Marathi Bible Reading | Tuesday 4th June 2024 | 9th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील  नववा   सप्ताह 

मंगळवार  दि. ४ जून  २०२४ 

"कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला भरून द्या."
Jesus said to them, 'Pay Caesar what belongs Caesar-and God what belongs to God.' And they were amazed at him.


संत फ्रान्सिस कॅराक्सिओला
•वर्तनसाक्षी (१५६३-१६०८)
आजच्या शुभवर्तमानात नियमांचे पालन करण्याचे स्पष्टीकरण देत असताना प्रभू येशू म्हणत आहे, 'कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरुन द्या.' आपण ह्या वचनावर चिंतन करु या. कैसराचे कैसराला देणे, म्हणजे आपण ज्या देशात व राज्यात राहतो त्या देशातील व राज्यातील जे समाज हितकारक नियम आहेत ते पाळावे. त्या नियमांचा योग्य तो सन्मान करावा. सरकारी नियम  पाळून कर भरावा कारण त्यामुळे आपल्याला सुविधा प्राप्त होतात. सामाजिक  व धार्मिक नियम आपल्याला सामाजिक व नैतिक जबाबदारीने आचरणकरण्यासाठी पाळायला हवेत. प्रभू येशू त्याला जोडूनच दुसरे वाक्य म्हणतो की, 'देवाचे ते देवाला भरुन द्या.' देवाच्या कृपेमुळेच आपले अस्तित्व आहे. देवाच्या इच्छेमुळेच आपल्याला विपुलता लाभते देव आपल्या निरपेक्ष प्रेम करुन अनेक दानांनी भरुन टाकतो. मात्र देवाला आपण काय द्यायचे ? तर देवाला आपले शुद्ध व नम्र अंतःकरण हवे आहे. आपल्या आभार स्तवनाची व स्तुतियज्ञाची देवाला अपेक्षा आहे.आपण देवाच्या दृष्टीने परोपकारी व शुद्ध बनू या.
✝️

पहिले वाचन पेत्रचे दुसरे पत्र ३:११-१५.१७-१८
वाचक :  पेत्रचे दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"आपण नवे आकाश आणि नवी पृथ्वी ह्यांची वाट पाहत आहो."

ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व कामे ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत आणि सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत आणि तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे ? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तृप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश आणि नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.
म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक आणि निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे. तर प्रियजनहो, ह्या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासूनच कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहात सापडून आपल्यास्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा आणि आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत जा. त्याचा गौरव आता आणि अनंतकालपर्यंत असो. आमेन.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
2 Peter 3:11b-15a, 17-18

What holy and saintly lives you should be living while you wait for the Day of God to come, and try to hasten its coming: on that Day the sky will dissolve in flames and the elements melt in the heat. What we are waiting for, relying on his promises, is the new heavens and new earth, where uprightness will be at home. So then, my dear friends, while you are waiting, do your best to live blameless and unsullied lives so that he will find you at peace. Think of our Lord's patience as your opportunity to be saved. Since you have been forewarned about this, my dear friends, be careful that you do not come to the point of losing the firm ground that you are standing on, carried away by the errors of unprincipled people. Instead, continue to grow in the grace and in the knowledge of our Lord and Saviour Jesus Christ. To him be glory, in time and eternity. Amen.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद ९0:२,३-४,१०,१४.१६

प्रतिसाद :  प्रभो, तू पिढ्यान्पिढया आमचे निवासस्थान आहेस.

१ पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी 
आणि जग ही निर्माण केली 
त्यापूर्वीच अनादिकालापासून 
अनंतकालापर्यंत तू देव आहेस.

२ तू मनुष्याला पुन्हा मातीला मिळवतोस 
आणि म्हणतोस, "अहो मानवांनो, परत जा."
 कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या
 गेलेल्या दिवसासाठी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.

३ आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि 
शक्य असल्यास फार तर ऐशी वर्षे असले, 
तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय आणि 
दुःखमय आहे. कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.

४ तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर, 
म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे 
सर्व दिवस आनंदात घालवू तुझी कृती तुझ्या सेवकांना,
 तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे.

Psalm 90:2, 3-4, 10, 14 & 16

O Lord, you have been our refuge, from one generation to the next.
Before the mountains were brought forth,
    or ever thou hadst formed the earth and the world,
    from everlasting to everlasting thou art God.

3 Thou turnest man back to the dust,
    and sayest, “Turn back, O children of men!”
4 For a thousand years in thy sight
    are but as yesterday when it is past,
    or as a watch in the night.

The years of our life are threescore and ten,
    or even by reason of strength fourscore;
yet their span[c] is but toil and trouble;
    they are soon gone, and we fly away.

Satisfy us in the morning with thy steadfast love,
    that we may rejoice and be glad all our days.

Let thy work be manifest to thy servants,
    and thy glorious power to their children

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
 तुझ्या आदेशांचे मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अलौकिक कृत्यांचे मनन करीन.
 आलेलुया!

Acclamation: 
 


शुभवर्तमान मार्क १२:१३-१७
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला भरून द्या."

प्रमुख याजक, शास्त्री आणि वडीलजन ह्यांनी येशूला बोलण्यात धरण्याकरता परुशी आणि हेरोदी ह्यांतील काहींना त्याच्याकडे पाठवले. ते येऊन त्याला म्हणाले, "गुरुजी, आपण खरे आहा आणि कोणाची भीडमुर्वत धरत नाही, आपण माणसांचे तोंड पाहून बोलत नसता, तर देवाचा मार्ग सात्त्विक भावाने शिकवत असता, हे आम्हाला ठाऊक आहे. कैसरला कर देणे रास्त आहे की नाही ? आम्ही तो द्यावा की देऊ नये ?" पण तो त्यांचे ढोंग ओळखून त्यांना म्हणाला, "माझी अशी परीक्षा का पाहता ? एक नाणे घेऊन या, मला ते पाहू द्या." त्यांनी ते आणले तेव्हा त्याने त्यांना विचारले, "हा मुखवटा आणि हा लेख कोणाचा?" ते त्याला म्हणाले, "कैसरचा.” येशू त्यांना म्हणाला, "कैसरचे ते कैसरला आणि देवाचे ते देवाला भरून द्या." तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले.

 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:Mark 12:13-17

The Jewish leaders sent to Jesus some Pharisees and some Herodians to catch him out in what he said. These came and said to him, 'Master, we know that you are an honest man, that you are not afraid of anyone, because human rank means nothing to you, and that you teach the way of God in all honesty. Is it permissible to pay taxes to Caesar or not? Should we pay or not?' Recognising their hypocrisy he said to them, 'Why are you putting me to the test? Hand me a denarius and let me see it.' They handed him one and he said to them, 'Whose portrait is this? Whose title?' They said to him, 'Caesars.' Jesus said to them, 'Pay Caesar what belongs Caesar-and God what belongs to God.' And they were amazed at him.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनमोजकी लोकं कर भरत असतात कारण बहुतेक लोक सरकारला जुमानत नाही. अशीप्रकारे यहुदी लोक रोमन अधिकाऱ्याला कर भरत नव्हते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. कैसराचे ते कैसराला, देवाचे ते देवाला भरून द्या. संत पॉल आपल्या रोमकरांस पत्रामध्ये म्हणत आहे. जे दुसऱ्यांचे आहे ते तुम्ही त्यांना द्या. कर देण्याचा असेल तर कर द्या. कुणाला मानसन्मान द्यायचा असेल तर त्यांना द्या. न्यायनितीने आपले जीवन जगा. एक चांगले नागरिक म्हणून देशाच्या उन्नतीसाठी हातभार लावा. चांगलेख्रिस्ती ह्या नात्याने ख्रिस्ती जीवन जगा. कारण बाप्तिस्माद्वारे देवाची मोहर आपल्या हृदयामध्ये ठसवली आहे. म्हणून चांगले ख्रिस्तीमय, नितीमय व सुशिक्षित नागरिक असे जीवन जगा.

प्रार्थना :  हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या विपुल दानांबद्दल तुला मनःपूर्वक धन्यवाद. तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या