Marathi Bible Reading | 11th Sunday in Ordinary Time | 16 June 2021

सामान्य काळातील अकरावा 

रविवार १६ जून २०२४ 

"मोहरीचा दाणा हा सर्व झाडपाल्यांमध्ये बारीक आहे तरी तो सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो."It is like a grain of mustard seed, which, when sown upon the ground, is the smallest of all the seeds on earth; 

✝️
“परमेश्वराचे राज्य असे आहे."

प्रभू येशूची देवराज्याची शिकवण सामान्य लोकांना समजावी आणि त्यांनी ग्रहण करावी, म्हणून प्रभूने पुष्कळ दाखले सांगितलेले आहेत.  आपण आपल्यावर सोपविवेली कार्य करण्याची जबाबदारी निष्ठेने व चोख पार पाडल्यावर देव त्याचे कृपाकार्य पूर्णत्वास नेतो. देवाचे वचन जीवनात स्वीकारायचे व त्याचे पालन करायचे, मात्र त्याचे फल देणे देवाच्या हातात आहे.

आज पुन्हा एकदा प्रभू येशू हा सर्वात लहान असलेल्या मोहरीच्या दाण्याचा दाखला देत आहे. मोहरीचा दाणा जमिनीत पेरल्यावर त्याची वाढहोऊन वृक्षात रुपांतर होते. देवराज्याचे बीज म्हणजेच अगदी छोटेखानी असलेले देवाचे वचन, आपण ग्रहण केल्यास व त्याप्रमाणे आचरण केल्यासआपले जीवन बहरु शकते, फूलू शकते व फलद्रुप बनते. अशामुळे आपल्या जीवनात देवाचे राज्य प्रस्थापित होण्यास मदत होत असते.

✝️             

पहिले वाचन :यहेज्केल  १७:२२-२४

वाचक : .यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"नीच वृक्षास मी उंच करीन."

प्रभू परमेश्वर म्हणतो, “मी उंच गंधसरूच्या शेंड्यावरील एक डहाळी तोडून ती लावीन, त्याच्या अगदी वरच्या कोवळ्या फांद्यातील एक घेऊन ती एका मोठ्या उंच पर्वतावर लावीन, मी इस्राएलच्या उंच पर्वतावर ती लावीन; तिला फांद्या फुटतील, फळे येतील, तिचा उत्तम गंधसरू होईल; म्हणजे मी त्याच्याखाली सर्व पक्षिकुळे राहतील, त्याच्या शाखांच्या छायेत ते वस्ती करतील. वनातील सर्व वृक्षांना कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षाला नीच केले आहे आणि नीच वृक्षाला उंच केले आहे, हिरव्या झाडाला सुकवले आहे आणि शुष्क झाडाला फलद्रूप केले आहे. मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेली आहे.”
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Ez 17: 22-24

Thus says the Lord God: “I myself will take a sprig from the lofty top of the cedar, and will set it out; I will break off from the topmost of its young twigs a tender one, and I myself will plant it upon a high and lofty mountain; on the mountain height of Israel will I plant it, that it may bring forth boughs and bear fruit, and become a noble cedar; and under it will dwell all kinds of beasts;m in the shade of its branches birds of every sort will nest. And all the trees of the field shall know that I the Lord bring low the high tree, and make high the low tree, dry up the green tree, and make the dry tree flourish. I the Lord have spoken, and I will do it.”

This is the word of God 

Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ९२ :२-३, १३-१६

प्रतिसाद : प्रभो, तुझे उपकारस्मरण करणे चांगले आहे.

१) परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे, प्रभातसमयी तुझे वात्सल्य आणि प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे चांगले आहे.

२)  नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनवरील गंधसरूसारखा वाढेल.

३ ) जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेतते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील, वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत आणि टवटवीत असतील; 'ह्यावरून दिसेल की, परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठायी अन्याय मुळीच नाही

Psalm  92:2-3, 13-14, 15-16 (R. 2a)

R. It is good to give thanks to you, O Lord.

It is good to give thanks to the Lord, 
to make music to your name, O Most High, 
to proclaim your loving mercy in the morning, 
and your truth in the watches of the night. R 

The just will flourish like the palm tree,
 and grow like a Lebanon cedar. 
Planted in the house of the Lord, 
they will flourish in the courts of our God. R. 

Still bearing fruit when they are old,
 still full of sap, still green, 
to proclaim that the Lord is upright. 
In him, my rock, there is no wrong. R.

दुसरे वाचन करिंथ  ५:६-१०
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

“आम्ही घरी असलो किंवा प्रवासात असलो तरी प्रभूला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे."
आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात घेतो की, आम्ही शरीरात वस्ती करीत आहो तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहो. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही, आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second reading : 2 Cor 5: 6-10

So we are always of good courage; we know that while we are at home in the body we are away from the Lord, for we walk by faith, not by sight. We are of good courage, and we would rather be away from the body and at home with the Lord. So whether we are at home or away, we make it our aim to please him. For we must all appear before the judgment seat of Christ, so that each one may receive good or evil, according to what he has done in the body.


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे, तू आम्हाला सत्यात समर्पित कर. 
  आलेलुया!

Acclamation: 
The seed is the word of God, the sower is Christ; 
all who come to him will live for ever.


शुभवर्तमान मार्क  ४:२६-३४
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"मोहरीचा दाणा हा सर्व झाडपाल्यांमध्ये बारीक आहे तरी तो सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो."

येशू म्हणाला, “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काही एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते; पण हे कसेहोते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे." आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्याला कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते.
असले पुष्कळ दाखले देऊन, त्याच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे, तथापि एकांती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mk 4: 26-34

And he said, “The kingdom of God is as if a man should scatter seed upon the ground, and should sleep and rise night and day, and the seed should sprout and grow, he knows not how. The earth produces of itself, first the blade, then the ear, then the full grain in the ear. But when the grain is ripe, at once he puts in the sickle, because the harvest has come.”

And he said, “With what can we compare the kingdom of God, or what parable shall we use for it? It is like a grain of mustard seed, which, when sown upon the ground, is the smallest of all the seeds on earth; yet when it is sown it grows up and becomes the greatest of all shrubs, and puts forth large branches, so that the birds of the air can make nests in its shade.”

With many such parables he spoke the word to them, as they were able to hear it; he did not speak to them without a parable, but privately to his own disciples he explained everything.

 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन:आता येशू आणखी दोन बोधकथा जोडतो. राज्य आणि जागतिक चित्राबद्दल एक वाढते बीज आहे आणि मोहरीचा दाणा पहिला शब्द चित्र घरी आणतो. बीजाची अनाकलनणीय वाढ आणि दुसरा शब्द चित्र लहान सूचित करतात. लहान सुरूवात सूचना परंतु बियाण्याची उच्च क्षमता, यापैकी कोणताही प्रबंध कोणत्याही मानवी व्यक्तीने कमावलेला नाही. ही देवाची देणगी राज्याची वाढ अनाकलनणीय आहे. कारण बिया पेरणारे देखील त्यांच्या शब्दाला दिर्घकाळ किती चांगले फळ मिळेल माहित नाही. दुसरा शब्द चित्र बिजामध्ये लपलेली क्षमता प्रकट करतो. बियाण्यालाच फुले, फळे, फांद्या, पाने, मुळे आणि देठ इत्यादी स्वतःमध्येलपलेले असतात. ती बियाणे दाखवणे आणि त्यांचे संगोपन करणे हे वास्तव आहे. कोणत्याही निराश उपदेशकाला दिलासा देऊ शकते. मी माझ्या जीवनात देवाच्या राज्याच्या वाढीचे बीज पेरण्यासाठी माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात कोणती पावले उचलू शकतो ?

प्रार्थना हे प्रभू, तुझ्या मळ्यात सेवाकार्य करण्यास मला प्रेरणा दे, तुझ्या सुवार्ता प्रसाराचे मला साधन बनव, आमेन.               

✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या