Marathi Bible Reading |Tuesday 9th July 2024 | 14th Week In Ordinary Time

सामान्य काळातील चौदावा  आठवडा

  मंगळवार ९ जुलै  २०२४ 


 "पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत.  म्हणून त्याची प्रार्थना करा." "The harvest is plentiful, but the labourers are few; 



 गोर्कुम (हॉलंड ) चे रक्तसाक्षी - 

संत निकोलस पिएल आणि त्याचे सहकारी (१५७२)

सोळाव्या शतकात कॅल्विन नावाचा एक प्रसिद्ध विचारवंत होऊन गेला. मात्र पुढे त्याने ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीविरुद्ध उघड उघड बंड पुकारले आणि कॅल्विनिझम नावाची विचारसरणी मानणाऱ्यांचा एक पंथ स्थापन केला. प्रॉटेस्टंट पंथासमानच त्यांची शिकवण होती. कालांतराने हा पंथ इतका व्यापक बनला की त्यांनी कॅथलिक शिकवण पाळणाऱ्या लोकांचा छळ करायला सुरवात केली.
हॉलंडमधील गोर्कुम या धर्मप्रांतात त्यांनी एक मोठे अमानुष हत्याकांड घडवून आणले. १९ धर्मगुरू आणि व्रतस्थांना त्यांनी ठार मारले. त्यापैकी बारा जणांना केवळ अतिपवित्र साक्रामेंतातील येशूच्या खऱ्या उपस्थितीवरील विश्वासापायी क्रुसावर खिळण्यात आले. त्यात एक धर्मगुरू तब्बल ९० वर्षांचे वृद्ध होते.
उरलेल्या सात जणांपैकी जेम्स लाकॉप्स ह्यांना शिडीवर उलटे टांगवण्यात आले आणि सहा जणांना खांबावर टांगून मारण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची निर्जीव शरिरे एका सार्वजनिक खड्ड्यात टाकण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इ. स. १६१६ पर्यंत म्हणजे १९४४ वर्षापर्यंत त्यातील एकही देह कुजला नाही. पुढे त्यांचे अवशेष बेल्जियम येथील क्रुसेल्सच्या फ्रान्सिस्कन चर्चमध्ये पुरण्यात आले. इ. स. १८६७ साली त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले.
प्रभू येशूला लोकांचा कळवळा आला कारण, 'मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे लोक बहकलेले होते.' प्रभू येशूने अशा सर्वांना जवळ केले.  त्यांच्या व्यथा समजून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. देवाचे वचन आणि देवराज्याची घोषणा करीत प्रभू येशूने अंधांना दृष्टी, मुक्यांना वाचा व बहियांना श्रवण शक्ती दिली. आजारी, अपंग आणि पीडित जनांना विश्वासात बळकट करुन महान चमत्कारांद्वारे देवाचे प्रकटीकरण केले. प्रभू येशू सर्वांचा मेंढपाळ,  सरंक्षण कर्ता, मार्गदर्शक, प्रकाश व मुक्तीदाता बनला.
आपण जर देवापासून, चांगुलपणापासून, सत्यापासून बहकून दूर गेलो असल्यास प्रभू येशूला आपला प्रभू आणि मेंढपाळ म्हणून त्याचा स्वीकार करु या. त्याच्या वचनावर विश्वास ठेवून त्याच्या कृपेच्या छायेत राहण्यासाठी प्रार्थना करु या. 
  
पहिले वाचन :होशेय ८:४-७,११-१३
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ते वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात. "

परमेश्वर म्हणतो : त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या विचाराने नेमले नाहीत. त्यांनी अधिपती स्थापले, पण त्यांना माझी संमती नव्हती. केवळ नष्ट होण्याकरिताच त्यांनी आपणासाठी आपल्या सोन्यारुप्यांच्या मूर्ती केल्या. हे शोमरोन, तुझ्या वासराचा त्याला वीट आहे. त्यांच्यावर माझा राग पेटला आहे. त्यांना निर्दोषता प्राप्त करायला किती काळ लागेल? कारण हेही इस्राएलकडून झाले. कारागिराने ते केले; ते देव नव्हेत. या शोमरोनच्या वासराचे तुकडेतुकडे होतील. कारण ते वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात. त्याला ताट नाही, अंकुराला कणीस येत नाही; आलेच तर ते परके खाऊन टाकतील. कारण इफ्राइमने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत. ह्या वेद्या त्याला पापमूलक झाल्या आहेत. मी त्याच्यासाठी आपल्या धर्माशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या तरी त्याला त्या परक्याच वाटतात. त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय; पण ती परमेश्वर स्वीकारत नाही. आता तो त्यांचा अधर्म स्मरेल आणि त्यांच्या पापांचे शासन करील; ते इजिप्तला परत जातील.
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Hosea 8:4-7, 11-13

Thus says the Lord: Israel made kings, but not through me. They set up princes, but I knew it not. With their silver and gold they made idols for their own destruction. I have spurned your calf, O Samaria. My anger burns against them. How long will they be incapable of innocence? For it is from Israel; a craftsman made it; it is not God. The calf of Samaria shall be broken to pieces. For they sow the wind, and they shall reap the whirlwind. The standing corn has no heads; it shall yield no flour; if it were to yield, strangers would devour it. Because Ephraim has multiplied altars for sinning, they have become to him altars for sinning. Were I to write for him my laws by the ten thousands, they would be regarded as a strange thing. As for my sacrificial offerings, they sacrifice meat and eat it, but the Lord does not accept them. Now he will remember their iniquity and punish their sins; they shall return to Egypt.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ११४:३-१०
प्रतिसाद :    हे इस्त्राएल, परमेश्वरावर भाव ठेव.

१ ) आमचा देव स्वर्गात आहे, 
त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो, 
त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत, 
त्या मनुष्यांच्या हातानी बनवलेल्या कृती आहेत.

२) त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही, 
त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही, 
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; 
त्यांना नाक आहे पण वास येत नाही.

३) त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही;
 पाय आहेत पण चालता येत नाही. 
त्या बनवणारे आणि त्यांच्यावर भाव ठेवणारे, 
सर्व त्यांच्यासारखे बनतात

४) हे इस्राएल परमेश्वरावर भाव ठेव; 
तोच त्यांचा सहाय्यकर्ता आणि त्यांची ढाल आहे 
हे अहरोनच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव;
 तोच त्यांचा सहाय्यकर्ता आणि त्यांची ढाल आहे.


Psalm 115:3-6, 7ab & 8-10
House of Israel, trust in the Lord.

But our God is in the heavens;
he does whatever he wills.
Their idols are silver and gold, 
the work of human hands. R

They have mouths but they cannot speak;
they have eyes but they cannot see.
They have ears but they cannot hear;
they have nostrils but they cannot smell. 

They have hands but they cannot feel;
 they have feet but they cannot walk.
Their makers will come to be like them, 
as will all who trust in them. R.

House of Israel, trust in the Lord;
he is their help and their shield.
House of Aaron, trust in the Lord; 
he is their help and their shield. R


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने. 
 आलेलुया!

Acclamation: 
I am the good shepherd, says the Lord; I know my own and my own know me.

शुभवर्तमान मत्तय ९:३२-३८
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. "
एका मुक्या भूतग्रस्त मनुष्याला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याचे भूत काढल्यावर त्या मुक्या मनुष्याला वाचा प्राप्त झाली. तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, "इस्राएलात असे कधीही पाहण्यात मिळाले नव्हते." परंतु परुशी म्हणू लागले, हा भुतांच्या अधिपतीच्या सहाय्याने भुते काढतो.” नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवत, राज्यांच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करत नगरातून आणि गावातून फिरत होता. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला; कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे, ते गांजलेले आणि पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, "पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading 

Matthew 9:32-38


At that time: A demon-oppressed man who was mute was brought to Jesus. And when the demon had been cast out, the mute man spoke. And the crowds marvelled, saying, "Never was anything like this seen in Israel." But the Pharisees said, He casts out demons by the prince of demons." And Jesus went throughout all the cities and villages, teaching in their synagogues and proclaiming the gospel of the kingdom and healing every disease and every infirmity. When he saw the crowds, he had compassion for them, because they were harassed and helpless, like sheep without a shepherd. Then he said to his disciples, "The harvest is plentiful, but the labourers are few; therefore pray earnestly to the Lord of the harvest to send out labourers into his harvest."

 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनयेशूचे मिशन कार्य”

येशू ह्या जगात आला तो देव राज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी. त्याने नगरात, गावात जाऊन सुवार्तेची घोषणा केली. येशू स्वर्गात जाण्या अगोदर अखेरची आज्ञा त्याने शिष्यांना दिली, "जा व संपूर्ण सृष्टीला सुवार्तेचीघोषणा करा.” (मार्क १६:१५) येशूच्या मागे चालणाऱ्या प्रत्येक विश्वासू माणसाला येशू ही आज्ञा देतो. सुवार्तेची घोषणा करणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपल्या बोलण्यातून, आपल्या कृतीतून आपण ख्रिस्त जगाला दिला पाहिजे. दुसऱ्याचे दुःख, वेदना पाहून येशूच्या हृदयात कळवळा निर्माण झाला. ख्रिस्ताचा धर्म म्हणजे मानवधर्माची पहाट होती. तेच त्याचे खरे मिशन कार्य होते. आज जग दुःख, आजार ह्यांनी भरलेले आहे. ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे आहेत. म्हणून ह्या मिशन कार्यासाठी ख्रिस्ताला अनेकांची गरज आहे. आपण धर्मगुरु, धर्मभगिनी होण्यासाठी गेलो नाहीत, तर हे पवित्र कार्य कोण करील? हे पिक, हि मेंढरे अशीच तडफडत मरून जातील. हे पवित्र कार्य करण्यासाठी जास्तच जास्त युवक युवतींना पाचारण लाभावे म्हणून स्वर्गीय पित्याकडे आपण प्रार्थना करुया.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच उत्तम मेंढपाळ आहेस, तुला अनुसरण्यास व तुझ्या  सहवासात जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या