सामान्यकाळातील नववा सप्ताह
शनिवार दि. ८ जून २०२४
जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ?” Did you not know that I must be in my Father's house?"

पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सण
“बाळा, तू आमच्याबरोबर असा कां वागलास ?”
पवित्र मरियेला परमेश्वराने आपल्या पुत्राची माता होण्यासाठी निवडले असतांना ती फार गोंधळून गेली होती. तरीसुद्धा परमेश्वराची इच्छा प्रमाण मानून तिने देवाच्या योजनेला पूर्णपणे प्रतिसाद दिला. अखिल मानवांच्या मुक्ततेसाठी ती देवपुत्राची माता बनली.
आज ख्रिस्तसभा पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सण साजरा करीत आहे. पवित्र मरियेला बाळपणापासूनच श्रद्धेचे बाळकडू पाजलेले होते. प्रार्थना, नीतिमत्ता, परोपकार व सेवा यामुळे तिच्या जीवनात देवासाठी प्रेम व बंधुजनांसाठी तळमळ निर्माण झाली होती. गाब्रियल दुताने तिला 'कृपापूर्ण' म्हटले आहे, कारण ती खरोखर निष्कलंक आणि निर्मळ होती.
परमेश्वराची दासी बनलेली मरिया आजच्या शुभवर्तमानात सुद्धा आपणांस गोंधळून गेलेली आढळते. बारा वर्षांचा बाळ येशू येरुशलेमच्यामंदिरात हरवला असतांना ती बावरली. ती म्हणाली, 'बाळा, तू आमच्याबरोबर असा कां वागलास?' परंतू सत्य समजताच मरियामाता अंतर्मुख बनली. तिने ती घटना हृदयाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवली, कारण ती येशू बाळा विषयीचे भाकित जाणून होती. पवित्र मरियेसारखे पवित्र, प्रार्थनामय व सेवाभावी जीवन जगण्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून तिच्या चरणाशी एकत्र येऊ या. तिच्या निष्कलंक हृदयातून सर्वांसाठी कृपेचा व प्रेमाचा झरा वाहत आहे.
पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदया आम्हा पाप्यांवर दया कर!
✝️
पहिले वाचन : यशया ६१:९-११
वाचक : यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
अन्य राष्ट्रात माझ्या लोकांचा वंश, देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल, परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती ही असे त्यांस पाहणारे कबूल करतील. मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्हासतो. कारण जसा वर शेलापागोटे परिधान करून स्वतःला याजकासराखा मंडित करतो आणि वधू जशी अलंकारांनी स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादले आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवितो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील.
First Reading :
Isaiah 61:9-11
The offspring lof my people! shall be known among the nations, and their descendants in the midst of the peoples; all who see them shall acknowledge them, that they are an offspring the Lord has blessed. I will greatly rejoice in the Lord; my soul shall exult in my God, for he has clothed me with the garments of salvation; he has covered me with the robe of righteousness, as a bridegroom decks himself like a priest with a beautiful headdress, and as a bride adorns herself with her jewels. For as the earth brings forth its sprouts, and as a garden causes what is sown in it to sprout up, so the Lord God will cause righteousness and praise to sprout up before all the nations.
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १ शमुवेल २:१,४-८
प्रतिसाद : परमेश्वराच्या ठायीं माझे हृदय उल्लासत आहे
१.) परमेश्वराच्या ठायीं माझे हृदय उल्लासत आहे;
परमेश्वराच्या ठायीं माझा का उत्कर्ष झाला आहे;
माझे मुख माझ्या शत्रूविरुद्ध उघडलें आहे.
कारण तूं केलेल्या उद्धारानें मला आनंद होत आहे.
२) शूर वीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत
जे लटपटत होते त्यांच्या कमरेस बलरूप कमरबंद चढविला आहे.
जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत.
जे क्षुधित होते त्यांस आतां आराम प्राप्त झाला आहे,
वंध्येला सात मुले झाली आहेत बहुपुत्रवती क्षीण झाली आहे.
३) परमेश्वर प्राण हरण करितो आणि प्राणदानहि करितो;
तो खालीं अधोलोकीं नेतो आणि तो वरहि आणतो.
परमेश्वर निर्धन करितो व धनवानहिं करितो;
शिक्ष तो अवनत करितो व उन्नतहि करितो
४) तो कंगालांस धुळीतून उठवितो,
दरिद्र्यांस उकिरड्यावरून उचलून उभे करितो.
म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात,
आणि वैभवी सिंहासन त्यांस प्राप्त होते;
कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत,
त्यांवर त्यानें दुनिया ठेविली आहे.
1 Samuel 2:1, 4-5, 6-7, 8abcd (1a)
My heart exults in the Lord, my Saviour.
My heart exults in the Lord;
my horn is exalted in the Lord.
My mouth derides my enemies,
because I rejoice in your salvation. R
The bows of the mighty are broken,
but the feeble bind on strength.
Those who were full have hired themselves out for bread,
but those who were hungry have ceased to hunger.
The barren has borne seven,
but she who has many children is forlom.
The Lord kills and brings to life;
he brings down to Sheol and raises up.
The Lord makes poor and makes rich:
he brings low and he exalts. R
He raises up the poor from the dust:
he lifts the needy from the ash heap
to make them sit with princes
and inherit a seat of honour. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
ज्या आईने ह्या देवाचा सर्व गोष्टी आपल्या हृदयात ठेवून चिंतन केले ती धन्य
आलेलुया!
Acclamation:
Blessed is the Virgin Mary, who kept the word of God,
pondering it in her heart.
शुभवर्तमान लूक २:४१:५२
वाचक :लूक लिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूचे आईबाप दरवर्षी वल्हांडण सणास यरुशलेमास जात असत, तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे निघाले, तेव्हा तो मुलगा येशू यरुशलेमात मागे राहिला हे त्याच्या आईवडिलांस कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग आणि ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते त्याचा शोध करत करत यरुशलेमास परत गेले. तीन दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना आणि त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्वत्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरावरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास ? पाहा, तुझे वडील आणि मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध करत राहिला हे कसे ? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ?” परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेथास गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला.त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मन ठेवल्या. “येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या मर्जीत वाढत गेला.”
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Luke 2:41-51
The parents of Jesus went to Jerusalem every year at the Feast of the Passover. And when he was twelve years old, they went up according to custom. And when the feast was ended, as they were returning, the boy Jesus stayed behind in Jerusalem. His parents did not know it, but supposing him to be in the group they went a day's journey, but then they began to search for him among their relatives and acquaintances, and when they did not find him, they returned to Jerusalem, searching for him. After three days they found him in the temple, sitting among the teachers, listening to them and asking them questions. And all who heard him were amazed at his understanding and his answers. And when his parents saw him, they were astonished. And his mother said to him, "Son, why have you treated us so? Behold, your father and I have been searching for you in great distress." And he said to them, "Why were you looking for me? Did you not know that I must be in my Father's house?" And they did not understand the saying that he spoke to them. And he went down with them and came to Nazareth and was submissive to them. And his mother treasured up all these things in her heart.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: जर येशूच्या पवित्र हृदयाचा सण येशूमध्ये दर्शविल्याप्रमाणे लोकांवरील देवाचे प्रेम दर्शविते. त्याप्रमाणे मरियेचा निष्कलंक हृदयाचा सण देखील आपणांस प्रेम दर्शविते. मरियेचे प्रेम देवाने आम्हांला दाखविले. आजची उपासना आपल्याला पत्नी आणि आईचे उदाहरण देते. जीने आपला पती व मुलावर प्रेम करून देवावर प्रेम केले. हे कार्य जे आपल्याला वाटते तितके सोपे नव्हते. मरियेने कुटुंबावरील तिच्या प्रेमावर देवावरील तिचे प्रेम सिद्ध केले. बिनशर्त आणि तिच्या स्वर्गीय पित्याला होय. देवावरील आपले प्रेम आपल्याला प्रेमळ लोकांद्वारे दिसून येते. पती-पत्नीचे परस्पर प्रेम, आईवडील त्यांच्या मुलांसाठी आणि मुले त्यांच्या पालकांसाठी, शत्रूनी मित्रावर प्रेम करणे हे देवावरील आपल्या प्रेमाचे प्रदर्शन आहे. मरियेचे निष्कलंक हृदय आपल्याला देवावर प्रेम करण्यास आमंत्रित करते. तिच्या उदाहरणानंतर निःस्वार्थी आणि शुद्ध अंतःकरणाने देवाचे प्रेम आम्हांवर वर्षाव करते.
प्रार्थना : हे पवित्र देवमाता, आम्हां पाप्यांसाठी तुझ्या प्रिय पुत्राकडे विनंती कर, आमेन.
✝️
0 टिप्पण्या