Marathi Bible Reading | Monday 17th June 2024 | 11 week in ordinary Time

सामान्य काळातील दहावा  

सोमवार १७  जून २०२४

जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस. Give to the one who begs from you, and do not refuse the one who would borrow from you.



 संत ग्रेगरी बार्बारिगो 
- महागुरू , वर्तनसाक्षी (१६२५-१९९७)

✝️   

पहिले वाचन :राजां  २१:१-१६
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
 "नाबोथास दगडमार होऊन तो मेला. "

इज्रेलकर नाबोथ याचा द्राक्षाचा मळा इज्रेल येथे शोमरोनचा राजा आहाब याच्या राजवाड्यापाशी होता. आहाब नाबोथला म्हणाला, "तुझा द्राक्षाचा मळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन. त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षाचा मळा देतो किंवा इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो." नाबोथ आहाबला म्हणाला, "माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो." "मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही." असे इज्रेलकर नाबोथ म्हणाला, म्हणून आहाब उदास आणि खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछान्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना.
तेव्हा त्याची स्त्री इजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, “आपण अन्न सेवन करीत नाही, इतके आपले मन खिन्न का झाले आहे?" तो तिला म्हणाला, "इज्रेलकर नाबोथ याला मी म्हणालो की, 'पैसे घेऊन मला तुझा द्राक्षाचा मळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षाचा मळा देतो,' यावर तो म्हणाला, 'मला आपला द्राक्षाचा मळा तुला द्यावयाचा नाही." त्याची बायको इजबेल त्याला म्हणाली, “सांप्रत इस्राएलवर आपली राजसत्ता आहे ना? चला, ऊठा, अन्न सेवन करा, आपले मन आनंदित करा. इज्रेलकर नाबोथचा द्राक्षाचा मळा मी आपणाला मिळवून देते." मग तिने आहाबच्या नावाने पत्रे लिहिली आणि त्यांवर त्याची मुद्रा केली आणि नाबोथ राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडीलजन आणि सरदार यांच्याकडे ती रवाना केली. तिने पत्रात याप्रमाणे लिहिले: “उपवासाचा जाहीरनामा काढा आणि नाबोथला लोकांसमोर उच्चस्थानी बसवा आणि दोन अधम मनुष्ये त्याच्यासमोर बसवा, 'त्याने देवाचा आणि राजाचा धिक्कार केला' अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी; मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.” इजबेलच्या पत्रांतील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्या वडीलजनांनी आणि सरदारांनी केले. त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढला आणि नाबोथला लोकांसमोर उच्चस्थानी बसवले. दोन अधम पुरुष येऊन त्याच्यासमोर बसले. त्या अधम पुरुषांनी लोकांसमोर नाबोथविरुद्ध साक्ष दिली; ते म्हणाले, “नाबोथने देवाचा आणि राजाचा धिक्कार केला आहे." यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला. त्यांने इजबेलला सांगून पाठवले की, “नाबोथला दगडमार केला आणि तो मेला."
नाबोथला दगडमार होऊन तो मेला हे इजबेलने ऐकले तेव्हा ती आहाबला म्हणाली, "उठा, जो द्राक्षाचा मळा इज्रेलकर नाबोथ पैसे घेऊन आपल्याला देण्यास कबूल नव्हता तो ताब्यात घ्या. नाबोथ आता जिवंत नाही, मेला आहे." इज्रेलकर नाबोथ मरण पावला हे आहाबने ऐकले तेव्हा तो त्याच्या द्राक्षाच्या मळ्याचा ताबा घ्यायला जाण्यासाठी उठला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.      

First Reading :1 Kings 21:1-16: 

At that time: Naboth the Jezreelite had a vineyard in Jezreel, beside the palace of Ahab king of Samaria. And after this Ahab said to Naboth, "Give me your vineyard, that I may have it for a vegetable garden, because it is near my house, and I will give you a better vineyard for it; or, if it seems good to you, I will give you its value in money. But Naboth said to Ahab, "The Lord forbid that I should give you the inheritance of my fathers." And Ahab went into his house vexed and sullen because of what Naboth the Jezreelite had said to him, for he had said, "I will not give you the inheritance of my fathers." And he lay down on his bed and turned away his face and would eat no food. But Jezebel his wife came to him and said to him, "Why is your spirit so vexed that you eat no food?" And he said to her, "Because I spoke to Naboth the Jezreelite and said to him, 'Give me your vineyard for money, or else, if it please you, I will give you another vineyard for it. And he answered, 'I will not give you my vineyard." And Jezebel his wife said to him, "Do you now govern Israel? Arise and eat bread and let your heart be cheerful; I will give you the vineyard of Naboth the Jezreelite." So she wrote letters in Ahab's name and sealed them with his seal, and she sent the letters to the elders and the leaders who lived with Naboth in his city. And she wrote in the letters, "Proclaim a fast, and set Naboth at the head of the people. And set two worthless men opposite him, and let them bring a charge against him, saying, 'You have cursed God and the king. Then take him out and stone him to death." And the men of his city, the elders and the leaders who lived in his city, did as Jezebel had sent word to them. As it was written in the letters that she had sent to them, they proclaimed a fast and set Naboth at the head of the people. And the two worthless men came in and sat opposite him. And the worthless men brought a charge against Naboth in the presence of the people, saying, "Naboth cursed God and the king." So they took him outside the city and stoned him to death with stones. Then they sent to Jezebel, saying, "Naboth has been stoned; he is dead." As soon as Jezebel heard that Naboth had been stoned and was dead, Jezebel said to Ahab, "Arise, take possession of the vineyard of Naboth the Jezreelite, which he refused to give you for money, for Naboth is not alive, but dead." And as soon as Ahab heard that Naboth was dead, Ahab arose to go down to the vineyard of Naboth the Jezreelite, to take possession of it.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :२-३,५-७
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे.

१) हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे.
 माझ्या चिंतनाकडे लक्ष दे.
हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझा धावा ऐक; 
कारण मी तुझी प्रार्थना करत आहे.

२) तू दुष्टपणाची आवड धरणारा देव नाहीस,
 दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. 
तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत.

३) सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे, 
असत्य भाषण करणाऱ्यांचा तू नाश करतोस. 
खुनी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.

Psalm 5:2-3, 5-6, 7

R. O Lord, give heed to my sighs.

To my words give ear, O Lord;
give heed to my sighs.
Attend to the sound of my cry,
my King and my God. R

You are no God who delights in evil;
no sinner is your guest.
The boastful shall not stand 
their ground before your eyes. R

All who do evil you despise; 
who lie you destroy. all
The deceitful and those who shed blood, 
the Lord detests. R

जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
जे वचन सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात 
आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.
 आलेलुया!

Acclamation: 
Your word is a lamp for my feet, and a light for my path.

शुभवर्तमान  मत्तय ५:३८-४२
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 
“मी तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका.” 

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, " 'डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात' असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel ReadingMatthew 5:38-42: At that time: Jesus said to his disciples, "You have heard that it was said, 'An eye for an eye and a tooth for a tooth. But I say to you, do not resist the one who is evil. But if anyone slaps you on the right cheek, turn to him the other also. And if anyone would sue you and take your tunic, let him have your cloak as well. And if anyone forces you to go one mile, go with him two miles. Give to the one who begs from you, and do not refuse the one who would borrow from you.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनप्रभू येशू आपणांस सांगत आहे, हिंसा विरुद्ध हिंसा करू नये. कारण त्याद्वारे हिंसेमध्ये वाद होत असते. ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने येशूच्या मार्गावर आपण चालले पाहिजे, येशू ख्रिस्त ते थेट मरेपर्यंत दुसऱ्यांन क्षमा करावी असा बोध करतो. आपले राष्ट्रपित महात्मा गांधी हे आपल्याला अहिंसेचा माग दाखवित आहे. त्यांची ही शिकवणूक ख्रिस्तापासून प्राप्त झाली आहे. आजच्य शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त नव्याप्रकारच न्याय करण्यास आपणांस सांगत आहेज्यामध्ये क्षमा आहे. प्रेम करण्याची शिकवणूक आहे. ख्रिस्त आपल्या दुःखाद्वारे देवावरचे प्रेम सर्व मानवजातीला दाखवत आहे. हे प्रेम दुसऱ्या व्यक्तीबरोबर करण्यास शिकवत आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, पश्चातापस, समेट व सहभागितेने जीवन जगून गरजवंतांना सहाय्य करण्यास आम्हांला प्रेरणा दे, आमेन.


✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या