सामान्यकाळातील आठवा सप्ताह
गुरुवार दि. ३० मे २०२४
"मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे ?
"What do you want me to do for you?"
संत जोन ऑफ आर्क
- कुमारिका, रक्तसाक्षी (१४१२-१४३१)
चिंतन : सर्वकाही स्वेच्छेने स्वीकारावे लागले तरी बिनधास त्याला मिठी मारा. शेवटी तुम्ही देवराज्याच्या पारादिस बागेत पोहोचाल. आकंची संत जोन
प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे अस्तित्व ओळखणाऱ्या आंधळ्या बार्तीमयला प्रभू येशूने दृष्टीदान दिले. जवळून जाणाऱ्या प्रभू येशू| ख्रिस्ताची चाहूल लागताच बार्तीमय मोठ्याने विनंती करीत म्हणाला, 'अहोदावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.' प्रभू येशू दयेचा व करुणेचा सागर आहे हे त्याने जाणले होते. त्याला गप्प बसविणाऱ्या लोकांपुढे तो नमला नाही तर येशूच्या नावाचा मोठ्याने त्याने धावा केला. प्रभू येशूने त्याला बोलावून विचारले, 'मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे ?' म्हणजेच प्रभू येशूने त्याच्या देवावरील विश्वासाची कसोटी घेतली. साहजिकच 'मला दृष्टी प्राप्त व्हावी' असे उत्तर देताच प्रभू येशूने त्याला म्हटले, 'जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.' व त्याला दृष्टी प्राप्त झाली.
दृष्टीदानाच्या ह्या चमत्कारातून आपणास चांगला बोध घेता येईल. प्रथमतः
आपण देवाचे अस्तित्व जाणावे. देवाला पूर्णपणे शरण जाऊन देवाकडे दयेची याचना करावी. देव दयेचा भूकेला आहे म्हणूनच आपल्या विश्वासाची तो कसोटी घेतो. आपण सर्वदा आपल्या देवावरील विश्वासात दृढबनून टिकून राहणे गरजेचे आहे. तरच जीवनात चमत्कार घडतो.
पहिले वाचन १ पेत्र : २:२-५.९-१२
वाचक :पेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"ज्याने तुम्हांला पाचारण केले त्याचे गुणगान गाण्यासाठी तुम्ही निवडलेले लोक, राजकीय याजकगण असे आहा."
प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा.माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला आणि मौल्यवान असा जो जिवंत घोडा त्याच्याजवळ येत असता, तुम्हीही स्वतः जिवंत घोड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहा; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.
पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. तुम्ही पूर्वी देवाचे लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहा; तुम्हांस दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे.
प्रियजनहो, जे तुम्ही प्रवासी आणि परदेशवासी आहा, त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा. ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांस दुष्कर्मी समजून तुम्हांविरूद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून न्यायाच्या दिवशी देवाचा गौरव करावा.
First Reading :
1 Peter2:2-5,9-12
Living Stone and the Holy Nation Rid yourselves, then, of all more lying or hypocrisy or jealousy or insulting language. Be like new-born babies, always thirsty for the pure spiritual milk, so that by drinking it you may grow up and be saved. As the scripture says, "You have found out for yourselves how kind the Lord is." Come to the Lord, the living stone rejected by man as worthless but chosen by God as valuable. Come as living stones, and let yourselves be used in building the spiritual temple, where you will serve as holy priests to offer spiritual and acceptable sacrifices to God through Jesus Christ. But you are the chosen race, the King's priests, the holy nation, God's own people, chosen to proclaim the wonderful acts of God, who called you out of darkness into his own marvellous light. 10 At one time you were not God's people, but now you are his people; at one time you did not know God's mercy, but now you have received his mercy.
appeal to you, my friends, as strangers and refugees in this world! Do not give in to bodily passions, which are always at war against the soul. Your conduct among the heathen should be so good that when they accuse you of being evildoers, they will have to recognize your good deeds and so praise God on the Day of his coming.
Thanks be to God
प्रतिसाद १००:२,३,४,५
प्रतिसाद : हर्षगीत गात, प्रभूपुढे या.
१ हर्षाने परमेश्वराची सेवा करा, हर्षगीत गात त्याच्यापुढे या.
२ परमेश्वर हाच देव आहे हे जाणा.
त्यानेच आम्हांला उत्पन्न केले,
आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा,
त्याच्या कुरणातील कळप आहोत.
३ त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या दारात,
स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा.
त्याचे उपकारस्मरण करा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
४ खरोखर परमेश्वर किती चांगला आहे,
त्याची दया सनातन आहे. त्याची सत्यता पिढ्यान्पिढ्या टिकते.
Psalm 100: 2-5
Sing to the LORD, all the world!
Sing to the LORD, all the world!
Worship the LORD with joy;
come before him with happy songs!
Never forget that the LORD is God.
He made us, and we belong to him;
we are his people, we are his flock.
* Enter the temple gates with thanksgiving,
go into its courts with praise.
Give thanks to him and praise him.
The LORD is good; his love is eternal
and his faithfulness lasts for ever.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझे सर्व आदेश विश्वसनीय आहेत, ते सदासर्वदा अढळ आहेत.
आलेलुया!
Acclamation:
Hear the voice of the Lord . harden not your heart.
शुभवर्तमान मार्क १०:४६-५२
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी."
येशू, त्याचे शिष्य आणि मोठा लोकसमुदाय यरिहो सोडून जात असता, तिमयाचा मुलगा बार्तीमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. हा नाझरेथकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, "अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा!" तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले; पण तो अधिकच ओरडू लागला, "अहो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!" तेव्हा येशू थांबून म्हणाला, "त्याला बोलवा." मग ते आंधळ्याला बोलावून म्हणाले " धीर धर, ऊठ, तो तुला बोलावत आहे." तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला आणि येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, "मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे ? आंधळा त्याला म्हणाला, "गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी." येशू त्याला म्हणाला, "जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे." तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला.
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mark 10:46-52
They came to Jericho, and as Jesus was leaving with his disciples and a large crowd, a blind beggar named Bartimaeus son of Timaeus was sitting by the road. 47 When he heard that it was Jesus of Nazareth, he began to shout, "Jesus! Son of David! Take pity on me!" Many of the people scolded him and told him to be quiet. But he shouted even more loudly, "Son of David, take pity on me!" Jesus stopped and said, "Call him."So they called the blind man. "Cheer up!" they said. "Get up, he is calling you."He threw off his cloak, jumped up, and came to Jesus. "What do you want me to do for you?" Jesus asked him."Teacher," the blind man answered, "I want to see again." "Go," Jesus told him, "your faith has made you well."
At once he was able to see and followed Jesus on the road.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, त्या माणसाला मदतीची गरज होती आणि त्याची नितांत गरज हे या उताऱ्यावरून कळून चुकते. मात्र येशू आपल्याला जगाच्या अंधत्वाच्या बाबतीत सांगत आहे. जगाला अंधत्वातून मुक्त करण्याची गरज आहे. ही गरज, शारीरिक, मानसिक, भावनीक किंवा आध्यात्मिक असू शकते. हि काही मनाची समस्या, असाध्य एकाकी पणा किंवा दुःख, पाप असू शकते. येशू अशा लोकांना मदत करण्यासाठी उपलब्ध आहे. त्याची इच्छा आहे त्या आंधल्याप्रमाणे बरे व्हावेत मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. आपल्या जीवनातील आंधळेपणा नाहीसा करण्यासाठी आपण येशूवर विश्वास ठेवून मदतीची याचना करतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्हावर दयेचा वर्षाव कर, आमच्या जीवनातील सर्व | प्रकारचा आंधळेपणा दूर करुन आम्हाला नवीन दृष्टी प्रदान कर, आमेन.
✝️
0 टिप्पण्या