Marathi Bible Reading | Second Sunday of Easter Divine Mercy Sunday 7th April 2024

पुनरुत्थानकाळातील 

दुसरा रविवार 

दैवीदयेचा रविवार  ०७ एप्रि २०२

 “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो."

"Peace be with you. As the Father has sent me, even so I am sending you."

✝️



दैवीदयेचा रविवार 


✝️

पुनरूस्थित प्रभू येशूने आपल्या शिष्यांना स्वर्गीय शांतिचे वरदान दिले.  विशेषतः पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्रभूने त्यांना बहाल केले. त्याच बरोबर !  पापांची क्षमा करण्याचा अधिकार देऊन देवराज्याची सुवार्ता पसरविण्याची  आज्ञा दिली. 
 ख्रिस्तसभा आज प्रभू येशूच्या दैवी दयेचा सण  साजरा करीत आहे. प्रभू येशू जो शांतिदाता परमेश्वर आहे, तो दयेचा व करुणेचा महासागर आहे. त्याला आपण सर्वस्वी शरण जाऊ या.
ख्रिस्त सभेमध्ये दैवी दयेची आराधना व भक्ती वाढत आहे. पापांबद्दल  पश्चात्ताप करुन आपण देवावरील आपल्या श्रद्धेत सर्वदा वाढत रहावे म्हणून  प्रयत्नशील बनू या. जिवंत प्रभूचा अनुभव घेऊन त्याची सुवार्ता आपल्या  कृतीद्वारे इतरांपर्यंत पोहोचविण्याचा आपण प्रयत्न करु या.
✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ४:३२-३५

वाचक :  प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"श्रद्धावंतांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता." 

श्रद्धावंतांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही काही कमी नव्हते, कारण जमिनीचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवीत, मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.

प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 4:32-35

The full number of those who believed were of one heart and soul, and no one said that any of the things that belonged to him was his own, but they had everything in common. And with great power the apostles were giving their testimony to the resurrection of the Lord Jesus, and great grace was upon them all. There was not a needy person among them, for as many as were owners of lands or houses sold them and brought the proceeds of what was sold and laid it at the apostles' feet, and it was distributed to each as any had need,

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र ११८:२-४,१६-१८,२२-२४

प्रतिसाद :परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे.

१) आता इस्त्राएलने म्हणावे, त्याची दया सनातन आहे. 
अहरोनच्या घराण्याने म्हणावे, 
त्याची दया सनातन आहे. 
देवाला भिणार्यांनी म्हणावे, "त्याची दया सनातन आहे."

२) परमेश्वराने उजवा हात उभारलेला आहे,
 परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. 
मी मरणार नाही, मी जगणार 
आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करणार. 
परमेश्वराने मला जबर शासन केले,
 तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही.

३) बांधणार्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. 
ही परमेश्वराची करणी आहे. 
प्रभूचा हा दिवस आहे, 
ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करुया.


Psalm 118:2-4, 15c-16b and 17-18, 22-24 (21)

Give praise to the Lord, for he is good; his mercy endures for ever.

Let the house of Israel say, 
"His mercy endures for ever.
" Let the house of Aaron say, "
His mercy endures for ever.
" Let those who fear the Lord say, 
"His mercy endures for ever."

"The Lord's right hand has done mighty deeds; 
I shall not die, I shall live 
and recount the deeds of the Lord. 
The Lord punished me, punished me severely,
 but did not hand me over to death.

The stone that the builders rejected 
has become the cornerstone.
By the Lord has this been done, 
a marvel in our eyes.
This is the day the Lord has made; 
let us rejoice in it and be glad.R 


दुसरे वाचन  १ योहा ५:१-६

वाचक :  योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते."

येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. आपण देवावर प्रीती करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा पाळणे कठीण नाहीत. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा दुसरा कोण आहे? जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त. पाण्याने केवळ नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही तो आला.

हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.

1 John 5:1-6

Beloved: Everyone who believes that Jesus is the Christ has been born of God, and everyone who loves the Father loves whoever has been born of him. By this we know that we love the children of God, when we love God and obey his commandments. For this is the love of God, that we keep his commandments. And his commandments are not burdensome. For everyone who has been born of God overcomes the world. And this is the victory that has overcome the world-our faith. Who is it that overcomes the world except the one who believes that Jesus is the Son of God? This is he who came by water and blood-Jesus Christ; not by the water only but by the water and the blood. And the Spirit is the one who testifies, because the Spirit is the truth.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
येशूने म्हटले, "थोमा, तू मला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवली आहे. पाहिल्यावाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य."
 आलेलुया!

Acclamation: 
Have you believed, Thomas, because you have seen me, says the Lord; blessed are those who have not seen and yet believe.

शुभवर्तमानयोहान  २०:१९-३१
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"आठ दिवसांनंतर येशू आला."

आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला  आणि मध्ये उभा राहून म्हणाला, "तुम्हांला शांती असो." असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो." असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर घातली आणि त्यांना म्हटले, "पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत." 
येशू आला तेव्हा बारातील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले." पण त्याने म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही."
मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो." नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको, तर विश्वास ठेवणारा ऐस." थोमाने त्याला म्हटले, "माझा प्रभू व माझा देव!" येशूने त्याला म्हटले, "तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य!"
ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे, म्हणून ही लिहिली आहेत.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 20:19-31

On the evening of that day, the first day of the week, the doors being locked where the disciples were for fear of the Jews, Jesus came and stood among them and said to them, "Peace be withyou." When he had said this, he showed them his hands and his side. Then the disciples were glad when they saw the Lord, Jesus said to them again, "Peace be with you. As the Father has sent me, even so I am sending you." And when he had said this, he breathed on them and said to them, "Receive the Holy Spirit. If you forgive the sins of any, they are forgiven them; if you withhold forgiveness from any, it is withheld Now Thomas, one of the twelve, called the Twin, was not with them when Jesus came. So the other disciples told him, "We have seen the Lord. But he said to then, "Unless I see in his hands the mark of the nails, and place my finger into the mark of the nails, and place my hand into his side, I will never believe." Eight days later, his disciples were inside again, and Thomas was with them. Although the doors were locked, Jesus came and stood among them and said, "Peace be with you." Then he said to Thomas, "Put your finger here, and see my hands; and put out your hand, and place it in my side. Do not disbelieve, but believe." Thomas answered him, "My Lord and my God! Jesus said to him, "Have you believed because you have seen me? Blessed are those who have not seen and yet have believed." Now Jesus did many other signs in the presence of the disciples, which are not written in this book; but these are written so that you may believe that Jesus Christ, the Son of God, and that by believing you may have life in his name.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनपुनरुत्थान काळातील दुसरा रविवार दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा केला जावा असा संदेश प्रभू येशूकडून मारिया फॉस्टिना कोवाल्स्का हिला मिळाल्याचे ख्रिस्तसभा मानते. प्रभू येशू ख्रिस्ताची ही दैवी दया त्याच्या जीवनात, कार्यात, दुःखसहनात व मरणात आणि मरणानंतर झालेल्या त्याच्या पुनरुत्थानातही दिसून येते. परंतु प्रभू येशूचे पुनरुत्थान हा शिष्यांसाठी एक नवीन अनुभव होता. जरी येशूने त्यांना त्याच्या मेलेल्यांतून उठण्याबाबत सतत समजावून सांगितले होते तरीही ते त्याचा अर्थ समजू शकले नाहीत. यासाठी आजची सर्व वाचने देवाच्या दयेबद्दल, विश्वासाबाबत व विश्वास ठेवण्याची गरज आणि आपल्या पापांसाठी देवाच्या कृपेची गरज याबद्दल मार्गदर्शन करतात. आजच्या पहिल्या वाचनात साक्रामेंताच्या प्रत्येक उत्सवात दैवी दया देखील आम्हाला दिली जाते असे ठासून सांगितलेले आहे. सुरूवातीच्या ख्रिस्त समुदायाने छळ होण्यापूर्वी प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे देवाचे प्रेम, करुणा आणि दया सामाईक करण्याचा सराव करून या साक्षीदार समुदायाने आपली शक्ती सामुदायिक प्रार्थना, भाकरीचे तुकडे आणि प्रेषितांच्या शिकवणूकीतून प्राप्त केली. दुसरे वाचन देवाच्या दयेच्या शारीरिक व आध्यात्मिक कार्यावर लक्ष केंद्रित करते. आजचे शुभवर्तमान देखील दयाळू परमेश्वराच्या सर्वव्यापी उपस्थितीत विश्वासाच्या महत्त्वावर जोर देते. न पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणे हा नंतरच्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तिचा अनुभव आहे. प्रभूला आपले जीवन अर्पण करून शंका आणि संकोचातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आमंत्रित केले आहे. त्यासाठी आपण आपला देव, आपल्या पित्याला आपले अंतःकरण उघडण्यास सांगू या, जेणेकरून आपल्याला पवित्र आत्म्याच्या रूपाने त्याची दया प्राप्त होईल. आपण प्रभू येशूवर जितका जास्त विश्वास ठेवू तितकीच आपल्याला त्याची दया प्राप्त होईल. प्रभू येशूच्या करुणामय कृतीने भारावून गेलेला थोमा त्याच्यावरील विश्वास व्यक्त करणारे उद्‌गार काढतो, "माझा प्रभू व माझा देव!"

प्रार्थना : हे प्रभू येशू, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. आम्हावर व अखिल जगावर दया कर, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या