प्रभू येशूच्या अतिपवित्र शरीर
व रक्ताचा सोहळा
रविवार २ जून २०२४
"घ्या, हे माझे शरीर आहे” आणि तो त्यांना म्हणाला, “(नवीन) करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे,
"Take; this is my body." And he said to them, "This is my blood of the covenant,
✝️
“घ्या, हे माझे शरीर, हे माझे रक्त.”
देवाबरोबर मानवाचे दुरावलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी बली अर्पण करण्याची प्रथा निमिर्तीच्या काळापासून आहे. मोशेने कोकराचे रक्त सांडून देवाबरोबर समेटाचा करार केला होता. रक्त सांडून व होमार्पण करुन शुद्धतेचा व समेटाचा करार जुन्या करारात केला जाई. समर्पणाचा करार करुन नवीन जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असे.
प्रभू येशू ख्रिस्ताने अखिल मानवजातीच्या पापांचे शुद्धीकरण करण्यासाठी व मुक्ती देण्यासाठी स्वत:चे रक्त सांडले. क्रुसावरील समर्पणाद्वारे प्रभू येशूने परमेश्वर पित्याबरोबर नवीन कराराची स्थापना केली. आपले शरीर व रक्त ह्यांनी युक्त असा करार स्थापन करुन प्रभू येशूने आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवनाचे सहभागीदार करुन घेतले आहे.
ख्रिस्तसभा आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे. पवित्र मिस्साबलिदान हे त्याच कराराची जिंवत स्मृती आहे. ख्रिस्तशरीर संस्काराद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एकरुप होत असतो. प्रभू येशू ख्रिस्त ह्या संस्काराद्वारे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो व आपण सर्वजण त्यामुळे शुद्ध बनून मुक्ती पावतो.
पवित्र मिस्सा बलिदान म्हणजे सर्वांत महान उपासना असून ख्रिस्त तेथे भाकर व द्राक्षरसाच्या रुपाने हजर असतो. विशेष म्हणजे तो स्वतः आपल्या जीवनात येऊन आपले जीवन ख्रिस्तमय बनवतो. आपल्याला लाभलेल्या ह्या महान संस्काराद्वारे सचेतन व उत्साही बनून पवित्र व सेवाभावी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या.
✝️
वाचक : निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पाहा, परमेश्वराने तुमच्याबरोबर जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय."
मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले, तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की, “जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही करू.' ." मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्राएलच्या बारा वंशांप्रमाणे बारा स्तंभ उभारले. त्याने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांत्यर्पणे अर्पण केली. मोशेन अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे वेदीवर टाकले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले, ते ऐकून ते म्हणाले, “जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू." नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले आणि म्हटले, "पाहा, परमेश्वराने ह्या सर्व वचनांप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय.”
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Exodus 24:3-8
In those days: Moses came and told the people all the words of the Lord and all the rules. And all the people answered with one voice and said, "All the words that the Lord has spoken we will do." And Moses wrote down all the words of the Lord. He rose early in the morning and built an altar at the foot of the mountain, and twelve pillars, according to the twelve tribes of Israel. And he sent young men of the people of Israel, who offered burnt offerings and sacrificed peace offerings of oxen to the Lord. And Moses took half of the blood and put it in basins, and half of the blood he threw against the altar. Then he took the Book of the Covenant and read it in the hearing of the people. And they said, "All that the Lord has spoken we will do, and we will be obedient." And Moses took the blood and threw it on the people and said, "Behold the blood of the covenant that the Lord has made with you in accordance with all these words."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११६: १२-१३,१५-१८
प्रतिसाद : मी परमेश्वराच्या नावाचा धावा करीन.
१)परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ? मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नामाचा धावा करीन.
२.) परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे. मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे, तू माझी बंधने सोडली आहेत.
३. ) मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पण करीन, परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.
Psalm 116:12-13, 15 and 16bc, 17-18 (13)
The cup of salvation I will raise.
I will call on the name of the Lord.
How can I repay the Lord for all his goodness to me?
The cup of salvation I will raise;
I will call on the name of the R
How precious in the eyes of the Lord
is the death of his faithful.
Your servant am I, the son of your handmaid;
you have loosened my bonds. R
A thanksgiving sacrifice I make;
I will call on the name of the Lord.
My vows to the Lord I will fulfil
before all his people. R
दुसरे वाचन : इब्री ९:११-१५
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुध्दी शुध्द करील."
ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला आणि जो हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ आणि पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्यांचे आणि बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुध्द झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुध्दी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुध्दी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुध्द करील?
आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरिता आहे की, पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने, सार्वकालिक वारसाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
Second reading : Hebrews 9:11-15
Brethren: When Christ appeared as a high priest of the good things that have come, then through the greater and more perfect tent (not made with hands, that is, not of this creation) he entered once for all into the holy places, not by means of the blood of goats and calves but by means of his own blood, thus securing an eternal redemption. For if the blood of goats and bulls, and the sprinkling of defiled persons with the ashes of a heifer, sanctify for the purification of the flesh, how much more will the blood of Christ, who through the eternal Spirit offered himself without blemish to God, purify our conscience from dead works to serve the living God. Therefore he is the mediator of a new covenant, so that those who are called may receive the promised eternal inheritance, since a death has occurred that redeems them from the transgressions committed under the first covenant.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे,
या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
आलेलुया!
Acclamation:
I am the living bread that came down from heaven,
says the Lord; if any one eats of this bread he will live for ever.
शुभवर्तमान मार्क १४ : १२-१६, २२-२६
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हे माझे शरीर आहे, हे माझे रक्त आहे."
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारत असत, त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे" ?
मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, “नगरात जा म्हणजे एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल, त्याच्यामागून जा. तो आत जाईल तेथल्या घरधन्याला असे सांगा, 'गुरू म्हणतो, मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरायची जागा कोठे आहे?' मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हांला दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा." मग शिष्य निघून नगरात गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
ते भोजन करत असता त्याने भाकर घेऊन आणि आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, "घ्या, हे माझे शरीर आहे” आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, “(नवीन) करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हांला खचित सांगतो की, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही."
मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतूनांच्या डोंगराकडे निघून गेले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mark 14:12-16.22-26
On the first day of Unleavened Bread, when they sacrificed the Passover lamb, his disciples said to Jesus, "Where will you have us go and prepare for you to eat the Passover?" And he sent two of his disciples and said to them, "Go into the city, and a man carrying a jar of water will meet you. Follow him, and wherever he enters, say to the master of the house, 'The Teacher says, Where is my guest room, where I may eat the Passover with my disciples? And he will show you a large upper room furnished and ready; there prepare for us." And the disciples set out and went to the city and found it just as he had told them, and they prepared the Passover. And as they were eating, he took bread, and after blessing it broke it and gave it to them, and said, "Take; this is my body." And he took a chalice, and when he had given thanks he gave it to them, and they all drank of it. And he said to them, "This is my blood of the covenant, which is poured out for many. Truly, I say to you, I will not drink again of the fruit of the vine until that day when I drink it new in the kingdom of God." And when they had sung a hymn, they went out to the Mount of Olives.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:प्राण्यांचे रक्त शिंपडून प्रामाणिक देवाने इस्राएल लोकांशी एक गंभीर करार केला. अशाप्रकारे त्यांना क्षमा अर्पण करून त्याची दया दाखवते. देवाने इस्राएलाशी करार केला नाही. वैयक्तिकरीत्या; एक करार होता. करार बलिदानाच्या संदर्भात केला गेला होता. देवासमोर पापीपणा कबूल करतो आणि त्याचप्रमाणे त्याला नुकसान भरपाई अर्पण फक्त एक आहे. देवाने सर्वांसाठी केलेला सार्वकालिक करार, कालवरीचे बलिदान जे प्रत्येक वस्तुमानात पुन्हा पाहिले जाते.ज्यामध्ये आपल्याला येशूच्या सूचना आठवतात. युकरिस्टचे यज्ञ आपल्याला देवाच्या आपल्याशी केलेल्या कराराची आठवण करून देतात. येशूचे शरीर व रक्त हे केवळ आपले आध्यात्मिक अन्न नाही. पण ती त्याची शाश्वत जीवनाची प्रतिज्ञा देखील आहे. येशूचे बलिदान देवाच्या कराराला मान्यता देते. मिस्सामध्ये आपण ख्रिस्ताचे शरीर म्हणून जी भाकर स्विकारतो ती आपले आणि देवाचे नाते दृढ करते.
प्रार्थना : हे प्रभो येशू, तुझ्या पवित्र शरीराने व अमोलिक रक्ताने आमचे जीवन पावन बनव व तुझी सेवा करण्यास प्रेरणा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या