सामान्यकाळातील सातवा सप्ताह
सोमवार दि. २७ मे २०२४
"तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये.""You lack one thing: go, sell all that you have and give to the poor, and you will have treasure in heaven; and come, follow me."
श्रीमंती वाईट नाही किंवा प्रभू येशू श्रीमंतांच्या विरोधात नाही. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूला सार्वकालिक जीवनाविषयी एका श्रीमंत माणसाने प्रश्न विचारला. आपण भौतिक व जागतिक गोष्टींच्या मोहजाळात अडकून न पडता स्वर्गीय संपत्तीचा ध्यास घ्यायला हवा. खऱ्या अर्थाने आपण सर्वजण सार्वकालिक म्हणजेच स्वर्गीय जीवनाचे वारसदार आहोत, मात्र त्यासाठी त्याग, समर्पण आणि एकनिष्ठेने प्रभूला अनुसरणे गरजेचे आहे.
जागतिक श्रीमंती आणि वैभव आपल्याला देवापासून व सार्वकालिक वैभवापासून दूर घेऊन जाऊ शकतात. म्हणूनच आपण पैसा व श्रीमंतीचे गुलाम न बनता प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन १पेत्र १:३-९
वाचक :पेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्ही ख्रिस्ताला पाहिले नसताही त्याच्यावर प्रीती करता आणि विश्वास ठेवता म्हणून तुम्ही अनिर्वाच्य आनंदाने भरला आहात."
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ आणि अक्षय वतन मिळवण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्याद्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहा, त्या तुम्हांसाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करता. तरी तुम्ही आता थोडावेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले. ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असा तुमचा विश्वास हा ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस त्याची प्रशंसा, गौरव आणि मान ठरावा. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता. आता तो दिसत नसताही तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवाचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
1 Peter 1:3-9
Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ! According to his great mercy, he has caused us to be born again to a living hope through the resurrection of Jesus Christ from the dead, to an inheritance that is imperishable, undefiled, and unfading, kept in heaven for you, who by God's power are being guarded through faith for a salvation ready to be revealed in the last time. In this you rejoice, though now for a little while, if necessary, you have been grieved by various trials, so that the tested genuineness of your faith more precious than gold that perishes though it is tested by fire may be found to result in praise and glory and honour at the revelation of Jesus Christ. Though you have not seen him, you love him. Though you do not now see him, you believe in him and rejoice with joy that is inexpressible and filled with glory, obtaining the outcome of your faith, the salvation of your souls.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद १११ : १-२,५-६,९,१०
प्रतिसाद : प्रभू आपल्या कराराचे सदैव स्मरण ठेवतो.
१) परमेश्वराचे स्तवन करा. सज्जनांच्या सभेत
आणि मंडळीत मी अगदी मनापासून
परमेश्वराचे उपकारस्मरण करीन.
परमेश्वराची कृत्ये थोर आहेत,
ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात
२) ज्याने आपले भय धरणाऱ्यांना अन्न दिले आहे;
तो आपला करार सदा स्मरतो.
त्याने आपल्या लोकांना राष्ट्रे वतनादाखल देऊन
आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे.
३ ) त्याने आपल्या लोकांना उद्धारदान
पाठवून दिले आहे, त्याने आपला करार
सर्वकाळासाठी नेमला आहे.
त्याचे नाव पवित्र आणि भययोग्य आहे.
४ परमेश्वराचे भय ज्ञानाचा होय;
त्याप्रमाणे जे वागतात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते.
त्याचे स्तवन सर्वकाळ चालते.
Psalm 111:1b-2, 5-6, 9 & 10c
The Lord keeps his covenant ever in mind.
I will praise the Lord with all my heart,
in the meeting of the just and the assembly.
Great are the works of the Lord,
to be pondered by all who delight in them.
He gives food to those who fear him;
keeps his covenant ever in mind.
His mighty works he has shown to his people
by giving them the heritage of nations. R
He has sent redemption to his people,
and established his covenant forever.
Holy his name, to be feared.
His praise endures forever! R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
माझ्या देवा, तुझे मार्ग मला दाखव,
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
Though Jesus Christ was rich, yet for your sake he became poor, so that you by his poverty might become rich.
शुभवर्तमान मार्क १०:१७-२७
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुझे असेल नसेल ते विकून टाक आणि चल, माझ्या मागे ये."
येशू वाटेला लागणार तोच एकाने धावत येऊन आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “सर्वश्रेष्ठ गुरुजी, सार्वकालिक जीवनाचे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?" येशू त्याला म्हणाला, "मला श्रेष्ठ का म्हणतोस ? एक जो देव त्याच्यावाचून कोणी सर्वश्रेष्ठ नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहेत. 'खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, कोणाला ठकवू नको, आपला बाप आणि आपली आई ह्यांचा मान राख. " त्याने त्याला उत्तर दिले, "गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे." येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, "तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये." तो फार श्रीमंत होता. म्हणून हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले आणि कष्टी होऊन तो निघून गेला.
तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, "देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे फार कठीण आहे." तेव्हा त्याच्या बोलण्याने शिष्य थक्क झाले. येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे! धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे." तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले की, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे ?" येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, “मनुष्यांना ते अशक्य आहे, परंतु देवाला नाही; देवाला सर्वकाही शक्य आहे.'
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mark 10:17-27
At that time: As Jesus was setting out on his journey, a man ran up and knelt before him and asked him, "Good Teacher, what must I do to inherit eternal life?" And Jesus said to him, "Why do you call me good? No one is good except God alone. You know the commandments: 'Do not murder, Do not commit adultery, Do not steal, Do not bear false witness, Do not defraud, Honour your father and mother." And he said to him, "Teacher, all these I have kept from my youth." And Jesus, looking at him, loved him, and said to him, "You lack one thing: go, sell all that you have and give to the poor, and you will have treasure in heaven; and come, follow me." Disheartened by the saying, he went away sorrowful, for he had great possessions. And Jesus looked around and said to his disciples, "How difficult it will be for those who have wealth to enter the kingdom of God!" And the disciples were amazed at his words. But jesus said to them again, "Children, how difficult it is to enter the kingdom of God! It is easier for a camel to go through the eye of a needle than for a rich person to enter the kingdom of God." And they were exceedingly astonished, and said to him, "Then who can be saved?" Jesus looked at them and said, "With man it is impossible, but not with God. For all things are possible with God.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आज आपण पाहतो, एक तरुण व्यक्ती सार्वकलिक जीवनाच्या शोधात येशू जवळ येतो. येशूला उत्तम गुरूजी म्हणून संबोधतो. लहानपणापासून तो सगळ्या आज्ञांचे पाळन करतो. मात्र जेव्हा येशू त्याला आपले सर्व विकण्यासाठी सांगतो तेव्हा तो त्याच्या श्रीमंतीमुळे कष्टी होऊन परत जातो. येशूच्या काळात, दुसऱ्यांच्या जमिनी बळकावणे व शेजाऱ्यांची फसवणुक करून श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला जात होता. संत जेम्स म्हणतो, "अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हांला होणारआहेत त्याविषयी रडून आकांत करा. पहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापिली त्यांची "तुम्ही” अडकवून ठेवलेली "मजुरी ओरडत आहे;" आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला; वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ति केली.” (जेम्स : ५:१, ४-५) गरिब लोक त्यांच्या वेतनावर दररोज अवलंबून होते. म्हणून येशू त्यांच्या हे निदर्शनात आणतो. आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आपण योग्य वेतन देऊन त्यांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या