सामान्यकाळातील नववा सप्ताह
शुक्रवार दि. ७ जून २०२४
शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले. one of the soldiers pierced his side with a spear, and at once there came out blood and water.
प्रभूयेशूच्या अति पवित्र हृदयाचा सोहळा
ख्रिस्तसभा आज प्रभूयेशूच्या अति पवित्र हृदयाचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभूयेशूचे हृदय सर्वांना त्याच्या वेंगेत घेण्यासाठी सदैव तयार आहे. प्रभू येशू दयेचा, प्रेमाचा, चांगुलपणाचा आणि कृपेचा महासागर आहे. त्याच्या अतिपवित्र हृदयातून कृपेचा झरा अखंडपणे वाहत असतो. ख्रिस्त आपणास म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्वजण मजकडे या, मी तुम्हांला विसावा देईन" (मत्तय ११:२८).
आज प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाचा आपण सन्मान करीत आहोत. ख्रिस्त प्रभू त्याचे दोन्ही बाहू पसरुन आपल्याला त्याच्या हृदयाशी कवटाळण्यासाठी तयार आहे. आपल्या सर्व वेदना, कष्ट, संकटे, दु:खे, चिंता व ईश्वरापासून जे जे आपणास दूर घेऊन जाते अशा सर्व घटना विचार घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला आपले सर्वस्व समर्पित करु या. त्याच्या हृदयातू अखंडपणे वाहत असलेल्या कृपेच्या झऱ्यातून तो आपणास अंतर्यामी बलसंपन्न करावयास तयार आहे.
प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदया आम्हा पाप्यांवर दया कर!
पहिले वाचन होशेय ११:१,३-४, ८-९
वाचक : होशेयच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझे हृदय आतल्या आत आक्रोश करत आहे."
परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली, मी त्याला आपला पुत्र म्हणून इजिप्तमधून बोलावले. मीच एफ्राइमला चालायला शिकवले, मी त्यांस आपल्या कवेत वागवले आणि मी त्याला बरे केले, पण ते त्याला ठाऊक नाही. मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी मी त्याला ओढले, बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणाऱ्यासारखा मी त्याला झालो, त्याला मी ममतेने खाऊ घातले.
माझे हृदय आतल्या आत आक्रोश करत आहे, माझ्या कळवळ्याला ऊत आला आहे. मी आपल्या क्रोध संतापाप्रमाणे करणार नाही, मी एफ्राइमचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही. कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे. तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे, मी क्रोधावेशाने येणार नाही.
First Reading :
Hosea 11:1.3-4.8c-9
Thus says the Lord: When Israel was a child, I loved him, and out of Egypt I called my son. Yet it was I who taught Ephraim to walk; I took them up by their arms, but they did not know that I healed them. I led them with cords of kindness, with the bands of love, and I became to them as one who eases the yoke on their jaws, and I bent down to them and fed them. My heart recoils within me; my compassion grows warm and tender. I will not execute my burning anger; I will not again destroy Ephraim; for I am God and not a man, the Holy One in your midst, and I will not come in wrath.
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र यशया १२: २-६
प्रतिसाद : तुम्ही तारणकूपातून उल्हासाने पाणी काढाल.
१.) पाहा, देव माझे तारण आहे, मी विश्वास ठेवतो, भीत नाही. कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे, तो मला तारण झाला आहे.
तेव्हा तुम्ही तारणकूपातून उल्हासाने पाणी काढाल.
२) त्या दिवशी तुम्ही म्हणाल, परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याच्या नावाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची महत्कृत्ये जाहीर करा, त्याचे नाव थोर आहे अशी वाखाणणी करा.
३) परमेश्वरापुढे गायन करा, कारण त्याची करणी प्रतापमय आहे, हे साऱ्या जगभर जाहीर होवो. अहो सीयोननिवासी लोकहो, जयघोष करा, गजर करा, कारण इस्राएलचा पवित्र प्रभू तुमच्याठायी थोर आहे.
Isaiah 12:2-3, 4bcde, 5-6 (R: 3)
With joy you will draw water from the wells of salvation.
"Behold, God is my salvation; I will trust,
and will not be afraid;
for the Lord God is my strength and my song,
and he has become my salvation."
With joy you will draw water from the wells of salvation. R
"Give thanks to the Lord, call upon his name;
make known his deeds among the peoples,
proclaim that his name is exalted." R
"Sing praises to the Lord, for he has done gloriously;
let this be known in all the earth.
Shout, and sing for joy, O inhabitant of Zion,
for great in your midst is the Holy One of Israel." R
दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र ३ : ८-१२.१४-१९
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"बुध्दीला अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखणे,"
मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृध्दीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे, ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिध्दीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी ह्यांना मंडळांच्या द्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य आणि हमीपूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. म्हणून मी विनंती करतो की, तुम्हाप्रीत्यर्थ मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हांला भूषणावह आहेत.
ह्या कारणास्तव स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक वंशाला ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की, त्याने आपल्या ऐश्वर्यांच्या समृध्दीप्रमाणे तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणांमध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घेण्यास आणि बुध्दीला अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे, अशा प्रकारे तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
Ephesians 3:8-12.14-19
Brethren: To me, though I am the very least of all the saints, this grace was given, to preach to the Gentiles the unsearchable riches of Christ, and to bring to light for everyone what is the plan of the mystery hidden for ages in God, who created all things, so that through the church the manifold wisdom of God might now be made known to the rulers and authorities in the heavenly places. This was according to the eternal purpose that he has realized in Christ Jesus our Lord, in whom we have boldness and access with confidence through our faith in him. For this reason I bow my knees before the Father, from whom every family in heaven and on earth is named, that according to the riches of his glory he may grant you to be strengthened with power through his Spirit in your inner being, so that Christ may dwell in your hearts through faith that you, being rooted and grounded in love, may have strength to comprehend with all the saints what is the breadth and length and height and depth, and to know the love of Christ that surpasses knowledge, that you may be filled with all the fullness of God.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रीती म्हणावी तर हीच.
देवाने तुम्हाआम्हावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले.
आलेलुया!
Acclamation:
Take my yoke upon you, says the Lord;
and learn from me, for I am gentle and lowly in heart.
शुभवर्तमान योहान १९:३१-३७
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला तेव्हा रक्त आणि पाणी बाहेर निघाले.'
तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशी शरिरे वधस्तंभावर राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता, म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहूद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन येशूबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे आणि दुसऱ्याचे पाय मोडले, परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे आणि आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, ह्यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. “त्याचे हाड मोडणार नाही” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की, “ज्याला त्यांनी भोसकले त्याच्याकडे ते पाहतील.”
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 19:31-37
Since it was the day of Preparation, and so that the bodies would not
remain on the cross on the Sabbath (for that Sabbath was a high day), the Jews asked Pilate that their legs might be broken and that they might be taken away. So the soldiers came and broke the legs of the first, and of the other who had been crucified with him. But when they came to lesus and saw that he was already dead, they did not break his legs. But one of the soldiers pierced his side with a spear, and at once there came out blood and water. He who saw it has borne witness- his testimony is true, and he knows that he is telling the truth that you also may believe. For these things took place that the Scripture might be fulfilled: "Not one of his bones will be broken." And again another Scripture says, "They will look on him whom they have pierced."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: येशूच्या पवित्र हृदयाचा सण आज आपण साजरा करीत आहोत. देवाकडून आम्हांला मिळालेली सर्वात मोठी भेट त्याचा मुलगा प्रभू येशू ख्रिस्त आहे. कालवारीच्या कुसावर जरी ते एक मुर्ख प्रेम दिसून येत असले तरी या प्रेमाच्या मूर्खपणाने आपल्याला मोक्ष मिळवून दिला आहे. अंगावरील जखमांनी व वधस्तंभावर खिळल्यामुळे मरण पावला. तेव्हा येशूने आपल्या आत्म्याचा श्वास सोडला. येशूच्या बाजूने जीवन देणारे पाणी आणि आपल्या तारणकर्त्यांचे मौल्यवान रक्त प्रवाहित केले. आपला जीव देताना त्याने तो फक्त स्वतःसाठी नाही तर जगासाठी दिला. दुसऱ्या वाचनात संत पॉल आपल्याशी देवाबद्दल बोलतो. स्वतःचे जीवन बिनशर्त आम्हांला देणे आणि येशू आपल्यासाठी बिनशर्त प्रेमाचे चित्र काढतो. आजच्या शुभवर्तमानात हरवलेल्या मेंढराची कथा, वडिलांचे प्रेम कसे विस्तारले जाते याचे वर्णन केले आहे. त्यांच्यापासून दूर जाणारे देखील येशूला येथे सांगायचे आहे की, प्रत्येक व्यक्तीवर देवाचे प्रेम आहे. प्रत्येक मेंढराला नावाने ओळखणाऱ्या मेंढपाळां- सारखा तो माणूस होता. हरवलेल्या मेंढराला वाचवण्यासाठी स्वतःला झोकून देईल. वन्य प्राण्यांना बळी पडणे. पवित्र हृदयाची प्रतिमा करायची ज्योत असते. देवाचे प्रेम अंतहीन जळते हे दर्शविते. सर्व मानवांना वाचवण्यासाठी, आम्ही कधी-कधी बाप्तिस्मा आणि ख्रिस्तशरीर म्हणून वापरले जाते. त्याच्या घायाळ शरीरातून आणि भोसकलेल्या हृदयातून बाहेर पडते हे आपण विसरलो.
प्रार्थना : हे येशूच्या अतिपवित्र हृदया, आम्ही सर्वदा तुझ्या सहवासात असावे आणि तुझी वाणी ऐकून त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या