Marathi Bible Reading | Thursday 6th June 2024 | 9th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील  नववा   सप्ताह 

 गुरुवार   दि. ६ जून  २०२४ 

जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.' ह्यांपेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही." You must love your neighbour as yourself. There is no commandment greater than these.' 



संत नॉर्बर्ट 
- महागुरु, वर्तनसाक्षी , (१०८०-११३४)

चिंतन : संत नॉबर्ट हे एक उत्तम प्रवचनकार होते. प्रभुशब्दावर सखोल मननचिंतन करून ते प्रभावी असे प्रवचन देत असत. भारदस्त आवाज, सद्विचारांची पखरण, चांगुलपणाविषयी तळमळ व ज्ञान संपन्नता ही त्यांच्या प्रवचनांची खास वैशिष्ट्य होती.

 देव प्रीति आहे. तो मानवावर निरपेक्ष प्रेम करतो म्हणूनच आपण देवावर प्रेम करणे ही पहिली आज्ञा प्रभूयेशूने दिली. देवाने आपल्याला त्याच्या प्रीतिचे सर्वोत्कृष्ठ दान दिलेले आहे. प्रीतिचे हे दान स्वतः पुरतेच मर्यादित नसून प्रेम हे सर्वांना देण्यासाठी आहे. म्हणूनच प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात  म्हणतो, 'जशी स्वतःवर तशीच आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर'. आज आपण  देवमीति व परस्पर प्रीति ह्या विषयावर चिंतन करु या. देवाचे प्रेम मी अनुभवले  आहे का ? देवाच्या प्रेमाचा साक्षात्कार मला झाला आहे का ? सर्व प्रसंगी व सर्व परिस्थितीमध्ये आपण देवावर प्रेम करुन त्याला धन्यवाद देतो का ? त्याची उपकार स्तुति करतो का ? स्वतः इतकेच मी इतरांवर प्रेम करतो का ? परस्पर प्रेमाची आज्ञा मला कळली आहे का ?
देवावर प्रीति करणे व शेजाऱ्यावर प्रीति करणे म्हणजे काय व ते आचरणात कसे आणावे हे जर आपण जाणले असेल तर 'देवाच्या राज्यापासून आपण दूर नाही.'
✝️

पहिले वाचन  तीमथीला २:८-१५
वाचक : पौलचे तीमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. जर आपण ख्रिस्त येशूबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू."

माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठवलेला, दावीदच्या संतानातील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव. ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यासारखा बेड्यांचे देखील दुःख सोशीत आहे. तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्याच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे, "जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू, जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू, आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील, आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही."
तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण दे. त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, शब्दयुद्ध करू नका, ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यात होईल तितके कर.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
2 Timothy 2:8-15

Remember the gospel that I carry, 'Jesus Christ risen from the dead, sprung from the race of David'; it is on account of this that I have to put up with suffering, even to being chained like a criminal. But God's message cannot be chained up. So I persevere for the sake of those who are chosen, so that they, too, may obtain the salvation that is in Christ Jesus with eternal glory. Here is a saying that you can rely on: If we have died with him, then we shall live with him. If we persevere, then we shall reign with him. If we disown him, then he will disown us. If we are faithless, he is faithful still, for he cannot disown his own self. Remind them of this; and tell them in the name of God that there must be no wrangling about words: all that this ever achieves is the destruction of those who are listening. Make every effort to present yourself before God as a proven worker who has no need to be ashamed, but who keeps the message of truth on a straight path.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  २५:४-५,८-९,१०.१४

प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्या वाटा मला दाखव.

१ हे परमेश्वरा, तुझ्या वाटा मला दाखव.
तुझे मार्ग मला प्रकट कर.
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव. 
मला शिक्षण दे; कारण तूच माझा उद्धारक देव आहेस.

२ परमेश्वराचा करार आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांना 
त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय आणि सत्यपूर्ण आहेत.
 परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते; 
तो आपला करार त्यांना कळवील.

Psalm 25:4-5ab, 8-9, 10 & 14
O Lord, make me know your ways.
 
Your ways, O LORD, make known to me;
teach me your paths,
Guide me in your truth and teach me,
for you are God my savior.

Good and upright is the LORD;
thus he shows sinners the way.
He guides the humble to justice,
he teaches the humble his way.

All the paths of the LORD are kindness and constancy
toward those who keep his covenant and his decrees.
The friendship of the LORD is with those who fear him,
and his covenant, for their instruction.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
हे प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे मन वळव आणि तुझे नियम मला शिकव
 आलेलुया!

Acclamation: 
 Our Savior Jesus Christ has destroyed death
and brought life to light through the Gospel.


शुभवर्तमान मार्क १२:२८-३४
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर."

शास्त्र्यांपैकी एक जण येशूकडे पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, "सर्वात पहिली आज्ञा कोणती?' येशूने उत्तर दिले, "पहिली ही की, 'हे इस्राएल, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर.' दुसरी ही की, 'जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.' ह्यांपेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही." तो शास्त्री त्याला म्हणाला, "गुरुजी, आपण ठीक आणि खरे बोलतात की, तो देव एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व होमार्पणे आणि यज्ञ ह्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे." त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, "तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस." तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही.
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:Mark 12:28-34

One of the scribes who had listened to Jesus debating appreciated that Jesus had given a good answer and put a further question to him, 'Which is the first of all the commandments?' Jesus replied, 'This is the first: Listen, Israel, the Lord our God is the one, only Lord, and you must love the Lord your God with all your heart, with all your soul, with all your mind and with all your strength. The second is this: You must love your neighbour as yourself. There is no commandment greater than these.' The scribe said to him, 'Well spoken, Master; what you have said is true, that he is one and there is no other. To love him with all your heart, with all your understanding and strength, and to love your neighbour as yourself, this is far more important than any burnt offering or sacrifice.' Jesus, seeing how wisely he had spoken, said, 'You are not far from the kingdom of God.' And after that no one dared to question him any more.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजच्या शुभवर्तमानामध्ये लेखकाला "जीवन म्हणजे काय?" हे माहित होते. तो जाणतो की, चर्चने अधिकृतपणे ठरवलेली सार्वजणिक प्रार्थना व प्रार्थनाविधी देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम करण्याच्या बाबतीत ते फक्त दुय्यम होते. आपल्याला त्याच्यामध्ये विचारसरणीची व्यक्ती सापडते. कोणताही संकोच न करता तो येशूने बोललेल्या सत्याशी सहमत झाला. सर्वांत महत्वाच्या आज्ञांबद्दल प्रेमाच्या या आज्ञा तो म्हणाला, "कोणत्याही होमार्पण किंवा यज्ञांपेक्षा ते अधिक मोलाचे होते. येशूने शास्रकारांची आज्ञा समजूनघेतल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. ज्याने देवाच्या राज्याच्या जवळ आणले. परंतु केवळ ज्ञान आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश करू देणार नाही. लेखकाप्रमाणे आम्हालाही "उत्तर माहित आहे.” आपल्या जीवनातील सर्वांत महत्वाच्या प्रश्नासाठी तरीही देवाच्या राज्यापासून दूर राहू शकतो. वचन दिलेल्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपण आपल्या जीवनात दररोज आज्ञा जगली पाहीजे.

प्रार्थना :  हे प्रेमळ पित्या, तुझ्या प्रेमाचा अंकूर माझ्या अंत:करणात वाढावा व ते प्रेम मी इतरांना देण्यास प्रवृत्त व्हावे म्हणून मला तुझी कृपा दे, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या