पवित्र त्रैक्याचा सण
रविवार
२६ मे २०२४
पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिव तुमच्याबरोबर आहे.”
And behold, I am with you always, to the end of the age."
✝️
परमेश्वर देव एकच अविभाज्य असा देव आहे, परंतु त्याचे - प्रकटीकरण तीन वेगवेगळ्याप्रकारे झाले आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा अशा प्रकारे आपण देवाला संबोधतो. ह्या अतिपवित्र त्रैक्याचा आपण आज सोहळा साजरा करीत आहोत. देवाला आपण त्याचा चांगुलपणा, प्रीति, कृपा, दया, सहनशीलता, पवित्रता, नीतिमत्व, सत्य, विश्वासुपणा अशा विविध गुणलक्षणांद्वारे जाणतो. पवित्र वैक्यासंबंधी पवित्र शास्त्रामध्ये स्पष्टपणे जरी उल्लेख नसला तरी त्याचा पाया पवित्र शास्त्रात आहे.
'हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. अशी स्वर्गीय वाणी प्रभू येशूच्या बाप्तिस्म्याचे वेळी झाली आणि त्याचवेळी पवित्र आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरला' (मत्तय ३:१३-१७). आजच्या शुभवर्तमानात प्रभूयेशू म्हणतो, 'सर्व लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने स्नानसंसकार द्या'. संत पौल करिथ येथील मंडळीला म्हणतो, 'प्रभूयेशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीति आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हांसर्वासह असो' (२ करिंथ १३:१४).प्रेमळ पित्याने सर्वकाही निर्माण केले, आपल्या प्रिय पुत्राद्वारे त्याने जगाचे तारण केले व पवित्रीकरणाचे सेवाकार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याला या जगात पाठविले. तोच पवित्र आत्मा आज निरनिराळ्या प्रकारे देवाचे राज्य या जगात यावे म्हणून कार्यरत आहे. आपल्या जीवनातील पवित्र त्रैक्याचे महत्व जाणून घेवून आपले जीवन पवित्र त्रैक्याला समर्पित करू या.
✝️
पहिले वाचन : अनुवाद ४:३२-३४.३९-४०
वाचक : अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही."
मोशे लोकांना म्हणाला, “देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले तेव्हापासून तुमच्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी मोठी गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती काय, हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत विचारून पाहा. तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत काय? त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने इजिप्त देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युध्दे, पराक्रमी हात आणि उगारलेला बाहू ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपणासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय? म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही. तुमचे आणि तुमच्यामागून तुमच्या वंशजांचे बरे व्हावे आणि तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला निरंतरचा देत आहे त्यात तुम्ही चिरकाळ राहावे म्हणून आज मी तुम्हांला देत असलेले विधी आणि आज्ञा ह्यांचे पालन करा.'
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Deuteronomy 4:32-34. 39-40 Moses said to the people: "Ask now of the days that are past,
which were before you, since the day that God created man on the earth, and ask from one end of heaven to the other, whether such a great thing as this has ever happened or was ever heard of. Did any people ever hear the voice of a god speaking out of the midst of the fire, as you have heard, and still live? Or has any god ever attempted to go and take a nation for himself from the midst of another nation, by trials, by signs, by wonders, and by war, by a mighty hand and an outstretched arm, and by great deeds of terror, all of which the LORD your God did for you in Egypt before your eyes? Know therefore today, and lay it to your heart, that the LORD is God in heaven above and on the earth beneath; there is no other. Therefore you shall keep his statutes and his commandments, which I command you today, that it may go well with you and with your children after you, and that you may prolong your days in the land that the LORD your God is giving you for all time."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३३:४,६, ९, १८ १९,२०,२२
प्रतिसाद : परमेश्वराने निवडलेली प्रजा धन्य.
१) परमेश्वराचे वचन सरळ आहे,
त्याची सर्व कृती सत्याची आहे त्याला नीती
आणि न्याय ही प्रिय आहेत,
परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.
२) परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले,
त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले.
कारण तो बोलला आणि अवघे झाले.
त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले.
३) पाहा, जे परमेश्वराने भय धरतात
आणि त्याच्या दयेची अपेक्षा करतात,
त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा
आणि दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा
म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.
४) आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे.
आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे.
हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे,
म्हणून आम्हावर तुझी कृपादृष्टी असो.
Psalm 33:4-5, 6 and 9, 18-19, 20 and 22 ( 12b)
R Blessed the people the Lord has chosen as his heritage.
The word of the Lord is faithful,
and all his works to be trusted.
The Lord loves justice and right,
and his merciful love fills the earth. R
By the word of the Lord the heavens were made,
by the breath of his mouth all their host.
He spoke, and it came to be.
He commanded; it stood in place. R
Yes, the Lord's eyes are on those who fear him,
who hope in his merciful love,
to rescue their souls from death,
to keep them alive in famine. R
Our soul is waiting for the Lord.
He is our help and our shield.
May your merciful love be upon us,
as we hope in you, O Lord. R
दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ८:१४-१७
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"आपण 'अब्बा, बापा', अशी हाक मारावी असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे."
जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण “अब्बा, बापा,” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो आणि जर मुले तर वारसही आहो, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहो, आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
Second reading : Romans 8:14-17
Brethren: All who are led by the Spirit of God are sons of God. For you did not receive the spirit of slavery to fall back into fear, but you have received the Spirit of adoption as sons, by whom we cry, "Abba! Father!" The Spirit himself bears witness with our spirit that we are children of God, and if children, then heirs-heirs of God and fellow heirs with Christ, provided we suffer with him in order that we may also be glorified with him.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू देव जो आहे, जो होता आणि जो येणार आहे, त्या पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो.
आलेलुया!
Acclamation:
Glory be to the Father, and to the Son, and to the
Holy spirit: to God who is, who was and who is to come.
शुभवर्तमान मत्तय २८:१६-२०
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नामाने स्नानसंस्कार द्या."
अकरा शिष्य गालीलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी काही शिष्यांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने स्नानसंस्कार द्या. जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिव तुमच्याबरोबर आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Matthew 28:16-20
At that time: The eleven disciples went to Galilee, to the mountain to which Jesus had directed them. And when they saw him they worshiped him, but some doubted. And Jesus came and said to them, "All authority in heaven and on earth has been given to me. Go therefore and make disciples of all nations, baptizing them in the name of the Father and of the Son and of the Holy Spirit, teaching them to observe all that I have commanded you. And behold, I am with you always, to the end of the age."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहोत. प्रत्येक संस्कार आपण पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने घेत असतो. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्यास नियुक्त करतो. ह्या स्नानसंस्काराद्वारे आपण त्रैक्याच्या कुटूंबाचे सदस्य बनण्याचे भाग्य आपल्याला मिळते. आपण देवाची मुले बनतो. आणि त्याच्या प्रेमात राहणाचे भाग्य आपल्याला मिळते. देव प्रेम आहे हे आपल्याला पित्याचे आपल्या पुत्राबरोबरचे नाते आणि पिता आणि पुत्राचे नाते कशाप्रकारें पवित्र आत्म्याबरोबर आहे हे ह्याद्वारे कळते. देवाची मुले बनल्याने आपले देखिल कर्तव्य आहे की, आपण त्याच्या प्रेमाची साक्ष इतरांना द्यावी. ख्रिस्ती या नात्याने पित्याचा, पुत्राचा आणि पवित्र आत्म्याचा आपल्याला आलेला अनुभव आपण इतरांना कशाप्रकारे दर्शवतो ?
प्रार्थना : हे प्रभो परमेश्वर, तुझे सामर्थ्य, तुझी कृपा व तुझे प्रेम हे अनाकलनीय आहे. आम्ही तुला शरण आलो आहोत, आमचा स्वीकार कर, आमेन.
✝️
0 टिप्पण्या