सामान्यकाळातील सातवा सप्ताह
शुक्रवार दि. २४ मे २०२४
'पुरुष आपल्या आईबापाला सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ते एकदेह होतील.'
Therefore a man shall leave his father and mother and hold fast to his wife, and the two shall become one flesh.
सण ख्रिस्तीजनांच्या सहाय्या ख्रिस्त जणांचीआई पवित्र माता मारिया
आम्हांसाठी विनंती कर
विवाह संस्कार हा ख्रिस्त आणि ख्रिस्तसभा ह्यांच्यातील संबंधाचे एक प्रतीक आहे, तसेच विश्वास, प्रेम, निष्ठा व ऐक्य यावर आधारलेली सहभागिता आहे. ते पवित्र ऐक्य अखंडित व अबाधित ठेवून मुलांना जन्म देणे व त्यांचे श्रद्धासंवर्धन करणे हे विवाहाचे आवश्यक घटक मानले जातात.
नर व नारी हा परमेश्वराच्या प्रतिरुपाचा अविष्कार आहे. परुश्यांचा प्रश्नाला उत्तर देतांना प्रभू येशूने स्पष्ट केले आहेकी, ईश्वर निर्मित प्रेमाचा अविष्कार स्त्री-पुरुषाच्या ऐक्याने घडत असतो. कारण देवाच्या योजनेनुसारच एक स्त्री व एक पुरुष विवाहसंस्काराद्वारे एक देह होतात, म्हणूनच ख्रिस्त म्हणतो, ‘देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.' ख्रिस्तसभेत ह्याच कारणासाठी वैवाहाची घटस्फोटाला विरोध आहे.
विवाहाची परिणीती जरी लैंगिक संबंधात होत असली, तरी परस्परावरील निष्ठा आणि प्रेम यामुळे वैवाहिक जीवनाला परिपूर्णता लाभले. वैवाहिक जीवनावर चिंतन करीत असतांना आपण आज आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिसाठी प्रार्थना करु या. पति-पत्नी व मुले असे लहानसे ख्रिस्ती कुटुंब म्हणजे ख्रिस्तसभाच आहे.
✝️
पहिले वाचन याकोब ५:९-१२
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन
“पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे."
बंधूंनो, तुम्ही एकमेकांविषयी कुरकुर कराल तर तुम्ही दोषी ठराल. पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःखसहन आणि त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या. पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही इयोबच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे, ह्यावरून प्रभू फार कनवाळू आणि दयाळू आहे हे तुम्हांला दिसून आले. माझ्या बंधूनो, मुख्यतः शपथ वाहू नका. स्वर्गाची पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हांला होय म्हणावयाचे तर होय म्हणा, नाही म्हणावयाचे तर नाही म्हणा.
First Reading :
James 5:9-12
Do not grumble against one another, brothers, so that you may not be judged; behold, the Judge is standing at the door. As an example of suffering and patience, brothers, take the prophets who spoke in the name of the Lord. Behold, we consider those blessed who remained steadfast. You have heard of the steadfastness of Job, and you have seen the purpose of the Lord, how the Lord is compassionate and merciful. But above all, my brothers, do not swear, either by heaven or by earth or by any other oath, but let your "yes" be yes and your "no" be no, so that you may not fall under condemnation.
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १०३ : १-४,८-९,११-१२
प्रतिसाद : परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे..
१) हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे.
हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे,
त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
२) तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो,
तो तुझे सर्व रोग बरे करतो,
तो तुझा जीव विनाशगर्तेतून वाचवतो,
तो तुला दया आणि करुणा ह्यांचा मुकूट घालतो .
३)परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे,
तो मंदक्रोध आणि दयामय आहे.
तो सर्वदाच दोष देत राहणार नाही,
तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही..
४ )जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे,
तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे.
पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,
तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.
Psalm The Lord is compassionate and gracious.
Psalm 103:1-4, 8-9, 11-12
The Lord is compassionate and gracious,
Bless the Lord, O my soul,
and all within me, his holy name.
Bless the Lord, O my soul,
and never forget all his benefits. R
It is the Lord who forgives all your sins,
who heals every one of your ills,
who redeems your life from the grave,
who crowns you
with mercy and compassion. R
The Lord is compassionate and gracious,
slow to anger and rich in mercy.
He will not always find fault;
nor persist in his anger forever. R
For as the heavens are high above the earth,
so strong his mercy for those who fear him.
As far as the east is from the west,
so far from us does he
remove our transgressions. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे,
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलुया !
Acclamation:
Your word, O Lord, is truth; sanctify us in the truth.
शुभवर्तमान मार्क १०:१-१२
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये."
येशू यहुदिया प्रांतात यार्देनच्या पलीकडे गेला, तेव्हा पुन्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आले आणि तो आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांना शिकवू लागला.
परुशी तेथे आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले, “पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय ?" उत्तरादाखल तो म्हणाला, "मोशेने तुम्हाला काय आज्ञा केली आहे?” ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे.” येशू त्यांना म्हणाला, "तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली; परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून 'देवाने त्यांना स्त्रीपुरूष असे उत्पन्न केले.' ह्या कारणामुळे 'पुरुष आपल्या आईबापाला सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ते एकदेह होतील.' ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले ते मनुष्याने तोडू नये."
नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, "जो कोणी आपल्या बायकोला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते."
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mark 10:1-12
At that time: Jesus went to the region of Judea and beyond the Jordan, and crowds gathered to him again. And again, as was his custom, he taught them. And Pharisees came up and in order to test him asked, "Is it lawful for a man to divorce his wife?" He answered them, "What did Moses command you?" They said, "Moses allowed a man to write a certificate of divorce and to send her away." And Jesus said to them, "Because of your hardness of heart he wrote you this commandment. But from the beginning of creation, 'God made them male and female. Therefore a man shall leave his father and mother and hold fast to his wife, and the two shall become one flesh. So they are no longer two but one flesh. What therefore God has joined together, let not man separate." And in the house the disciples asked him again about this matter. And he said to them, "Whoever divorces his wife and marries another commits adultery against her, and if she divorces her husband and marries another, she commits adultery."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: प्रभू येशू परूश्यांच्या प्रश्नांचे उत्तर देताना म्हणतो की, तुमच्या हृदयाच्या कठोरपणामुळे मोशेने सुटपत्र देण्याची परवानगी दिली. घटस्फोट देवाच्या मानवतेसाठी आखलेल्या मुळ योजनेत बसत नाही. येशू त्यांना म्हणतो की, लग्न संस्कारात दोन व्यक्ती भागीदारीचे ठेवा. एखाद्या मीठाप्रमाणे तुम्ही स्वतः आपल्या जीवनाची पारख करा, तुमच्या जीवनात मीठाचा चविष्टपणा आहे म्हणजेच तुम्ही तुमचे जीवन पावित्र्याने जगता ते पहा. तसेच इतरांशी शांतीने वागता की पहा. आपल्या जीवनात आपण इतरांना पापात पाडण्याचा प्रयत्न करतो का? इतरांना पापात पाडल्याने आपण नरकाच्या शिक्षेस पात्र बनतो ह्याचे गांभीर्य आपल्याला समजले आहे का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, पति-पत्नी मधील ऐक्य, प्रेम, विश्वास व निष्ठा अबाधित राहावी आणि कुटुंब खऱ्या ख्रिस्ती श्रद्धेचा आदर्श बनावे म्हणून तुझी कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या