सामान्य काळातील दहावा
सोमवार १० जून २०२४
"जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील."
“Blessed are the pure in heart, for they shall see God.
: संत जेटुलियुस व त्यांचे सहकारीरक्तसाक्षी (...१२०)
(संत) सिंफोरोझा हिचे पती जेटुलियुस हे ट्राजन व हेड्रियन ह्या सम्राटाच्या रोमन आर्मीमध्ये मोठ्या पदावर कार्य करीत होते. जेटुलियुस ह्यांचे परिवर्तन होऊन त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर इटलीतील तिवोली नजीकच्या सबाईन हिल्समधील आपल्या धनदौलतीची निगा राखण्याच्या हेतूने त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.
आपल्या रिकामटेकड्या वेळेत तो आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या ख्रिस्ती लोकांना गोळा करीत असे. त्यांना शिक्षण व प्रोत्साहन देई. एके दिवशी अशाचप्रकारे धर्मशिक्षण देण्यात तो गुंग असताना अचानक रोमन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर धाड टाकली. त्यांना अटक करण्याचा ह्या अधिकाऱ्याचा विचार होता. परंतु ज्या पद्धतीने जेटूलियुस आपल्या सवंगड्यासह बोलत होता ती
[2:28 pm, 9/6/2024] johnsondmonty: पद्धत, ती आत्मियता आणि जिव्हाळा पाहून ते अधिकारी ख्रिस्ती धर्माकडे ओढले गेले. त्या अधिकाऱ्यांमध्ये अमेन्शिअस नावाचा जेटूलियुसचा सख्खा भाऊ होता. ख्रिस्ती श्रद्धेत दृढ असूनही तो अजूनही रोमन मूर्तिपूजकांत राहिलेला होता. त्यानेदेखील या अधिकाऱ्यांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यात जेटूलियुस ह्याला पाठिंबा दिला.
ही घडलेली हकीकत सम्राटाच्या कानावर गेली. त्याने सिरिलियस ह्या अधिकाऱ्यांच्या धर्मांतराविषयी आणि जेटुलियूस व अमेन्शिअस ह्या बंधुद्वयांच्या सुवार्ताप्रसाराविषयी ऐकताच त्याचा राग भडकला आणि त्याने त्या तिघांना आपली श्रद्धा झिडकारून देण्याचे आवाहन केले. अन्यथा त्यांना देहान्त शिक्षा ठोठावण्यात येईल असे फर्मान देखील राजाने काढले. त्यांना चौकशी आयोगासमोर आणण्यात आले. पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या श्रद्धेबाबत प्रश्न करण्यात आले. तरीही तिघांनी आपली श्रद्धा भक्कम असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांना २७ दिवस तिवोलीच्या तुरूंगात पाठविण्यात आले. तिथे त्यांचे अतोनात हाल हाल करण्यात आले. शेवटी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. संत सिम्फोरोझा हिने आपल्या जमिनीत ह्या तिघांचे अवशेष पुरले.
✝️
पहिले वाचन :१ राजांच्या १७:१-६
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन १७:१-६
"एलिया इस्राएलच्या देवाचा सेवक आहे."
एलिया तिश्बी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबाला म्हणाला, "इस्राएलचा देव परमेश्वर ज्याचा सेवक मी आहे त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दंहिवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल." पुढे परमेश्वराचे वचन त्यांला प्राप्त झाले "येथून निघून पूर्व दिशेला जा आणि यार्दैनसमोरच्या करिंथ ओहळानजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील." परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तो यार्दैनसमोरच्या करिंथ ओहळानजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी आणि मांस सकाळ संध्याकाळ आणून देत आणि त्या ओहळाचे पाणी तो पिई.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :1 Kgs 17: 1-6
Now Eli´jah the Tishbite, of Tishber in Gilead, said to Ahab, “As the Lord the God of Israel lives, before whom I stand, there shall be neither dew nor rain these years, except by my word.” And the word of the Lord came to him, “Depart from here and turn eastward, and hide yourself by the brook Cherith, that is east of the Jordan. You shall drink from the brook, and I have commanded the ravens to feed you there.” So he went and did according to the word of the Lord; he went and dwelt by the brook Cherith that is east of the Jordan. And the ravens brought him bread and meat in the morning, and bread and meat in the evening; and he drank from the brook.
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १२१:१-२,३-४,५-६,७-८
प्रतिसाद : आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य मिळते.
१ मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो;
मला सहाय्य कोठून मिळेल ?
आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता
जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळते.
२ तो माझा पाय कदापि ढळू देत नाही !
तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पाहा,
इस्राएलच्या रक्षकाला झोप लागत नाही
आणि तो डुलकीही घेत नाही.
३ परमेश्वर तुझा रक्षक आहे,
परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे.
दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही
४ परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील,
तो तुझ्या जिवाचे रक्षण करील,
परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्वकाळ सुरक्षित करील.
Psalm 121: 1bc-2, 3-4, 5-6, 7-8
R. (2)
Our help is from the Lord, who made heaven and earth.
1bc I
have lifted up my eyes to the mountains, from whence help shall come to me.
2 My
help is from the Lord, who made heaven and earth.
R. Our
help is from the Lord, who made heaven and earth.
3 May
he not suffer thy foot to be moved: neither let him slumber that keepeth thee.
4 Behold
he shall neither slumber nor sleep, that keepeth Israel.
R. Our
help is from the Lord, who made heaven and earth.
5 The
Lord is thy keeper, the Lord is thy protection upon thy right hand.
6 The
sun shall not burn thee by day: nor the moon by night.
R. Our
help is from the Lord, who made heaven and earth.
7 The
Lord keepeth thee from all evil: may the Lord keep thy soul.
8 May the Lord keep thy
going in and thy going out; from henceforth now and for ever.
R. Our help is from the
Lord, who made heaven and earth.
आलेलुया, आलेलुया!
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
Rejoice and be glad; for your reward will be great in heaven.
शुभवर्तमान मत्तय ५:१-१२
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जे आत्म्याने दीन ते धन्य."
लोकसमुदायांना पाहून येशू डोंगरावर चढला आणि तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो मोठ्याने त्यांना शिकवू लागला.
"जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. "जे करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सात्वन करण्यात येईल."
"जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.
"जे नीतिमत्त्वाने भुकेले आणि तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील."
"जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल."
"जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील."
"जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील."
"नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mt 5: 1-12
Seeing the crowds, he went up on the mountain, and when he sat down his disciples came to him. And he opened his mouth and taught them, saying:
“Blessed are the poor in spirit, for theirs is the kingdom of heaven. “Blessed are those who mourn, for they shall be comforted.
“Blessed are the meek, for they shall inherit the earth.
“Blessed are those who hunger and thirst for righteousness, for they shall be satisfied.
“Blessed are the merciful, for they shall obtain mercy.
“Blessed are the pure in heart, for they shall see God.
“Blessed are the peacemakers, for they shall be called sons of God. “Blessed are those who are persecuted for righteousness’ sake, for theirs is the kingdom of heaven.
“Blessed are you when men revile you and persecute you and utter all kinds of evil against you falsely on my account.
Rejoice and be glad, for your reward is great in heaven, for so men persecuted the prophets who were before you.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:येशू तेथे अनेक आशीर्वादांचा उच्चार करतो. ज्यांना शब्द दुर्दैवी मानतो. त्याच्या अकारण प्रेमाने येशू आपल्या राज्यात नीच लोकांचे स्वागत करतो. नम्र आणि न्यायी लोक ज्यांना जग वगळते. सुंदरेतेने तो घोषित करतो की, नविन पद्धतीची सुरूवात झाली आहे. ते देवाच्या राज्याचा नविन कायदा बनवतात. येशू हा नवा मोजेस आहे. आणि त्याचे शुभवर्तमान हे नवीन करार आहे. आपल्या मुळ प्रणालीला उलथपालत करणाऱ्या, आनंदाची अतुलनीय नवीनता म्हणजे देवाचा नियम अधिक रचनात्मक आणि जाचक नाही. तर सर्व अडचणीमधून मुक्त करणारा आणि आशीर्वाद म्हणून सादर करणे.
प्रार्थना : भाग्यवान जगी कोण महान, ऐका काय वदे भगवान.
0 टिप्पण्या