सामान्यकाळातील सातवा सप्ताह
मंगळवार दि. २८ मे २०२४
येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.
and in the age to come eternal life.संत जर्मेनुस-
महागुरू (४९६-५७६)
आपण देवाची आज्ञांकित मुले बनावीत व पवित्र जीवन जगावे म्हणून आवाहन करण्यात येत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेल्या प्रेषितांनी ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली.
ख्रिस्तासाठी आणि सुवार्तेसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेल्या सर्वांना स्वर्गीय नंदनवनात अक्षय आनंदाचे जीवन मिळाले. मात्र त्यासाठी त्यागच नाही, तर ख्रिस्ताप्रमाणे छळ व दुःख सहन करावे लागले. आपण सर्वजण प्रभू येशूचे अनुयायी आहोत. आपल्या सर्वांना आत्मत्याग, दुःख सहन व सेवाकार्य करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. प्रभू येशूने स्वत:ला पूर्णपणे रिक्त केले व त्याने आपले सर्वस्व आपल्या तारणासाठी समर्पित केले. प्रभू येशूचे औदार्य शब्दात वर्णन करता येत नाही. आपला त्याग व औदार्य वाया जाणार नाही तर त्याच्या शंभरपटीने आपणास देवाचा आशीर्वाद मिळणार आहे.
✝️
पहिले वाचन १ पेत्र : १:१०-१६
वाचक :पेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
बंधूंनो, ज्या संदेष्ट्यांनी तुम्हांवर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला; त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे आणि त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या, त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला ह्याविषयी ते शोध करत होते. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की, स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तुम्हास सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे, तर तुम्हासाठी करत होते; त्या गोष्टी न्याहाळून पाहाण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. म्हणून तुम्ही आपली मनोरूपी कंबर बांधा आणि सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार आचरण करू नका, तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.”
First Reading :
1 Peter 1:10-16
Beloved: Concerning the salvation, the prophets who prophesied about the grace that was to be yours searched and enquired carefully, enquiring what person or time the Spirit of Christ in them was indicating when he predicted the sufferings of Christ and the subsequent glories. It was revealed to them that they were serving not themselves but you, in the things that have now been announced to you through those who preached the good news to you by the Holy Spirit sent from heaven, things into which angels long to look. Therefore, preparing your minds for action, and being sober-minded, set your hope fully on the grace that will be brought to you at the revelation of Jesus Christ. As obedient children, do not be conformed to the passions of your former ignorance, but as he who called you is holy, you also be holy in all your conduct, since it is written, "You shall be holy, for I am holy."
Thanks be to God
प्रतिसाद ९८:१-४
प्रतिसाद : परमेश्वराने आपला विजय घोषित केला आहे.
१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.
त्याने आपल्या उजव्या हाताने,
आपल्या पवित्र बाहूने स्वतः साठी विजय साधला आहे.
२) परमेश्वराने आपला विजय घोषित केला आहे,
राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया
आणि आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे.
३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी
आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो,
परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने,
आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा.
Psalm 98:1, 2-3ab, 3cd-4
The Lord has made known his salvation.
O sing a new song to the Lord,
for he has worked wonders.
His right hand and his holy arm
have brought salvation. R
The Lord has made known his salvation,
has shown his deliverance to the nations.
He has remembered his merciful love
and his truth for the house of Israel. R
All the ends of the earth have seen the salvation
of our God. Shout to the Lord,
all the earth, break forth into joyous song,
and sing out your praise. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने
आलेलुया!
Acclamation:
Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom.
शुभवर्तमान मार्क १०:२८-३१
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
पेत्र येशूला म्हणू लागला, 'पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.' येशूने उत्तर दिले, 'मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता आणि सुवार्तेकरता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.'
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mark 10:28-31
At that time: Peter began to say to Jesus, "See, we have left everything and followed you." Jesus said, "Truly, I say to you, there is no one who has left house or brothers or sisters or mother or father or children or lands, for my sake and for the gospel, who will not receive a hundredfold now in this time, houses and brothers and sisters and mothers and children and lands, with persecutions, and in the age to come eternal life. But many who are first will be last, and the last first."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू पेत्राच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतो की, ज्यांनी स्वर्गराज्याच्या स्थापनेसाठी आणि येशूसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आहे. त्यांना ह्याच जीवनात शंभर पट दिले जाईल. म्हणजेच ज्यांना समाजातील सदस्यांमध्ये सुरक्षित आश्रय मिळतो. मात्र त्याच्या मागे चालणाऱ्यालोकांचा छळ होईल पण येशू त्यांना सांगतो की, समाज्यात अन्यायाविरुद्ध लढताना तुम्ही जीवन जगत राहीले तर सार्वकालिक जीवनाचा खजिना तुमची वाट बघीत आहे. येशूसाठी त्यागमय जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करतो का? सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आपण कोणती धडपड करत आहोत ?
प्रार्थना : हे प्रभू, सार्वकालिक जीवन देणारा तू देव आहेस. त्याग व समर्पण करुन सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या