Marathi Bible Reading | Wednesday 29th May 2024 | 8th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील  आठवा   सप्ताह 

बुधवार   दि. २९ मे  २०२४ 

जो तुम्हांमध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे  
If one of you wants to be great, he must be the servant of the rest; 
संत सिरिलचा सण .
रक्तसाक्षी  (... -२५१) 

पृथ्वीवरील सर्व ऐहिक सुखापेक्षा प्रभू येशू ख्रिस्तावरच सर्वाधिक प्रेम करण्याची शिकवण सिरील नावाच्या मुलाला अगदी बालपणापासून त्याच्या ख्रिस्ती आईपासून मिळालेली होती. त्यामुळे सदान्कदा त्याच्या मुखात प्रभू येशू ख्रिस्ताचेच नाव असायचे. जेव्हा जेव्हा आपण हे अद्भुत सामर्थ्यशाली नाव घेतो तेव्हा तेव्हा आपल्याला आगळीवेगळी स्पंदने जाणवतात अशी कबुली सिरीलने अनेकदा दिलेली होती.

सिरीलची आई जरी अत्यंत भक्तीमान असली तरी त्याचे वडील नास्तिकवादाकडे झुकलेले मूर्तीपूजक असे होते. तो ख्रिस्ती धर्माचा कट्टर विरोधक होता. आपल्या मुलाने ख्रिस्ताचे नाव घेतल्यास तो त्याला झोडपून काढीत असे. हे सर्व सिरील मोठ्या आनंदाने सहन करी. तरुणपणी सिरीलला त्याच्या वडिलांनी घराबाहेर काढले. तेव्हा आपण महान प्रतिफळासाठी थोडक्या गोष्टींचा त्याग का करू नये? अशा शब्दात त्याने ह्या अपमानाचा स्वीकार केला.

त्यावेळी ख्रिस्ती धर्माचा भयंकर छळ केला जात असे. सिरीलच्या दृढ विश्वासाविषयीची बातमी कैसेरियाच्या गव्हर्नरच्या कानावर गेलेली होती. त्याने सिरीलला आपणासमोर हजर राहण्याचा आदेश दिला. प्रारंभी प्रारंभी त्या तरुण मुलाला आपल्या विश्वासापासून दूर राहण्यासाठी बरीच आमिषे दाखविण्यात आली. शेवटी त्याच्या अढळ निश्चयाकडे पाहून त्याला मरणदंडाच्या शिक्षेच्या जागेकडे नेण्यात आले आणि सर्व प्रकारची तीक्ष्ण हत्यारे दाखविण्यात आली. परंतु त्याचाही परिणाम सिरीलवर झाला नाही.
 
सिरीलचे कोवळे वय पाहून गव्हर्नरला त्याची दया आली त्याने सिरीलला मुक्त करून घरी जाण्याची सवलत दिली. परंतु त्यावेळी सिरील निर्भयपणे म्हणाला. “मी आनंदाने माझे घरदार सोडलेले आहे. कारण माझ्यासाठी मोठे प्रतिफळ स्वर्गात तयार आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.”

हे ऐकून गव्हर्नरने त्याला अग्नीकुंडात फेकून देण्याची आज्ञा दिली. त्याला धगधगत्या अग्नी कुंडापाशी नेण्यात आले. पुन्हा एकदा त्याला संधी द्यावी आणि त्याची मनस्थिती तपासून पहावी म्हणून त्याला माघारी आणण्यात आले. त्याचे मन तर स्वर्गीय आनंदाने इतके भरून गेलेले होते की आता आणखी उशीर करणाऱ्या आपल्या मारेकऱ्यांना तोच चेतावणी देऊ लागला. सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याला मारेकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याला रक्तसाक्षीत्वाचा मुकूट प्राप्त झाला.

✝️

पहिले वाचन १ पेत्र : १:१८-२५
वाचक :पेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात."

तुम्हांस ठाऊक आहे की, वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक आणि निर्दोष कोकरू असा जो ख्रिस्त, त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रकट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहा; देवानेच त्याला मेलेल्यातून उठवून त्याचा गौरव केला, ह्यामुळे तुमचा विश्वास आणि आशा देवावर आहे.

निःस्वार्थी बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहेत म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कारण तुम्ही नाशंवत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत आणिटिकणाऱ्या शब्दांच्याद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहा. कारण, "सर्व मानवजात गवतासारखी आहे. आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे. गवत वाळते आणि त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते." सुवार्तेचे जे वचन तुम्हाला सांगण्यात आले ते हेच होय.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
1 Peter 1:18-25
For you know what was paid to set you free from the worthless manner of life handed down by your ancestors. It was not something that can be destroyed, such as silver or gold;  it was the costly sacrifice of Christ, who was like a lamb without defect or flaw.  He had been chosen by God before the creation of the world and was revealed in these last days for your sake.  Through him you believe in God, who raised him from death and gave him glory; and so your faith and hope are fixed on God.Now that by your obedience to the truth you have purified yourselves and have come to have a sincere love for your fellow-believers, love one another earnestly with all your heart.  For through the living and eternal word of God you have been born again as the children of a parent who is immortal, not mortal.  As the scripture says, "All mankind are like grass,and all their glory is like wild flowers. The grass withers, and the flowers fall, but the word of the Lord remains for ever."
This word is the Good News that was proclaimed to you.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद १४७:१२-१३,१४-१५,१९-२०
प्रतिसाद : हे यरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर !

१ हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर ! 
हे सियोन, तू आपल्या देवाचे स्तवन कर ! 
त्याने तुझ्या वेशीचे अडसर बळकट केले आहेत, 
त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे.

२ तो तुझ्या सीमांच्या आत शांतता प्रस्थापित करतो. 
उत्कृष्ठ गव्हाने तुला तृप्त करतो, 
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो, 
त्याचा शब्द फार वेगाने धावतो.

३ तो याकोबला आपले वचन, 
इस्राएलला आपले नियम आणि निर्णय विदित करतो, 
कोणत्याही राष्ट्रांबरोबर त्याने असे वर्तन केले नाही; 
त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेश्वराचे स्तवन करा !

Psalm 147:12-15,19-20

1Praise the LORD, O Jerusalem! 
Praise your God, O Zion!
 He keeps your gates strong; 
he blesses your people.
 He keeps your borders safe and satisfies 
you with the finest wheat.
15 He gives a command to the earth, 
and what he says is quickly done. 
 He spreads snow like a blanket
and scatters frost like dust.

2 He sends hail like gravel; 
no one can endure the cold he sends!
Then he gives a command, 
and the ice melts; he sends the wind, 
and the water flows. 

He gives his message to his people, 
his instructions and laws to Israel.
He has not done this for other nations; 
they do not know his laws.
Praise the LORD!


जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
तुम्ही आपली मने कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
 आलेलुया!

Acclamation: 
 Hear the voice of the Lord . harden not your heart.


शुभवर्तमान मार्क १०:३२-४५
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

   "आपण वर येरुशलेमला जात आहो, तेथे मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल."

 शिष्य वर येरुशलेमला जात असताना वाटेने येशू त्यांच्यापुढे चालला होता, तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा त्या बाराजणांस जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार ते त्यांना सांगू लागलाः "पाहा, आपण वर येरुशलेमला जात आहो; तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल, ते त्याला देहान्त शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर धुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल."

जब्दीचे दोन मुलगे याकोब आणि योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, "गुरुजी, आम्ही आपणाजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हांसाठी करावे अशी आमची इच्छा आहे." तो त्यांना म्हणाला, "मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?" ते त्याला म्हणाले, "आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे आणि एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे." येशूने त्यांना म्हटले, "तुम्ही काय मागत आहा हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय ? आणि जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्हांला घेववेल काय?" ते त्याला म्हणाले, "घेववेल." येशूने त्यांना म्हटले, "जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे, पण माझ्या उजवीकडे आणि डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार," हे ऐकून बाकीचे दहाजण याकोब आणि योहान ह्यांच्यावर संतापले. तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यांना म्हणाला, "परराष्ट्रीयात सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात आणि त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुम्हांमध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे आणि जो कोणी तुम्हांमध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला आणि पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे."

 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:Mark 10:28-31

Jesus and his disciples were now on the road going up to Jerusalem. Jesus was going ahead of the disciples, who were filled with alarm; the people who followed behind were afraid. Once again Jesus took the twelve disciples aside and spoke of the things that were going to happen to him. "Listen," he told them, "we are going up to Jerusalem where the Son of Man will be handed over to the chief priests and the teachers of the Law. They will condemn him to death and then hand him over to the Gentiles,  who will mock kill hock but three days later he will rise to life."
The Request of James and John.
Then James and John, the sons of Zebedee, came to Jesus. "Teacher," they said. "there is something we want you to do for us."
 "What is it?" Jesus asked them.
They answered, "When you sit on your throne in your glorious Kingdom, we want you to let us sit with you, one at your right and one at your left." Jesus said to them, "You don't know what you are asking for. Can you drink the cup of suffering that I must drink? Can you be baptized in the way I must be baptized?"
"We can," they answered.
Jesus said to them, "You will indeed drink the cup I must drink and be baptized in the way I must be baptized. But I do not have the right to choose who will sit at my right and my left. It is God who will give these places to to those for whom he has prepared them."
 When the other ten disciples heard about it, they became angry with James and John. So Jesus called them all together to him and said, "You know that the men who are considered rulers of the heathen have power over them, and the leaders have complete authority.  This, however, is not the way it is among you. If one of you wants to be great, he must be the servant of the rest; and if one of you wants to be first, he must be the slave of all. For even the Son of Man did not come to be served; he came to serve and to give his life to redeem many people."
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनयेशूच्या शिष्यांना ठाऊक होते की, प्रभू येशू आपले राज्य स्थापन करणार आहे आणि आता त्याच्या राज्याची सत्ता आणि अधिकाराची पदे सुरक्षित करण्याची वेळ आहे. म्हणून याकोब आणि योहान त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे बसण्यास म्हणजचे पदाची मागणी करतात. मात्र येशूचे राज्य ह्या जगाचे नाही. तर त्याचे राज्य हे आध्यात्मिक राज्य आहे आणि त्या राज्यात जर महत्वाचे स्थान जर कोणाला हवे असेल तर ते येशू ख्रिस्तासारखी सेवा करूनच मिळेल. ख्रिस्तसभेत आपण सत्ता आणि पद मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतो की, ख्रिस्तासारखे त्यागमय जीवन जगून सेवक बनण्याचा प्रयत्न करत असतो ?

प्रार्थना :  हे प्रभू,  तुझे राज्य हे आध्यात्मिक राज्य आहे तसेच राज्य आमच्या सर्वांच्या  हृदयात येवो आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या