सामान्य काळातील दहावा
शुक्रवार १४ जून २०२४
तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.For it is better that you lose one of your members than that your whole body be thrown into hell.
आजच्या शुभवर्तमानात पुन्हा प्रभू येशू सद्वर्तन आणि पवित्रते संबंधाने आपल्याला बोध करीत आहे. 'व्यभिचार करू नको', ह्या सहाव्या आज्ञेवर चिंतनात्मक प्रबोधन प्रभू येशूने केलेले आहे. प्रभू येशू अधिकार वाणीने शिक्षण देत आहे, कारण त्याचा दैवीपणा प्रकट रुपाने त्याच्या वाणीतून समजतो.
व्यभिचार केवळ एक शारीरिक कृत्य किंवा पाप नाही. व्यभिचाराची सुरूवात प्रथम अंतःकरणात होते. त्यानुसार कृती करण्याचा वाईट उद्देश मनात
तयार होतो. त्यानंतरच व्यभिचार घडतो. म्हणूनच प्रभू येशू म्हणत आहे, 'जो | कोणी एखाद्या स्त्रीकडे (पुरूषाकडे) कामेच्छेने पाहतो त्याने (तीने) आपल्या मनात तिच्याशी (त्याच्याशी) व्यभिचार केलाच आहे'. प्रभू येशू स्पष्ट करीत आहे की, आपला विचार बाह्य स्वरूपात प्रकट करणारे अवयव म्हणजे डोळा, हात, पाय ह्याबद्दल चिंतन करावयास प्रवृत्त करीत आहे.
पहिले वाचन : १राजांच्या १९:९,११-१६
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तू येथून बाहेर जा; पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा."
एलिया तेथे जाऊन एका गुहेत राहिला. तेव्हा पाहा, परमेश्वराचे वचन त्यांला प्राप्त झाले, त्याने त्यांला म्हटले, "तू येथून बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा; तेव्हा पाहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच्या समोरून सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारीत आणि खडक फोडीत होता, पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत, मंद वाणी झाली. एलियाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्याला वाणी ऐकू आली ती अशी, “एलिया, तू येथे कशासाठी आलास?" तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेदी मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तरवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत." परमेश्वर त्याला म्हणाला, "तू परत दिमिष्काच्या रानाकडे जा; तेथे जाऊन पोहचलास म्हणजे हजाएलला अभिषेक करून अरामावर राजा नेम. निमशीचा पुत्र येहू याला अभिषेक करून इस्त्राएलवर राजा नेम, तसेच आबेल-महोला येथील शाफाटचा पुत्र अलिशा यास अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
✝️
First Reading :1 Kings 19:9a, 11-16
In those days: Elijah came [to Horeb the mount of God) to a cave and lodged in it. And behold, the word of the Lord came to him. And he said, Go out and stand on the mount before the Lord." And behold, the Lord passed by, and a great and strong wind tore the mountains and broke in pieces the rocks before the Lord, but the Lord was not in the wind. And after the wind an earthquake, but the Lord was not in the earthquake. And after the earthquake a fire, but the Lord was not in the fire. And after the fire the sound of a low whisper. And when Elijah heard it, he wrapped his face in his cloak and went out and stood at the entrance of the cave. And behold, there came a voice to him and said, "What are you doing here, Elijah?" He said, "I have been very jealous for the Lord, the God of hosts. For the people of Israel have forsaken your covenant, thrown down your altars, and killed your prophets with the sword, and I, even I only, am left, and they seek my life, to take it away." And the Lord said to him, "Go, return on your way to the wilderness of Damascus. And when you arrive, you shall anoint Hazael to be king over Syria. And Jehu the son of Nimshi you shall anoint to be king over Israel, and Elisha the son of Shaphat of Abel-meholah you shall anoint to be prophet in your place.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र २७:७-९,१३-१४
प्रतिसाद : हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.
१) मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे,
हे परमेश्वरा, ऐक; माझ्यावर दया कर,
माझी याचना ऐक.
“माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले,
तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले:
२ )हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला
उत्सुक झालो आहे,
तू आपले मुख माझ्या दृष्टिआड करू नकोस.
आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस;
तू माझे सहाय्य होत आला आहेस.
३) ह्या जिवंतांच्या भूमीवर
परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील.
परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर.
परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.
Psalm Psalm 27:7-8ab, 8c-9abc, 13-14
It is your face, O Lord, that I seek;
O Lord, hear my voice when I call;
have mercy and answer me.
Of you my heart has spoken,
"Seek his face." R
It is your face, O Lord, that I seek.
hide not your face from me.
Dismiss not your servant in anger
you have been my help. R
I believe I shall see the Lord's goodness
in the land of the living.
Wait for the Lord; be strong;
be stouthearted, and wait for the Lord! R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे,
तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.
आलेलुया!
Acclamation:
You shine as lights in the world, holding fast to the word of life.
शुभवर्तमान मत्तय ५:२७-३२
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने व्यभिचार केलाच आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “ “व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते,' हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो उपटून काढून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापाला प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
'कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे,' हे सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा परित्यक्ता स्त्रीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: Matthew 5:27-32
At that time: Jesus said to his disciples, "You have heard that it was said, 'You shall not commit adultery. But I say to you that everyone who looks at a woman with lustful intent has already committed adultery with her in his heart. If your right eye causes you to sin, tear it out and throw it away. For it is better that you lose one of your members than that your whole body be thrown into hell. And if your right hand causes you to sin, cut it off and throw it away. For it is better that you lose one of your members than that your whole body go into hell. "It was also said, 'Whoever divorces his wife, let him give her a certificate of divorce. But I say to you that everyone who divorces his wife, except on the ground of sexual immorality, makes her commit adultery, and whoever marries a divorced woman commits adultery.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: सखोल सद्गुण आणि अधिक पावित्र्य यावर असणारे कालचे प्रवचन आजही चालू आहे. कायद्याचे बाह्य आणि कर्मकांडाचे तारण हे गुलामगिरीत गणले जात नाही पण हृदयाची अखंडता, येशू त्याचे देवत्व प्रकट करत आहे आणि देवाशी बोलत आहे. असे म्हटले होते की, मी तुला त्याच्यासमोर सांगतो. आपण स्वतःचे सत्य शोधतो. येशूशी असलेल्या आपल्या वचनबद्धतेची सत्यता तपासली जाते. व्यभिचार ही केवळ शारीरिक क्रिया नाही. त्याची सुरूवात हृदयातून होते. ती खूप खोलवर जाते. बाह्य नियमांच्या संहितेशी सुसंगत असल्यास अस्तित्वाचे सत्य केले जात नाही. येशू आम्हांला खूप जास्त मागणी देतो आणि धर्मदाय तत्वाचे कठोर तत्व जे सहन होत नाही. औपचारिकता आणि अधिक बाह्यतेचा ढोंगीपणा त्यानुसार येशू देखील प्रकट करतो की, पुरुष आणि स्त्रीला समान नैतिक प्रतिष्ठा आहे.
प्रार्थना :हे प्रभू येशू शुद्ध विचाराने जीवन आचरण करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या