Marathi Bible Reading | Saturday 15th June 2024 | 10th Week in Ordinary Time

सामान्य काळातील दहावा  

शनिवार १५  जून २०२४

तुमचे बोलणे, 'होय' किंवा 'नाही,' एवढेच असावे, ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे. All you need say is "Yes" if you mean yes, "No" if you mean no; anything more than this comes from the Evil One.'


 संत जर्मेन कझीन
- कुमारिका (१५७९-१६०१)

तौलोसे (फ्रान्स) येथल्या एका गरीब शेतमजूराची ही मुलगी, एका हाताने अधू होती. केवळ नवजात बालिका असतानाच तिची आई देवाघरी गेली होती. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईने तिला अत्यंत तिरस्कारणीय अशी वागणूक दिली. बऱ्याच वेळा तिला घराबाहेर ठेवण्यात येई. परतुं जर्मेन हिची नम्रता व सहनशीलता पाहून देवाने तिला आपल्या दिव्य सहवासाचे, अतिपवित्र साक्रामेंतावरील प्रेमाचे आणि पवित्र मरियेच्या कृपापूर्ण उपस्थितीचे वरदान दिलेले होते. त्यामुळे त्याही परिस्थितीत ती हसतमुख होती.
तिला घराबाहेर काढल्यानंतर ती दुर्मुखलेल्या चेहऱ्यांनी रडत बसली नाही तर तिने आपल्या परिसरातील लहान मुले जमविली. त्यांना येशू व मरियेविषयीच्या कथा सांगितल्या. इतकेच नव्हे तर तिला जे थोडेथोडके अन्न मिळत असे त्यातील थोडासा वाटा ती आणखी गरीब असलेल्या मुलांना देत असे.
आपल्या परिसरात वाढत असलेल्या पाखंडवादी विचारसरणीमुळे तिने उपवास आणि आत्मक्लेश करायला सुरूवात केली. वयाच्या २२ व्या वर्षी तिला देवाघरचे बोलावणे आले. तेव्हा कुठे जनमाणसांत तिच्या पावित्र्याविषयीची जाणीव लोकांना होऊ लागली होती. पोप पायस नववे ह्यांनी २९ जून १८६७ साली तिला संतपद बहाल केले. प्रत्येक वर्षी १५ जून रोजी तिचे अवशेष असलेल्या पिबँक चर्चमध्ये तीर्थयात्रा आयोजित केली जाते.


प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या आज्ञा व देवराज्याची शिकवण सोप्या भाषेत  आणि स्पष्टपणे समजावून सांगितली हे आपण गेल्या दोन दिवसातील| शुभवर्तमानातून पाहतो. "खोटी शपथ वाहू नको तर आपल्या शपथा । परमेश्वरापुढे खऱ्या कर". ह्या प्राचीन काळच्या शिकवणुकीचे स्पष्टीकरण प्रभू । येशू आज आपल्याला देत आहे.

शपथ वाहणे म्हणजे दिलेले वचन पूर्णपणे पाळणे. शपथ वाहताना कोणाला  तरी मध्यस्थ ठेवूनच ती वाहावी लागते. मात्र आज प्रभू येशू स्पष्ट करीत आहे  की, "शपथ वाहूच नका". स्वर्गाची शपथ वाहणे अयोग्य आहे कारण स्वर्ग  देवाचे राजासन आहे. देवाला मध्यस्थ ठेवून वचन पाळण्याचा अधिकार  आपल्याला नाही. आपण देवाची निर्मिती आहोत. प्रभू म्हणतो, "पृथ्वीचीहि  शपथ वाहू नका", कारण ती देवाचे पादासन आहे, देव पृथ्वीचा निर्माता असून देवाचे अस्तित्व पृथ्वीवरसुद्धा आहे. इतकेच नव्हे तर आपण आपल्या किंवा  आपल्या मुलाबाळांच्या मस्तकाचीसुद्धा शपथ वाहू नये कारण आपल्या  प्रत्येकावर देवाचा अधिकार आहे. आपले बोलणे किंवा आपली बाजू खरी आहे ! हे पटवून देण्यासाठी अनेकदा शपथ वाहिली जाते. किंबहुना आपण खूप  प्रामाणिक आहोत हे दर्शविण्यासाठीसुद्धा शपथ घेतली जाते. देव प्रामाणिक,  खरा आणि सत्य आहे, आपणा सर्वांना देवाच्या खरेपणात व सत्यात आचरण  करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. 

  
पहिले वाचन : १ राजांच्या    १९:१९-२१ 
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"अलिशा उठून एलियाबरोबर गेला."

एलिया पर्वतावरुन निघाला तेव्हा त्याला शाफाटचा पुत्र अलिशा भेटला. तो बैलांची बारा जोते चालवून शेत नांगरत असे आणि तो स्वतः बाराव्या जोताबरोबर होता. त्याच्याजवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याच्यावर टाकला. तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या मागून धावला. तो त्यांला म्हणाला, “मला आपल्या आईबापाचे चुंबन घेऊन येऊ द्या, मग मी आपला अनुयायी होईन." तो त्यांला म्हणाला, "परत जा, मी तुझे काय केले ?" मग तो त्याच्यामागून जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची आऊते पेटवून त्यांवर त्याचे मांस भाजले. ते त्याने आपल्या लोकांना दिले, ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलियाबरोबर गेला आणि त्याची सेवा करू लागला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.
✝️             


First Reading :1 Kings 19:19-21

Leaving Mount Horeb, Elijah came on Elisha son of Shaphat as he was ploughing behind twelve yoke of oxen, he himself being with the twelfth. Elijah passed near to him and threw his cloak over him. Elisha left his oxen and ran after Elijah. 'Let me kiss my father and mother, then I will follow you,' he said. Elijah answered, 'Go, go back; for have I done anything to you?' Elisha turned away, took a yoke of oxen and slaughtered them. He used the oxen's tackle for cooking the meat, which he gave the people to eat. He then rose and, following Elijah, became his servant.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १५:१-२अ. ५,७-८,९-१०
प्रतिसाद :   प्रभो, तूच माझ्या वतनाचा आणि प्याल्याचा वाटा आहेस.

१ हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे
मी परमेश्वराला म्हटले, "तूच माझा प्रभू आहेस." 
परमेश्वर माझ्या वतनाचा आणि प्याल्याचा वाटा आहे, 
माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.

२ परमेश्वराने मला बोध केला आहे, 
त्याला मी धन्यवाद देतो, 
माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते. 
मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे; 
ती माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.

३ म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, 
माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. 
कारण तू माझा जीव अधोलोकांत राहू देणार नाहीस, 
तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.

Psalm 16:1-2a & 5, 7-8, 9-10 You are my inheritance, O Lord.
1b Preserve me, O Lord, for I have put trust in thee.
2a I have said to the Lord, thou art my God.
5 The Lord is the portion of my inheritance and of my cup: it is thou that wilt restore my inheritance to me.
R. You are my inheritance, O Lord.

7 I will bless the Lord, who hath given me understanding:
moreover my reins also have corrected me even till night.
8 I set the Lord always in my sight: for he is at my right hand, that I be not moved.
R. You are my inheritance, O Lord.

9 Therefore my heart hath been glad, 
and my tongue hath rejoiced: moreover 
my flesh also shall rest in hope.
10 Because thou wilt not leave my soul in hell; 
nor wilt then give thy holy one to see corruption.

R. You are my inheritance, O Lord.


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
हे पित्या, स्वगीच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ह्या गोष्टी तू बाळकांना प्रकट केल्या. 
 आलेलुया!

Acclamation: 
You shine as lights in the world, holding fast to the word of life.


शुभवर्तमान  मत्तय ५:२७-३२
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ५:३३-३७

"मी तुम्हास सांगतो, शपथ वाहूच नका.”

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "खोटी शपथ वाहू नको, तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, शपथ वाहूच नका; स्वर्गाची नका, कारण ते देवाचे राजासन आहे; पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पदासन आहे; येरुशलेमचीही नका, कारण ती थोर राजाची नगरी आहे. आपल्या मस्तकाची शपथ वाहू नको, कारण तुम्ही आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाही. तर तुमचे बोलणे, 'होय' किंवा 'नाही,' एवढेच असावे, ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे."

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel ReadingMatthew 5:33-37

Jesus said to his disciples: 'You have heard how it was said to our ancestors: You must not break your oath, but must fulfil your oaths to the Lord. But I say this to you, do not swear at all, either by heaven, since that is God's throne; or by earth, since that is his footstool; or by Jerusalem, since that is the city of the great King. Do not swear by your own head either, since you cannot turn a single hair white or black. All you need say is "Yes" if you mean yes, "No" if you mean no; anything more than this comes from the Evil One.'
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनमाणसांमधील संबंध प्रस्थापित झाले पाहिजे. सर्वात मुलगामी आणि पूर्णपणे प्रामाणिकपणावर सत्य झाकण्यासाठी कोणतेही दुहेरी बोलणे हे ख्रिश्चन आणि प्रचारीत आहे. दुष्टाची शपथ घेणे आधारीत आहे. जो धोका होऊ शकतो. त्यापासून स्वतःचा बचाव करणे ख्रिश्चन समाजातील इतरांचा असभ्यपणा त्यावर पूर्ण प्रामाणिकपणा उभा राहायला हवा. स्वतःच्या गुणवत्तेशिवाय आणि संरक्षण, देव पूर्णपणे सत्यवादी आहे. आणि ख्रिश्चनांना त्याच्याशी साम्य दाखविण्यासाठी बोलावले आहे. संत पॉल ख्रिस्ताबाबत म्हणतो, त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये देवाची सर्व वचने त्यांच्याद्वारे आम्ही आमेन देखील उच्चारू शकतो. देवाच्या गौरवासाठी ख्रिस्ती लोकांसाठी सत्य सांगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रेमाने वागणे कारण देवाचे प्रेम सत्य आहे.
प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, सत्याने, नीतिने आणि प्रामाणिकपणे जीवन जगण्यास | आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.


✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या