Marathi Bible Reading | Sunday 9th June 2024 | 10th Week in Ordinary Time

सामान्य काळातील दहावा  

रविवार ९जून २०२४ 


जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई.

Whoever does the will of God is my brother, and sister, and mother

✝️
प्रभू येशू अविरतपणे देवराज्याची सुवार्ता पसरवित असतांना असंख्य माणसे त्याच्याकडे आरोग्य दानासाठी येत होती. विशेषतः भूतग्रस्तांना मुक्ती मिळत होती. मात्र त्याच्या स्वकीयांनी त्याला वेड्यात काढले. तसेच यहुदी  शास्त्री गणांनी तर येशू भूताच्या अधिषतीच्या साहाय्याने भूत काढतो असा आरोप लावला. मात्र प्रभू येशूने त्यांना समर्पक उत्तर देऊन त्यांच्या कठोर  प्रकृतीचा निषेध केला म्हटले, 'आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही.' प्रभू  येशूला देवपुत्र आणि तारणारा म्हणून स्वीकारण्यास नकार देणाऱ्या सर्व  माणसांवर जणू सैतानाचीच अधिसत्ता होती. खऱ्या अर्थाने त्या सर्वांना बंधमुक्त होण्याची गरज होती.
प्रभू येशू सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक बंधनातून
मुक्ती देणारा प्रभू आहे. आपल्या अंतःकरणात असलेल्या द्वेषाची, सुडाची 
आणि अशुद्धतेची भावना आपण नम्रपणे प्रभू समोर ठेवू या. प्रभू येशूच्या  आपल्या मुक्तीदान म्हणून स्वीकारु या. संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात 
 आपल्याला आशेने जीवन जगण्याचा सल्ला देत आहे. प्रभू वरील विश्वासात 
 प्रभूला समर्पित कराव्या म्हणजे सार्वकालिक वैभवात आपणांस प्रवेश करता येईल.
✝️             

पहिले वाचन :उत्पत्ती ३:९-१५

वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन ३:९-१५

"तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन."

परमेश्वर देवाने आदामला हाक मारून म्हटले, "तू कोठे आहेस?" तो म्हणाला, "मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो." देवाने म्हटले, "तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले ? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय ? आदाम म्हणाला, "जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले." परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, "हे तू काय केलेस ?" स्त्री म्हणाली, "सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले." तेव्हा परमेश्वर देव त्या सर्पास म्हणाला, "तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशू आणि वनचर यांपेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील आणि तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील आणि तू तिची टाच फोडशील."
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Gn 3: 9-15

But the Lord God called to the man, and said to him, “Where are you?” And he said, “I heard the sound of thee in the garden, and I was afraid, because I was naked; and I hid myself.” He said, “Who told you that you were naked? Have you eaten of the tree of which I commanded you not to eat?” The man said, “The woman whom thou gavest to be with me, she gave me fruit of the tree, and I ate.” Then the Lord God said to the woman, “What is this that you have done?” The woman said, “The serpent beguiled me, and I ate.” The Lord God said to the serpent,
“Because you have done this,
cursed are you above all cattle,
and above all wild animals;
upon your belly you shall go,
and dust you shall eat all the days of your life.
I will put enmity between you and the woman,
and between your seed and her seed;
he shall bruise your head,
and you shall bruise his heel.”


This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  :१-२,३-४,५-६,७-८

प्रतिसाद : प्रभूठायी दया आहे.

१ हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करत आहे,
 हे प्रभो, माझी वाणी ऐक
 माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत.

२ हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील,
 तर हे प्रभो, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील ?
तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.

३ माझा जीव परमेश्वराची अपेक्षा करतो, 
मी त्याच्या वचनाची आशा धरतो, 
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यांपेक्षा, 
माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.

४ हे इस्राएल परमेश्वराची आशा धर, 
कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे. 
त्याच्याजवळ उद्धाराचे महान सामर्थ्य आहे 
तो इस्राएलला त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करील.

Psalm  130:1-2, 3-4, 5-6, 7-8
1 [Song of Ascents] From the depths I call to you, Yahweh:

2 Lord, hear my cry. 
Listen attentively to the sound of my pleading!
3 If you kept a record of our sins, Lord, 
who could stand their ground?

4 But with you is forgiveness, 
that you may be revered.
5 I rely, my whole being relies, 
Yahweh, on your promise.

6 My whole being hopes in the Lord, 
more than watchmen for daybreak; 
more than watchmen for daybreak7 

let Israel hope in Yahweh. 
For with Yahweh is faithful love, 
with him generous ransom;8
 and he will ransom Israel from all its sins.


दुसरे वाचनकरिंथकरांस दुसरे पत्र ४:१३-५:१
वाचक :पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही."

"मी विश्वास धरला म्हणून बोललो,” ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हांला ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हालाही उठवील आणि तुमच्याबरोबर सादर करील. कारण सर्व काही तुम्हांकरिता आहे, ह्यासाठी पुष्कळ जणांच्याद्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभारप्रदर्शनाला साधनीभूत व्हावी.म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. कारण आम्हांवर येणारे तात्कालिक आणि हलके संकट हे आम्हांसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.
आम्हाला ठाऊक आहे की, आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले तर देवाने आम्हांसाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second reading : 2 Cor 4: 13-5:1

Since we have the same spirit of faith as he had who wrote, “I believed, and so I spoke,” we too believe, and so we speak, knowing that he who raised the Lord Jesus will raise us also with Jesus and bring us with you into his presence. For it is all for your sake, so that as grace extends to more and more people it may increase thanksgiving, to the glory of God.

So we do not lose heart. Though our outer nature is wasting away, our inner nature is being renewed every day. For this slight momentary affliction is preparing for us an eternal weight of glory beyond all comparison, because we look not to the things that are seen but to the things that are unseen; for the things that are seen are transient, but the things that are unseen are eternal.

For we know that if the earthly tent we live in is destroyed, we have a building from God, a house not made with hands, eternal in the heavens.


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे; सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. आलेलुया !

 आलेलुया!

Acclamation: 
I am the living bread that came down from heaven,
says the Lord; if any one eats of this bread he will live for ever.

शुभवर्तमान मार्क  ३:२०-३५
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"सैतानाचा शेवट होणार आहे."

येशू घरी आला तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की, त्यांना जेवायलाही सवड होईना. हे पाहून येशूचे आप्त त्याला धरायला निघाले, कारण "त्याला वेड लागले आहे" असे त्याचे म्हणणे होते. तसेच येरुशलेमहून आलेले शास्त्री म्हणत होते, "त्याला बालजबूल लागला आहे आणि तो त्या भुतांच्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने भुते काढतो." तेव्हा येशू त्यांना आपणाजवळ बोलावून बोधकथेच्या रूपाने म्हणू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील ? आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठला आणि त्यांच्यात फूट पडली तर तोही नाही, त्याचा शेवट होणार. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही, त्याला 
बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.मी तुम्हास नक्की सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची आणि त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे.- "त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे,” असे ते म्हणत होते म्हणून येशू हे बोलला.
तेव्हा त्याची आई आणि त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्याच्याभोवती पुष्कळ लोक बसले होते, ते त्यालो म्हणाले, "पाहा, बाहेर आपली आई आणि आपले भाऊ आपला शोध करत आहेत." त्याने त्यांना उत्तर दिले, "कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ ?" मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, "पाहा, ही माझी आई आणि हे माझे भाऊ ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:Mark 3: 20-35

Then he went home; and the crowd came together again, so that they could not even eat. And when his friends heard it, they went out to seize him, for they said, “He is beside himself.” And the scribes who came down from Jerusalem said, “He is possessed by Beel´zebul, and by the prince of demons he casts out the demons.” And he called them to him, and said to them in parables, “How can Satan cast out Satan? If a kingdom is divided against itself, that kingdom cannot stand. And if a house is divided against itself, that house will not be able to stand. And if Satan has risen up against himself and is divided, he cannot stand, but is coming to an end. But no one can enter a strong man’s house and plunder his goods, unless he first binds the strong man; then indeed he may plunder his house. “Truly, I say to you, all sins will be forgiven the sons of men, and whatever blasphemies they utter; but whoever blasphemes against the Holy Spirit never has forgiveness, but is guilty of an eternal sin”—for they had said, “He has an unclean spirit.”

And his mother and his brethren came; and standing outside they sent to him and called him. And a crowd was sitting about him; and they said to him, “Your mother and your brethren are outside, asking for you.” And he replied, “Who are my mother and my brethren?” And looking around on those who sat about him, he said, “Here are my mother and my brethren! Whoever does the will of God is my brother, and sister, and mother

 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन:शुभवर्तमानात येशूच्या सेवेला लोकांच्या विविध प्रतिसादांचे वर्णन करतो. काहींनी त्याला मनापासून स्विकारले. त्यांचा प्रभू, शिक्षक, गुरू आणि अगदी मसिहा म्हणून आणि तो जेथे गेला तेथे त्याच्या मागे गेले. इतरांनी फक्त त्याच्या शिकवणीबद्दल विस्मय आणि आश्चर्य व्यक्त केले आणि काहींनी तर त्याच्याचमत्कारीक व्यवहारांवर टीका केली. पापी आणि जकातदारासह ज्यू अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. अनेकांनी त्याचा गैरसमज केला. जणू तो आपल्या मनातून निघून गेला आहे. आजच्या सुवार्तेमध्ये त्यांच्या स्वतःच्या लोकांनी त्याला पकडायचे होते. इतरांना त्याच्या शक्तीवर शंका होती. त्यांना वाटले की तो बालजबुलच्या साहाय्याने भूते काढत आहे. सर्व राष्ट्रांचा राजकुमार या शंकांचे स्पष्टीकरण करताना येशू त्यांची दृष्टता प्रकट करतो. जी त्यांच्या अंतःकरणाच्या जिद्दीतून निर्माण झाली होती. ह्या जिद्दीपणामुळे हृदयाला अडथळा निर्माण होतो. पवित्र आत्म्याच्या प्रचारांचा मार्गे मी येशूच्या सेवेला कसा प्रतिसाद देऊ? शुभवर्तमानामध्ये नोंदवलेले माझ्या जीवनातील कोणत्या भागात आहे ? मला माझे हृदय कठोर होण्याचा अनुभव येत आहे का ?

प्रार्थना हे प्रभू येशू, पूर्ण  विश्वासाने तुला अनुसरण्यास व तुझा सामर्थ्य आणि | कृपा अनुभवण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन.                 

✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या