सामान्य काळातील चौदावा
रविवार ७ जुलै २०२४
संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टात अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो.”
"A prophet is not without honor, except in his hometown and among his relatives and in his own household."
'ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे.' संत पौलाने कुठल्याच अडथळ्याची पर्वा न करता प्रभू येशूचा संदेशसर्वांना दिला.
आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की अनेक अद्भूते करीत देवराज्याची सुवार्ता घोषित करणाऱ्या प्रभू येशूचा आपल्याच माणसांनी अव्हेर केला. मात्र प्रभू येशू तिथेच थांबला नाही तर 'तो शिक्षण देत गावोगाव फिरला.' संत पौल प्रभू येशूची सुवार्ता पसरवित असताना त्याचा भयंकर छळ झाला, मात्र विश्वासाने व मोठ्या धैर्याने संत पौलाने प्रभूची सुवार्ता पसरविली. प्रभू येशूचे अनुकरण सर्व शिष्यांनी आणि प्रेषितांनी केले. आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे अखंडितपणे ते सुवार्ता घोषवित राहिले. सुवार्तिक श्रद्धावान माणसांचे जीवन सोपे नसते हे बायबलमधील व ख्रिस्ती इतिहासातील अनेक उदाहरणावरून आपल्याला समजून येते. आपली श्रद्धा कशी दृढ करता येईल ह्यासाठी मार्गदर्शक तत्वे नाहीत तर जिवंत उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आज आपण आपल्या श्रद्धामय जीवनावर चिंतन करुया.
✝️
पहिले वाचन : यहेज्केल २:२-५
वाचक : यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"हे त्याचे वंशज उद्धट आणि कठीण हृदयाचे आहेत, आणि निदान त्यांच्याकडे कोणी तरी संदेष्टा गेला होता हे त्यांना समजेल."
प्रभू माझ्याबरोबर बोलत असता आत्म्याने माझ्या ठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले तेव्हा त्याचे बोलणे मला ऐकू आले. तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल वंशजांकडे, माझ्याशी फितुरी केलेल्या त्या फितुरी राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी आणि त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत माझ्याविरुद्ध वर्तन केले आहे. हे त्यांचे वंशज उद्धट आणि कठीण हृदयाचे आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवत आहे; 'प्रभू परमेश्वर असे म्हणतो' हे त्यांना सांग. ते तुझे ऐकोत वा न ऐकोत (ते बंडखोर आहेत हे विसरू नकोस), निदान त्यांच्याकडे कोणी संदेष्टा गेला होता हे त्यांना समजेल."
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Ezekiel 2:2-5
In those days: The Spirit entered into me and set me on my feet, and I heard him speaking to me. And he said to me, "Son of man, I send you to the people of Israel, to nations of rebels, who have rebelled against me. They and their fathers have transgressed against me to this very day. The descendants also are impudent and stubborn: I send you to them, and you shall say to them, "Thus says the Lord GOD.' And whether they hear or refuse to hear (for they are a rebellious house) they will know that a prophet has been among them.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : १२३:१-५
प्रतिसाद : आमचे डोळे परमेश्वराकडे लागलेले आहेत.
१) हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या,
मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावतो;
पाहा, जसे दासांचे डोळे आपल्या
धन्याच्या हाताकडे असतात,
२) जसे दासीचे डोळे आपल्या
धनिणीच्या हाताकडे असतात,
तसे आमचा देव परमेश्वर
आमच्यावर कृपा करीपर्यंत
त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले आहेत.
३) हे परमेश्वरा आमच्यावर कृपा कर,
आमच्यावर कृपा कर आमची पुरी नालस्ती होत आहे.
सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास
आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी
आमच्या जीवाला मातीमोल करून टाकले आहे.
Psalm 123:1-2ab, 2cdef, 3-4 (R. 2ef)
Our eyes are on the Lord our God, till he show us his mercy.
To you have I lifted up my eyes,
you who dwell in the heavens.
Behold, like the eyes of slaves
on the hand of their lords. R
Like the eyes of a servant
on the hand of her mistress,
so our eyes are on the Lord our God,
till he show us his mercy. R
Have mercy on us, Lord, have mercy.
We are filled with contempt.
Indeed, all too full is our soul
with the scorn of the arrogant,
the disdain of the proud. R
दुसरे वाचन २ करिंथ १२:७-१०
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. "
प्रगटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला गुद्दा मारण्याकरिता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली; परंतु त्याने मला म्हटले आहे, “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेला येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद..
Second reading : 2 Corinthians 12:7-10
Brethren: To keep me from becoming conceited because of the surpassing greatness of the revelations, a thorn was given me in the flesh, a messenger of Satan to harass me, to keep me from becoming conceited. Three times I pleaded with the Lord about this, that it should leave me. But he said to me, "My grace is sufficient for you, for my power is made perfect in weakness." Therefore I will boast all the more gladly of my weaknesses, so that the power of Christ may rest upon me. For the sake of Christ, then, I am content with weaknesses, insults, hardships, persecutions, and calamities. For when I am weak, then I am strong.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
भू म्हणतो, मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.
आलेलुया!
Acclamation:
The Spirit of the Lord is upon me; because he has anointed me to proclaim good news to the poor.
शुभवर्तमान मार्क ६: १-६
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"संदेष्ट्याचा सन्मान मात्र त्यांच्या देशात होत नसतो. "
येशू आपल्या गावात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. मग शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले आणि म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे. आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात! जो सुतार, जो मरियेचा आणि याकोब याचा मुलगा, योसे, यहुदा आणि शिमोन ह्यांचा भाऊ तोच हा आहे ना ? आणि ह्यांच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना ? असे ते त्याच्याविषयी कुजबूजू लागले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टात अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो.” थोड्या आजारी लोकांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे येशूला आश्चर्य वाटले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: Mark 6:1-6
At that time: Jesus came to his hometown, and his disciples followed him. And on the Sabbath he began to teach in the synagogue, and many who heard him were astonished, saying, "Where did this man get these things? What is the wisdom given to him? How are such mighty works done by his hands? Is not this the carpenter, the son of Mary and brother of James and Joses and Judas and Simon? And are not his sisters here with us?" And they took offense at him. And Jesus said to them, "A prophet is not without honor, except in his hometown and among his relatives and in his own household." And he could do no mighty work there, except that he laid his hands on a few sick people and healed them. And he marvelled because of their unbelief. And he went about among the villages teaching.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: "येशू एक मसिहा"
येशू आपल्या गावी म्हणजे नाझरेथ गावात येतो. तिथेच तो लहानाचा मोठा झाला होता. पण त्या लोकांनी येशूचा सन्मान करण्याऐवजी, त्याचा अव्हेर केला. त्यांनी येशूला का नाकारले? नाझरेथ गावातील लोकांनी येशूला नाकारले कारण येशूचे ज्ञान, त्याची चमत्कार करण्याची शक्ती, ह्याचा उलगडा त्यांना झाला नाही. येशू एका साध्या सामान्य कुटूंबात वाढला, त्याचे आईवडील, भाऊ-बहिण ह्यांना ते ओळखत होते. त्यामुळे येशू हा खरोखर देवाचा पुत्र आहे. हे ते मानावयास तयार नव्हते. योहान १०:३३ मध्ये आपण वाचतो, "यहुद्यांनी उत्तर दिले," चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुम्हाला दगडमारकरीत नाही, तर तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणविता. येशू खरोखर इतरांसारखा साधा माणूस असता व स्वतःला देवाचा पुत्र म्हणून म्हणवित असता तर येशू त्यांना फसवत होता. पण तसे नाही तो मसिहा, ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, देवाने आपल्यावर ऐवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशूला ह्या जगात पाठविले. म्हणून प्रत्येक ख्रिस्ती माणसाच्या तोंडातून ख्रिस्त हाच प्रभू आहे, ही वाणी बाहेर पडायला हवी व प्रत्येक व्यक्ती येशूच्या नावाने ओळखली जावी.
प्रार्थना : प्रभू येशू, तुझ्यावरील व तुझ्या सुवार्तेवरील विश्वासात टिकून | राहण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️
.jpg)
0 टिप्पण्या