Marathi Bible Reading | Saturday 25th May 2024 | 7th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील  सातवा  सप्ताह 

शनिवार दि. २५ मे  २०२४ 

“बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.
"Let the children come to me; do not hinder them, for to such belongs the kingdom of God.

संत बीड

वर्तनसाक्षी, धर्मपंडित (६७३-७३५)  


 चिंतन: "जो आपल्या शेजाऱ्यावर शुद्ध अंतःकरणाने प्रेम करतो तोच उत्पन्न कर्त्या  देवावर प्रेम करू शकतो." संत बीड

प्रार्थना निरनिराळ्या प्रकारे करता यावी म्हणून संत याकोब स्पष्ट करीत आहे. 'प्रार्थना करावी, स्तोत्रे गावी, वडील मंडळीला बोलावून तेल लावावे, ओणवून प्रार्थना करावी, विश्वासाने प्रार्थना करावी.

येशूने बालकांना  जवळ घेतले.  आलिंगन देऊन प्रभूने त्यांना आशीर्वाद दिला. प्रभू येशूचा तो प्रेमळ स्पर्श किती आल्हाददायक असेल. बालकांना येण्यास मनाई करणाऱ्या शिष्यांची प्रभूने कान उघडणी केली . आपण बालकांप्रमाणे निरागस, नम्र व निष्पाप बनले पाहिजे म्हणूनच 'लहानपण देगा देवा' अशी आळवणी कराविशी वाटते. बालकांतील जे  चांगले गुण आहेत ते जोपासण्यासाठी आपण प्रेरणा स्रोत बनणे आवश्यक आहे.

प्रभू येशूचा स्पर्श, त्याचा आशीर्वाद व त्याची करुणा आपल्या प्रत्येकाला लाभावी म्हणून प्रभूच्या सहवासात जाऊ या. स्वतःबरोबरच जे प्रभूपासून दुरावले आहेत, जीवनातील समस्येमुळे दुःखी, कष्टी आहेत, आजारी आहेत अशा सर्वांसाठी  आज विशेष प्रार्थना करु या. 
✝️   

पहिले वाचन याकोब ५:१३-२०
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन 
“नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रवक असते, "

तुम्हापैकी कोणी दुःख सहन करीत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय? त्याने स्तोत्रे गावी, तुम्हीपैकी कोणी दुखणाईत आहे काय ? त्यांने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावून त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखणाइतास वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पापे एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता, त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजवले. माझ्या बंधूंनो, तुम्हांमधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारे फिरवले, तर अशा पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो, तो स्वतःचा जीव मरणापासून वाचवील आणि पापांची रास झाकील हे ध्यानात ठेवा.

प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
James 5:13-20

Beloved: Is anyone among you suffering? Let him pray. Is anyone cheerful?Let him sing praise. Is anyone among you sick? Let him call for the elders of the church, and let them pray over him, anointing him with oil in the name of the Lord. And the prayer of faith will save the one who is sick, and the Lord will raise him up. And if he has committed sins, he will be forgiven. Therefore,confess your sins to one another and pray for one another, that you may be healed. The prayer of a righteous person has great power as it is working. Elijah was a man with a nature like ours, and he prayed fervently that it might not rain, and for three years and six months it did not rain on the earth. Then he prayed again, and heaven gave rain,and the earth bore its fruit. My brothers, if anyone among you wanders from the truth and someone brings him back, let him know that whoever brings back a sinner from his wandering will save his soul from death and will cover a multitude of sins.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  १४१ : १-३,८
प्रतिसाद :   माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे सादर होवो.

१ हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो,
 माझ्याकडे सत्वर ये; मी तुझा धावा करतो 
तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. 
माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, 
माझे हात उभारणे 
संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे, सादर होवो.

२)हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव, 
माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. तरी हे प्रभू परमेश्वरा, 
माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; 
मी तुझ्यावर भरवसा टाकला आहे, 
माझा जीव जाऊ देऊ नकोस.

Psalm 141:1-2, 3 and 8

Let my prayer be accepted as incense before you.

 I have called to you, Lord; hasten to help me!
Hear my voice when I cry to you.
Let my prayer be accepted as incense before you, 
the raising of my hands like an evening oblation. R 

Set, O Lord, a guard on my mouth; 
keep watch at the door of my lips! 
To you my eyes are turned, O Lord, my Lord. 
In you I take refuge; spare my soul! R


जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मला सरळ मार्गाने ने.
 आलेलुया!

Acclamation: 
Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom

शुभवर्तमान मार्क  १०:१३-१६
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 “जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश देवराज्यात मुळीच होणार नाही."

येशूने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, तेव्हा शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हांला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. मग त्याने त्यांना कवटाळून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.

 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:Mark 10:13-16

At that time: They were bringing children to Jesus that he might touch them, and the disciples rebuked them. But when Jesus saw it, he was indignant and said to them, "Let the children come to me; do not hinder them, for to such belongs the kingdom of God. Truly, I say to you, whoever does not receive the kingdom of God like a child shall not enter it." And he took them in his arms and blessed them, laying his hands on them.

 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन जेव्हा लोक बालकांना येशूजवळ आणत  होती तेव्हा शिष्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रभू येशू म्हणतो की, त्यांना माझ्याकडे येऊ द्या कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांसाठी आहे. जो स्वर्गाचे राज्य लहान बाळकांप्रमाणे स्विकारत नाही तो स्वर्गराज्यात प्रवेश करू शकणार नाही. म्हणून ज्याला स्वर्गराज्यात प्रवेश करण्याची इच्छा आहे त्यांनी लहान बाळकांसारखे व्हायला हवे. स्वर्ग राज्याचे स्वागत करणे म्हणजे लहान बाळकांचे स्वागत करण्यासारखे आहे. त्याकाळी लहान बालकांना अगदी खालच्या दर्जाचे संबोधण्यात आले होते. म्हणून मुलांचे स्वागत केल्याने येशूचे देखील स्वागत होते. येशूच्या स्वर्गराज्याचे स्वागत आपण इतरांना आपल्या दर्जाचे म्हणून करतो का ?

प्रार्थना : हे प्रेमळ येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यास आम्हाला प्रेरणा लाभू दे, तुझा आशीर्वाद आम्हावर सर्वदा असू दे, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या