O Nebuchadnezzar, we have no need to answer you this matter. If this be so, our God whom we serve is able to delivve us from the burning bery fumace, and he will deliver us out of your hand. O koing. But if not, be kisown to you, O king, that we will not serve your gods or wowship the golden image that you have set up." Then Nebuchadnezzar was filled with tay, and the exqvessiast of his tace was changed against Shadrach, Meshach, and Abednego. He ordered the fumace heated seven times more than it was usually heated. And he ordered some of the mighh men of his army to bind Shadrach, Meshach, and Abednego, and to cast them into the buming fiery fumace. Then King Nebuchadnezzar was astonished and rose up in haste He declared to his counselors, "Did we not cast three men bound into the feel they answered and said to the king, "True, O king." He answered and sand "But I see Four men unbound, walking in the midst of the fire, and they are not hurt, and the app of the fourth is like a son of the gods." Nebuchadnezzar answered and said, "Blessed be the God of Shadrach, Meshach, and Abednego, who has sent his angel and delivered his servants, who trusted in him, and set aside the king's command, and yielded up ther bodies rather than serve and worship any god except their own God.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  दानिएल ६:५२-५६

प्रतिसाद प्रभो, तुझा सदासर्वदा गौरव असो.

१ हे प्रभो, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, तू धन्य आहेस तुझा सदासर्वदा गौरव असो.तुझे महिमामय पवित्र नाम धन्य असो. तुझा सदासर्वदा गौरव असो.

२ तू आपल्या वैभवशाली मंदिरात धन्य आहेस. तुझा सदासर्वदा गौरव असो.

३ तू आपल्या राजसिंहासनावर धन्य आहेस.तुझा सदासर्वदा गौरव असो.

४ खोलवर दृष्टी टाकणाऱ्या प्रभो, तू धन्य आहेस. तुझा सदासर्वदा गौरव असो.

५ स्वर्गीय निवासस्थानी तू धन्य आहेस. तुझा सदासर्वदा गौरव असो.



Psalm Daniel 3:29-30, 31, 33, 32, 34 (R 29b) 

You are to be praised and highly exalted forever!
Blessed are you, O Lord, God of our ancestors,
and to be praised and highly exalted forever;
And blessed is your glorious, holy name
and to be highly praised and highly exalted forever. R 

Blessed are you in the shrine of your holy glory
and to be extolled and highly glorified forever. R

Blessed are you, who sits upon cherubim 
and looks upon the deeps
and to be praised and highly exalted forever. &
Blessed are you upon the throne of your kingdom
and to be extolled and highly exalted forever. R

Blessed are you in the firmament of heaven 
and to be sung and glorified forever. R

जयघोष  
प्रभू म्हणतो, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे 
आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही."

Acclamation: 
  Blessed are those who, hearing the word, 
hold it fast in an honest and good heart, 
and bear fruit with patience.


शुभवर्तमान योहान ८:३१-४२
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 
ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशु म्हणाला, "तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील." ते त्याला म्हणाले, "आम्ही आब्राहामचे वंशज आहो व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता ?"
येशूने त्याना उत्तर दिले, "मी तुम्हांला नक्की सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदासर्वदा राहत नाही; पुत्र सदासर्वदा राहतो. ह्यास्तव जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही आब्राहामचे वंशज आहा हे मला ठाऊक आहे; तरी तुम्हांमध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जिवे मारायला पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो. तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता."
त्यांनी त्याला उत्तर दिले, "आमचा पिता आब्राहाम आहे." येशू त्यांना म्हणाला, "तुम्ही आब्राहामची मुले आहा 11 तर तुम्ही आब्राहामची कृत्ये करा; परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हांला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जिवे मारायला पाहता; आब्राहामने असे केले नाही. तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करता” ते त्याला म्हणाले, "आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही; आम्हांला एकच पिता म्हणजे देव आहे." येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे; मी आपण होऊन आलो नाही तर त्यानेच मला पाठवले आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 8:31-42

At that time: Jesus said to the Jews who had believed him, "If you abide in my word you are truly my disciples, and you will know the truth, and the truth will set you free they answered him, "We are offspring of Abraham and have never been enslaved to anyone. How is it that you say, 'You will become free'?" Jesus answered them, "Truly, truly, I say to you, everyone who practices sin is a slave to sin. The slave does not remain in the house forever, the son remains forever. So if the Son sets you free, you will be free indeed. I know that you are offspring of Abraham; yet you seek to kill me because my word finds no place in you. I speak of what I have seen with my Father, and you do what you have heard from your father." They answered him, "Abraham is our father." Jesus said to them, "If you were Abraham's children, you would be doing the works Abraham did, but now you seek to kill me, a man who has told you the truth that I heard from God. This is not what Abraham did. You are doing the works your father did." They said to him, "We were not born of sexual immorality. We have one Father-even God." Jesus said to them, "If God were your Father, you would love me, for I came from God and I am here. I came not of my own accord, but he sent me.

  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजच्या पहिल्या वाचनातील मजकूर आपल्याला सांगतो की बॅबिलोनियन राजा नबुखेनेस्सर याने एक भव्य सोन्याचा पुतळा उभारला आणि सर्वांनी त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे अशी आज्ञा दिली. हे शद्रख, मेशख आणि अबेदनगो ह्यांच्या विश्वासाला थेट आव्हान होते. देवावरील आपला विश्वास व आपली भक्ती ह्याद्वारे आपण स्वतःकडे लोकांचे लक्ष वेधून घेऊ नये. प्रत्येक वेळी प्रभू येशूने जे चमत्कार केले ते स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी नव्हते तर देवाचा गौरव प्रकट करण्यासाठी त्याने महत्कृत्ये केली. जेव्हा आपल्या जीवनात पराक्रमी कृत्ये केली जातात तेव्हा आपण या महान कृत्यांचे केंद्र बनू तर देवाला गौरव द्यावे. शद्रख, मेशख व अबेदनगो ह्यांनी योग्य निवड केली आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारा राजाचा रोष ओढवून घेतला. त्यांच्याप्रमाणे आपणही योग्य निवड करावी कारण कोणतीही कठीण परिस्थिती आम्हाला देवाशी अविश्वासू होऊ देऊ शकत नाही. प्रभू येशूवर त्याच्या काळातील धार्मिक अधिकाऱ्यांनी सतत हल्ले केले, कारण प्रभू येशूनी त्यांना काही कटु सत्ये सांगितली. आपण प्रभू येशू, शद्रख, मेशख व अबेनगोसारखे सत्याची कदर करणारे, बोलणारे आणि स्वीकारणारे लोक आहोत का?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या शब्दाप्रमाणे आचरण करण्यास व तुला सर्वस्वी तारणारा म्हणून स्वीकारण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या