सामान्यकाळातील नववा सप्ताह
सोमवार दि. ३ जून २०२४
योहानचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की माणसापासून

युगांडाचे रक्तसाक्षी
चार्ल्स ल्वांगा, जोसेफ कासा आणि त्यांचे सहकारी
(१८८६-१८८७)
अप्पर नीलच्या प्रदेशातील जमातींमध्ये १८८७ सालापासून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आपले मिशनकार्य सुरू केलेले होते. त्यानंतरच्या पुढच्या वर्षातील इस्टर जागरणविधीच्या वेळी पहिले काही स्नानसंस्कार पार पडले. ह्या नवसंस्कारितांमध्ये पूर्वी इस्लाम धर्मातून प्रॉस्टेस्टंट पंथामध्ये आलेले काही स्त्री पुरुष होते. ह्या वाढत्या कॅथलिक धर्मप्रसाराला रोखून धरण्यासाठी १८८६ साली अरब व प्रॉटेस्टंट पंथातील काहींनी राजा म्वांगा ह्याला चिथावले. त्याने जोसेफ कासा आणि मारूंबा ह्या प्रमुख मिशनऱ्यांची हत्या घडवून आणली.
आजच्या दिवशी ख्रिस्तसभा युगांडातील प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये श्रद्धेची जोपासना करणाऱ्या व त्यासाठी क्रूर अशा छळवादाला मिठी मारणाऱ्या १३ ते ३० वर्षे वयातील २२ निग्रो मुले व युवक ह्यांचा सन्मान करते. या २२ जणांपैकी १३ जणांना जिवंत जाळण्यात आले. काहींना ३ जून १८८६ मध्ये ठार करण्यात आले.
हे २२ आफ्रिकन निग्रो इ. स. १९२० साली प्रथम धन्यवादित म्हणून घोषित करण्यात आले. ह्या २२ जणांव्यतिरिक्त ८० इतर जण ह्या छळामध्ये केले गेले. ह्या सर्व युगांडाच्या रक्तसाक्षींना २२ जून १९६४ साली पोप पॉल सहावे ह्यांनी संतपद बहाल केले.
चिंतन : “रक्तसाक्ष्यांना साखळदड बांधण्यात आले. तुरुंगात टाकण्यात आले, त्यांना फटके मारण्यात आले, जाळण्यात आले, त्यांना अक्षरशः कांपण्यात आले तरी त्यांची संख्या वाढतच राहिली.” - संत अगस्तीन
पहिले वाचन पेत्रचे दुसरे पत्र १:२-७
वाचक : पेत्रचे दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाने आपली मोलवान आणि अतिमहान अशी वचने आपल्याला दिली आहेत."
देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हाला विपुल कृपा आणि शांती मिळो.
ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी आणि सात्त्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनाला आणि सुभक्तीला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्याच्या योगे मौल्यवान आणि अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्त्विकतेची, सात्त्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची आणि बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.
First Reading :
2 Peter 1:2-7
peace be yours in abundance through the Grace and peace knowledge of our Lord. By his divine power, he has lavished on us all the things we need for life and for true devotion, through the knowledge of him who has called us by his own glory and goodness. Through these, the greatest and priceless promises have been lavished on us, that through them you should share the divine nature and escape the corruption rife in the world through disordered passion. With this in view, do your utmost to support your faith with goodness, goodness with understanding, understanding with self-control, self-control with perseverance, perseverance with devotion, devotion with kindness to the brothers, and kindness to the brothers with love.
Thanks be to God
प्रतिसाद ९१:१-२,१४-१५अ, १५ब-१६
प्रतिसाद : माझ्या देवा, तुझ्यावर मी भाव ठेवतो.
१ जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो.
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
परमेश्वराला मी "माझा आश्रय,
माझा दुर्ग असे म्हणतो.
तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो."
२ माझ्यावर त्याचे प्रेम आहे,
म्हणून मी त्याला मुक्त करीन.
त्याला माझ्या नावाची जाणीव आहे
म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन.
तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन.
"मी तुझ्याजवळ आहे !"
३ संकटसमयी मी त्याला मुक्त करीन,
मी त्याला गौरव देईन.
त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन,
त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन-
Psalm 91:1-2, 14-15ab, 15c-16
O my God, I trust in you.
He who dwells in the shelter of the Most High,
who abides in the shadow of the Almighty,
2 will say to the Lord, “My refuge and my fortress;
my God, in whom I trust.”
Because he cleaves to me in love,
I will deliver him;
I will protect him, because he knows my name.15 When he calls to me, I will answer him; I will be with him in trouble, I will rescue him and honor him.16 With long life I will satisfy him, and show him my salvation.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अलौकिक गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!
Acclamation:
शुभवर्तमान मार्क १२:१-१२
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"त्याने त्या प्रिय आवडत्या मुलाला धरून जिवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले."
येशू दाखले देऊन परुश्यांबरोबर बोलू लागला, "एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, द्राक्षरसासाठी कुंड खणले, माळा बांधला आणि तो द्राक्षमळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशी निघून गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्यांकडून द्राक्षमळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्यांकडे एका नोकराला पाठवले. त्याला त्यांनी धरून मारहाण केली आणि रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसऱ्या एका नोकराला त्याच्याकडे पाठवले, त्याचे तर डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला. त्याने आणखी एकाला पाठवले, त्याला तर त्यांनी जिवे मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यातून कित्येकांना त्यांनी मारहाण केली आणि कित्येकांचा जीव घेतला. अद्यापि त्याच्याजवळ एकजण उरला होता, तो म्हणजे त्याचा प्रिय आवडता मुलगा. 'आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील' असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. परंतु ते माळी आपसांत म्हणाले, 'हा वारस आहे. चला, आपण ह्याला मारून टाकू, म्हणजे आपले होईल.' मग त्यांनी त्याला धरून जिवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील बरे ? तो येऊन त्या माळ्यांचा समूळ नाश करील आणि द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. तुम्ही हा शास्रलेखही वाचला नाही काय की 'जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे."तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली. कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून निघून गेले.
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mark 12:1-12
Jesus went on to speak to the chief priests and the elders in parables, 'A man planted a vineyard; he fenced it round, dug out a trough for the winepress and built a tower, then he leased it to tenants and went abroad. When the time came, he sent a servant to the tenants to collect from them his share of the produce of the vineyard. But they seized the man, thrashed him and sent him away empty handed. Next he sent another servant to them; him they beat about the head and treated shamefully. And he sent another and him they killed; then a number of others, and they thrashed some and killed the rest. He had still someone left: his beloved son. He sent him to them last of all, thinking, "They will respect my son." But those tenants said to each other, "This is the heir. Come on, let us kill him, and the inheritance will be ours." So they seized him and killed him and threw him out of the vineyard. Now what will the owner of the vineyard do? He will come and make an end of the tenants and give the vineyard to others. Have you not read this text of scripture: The stone which the builders rejected has become the cornerstone; this is the Lord's doing, and we marvel at it?' And they would have liked to arrest him, because they realised that the parable was aimed at them, but they were afraid of the crowds. So they left him alone and went away.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: कोण आहे येशू जो दुष्ट सेवकांच्या बोधकथेबद्दल बोलत आहे? हे विशेषतः आपल्या पैकी प्रत्येकाबद्दल आहे; जे येशूला नाकारतात. आपली पापे आणि आज्ञेचे पाळन न करणे, देवाने मानव जातीसाठी जग निर्माण केले. एक सुंदर जग त्याने आमच्यावर सोपवले. जोपर्यंत आम्ही त्याची काळजी घेतो आणि आमचे सर्वोत्तम प्रयत्न करतो, तोपर्यंत ते आमचे आहे. एकमेकांशी आदर आणि प्रेमाने वागणे परंतु केवळ देवाची लोकं जगाची काळजी घेण्यात अयशस्वी झाले नाहीत. ते एकमेकांशी भयंकर वागले म्हणून देवाने त्यांचा निरोप संदेष्ट्यामार्फत पाठवला की, त्यांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल त्यांना चेतावनी देण्यासाठी त्यांचे ऐकण्याऐवजी आणि रूपांतरित होण्याऐवजी लोकांनी त्यांना फक्त नाकारले नाही, पण त्यांच्यावर अत्याचार केले आणि काहिंना मारले. शेवटी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मरून जगाच्या तारणासाठी पाठवले. आम्हाला माहित आहे की ही बोधकथा फक्त इस्राएल लोकांबद्दल नाही, तर निवडलेल्या लोकांबद्दल आहे. परंतु ते आपल्यापैकी प्रत्येकांविषयी आहे. जे ख्रिस्ताला विश्वासू राहण्यास अपयशी ठरतात. आपली कर्तव्ये पार पाडण्यात अयशस्वी झाल्यामुळे आपल्याला परमेश्वराच्या द्राक्षमळ्यातून बेदखल केले जाईल ह्याची जाणीव आपण ठेवावी.
प्रार्थना : हे प्रभू येशू, ख्रिस्तसभेतील सर्व व्रतस्थांना आणि प्रापंचिकांना सुवार्ता प्रसाराचे कार्य करण्यास विशेष कृपा दे, आमेन
✝️
0 टिप्पण्या