सामान्य काळातील चौदावा आठवडा
सोमवार ८ जुलै २०२४
“मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
"Take heart, daughter; your faith has made you well."
संत मरियम तेरसिया
Born : 26 April 1876 at Trichur, Kerala, India
⛪ Died : 8 June 1926 in Kuzhikattussery, Thissur, Kerala, India of natural causes
⛪ Beatified : 9 April 2000 by Pope John Paul II
• वर्तनसाक्षी
खिस्तसभा आज संत मरियम तेरसिया हीचा स्मृतीदिन साजरा करीत आहे. बालपणापासूनच तेरसीयाला देवाच्या प्रेमाची गोडी लागली व तिने स्वत:ला प्रार्थनामध्ये समर्पित केले. गरीब, आजारी आणि गरजवंतांच्या सेवेसाठी तिने स्वत:चे जीवन ख्रिस्तचरणी समर्पित केले आहे. बिशपांच्या विनंती करुन तिने फ्रान्सिस्कन क्लॅरेटस् संस्थेची स्थापना केली. तिच्या प्रार्थनेद्वारे संत तेरसीयाने आध्यात्म्याची उच्च पातळी गाठली होती. संत मरियम तेरेसीयाचा आदर्श समोर ठेवून आपण सेवाकार्य करण्यास प्रेरणा घेऊ या.
पहिले वाचन :होशेय २:१४.१५-१६.१९-२०
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन
“धर्माने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन."
परमेश्वर म्हणतो : “मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन. ती आपल्या तारुण्यातल्या दिवसांतल्याप्रमाणे, आणि इजिप्त देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी असे होईल की तू मला 'इशी' म्हणजे 'माझा पती' म्हणशील; यापुढे कधी मला 'बाली' म्हणजे 'माझा धनी' म्हणणार नाहीस. मी तुला सर्वकाळची आपली वाग्दत्त असे करीन; धर्माने, न्यायाने, ममतेने आणि दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन आणि तू परमेश्वराला ओळखशील.”
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Hosea 2:14-16,19-20
Thus says the Lord: "Behold, I will allure her, and bring her into the wilderness, and speak tenderly to her. And there she shall answer as in the days of her youth, as at the time when she came out of the land of Egypt. "And in that day, declares the Lord, you will call me 'My Husband', and no longer will you call me 'My Baal'. And I will betroth you to me for ever. I will betroth you to me in righteousness and in justice, in steadfast love and in mercy. I will betroth you to me in faithfulness. And you shall know the Lord."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४५:२-९
प्रतिसाद : परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे.
१) मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन
आणि सदासर्वकाळ तुझ्या नामाचे स्तवन करीन.
परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे;
त्याची थोरवी अगम्य आहे.
२) एक पिढी दुसऱ्या पिढीला तुझ्या
कृत्यांची प्रशंसा करीत राहील,
त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील.
तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप
आणि तुझी अद्भुत कृत्ये यांचे मी मनन करीन.
३) तुझ्या भयावह कृत्यांचे प्राबल्य लोक जाहीर करतील,
मी तुझे महात्म्य वर्णीन.
ते तुझ्या परमकृपेची आठवण काढतील
आणि तुझ्या न्याय्यत्वाचे पोवाडे गातील.
४ परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे;
तो मंदक्रोध आणि अतिदयाळू आहे.
परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे;
त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
Psalm 145:2-3, 4-5, 6-7, 8-9
The Lord is kind and full of compassion.
I will bless you day after day,
and praise your name forever and ever.
The Lord is great and highly to be praised;
his greatness cannot be measured. R
Age to age shall proclaim your works,
shall declare your mighty deeds.
They will tell of your great glory and splendour,
and recount your wonderful works.
They will speak of your awesome deeds,
recount your greatness and might.
They will recall your abundant goodness,
and sing of your just deeds with joy. R
The Lord is kind and full of compassion,
slow to anger, abounding in mercy.
How good is the Lord to all,
compassionate to all his creatures. R.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर,
तू आपल्या सत्पथाने मला चालव.
आलेलुया!
Acclamation:
Our Saviour Christ Jesus abolished death and brought life and immortality to light through the gospel.
शुभवर्तमान मत्तय ९:१८-२६
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे, तरी आपण या म्हणजे ती जिवंत होईल."
येशू योहानच्या शिष्यांबरोबर बोलत असताना कोणीएक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, "माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल." तेव्हा येशू उठला आणि त्याच्यामागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पाहा, बारा वर्षे रक्तस्त्रावाने पीडलेली एक स्त्री त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली; ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन." तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजवणाऱ्यांस आणि गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणू लागला, “वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले. मग लोकसमुदायाला बाहेर काढल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. हे वर्तमान त्या अखिल देशात पसरले.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 9:18-26
At that time while Jesus was speaking, behold, a ruler came in and knelt before him, saying, "My daughter has just died, but come and lay your hand on her, and she will live." And Jesus rose and followed him, with his disciples. And behold, a woman who had suffered from a discharge of blood for twelve years came up behind him and touched the fringe of his garment, for she said to herself, "If I only touch his garment, I will be made well." Jesus turned, and seeing her he said, "Take heart, daughter; your faith has made you well." And instantly the woman was made well. And when Jesus came to the ruler's house and saw the flute players and the crowd making a commotion, he said, "Go away, for the girl is not dead but sleeping." And they laughed at him. But when the crowd had been put outside, he went in and took her by the hand, and the girl arose. And the report of this went through all that district.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: "श्रद्धेचे फळ"
श्रद्धा ही प्रत्येक ख्रिस्ती माणसाचा आत्मा आहे. देव केवळ आपल्या तोंडातून निघणाऱ्या स्तुती गीताकडे पाहत नसतो, तर आपल्या अंतःकरणातील श्रद्धेकडे त्याची नजर असते, पहिले उदाहरण सभास्थानाचा अधिकारी त्याची लहान मुलगी मरणाच्या दारात होती, (मार्क ५:२३) तिला कुणी वाचविल असे त्याला वाटत नव्हते. त्याला येशूची आठवण होते. आपल्या लहान मुलीला मरणाच्या दाराशी सोडून तो येशूकडे धाव घेतो. पहा हा थक्क करणारा विश्वास. तो अधिकारी होता, तरी देखील तो येशूच्या पाया पडतो व येशूवर विश्वास ठेवतो. त्या श्रद्धेचे फळ त्याला मिळाले, त्याची मुलगी बरी झाली. दुसरे उदाहरण म्हणजे बारा वर्षे रक्तस्रावाने पिडलेली स्त्री. आपला आजार बरा होण्यासाठी तीने होते नव्हते ते सर्व खर्च केले. पण तिचा आजार काही बरा झाला नाही. मग तिला येशूची आठवण झाली. ती मनात म्हणाली, मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी स्पर्श केला तरी मी बरी होईन, काय हा विश्वास ? आणि त्या विश्वासामुळे तिला तिचे फळ मिळाले, विश्वास म्हणजे संपूर्ण शरण जाणे, संपूर्णतः शरण जाणे ही साधी गोष्ट नाही ते एक आव्हान आहे. विश्वास ही देवाची देणगी आहे. ती मिळविण्यासाठी प्रार्थना करणे आवश्यक आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्यावरील आमची श्रध्दा वाढावी म्हणून आम्ही सर्वस्वी तुला शरण येतो आमचा स्वीकार कर, आमेन.
✝️
0 टिप्पण्या