सामान्य काळातील दहावा
मंगळवार ११ जून २०२४
'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.'
'As you go, proclaim that the kingdom of Heaven is close at hand.
संत बर्णबा
•प्रेषित आणि रक्तसाक्षी (इ. स. १-६०)
सायप्रेस (कुप्र) बेटामध्ये एका उच्च कुलीन लेवी वंशात जन्मलेला बर्णबा हा मूळात यहुदी धर्मीय होता. शौलबरोबर तोसुद्धा गमलिएल ह्या विद्वान शास्त्र्याच्या चरणाशी बसून शिकलेला असावा असे मानले जाते. पेन्टेकॉस्टच्या जगप्रसिद्ध घटनेनंतर तो तात्काळ ख्रिस्ती झाला आणि त्याने आपली सर्व मालमत्ता प्रेषितांच्या चरणाशी आणून ठेवली (प्रे. कृ. ४).
पुढे शौलचे परिवर्तन झाल्यानंतर ह्याच बर्णबाने प्रेषितांना पौलची ओळख करून दिली. पहिल्यांदा प्रेषित पौलला पाहून भ्याले परंतु ख्रिस्ती लोकांचा छळ करणाऱ्या पौलला खुद्द ख्रिस्ताचाच साक्षात्कार झालेला आहे असे स्पष्टीकरण बर्णबा ह्याने प्रेषितांना दिले. त्यानंतर पौल प्रेषितांबरोबर मिळून मिसळून राहू लागला.
शौलच्या स्वभावाविषयी बर्णबाला पूर्ण कल्पना असल्यामुळे एकदा हाती घेतलेले कुठलेही काम तडीस नेल्याशिवाय तो राहणार नाही ह्याची बर्णबाला खात्री पटलेली होती. पौल आणि बर्णबा ह्या दोहोंनी ख्रिस्तसभेच्या काळात सुवार्ता प्रसारासाठी मोलाचे कार्य केले. त्यामुळे ख्रिस्तसभेने त्या दोहोंना १२ प्रेषितांसमान “प्रेषित” हे पद बहाल केलेले आहे.
आपल्या जन्मभूमीतील सायप्रसमधील आणि कुरेने येथील काही शिष्यांनी अंत्युखिया येथल्या ग्रीक लोकांमध्ये ख्रिस्ती श्रद्धेचा जो प्रसार केलेला होता त्याविषयी माहिती गोळा करण्यासाठी पुढे बर्णबा तिथे जाऊन पोहोचला. ते पाहून आपले यहुदी पूर्वग्रह बर्णबाने सोडून दिले. परमेश्वर फक्त यहुदी लोकांमध्येच नव्हे तर परराष्ट्रीयांमध्येसुद्धा त्याची तारणयोजना पूर्णत्वास नेत असल्याचे पाहून पुढील एक संपूर्ण वर्ष त्याने तार्सिसहून आलेल्या शौलबरोबर तिथे सुवार्ता प्रसार करण्यात घालविले.
इ. स. ४५ साली येरूशलेम येथे मोठा दुष्काळ पडलेला होता. ह्या दोन प्रेषितांनी अंत्युखिया येथून येरुशलेमच्या ख्रिस्तसभेसाठी मोठी वर्गणी गोळा करून आणली. तिथून परत जाताना आपल्या पहिल्या मिशनरी दौऱ्यासाठी त्या दोघांनी योहान मार्क ह्याला आपल्या बरोबर घेतले आणि ते सायप्रस (क्रूप) बेटात सुवार्ताप्रसार करू लागले.
त्यानंतर ह्या दोघांनी आशिया मायनर (तुर्कस्तान) मध्ये ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास सुरूवात केली परंतु तिथे त्यांना मोठ्या विरोधास तोंड दयावे लागले. तरीही त्यांनी तिथे बऱ्याच ख्रिस्तमंडळ्या स्थापन केल्या व स्थानिक नेतृत्व घडविले.
इ. स. ४९-५० साली येरुशलेम येथे भरलेल्या धर्मपरिषदेनंतर (प्रे. कृ. १५) बर्णबा योहान मार्क ह्यांच्यासह पुन्हा एकदा सायप्रस येथे आला. परंतु त्यानंतरचे त्याचे जीवन व मरण ह्याविषयी इतिहासात काहीच माहिती उपलब्ध नाही. इ. स. ६१ साली त्याला दगडमार करण्यात आला आणि त्यातच त्याचा अंत झाला असावा असे मानण्यात येते. त्यावेळी योहान मार्क हा रोममध्ये तुरूंगात असलेल्या ऋषीतुल्य पौलची सेवा करीत होता.
बर्णबा हा सौम्य, सभ्य आणि सुज्ञ होता. (संत) पौलनंतर प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत होऊन गेलेले ते एक अत्यंत आकर्षक असे व्यक्तिमत्व होते. पुढे इ. स. ४८२ साली सायप्रस बेटावर त्याचे अवशेष सापडले. बर्णबा ह्याचा अर्थ बोधपुत्र आणि त्याच्या ह्या नावाला तो अखेरपर्यंत जागला.
ख्रिस्तसभा आज संत बर्णबा ह्या संत पौलाबरोबर ख्रिस्ताची सुवार्ता घोषविणाऱ्या प्रेषिताचा सण साजरा करीत आहे. संत वर्णबाचे अनुकरण करण्यास आपण प्रेरणा घेऊ या.
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये ११:२१-२६,१३:१-३
वाचक : प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकांतून घेतलेले वाचन
"तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता."
पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्याच्याविषयीचे वर्तमान येरुशलेममधल्या मंडळीच्या कानी आले तेव्हा त्यांनी बार्नाबसला अंत्युखियापर्यंत पाठवले. तो तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, दृढनिश्चयाने प्रभूला बिलगून राहा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले. नंतर तो शौलाचा शोध करायला तार्सास गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याला अंत्युखियाला आणले. मग असे झाले की, त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळूनमिसळून बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले.
अंत्युखियाच्या मंडळीत बार्नाबस, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन आणि शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा आणि उपवास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की, “बार्नाबस आणि शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा.” तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
✝️
First Reading :Acts 11:21b-26; 13
A great number believed and were converted to the Lord. The news of them came to the ears et the church in Jerusalem and they sent Barnabas out to Antioch, these he was glad to see for himself that God had given grace, and he urged them all to remain faithful to the Lord with heartfelt devotion, for he was a good man, filled with the Holy Spirit and with taith. And a large number of people were won over to the Lord. Barnabas then left for Tarsus to look for Saul, and when he found him he brought him to Antioch. And it happened that they stayed together in that church a whole year, instructing a large number of people. It was at Antioch that the disciples were first called "Christians'. In the church at Antioch the following were prophets and teachers: Barnabas, Simeon called Niger, and Lucius of Cyrene, Manaen, who had been brought up with Herod the tetrarch, and Saul. One day while they were offering worship to the Lord and keeping a fast, the Holy Spirit said, 'I want Barnabas and Saul set apart for the work to which I have called them. So it was that after fasting and prayer they laid their hands on them and sent them off.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९८:१-६
प्रतिसाद : परमेश्वराने (राष्ट्रांसमक्ष स्वतः सिध्द केलेले ) तारण प्रकट केले आहे.
१.) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुतकृत्ये केली आहेत.
त्याच्या उजव्या हाताने,
त्याच्या पवित्र बाहूने तारण साधले आहे.
२. )परमेश्वराने स्वतः सिध्द केलेले तारण प्रकट केले आहे.
राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
इसराएलाच्या घराण्यातील आपली दया
आणि सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.
३.) पृथ्वीच्या सर्व दिशांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे.
अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो, उच्च स्वराने, आनंदाने गा.
४. )परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा,
वीणेवर सुस्वर स्तोत्र वाजवा.
कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा.
Psalm 98:1, 2-3ab, 3cd-4, 5-6
The Lord has shown his deliverance to the nations.
O sing a new song to the Lord,
for he has worked wonders.
His right hand and his holy arm have brought salvation. R
The Lord has made known his salvation,
has shown his deliverance to the nations.
He has remembered his merciful love
and his truth for the house of Israel. R
All the ends of the earth have seen
the salvation of our God, Shout to the Lord,
all the earth; break forth into joyous song,
and sing out your praise. R
Sing psalms to the Lord with the harp,
with the harp and the sound of song.
With trumpets and the sound of the horn,
raise a shout before the King, the Lord. It
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो,
तू प्रभू आहेस हे आम्ही मान्य करतो.
हे प्रभो, प्रेषितांच्या गौरवमय सहवासाबद्दल
आम्ही तुझी स्तुती करतो.
आलेलुया!
Acclamation:
Go and make disciples of all nations, says the Lord,
I am with you always, to the end of the age.
शुभवर्तमान मत्तय १०:७-१३
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या."
येशू आपल्या प्रेषितांना म्हणाला, "जात असताना अशी घोषणा करत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.' आजाऱ्यांना बरे करा, मेलल्यांना उठवा, कुष्ठ रोग्यांना शुध्द करा, भुते काढा, तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका, वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. घरात जाताना 'तुम्हाला शांती असो.' असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो, ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Matthew 10:7-13
Jesus said to his apostles, 'As you go, proclaim that the kingdom of Heaven is close at hand. Cure the sick, raise the dead, cleanse those suffering from virulent skin- diseases, drive out devils. You received without charge, give without charge. Provide yourselves with no gold or silver, not even with coppers for your purses, with no haversack for the journey or spare tunic or footwear or a staff, for the labourer deserves his keep. Whatever town or village you go into, seek out someone worthy and stay with him until you leave. As you enter his house, salute it, and if the house deserves it, may your peace come upon it; if it does not, may your peace come back to you."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: येशूच्या शिष्यांला वचनाची घोषणा करण्याचे काम सोपवले होते आणि सर्व बरे करण्याचे सामर्थ्य दिले होते. जे आजारी व दृष्ट आत्म्याला घालवण्यासाठी आणि मेलेल्यांस उठविण्यासाठी देखिल होते. पण हे करत असताना त्यांनी पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहावे, अशी त्यांची इच्छा होती. कोणतीही बाब किंवा मानवी संसाधन देखील त्यांच्यावर नाहीत. क्षमता पण देवाच्या सामर्थ्यावर त्यांच्या परिणामाची त्यांनी काळजी करू नये. त्यांचे मंत्रालय आणि लोकांच्या प्रतिक्रिया ते स्वीकारतात किंवा त्यांचे स्वागत करतात की नाही. प्रभूचे शिष्य आपण आपले ध्येय कसे पूर्ण करू? आम्ही वचनबद्ध आहोत आणि | त्यांच्यावर अवलंबून आहोत व त्यांच्या लोकांसाठी प्रेमाने श्रम करा.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वचने पाळण्यास, तुझ्या आज्ञेप्रमाणे वागण्यास व तुझ्या मागे चालण्यास मला तुझे सामर्थ्य दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या