सामान्य काळातील दहावा
गुरुवार १३ जून २०२४
प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.
First be reconciled to your brother, and then come and offer your gift.
पादुआचे संत अंतोनी
वर्तनसाक्षी, धर्मपंडित (११९५-१२३१)
पोर्तुगालमधील लिस्बन शहरात जन्मलेला फर्डिनंड बुइलॉन प्रारंभी संत अगस्तीनच्या संस्थेत दाखल झालेला होता. परंतु पुढे १० वर्षानी जेव्हा फ्रान्सिस्कन रक्तसाक्ष्यांचे देह मोरोक्कोहून पोर्तुगालला आणण्यात आले तेव्हा त्याच्याठायी रक्तसाक्षी बनण्याची तीव्र उत्कंठा उत्पन्न झाली. त्याच्या धर्मबंधूंनी त्याला भिक्षुकांच्या संस्थेत प्रवेश घेण्यास प्रोत्साहन दिले. एक फ्रान्सिस्कन भिक्षुक म्हणून त्याने अंतोनी हे नाव धारण केले.
पुढे मोरोक्को येथे पोहोचल्यानंतर तो गंभीररित्या आजारी झाला. त्यामुळे आपण आपल्या मिशनकार्यावरून माघारी परतावे असा त्याने निर्णय घेतला, परतताना मात्र त्याचे जहाज वादळात सापडले व ते सिसिलीच्या किनाऱ्याला लागले. त्याचवेळी असिसी येथे फ्रान्सिस्कन संस्थेची परिषद भरलेली होती. इ. स. १२२१ सालच्या त्या परिषदेला ३००० फ्रान्सिस्कन उपस्थित होते. त्या परिषदेला खुद्द संत फ्रान्सिस असिसीकर हे उपस्थित होते.
अत्यंत नम्र वृत्तीने त्याने आपली पुढे शिकण्याची इच्छा संत फ्रान्सिसजवळ व्यक्त केली. काही काळ त्याला फॉर्लीनजीकच्या एका मठात काबाडकष्ट करण्यासाठी पाठविण्यात आले. त्यावेळी एका धर्मगुरूदीक्षेच्या प्रसंगी त्याने केलेल्या भाषणामुळे त्याला वक्तृत्वाची देणगी असल्याचे सिद्ध झाले.पवित्र शास्त्रातील उताऱ्यावर अंतोनी तर अत्यंत नम्रपणे इतके सुंदर स्पष्टीकरण देत असे की (संत) फ्रान्सिसने त्याला आपल्या धर्मबंधूचे ईशज्ञानाचे वर्ग घेण्यास नियुक्त केले. मात्र हे करीत असताना त्याची भक्ती आणि प्रार्थनाशील वृत्ती यावर परिणाम होणार नाही ह्याची काळजी घेण्यास सांगितले! त्यानंतर अंतोनीने दक्षिण फ्रान्समध्ये आणि उत्तर इटलीमध्ये आपल्या स्पष्ट, खणखणीत व मधूर आवाजात प्रवचनाद्वारे सुवार्ताप्रसाराचे कार्य हाती घेतले.
वक्तृत्व आणि विद्वत्ता या कलागुणांव्यतिरिक्त देवाने त्याला चमत्कार करण्याचे, अन्य भाषेत बोलण्याचे आणि संदेश देण्याचे पैलू दिले होते. दहशतवाद, द्वेष, तिरस्कार अशा विकृतींवर त्यांनी आपल्या प्रभावी वक्तव्याने घणाघाती हल्ले चढविले. "पांखडवाद्यांवर उगारलेला हातोडा" असे नामाभिमान प्राप्त झालेल्या अंतोनी ह्याची प्रवचने ऐकण्यासाठी कधीकधी ३०,००० लोक येत असत. त्यांच्या प्रवचनानंतर प्रायश्चित्त संस्कार घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असायची की त्यापुढे धर्मगुरूचा फार मोठा तुटवडा पडत असे.
त्यांच्या प्रवचनानंतर काहींच्या जीवनातील शत्रूत्व कायमचे नाहीसे झाले, अनेकांची कर्जे माफ केली गेली, बऱ्याच जणांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले. मोठमोठे दरोडेखोर एकदम प्रामाणिक जीवन जगू लागले. लबाडी करणाऱ्यांनी आपल्याकडील चोरीच्या वस्तू परत केल्या. भ्रष्टाचार टाळण्यासाठी सरकारने कायदे कडक केले.
असा हा प्रभावी सुवार्तिक १३ जून १२३१ रोजी वयाच्या केवळ ३६ व्या वर्षी मरण पावला. केवळ एका वर्षातच त्याला संतपद बहाल करण्यात आले. इ. स. १९४६ साली पोप पायस बारावे ह्यांनी त्यांना धर्मपंडित ही पदवी दिली.
त्यांना पोर्तुगालचा आश्रयदाता संत म्हणून गौरविण्यात आलेले आहे. प्रवासी, गर्भवती व निःसंतान स्त्रिया ह्यांचाही तो आश्रयदाता संत मानला जातो. हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी आणि वादळात बचाव होण्यासाठी त्याचा धावा केला जातो.
चिंतन : पवित्र मरियेचे नाव आपल्या ओठांना मधापेक्षाही गोड, आपल्या कानांना कोणत्याही मधुर गीतापेक्षा श्रवणीय आणि आपल्या हृदयाला अतिशुद्ध आनंदापेक्षा अधिक मौल्यवान असे आहे. -पादुआचे संत अंतोनी
पहिले वाचन :१राजांच्या १८:४१-४६
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“एलियाने प्रार्थना केली आणि आकाशातून पाऊस पडला."
एलिया आहाबला म्हणाला, “ऊठ, खा, पी; विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे." मग अहाब खाण्यापिण्याकरिता वरती गेला. इकडे एलिया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले. त्याने आपल्या चाकराला सांगितले, “वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव." त्याने जाऊन पाहिले आणि म्हटले, "काही दिसत नाही." एलिया म्हणाला, “आणखी सातदा जा." सातव्या खेपेस तो म्हणाला, "पाहा, समुद्रातून मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग वर येत आहे." एलिया म्हणाला, “अहाबकडे जाऊन सांग, 'रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही.' " थोड्याच वेळाने मेघ आणि तुफान ह्यांनी आकाश काळेभोर झाले आणि धो धो पाऊस पडला. अहाब रथात बसून इज्रेलला चालला होता. परमेश्वराचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कमर बांधून अहाबपुढे इज्रेलच्या वेशीपर्यंत धावत गेला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
✝️
First Reading :1 Kings 18:41-46
In those days: Elijah said to Ahab, "Go up, eat and drink, for there is a sound of the rushing of rain. So Ahab went up to eat and to drink And Elijah went up to the top of Mount Carmel. And he bowed himself down on the earth and put his face between his knees. And he said to his servant, "Go up now, look towards the sea." And he went up and looked and said, "There is nothing." And he said, "Go again," seven times. And at the seventh time he said, "Behold, a little cloud like a man's hand is rising from the sea." And he said, "Go up, say to Ahab, 'Prepare your chariot and go down, lest the rain stop you." And in a little while the heavens grew black with clouds and wind, and there was a great rain. And Ahah rode and went to Jezreel. And the hand of the Lord was on Elijah, and he gathered up his garment and ran before Ahab to the entrance of Jezreel.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ६५:१०-१३
प्रतिसाद : हे देवा, सियोनात तुझी स्तुती होवो.
१) तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस,
तू तिला फार फलद्रूप करतोस.
देवाची नदी जलपूर्ण आहे,
भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस.
२) नांगरलेल्या जमिनीला तू भरपूर पाणी देतोस,
तिचे उंचवटे सपाट करतोस,
तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस,
तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस.
३ )तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस.
तुझे मार्ग समृद्धिमय झाले आहेत,
रानातली कुरणेही समृद्ध होतात.
Psalm Psalm 65:10abcd, 10e-11, 12-13
Praise is due to you in Sion, O God.
You visit the earth, give it water;
you fill it with riches.
God's ever-flowing river brims over
to prepare the grain. R
And thus you provide for the earth:
you drench its furrows;
you level it, soften it with showers:
you bless its growth. R
You crown the year with your bounty.
Abundance flows in your pathways;
in pastures of the desert it flows.
The hills are girded with joy. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
आलेलुया!
Acclamation:
A new commandment I give to you, says the Lord, that you love one another, just as I have loved you.
शुभवर्तमान मत्तय ५:२०-२६
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो कोणी आपल्या भावावर रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी तुम्हाला सांगतो, शास्त्री आणि परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश नाही.
"खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडाला पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच ) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, 'अरे वेडगळा' असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेला पात्र होईल आणि जो कोणी त्याला 'अरे मूर्खा', असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेला पात्र होईल. ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खरोखर सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस.
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: Matthew 5:20-26
At that time: Jesus said to his disciples, "For I tell you, unless your righteousness exceeds that of the scribes and Pharisees, you will never enter the kingdom of heaven. "You have heard that it was said to those of old, You shall not murder, and whoever murders will be liable a to judgment. But I say to you that everyone who is angry with his brother will be liable to judgment; whoever insults his brother will be liable to the council; and whoever says, 'You fool!' will be liable to the hell of fire. So if you are offering your gift at the altar and there remember that your brother has something against you, leave your gift there before the altar and go. First be reconciled to your brother, and then come and offer your gift. Come to terms quickly with your accuser while you are going with him to court, lest your accuser hand you over to the judge, and the judge to the guard, and you be put in prison. Truly, I say to you, you will never get out until you have paid the last penny.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: येशू त्याच्या अनुयायांनी अधिक पवित्रतेने जगले पाहिजे. असा जोरदार आग्रह धरतो. नंतर त्याच्या काळातील यहुदी नेत्यांनी आज्ञा पाळणे पुरेसे नाही. आत्म्याने देखील खूनटाळणे पुरेसे नाही. आपण आपल्या सहमानवांना दुखवू नये किंवा त्यांचा अपमान करू नये. जर आपण दुसऱ्याबरोबर शांततेत नसलो तर तो कोणाचाही दोष असला तरी आपण आवश्यक पावले उचलली पाहिजे. सलोखा आणि शांतता प्रस्थापित करण्याचे काम, दुसऱ्याबरोबर शांतता प्रस्थापित करणे. वेदीवर भेटवस्तू देण्यापेक्षा प्राधान्य द्या. हा राज्याचा नविन न्याय आहे. स्वर्गातील गुणवत्तेचा समावेश नाही. विविध विधी परंतु प्रेमळ देवाची चांगली प्रतिमा बनवा.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तू महायाजक बनून आम्हा सर्वांना परमेश्वर पित्याच्या देवराज्याचे सहभागीद्वारे बनवले आहेस. आम्हाला तुझी तारणदायी कृपा बहालकर, आमेन.
✝️
0 टिप्पण्या