Marathi Bible Reading | 8th week in ordinary Time| Friday 31st May 2024 visitation of our Lady

सामान्यकाळातील  आठवा   सप्ताह 

शुक्रवार  दि. ३१ मे  २०२४ 

"स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ?
"Blessed are you among women, and blessed is the fruit of your womb! 

✝️


कुमारी मरियेची एलिझाबेथशी भेट सण

ख्रिस्तसभा आज धन्य कुमारी मरियेने तिची मावस बहिण अलीशीबा हिला दिलेल्या स्नेह भेटीची आठवण करुन सन्मान करीत आहोत. अलीशीबा म्हातारपणी गर्भवती झाली होती. तिला प्रेम, आस्था व धीर देऊन मरियेने तिचा  आदर सन्मान केला. विशेषत: अशा कठीण प्रसंगी मरिया त्याच वेळी पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती झाली असताना सुद्धा ती गरजवंतांसाठी पुढे सरसावली. ख्रिस्ती जीवनाचा खरा आदर्श पवित्र मरियेच्या जीवनातून आपल्याला प्रेरणा  देणारा आहे. मरिया अलीशीबेची स्नेहभेट म्हणजे प्रभू परमेश्वराच्या स्नेहभेटीचाच प्रसंग आहे. मरियेच्या अभिवादनाची केवळ वाणी ऐकताच  अलीशीबेच्या उदरातील बाळकाने आनंदाने उडी मारली. पवित्र मरियेच्या सहवासाने अलीशीबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. अलीशीबेच्या मुखातून  शब्द बाहेर पडेल, 'स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. '
पवित्र मरिया खरोखरच परमेश्वराची निवडलेली धन्य माता असून खऱ्या ख्रिस्ती जीवनाचा महान आदर्श आहे. पवित्र मरियेच्या परस्पर प्रेमाचे  आणि सेवेचे उदाहरण आपल्या समोर आहे. तिच्या पवित्र गुणांचे अनुकरण करुन खरे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी पवित्र मरियेकडे मध्यस्थी करु या. 
✝️             

पहिले वाचन : सफन्या ३ : १४-१८
वाचक : सफन्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"इस्त्राएलचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे."
सीयोन कन्ये, उच्च स्वराने गा, हे इस्राएल, जयजयकार कर. यरुशलेम कन्ये, मन:पूर्वक उल्हास आणि उत्सव कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे. तुझ्या शत्रूंचे निवारण केले आहे. इस्राएलचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही. त्या दिवशी येरुशलेमला म्हणतील : “हे सीयोने, भिऊ नकोस. तुझे हात गळू देऊ नकोस. परमेश्वर तुझा देव, सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठायी आहे. तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील. त्याचे प्रेम स्थिर राहील. तुझ्याविषयी त्याला उल्हास वाटून तो मेळ्याच्या दिवसाप्रमाणे गाईल.”
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Zephaniah 3:14-18 (Or Romans 12:9-16b)

Sing aloud, O daughter of Zion; shout, O Israel! Rejoice and exult with all your heart, O daughter of Jerusalem! The Lord has taken away the judgments against you; he has cleared away your enemies. The King of Israel, the Lord, is in your midst; you shall never again fear evil. On that day it shall be said to Jerusalem: "Fear not, O Zion; let not your hands grow weak. The Lord your God is in your midst, a mighty one who will save, he will rejoice over you with gladness; he will quiet you by his love; he will exult over you with loud singing. I will gather those of you who mourn for the festival, so that you will no longer suffer reproach.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र यशया १२ : २-६
प्रतिसाद : इस्राएलचा पवित्र प्रभू थोर आहे.

१.) पाहा, देव माझे तारण आहे, 
मी विश्वास ठेवतो, भीत नाही. 
कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे, 
तो मला तारण झाला आहे. 
तेव्हा तुम्ही तारणकूपातून उल्हासाने पाणी काढाल.

२.)परमेश्वराला धन्यवाद द्या, 
त्याच्या नावाचा जयघोष करा. 
राष्ट्रांमध्ये त्याची महत्कृत्ये जाहीर करा. 
त्याचे नाव थोर आहे अशी वाखाणणी करा.

३. )परमेश्वरापुढे गायन करा. 
कारण त्याची करणी प्रतापमय आहे, 
हे साऱ्या जगभर जाहीर होवो. 
अहो सियोननिवासी लोकहो, जयघोष करा, 
गजर करा, कारण इस्राएलचा 
पवित्र प्रभू तुमच्याठायी थोर आहे.

Psalm Isaiah 12:2-3, 4bcde, 5-6 
 Great in your midst is the Holy One of Israel.

Behold, God is my salvation; 
I will trust, and will not be afraid; 
for the Lord God is my strength and 
my song, and he has become my salvation," 
With joy you will draw water 
from the wells of salvation, R

"Give thanks to the Lord,
 call upon his name,
make known his deeds among the peoples, 
proclaim that his name is exalted.

Sing praises to the Lord, 
for he has done gloriously,
let this be made known in all the earth.
Shout, and sing for joy, 
O inhabitant of Zion,
for great in your midst
is the Holy One of Israel.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
जिने विश्वास ठेवला ती कुमारी मरिया धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.
 आलेलुया!

Acclamation: 
Blessed are you Virgin Mary, who believed that there would be a fulfilment of what was spoken to you from the Lord.

शुभवर्तमान लूक १:३९-५६
वाचक : लूकलिखित पवित्र  शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
‘‘माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ?"

डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावात मरिया त्वरेने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलीशिबेला अभिवादन केले. अलीशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने हालचाल केली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठयाने बोलली, "स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.”
तेव्हा मरिया म्हणाली : “माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत. आणि त्याचे नाव पवित्र आहे .
जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान्पिढ्या असते.
त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे, जे आपल्या अंत:करणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेतत्यांची त्याने दाणादाण केली आहे,
त्याने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनजनांना उंच केले आहे, त्याने भुकेल्यांना उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे. आणि धनवानांना रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांना त्याने सांगितले त्याप्रमाणे आब्राहाम आणि त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला सहाय्य केले आहे.”
नंतर मरिया सुमारे तीन महिने अलीशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली.
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:Luke 1:39-56

In those days Mary arose and went with haste into the hill country, to a town in Judah, and she entered the house of Zechariah and greeted Elizabeth. And when Elizabeth heard the greeting of Mary, the baby leaped in her womb. And Elizabeth was filled with the Holy Spirit, and she exclaimed with a loud cry, "Blessed are you among women, and blessed is the fruit of your womb! And why is this granted to me that the mother of my Lord should come to me? For behold, when the sound of your greeting came to my ears, the baby in my womb leaped for joy. And blessed is she who believed that there would be a fulfilment of what was spoken to her from the Lord." And Mary said, "My soul magnifies the Lord, and my spirit rejoices in God my Saviour, for he has looked on the humble estate of his servant. For behold, from now on all generations will call me blessed; for he who is mighty has done great things for me, and holy is his name. And his mercy is for those who fear him from generation to generation. He has shown strength with his arm; he has scattered the proud in the thoughts of their hearts; he has brought down the mighty from their thrones and exalted those of humble estate; he has filled the hungry with good things, and the rich he has sent away empty. He has helped his servant Israel, in remembrance of his mercy, as he spoke to our fathers, to Abraham and to his offspring for ever." And Mary remained with her about three months and returned to her home.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआज आपण कुमारी मरियेची एलिझाबेथशी भेट हा सण साजरा करीत आहोत. ह्या सणाविषयी सर्व प्रथम १२६३मध्ये एकण्यात आले होते. त्यानंतर पोप अर्बन सहावे ह्यांनी ग्रेट स्किझमच्या समाप्तीसाठी ह्या सणाचे पालन १३८९ मध्ये विस्तारीत केले. एलिझाबेथ गरोदर आहे हे कळताच मरीया तिच्या सेवेसाठी त्वरेने निघाली. ह्या भेटीद्वारे मरियेला देखिल देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी धैर्य मिळाले. इतकेच नव्हे तर मरियेचा आवाज एकताच एलिझाबेथच्या उदरातील बाळाने (योहान) उडी मारली. ही एक कृती आहे ज्यामध्ये तो ख्रिस्ताचा अग्रदूत म्हणजेच त्याच्यासाठी वाट तयार करणाऱ्याची भूमिका ठाम पणे मांडतो. आपल्या भेटीद्वारे इतरांच्या जीवनात आपण देवासाठी वाट तयार करतो का? मरियेसारखे सेवामय आणि नम्रतेचे जीवन जगण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करतो ?

प्रार्थना :  हे पवित्र मरिये, देवाच्या हाकेचा प्रतिसाद देण्यास व तुझ्या गुणांचे अनुकरण करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन..
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या