सामान्यकाळातील आठवा सप्ताह
शनिवार दि. १ जुन २०२४
योहानचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की माणसापासून होता ह्याचे मला उत्तर द्या." where did John's right to baptize come from: was it from God or from man?”
चिंतन : "केवळ आपल्या प्रभू ख्रिस्तासाठी छळ सहन करण्याइतके दुसरे काहीही महान नाही. ह्याच छळामध्ये सार्वकालिक आनंद आणि आपला आत्मविश्वास दडलेला आहे.” संत जस्टीन
आपल्या स्नानसंस्कारामध्ये आपल्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याचे दान मिळालेले आहे. मात्र पवित्र आत्म्याचे नुतनीकरण करण्यासाठी आपण पवित्र आत्म्याची आराधना करणे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात पवित्र आत्मा कार्य करीत असतो. पवित्र आत्मा आम्हास मार्गदर्शन करतो| (रोम८:१४). पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो (योहान १४:२६). पवित्र आत्मा देवाला आवडेलअसे जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतो (गलती ५:१६). पवित्र आत्मा आपल्या प्रार्थनेत सहाय्य करतो (रोम ८:२६). पवित्र आत्म्याद्वारे| आपल्याला अनेक कृपादाने मिळत असतात (१ करिंथ १२:४, ८-१०). पवित्र आत्म्याद्वारे देवाच्या कृपेचा अनुभव आपल्याला येतो. आज प्रभू येशूचा प्रेषित संत यहूदा पहिल्या वाचनात म्हणतो, 'पवित्र आत्म्याने प्रार्थना करा'.
पवित्र आत्म्याचा योग्य तन्हेने स्वीकार करण्यासाठी आपण नम्र बनून पश्चाताप करणे गरजेचे आहे, तरच त्याच्या सहाय्याने आपण प्रार्थना करु शकतो. प्रेम, आनंद, शांति, सहनशीलता, प्रेमळपणा, चांगुलपणा, विश्वासुपणा, सौम्यता, संयम ही सर्व पवित्र आत्म्याची फळे आपणास अनुभवता यावी म्हणून आपल्या अंतःकरणातीलपवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्याचा आपण प्रयत्न करु या.
✝️
पहिले वाचन यहुदाचे पत्र : १७, २०-२५
वाचक : यहुदाचे पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्हांस पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास परमेश्वर समर्थ आहे."
प्रियजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पुर्वी सांगितलेल्या वचनांची तुम्ही आठवण ठेवा. प्रियजनहो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा. पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा आणि आपणांस देवाच्या प्रीतीमध्ये राखा. जे कित्येकजण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा, त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र देहाने डागाळलेल्या त्यांच्या वस्त्राचा तिरस्कार करा.
तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला, येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे गौरव, महिमा, पराक्रम आणि अधिकार ही युगारंभापूर्वी आता आणि युगानुयुगे आहेत. आमेन.
First Reading :
Jude 17,20-25
But remember, my friends, what you were told in the past by the apostles of our Lord Jesus Christ.
But you, my friends, keep on building yourselves up on your most sacred faith. Pray in the power of the Holy Spirit, and keep yourselves in the love of God, as you wait for our Lord Jesus Christ in his mercy to give you eternal life. Show mercy towards those who have doubts; save others by snatching them out of the fire; and to others show mercy mixed with fear, but hate their very clothes, stained by their sinful lusts. To him who is able to keep you from falling, and to bring you faultless and joyful before his glorious presence to the only God our Saviour, through Jesus Christ our Lord, be glory, majesty, might, and authority, from all ages past, and now, and for ever and ever! Amen.
Thanks be to God
प्रतिसाद ६२:२,३-४,५-६
प्रतिसाद : हे प्रभो, माझ्या देवा, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे.
१ हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन.
शुष्क, रूक्ष आणि निर्जन प्रदेशात
माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे,
माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.
२ अशा प्रकारे तुझे बळ आणि वैभव पाहण्यास
पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे.
तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे,
माझे ओठ तुझे स्तवन करतील.
३ मी जिवंत आहे तोपर्यंत तुला असाच धन्यवाद देईन,
तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन.
देहातील मज्जेने आणि मेदाने व्हावा
तसा माझा जीव तृप्त होईल आणि
माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.
Psalm 63: 2-6
O God, you are my God, and I long for you.
My whole being desires you; like a dry,
worn-out, and waterless land,
my soul is thirsty for you.
Let me see you in the sanctuary;
let me see how mighty and glorious you are.
Your constant love is better than life itself,
and so I will praise you.
I will give you thanks as long as I live;
I will raise my hands to you in prayer.
My soul will feast and be satisfied,
and I will sing glad songs of praise to you.
As I lie in bed, I remember you;
all night long I think of you,
because you have always been my
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुझ्या आदेशांचा मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अलौकिक कृत्यांचे मनन करीन.
आलेलुया!
Acclamation:
शुभवर्तमान मार्क ११:२७-३३
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता ?"
येशू आणि त्याचे शिष्य पुन्हा येरुशलेमला आले आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री आणि वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, "तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?" येशू त्यांना म्हणाला, "मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला उत्तर द्या, म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हाला सांगेन. योहानचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की माणसापासून होता ह्याचे मला उत्तर द्या." तेव्हा ते आपसात विचार करू लागलेः'स्वर्गापासून होता' असे म्हणावे तर तो म्हणेल की, 'तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?' 'माणसापासून होता' असे म्हणावे तर ? त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानत." तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, "आम्हांला ठाऊक नाही." येशू त्यांना म्हणाला, "तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही."
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mark 11:27-33
They arrived once again in Jeru-salem. As Jesus was walking in the Temple, the chief priests, the teachers of the Law, and the elders came to him and asked him, "What right have you to do these things? Who gave you this right?" Jesus answered them, "I will ask you just one question, and if you give me an answer, I will tell you what right I have to do these things.Tell me, where did John's right to baptize come from: was it from God or from man?”
They started to argue among them- selves: "What shall we say? If we answer, 'From God,' he will say, 'Why, then, did you not believe John?' But if we say, 'From man .'" (They were afraid of the people, because everyone was con- vinced that John had been a prophet.) So their answer to Jesus was, "We don't know."
Jesus said to them, "Neither will I tell you, then, by what right I do these things."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त यहुदी बुढायांना आव्हान करून सांगतो की, जर दुसयाविश्वास वाढवला नाही तर तुम्ही तुमच्या पापांमध्ये सर्व मरणार. आपला विश्वास परमेश्वरामध्ये दृढ असायला पाहिजे. कारण आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे फक्त परमेश्वराकडे आहेत. म्हणून आपण सर्वांनी परमेश्वराचे ऐकले पाहिजे. देव आपला संदेश आपणाकडे पोहचविण्यासाठी दुसऱ्यारितीने आपल्याकडे पोहचवितो. उदा. अशिक्षित लोक, मेंढपाळ, सुतार, मासळी पकडणारे, शेतकरी, कुंभार जे लोक आपणांस प्रश्न विचारतात, ते लोक त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ऐकण्यास तयार असतात. अशाप्रकारचे लोक फक्त त्यांचे विचार दुसत्यांवर लादतात. आजच्या शुभवर्तमानात यहुदी, धार्मिक, पुढारी प्रभू येशूला पकडण्यासाठी प्रश्न विचारतात. परंतु ते स्वतः त्यांच्यामध्ये फसतात. म्हणून शास्त्री व परूशांच्या चुकांतून शिकुया व देवाला आपले हृदय, आपली बुद्धी, शक्ती देऊया व धैर्याने सत्याला सामोरे जाऊ या.
प्रार्थना : हे पवित्र आत्म्या, आम्हास तुझी प्रेरणा दे, मार्गदर्शन दे आणि तुझा गौरव करण्यास व स्तुति करण्यास सामर्थ्य दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या