Marathi Bible Reading |Wednesday 10th July 2024 | 14th Week In Ordinary Time

सामान्य काळातील चौदावा आठवडा

बुधवार १०  जुलै  २०२४ 

अशी घोषणा करीत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.'

And proclaim as you go, saying, 'The kingdom of heaven is at hand.'


 संत फेलिसिटी आणि तिची सात रक्तसाक्षी मुले यांचा सण 

रकासाक्षी ........१६५) 

रोम शहरात सम्राट अंतोनियस ह्यांच्या कारकीर्दीत घडलेली ही घटना. त्याच्या राज्यात फेलिसिटी नावाची एक साध्वी, नीतिमान आणि शालीन विधवा आपल्या सात मुलांसह राहत होती. आपल्या पतीच्या निधनानंतर तिने आमरण कौमार्य आणि परोपकार ह्या सद्‌गुणांची जोपासना केलेली होती. तिच्या सात्विक जीवनाकडे पाहून असंख्य मूर्तीपूजक खोट्या दैवताकडून ख्रिस्ताकडे व ख्रिस्ती धर्माकडे वळले होते. त्यामुळे स्थानिक मूर्तीपूजक धर्मगुरू चवताळले होते.
या धर्मगुरूंनी एकत्र येऊन सम्राटाकडे अशी तक्रार केली की ही स्त्री आपल्या धर्माचा उघड उघड प्रचार करीत आहे आणि सम्राटने नेमून दिलेले धार्मिक विधी पार पाडीत नाही. त्यामुळे आपल्या साम्राज्याचे संरक्षक असलेल्या दैवतांना तिने आपल्या मुलांसह सर्वासमक्ष यज्ञबळी अर्पण करावा अशी राजाने आज्ञा दयावी.
ही तक्रार राजाच्या कानी जाताच त्याने रोमचा प्रमुख प्रिफेक्ट प्युब्लियस ह्याला या प्रकरणात लक्ष घालण्याचा आदेश दिला. त्याने फेलिसिटी आणि तिच्या सात मुलांना एकत्र करून म्हटले, "हे बघ फेलिसिटी, तुझ्या कोवळ्या बालकांकडे दयापूर्ण नजरेने पाहा. त्यांच्यातील काहीजण तारुण्याने मुसमुसलेले आहेत. लवकरच त्यांना राजदरबारात मानाचे स्थान दिले जाणार आहे." त्यावेळी त्या पवित्र स्त्रीने उत्तर दिले, "तुझी कळकळ हा खरा मोहपाश आहे आणि तू मला जी सहानुभूती दाखवित आहेस तो क्रूरतेचा छुपा अविष्कार आहे." त्यानंतर आपल्या मुलांकडे वळून तिने म्हटले, "माझ्या प्रिय मुलांनो, स्वर्गाकडे आपली दृष्टी लावा, तिथे कधीही ढळणार नाहीत अशा सन्मान व गौरवाच्या जागा जुलै महिन्यातील संत सोहळे तुम्हाला बहाल करण्यासाठी येशू थांबलेला आहे. त्याच्यावरील श्रद्धेशी विश्वासू रहा आणि धैर्यान या संघर्षाशी मुकाबला करा."

या एकंदर प्रकरणाने चक्रावून गेलेला प्युब्लिअस ह्याने त्या मातेला आपल्या सात मुलांसह मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्याने सात भावांना एकामागून एक असे आपणाकडे बोलावून घेतले आणि वेगवेगळी आमिषे दाखवून आश्वासने देऊन आणि शेवटी भीती घालून आपल्या दैवताला भजण्यास परोपरीने विनविले. त्याचा सर्व वादविवाद आणि धाकदपटशा व्यर्थ गेला. सर्व भावांना त्यानंतर फटके मारण्यासाठी शिपायांच्या हाती देण्यात आले व शेवटी त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
आपला अधिकार अपुरा पडत आहे ह्याची जाणीव प्युब्लिअस ह्याला झाल्याने त्याने हे संपूर्ण प्रकरण सम्राट अंतोनियस ह्याच्या हाती सोपविले. ह्या सात भावांना वेगवेगळ्या न्यायाधिशांकडे पाठवून त्यांना विविध प्रकारची शिक्षा 
ठोठावली जावी असा आदेश सम्राटने दिला. त्यानुसार जानुआरिअस ह्या थोरल्या भावाला खांबाला बांधून मरेपर्यंत फटके मारण्यात आले. फेलिक्स व फिलीप ह्या दोघांना दंडुक्यांनी बडविण्यात आले व त्यातच त्यांचा अंत झाला. सिल्वानुस ह्याला सर्व लोकसमुदायासमोर डोंगरकड्यावरून खाली ढकलून देण्यात आले आणि शेवटच्या तिघांचा आलेक्झांडर, विटालीस आणि मार्शिआलिस ह्यांचा शिरच्छेद करण्यात आला. सात दुःखांची ही तरवार आपल्या हृदयातून आरपार गेल्याची भावना त्या विधवा मातेने "याचि देही याचि डोळा" अनुभवली. शेवटी तिलाही ठार करण्यात आले.
  
पहिले वाचन :होशेय १०:१-३,७-८,१२
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन
"प्रभूला शरण जाण्याचा हा समय आहे."
परमेश्वर म्हणतो: इस्राएल उफाड्याने वाढणारा द्राक्षाचा वेल आहे, त्याला भरपूर फळे येतात. जो जो त्याला जास्त फळे आली तो तो त्याने जास्त वेद्या केल्या, त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले. त्यांचे हृदय बेइमान आहे; आता त्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे. तो त्यांच्या वेद्या मोडून टाकील, तो त्यांचे मूर्तिस्तंभ उद्ध्वस्त करील.
आता ते निश्चित म्हणतील: “आम्हाला राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय बाळगले नाही; राजा आमच्या काय कामाचा ?" शोमरोन नाश पावला आहे, त्याचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलप्यासारखा आहे. इस्राएलचे पाप म्हणजे आवेनची उच्चस्थाने नाश पावतील. त्याच्या वेद्यांवर काटेकुसळे आणि काटेरी झुडपे उगवतील; ते पर्वतांना म्हणतील, आम्हांस झाकून टाका, टेकड्यांना म्हणतील, आम्हावर पडा.
तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल; पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हांवर धार्मिकतेची वृष्टी करावी याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Hosea 10: 1-3,7-8,12

Israel is a luxuriant vine that yields its fruit. The more his fruit increased, the more altars he built; as his country improved, he improved his pillars. Their heart is false; now they must bear their guilt. The Lord will break down their altars and destroy their pillars. For now they will say: "We have no king, for we do not fear the Lord; and a king, what could he do for us?" Samaria's king shall perish, like a twig on the face of the waters. The high places of Aven, the sin of Israel, shall be destroyed. Thorn and thistle shall grow up on their altars, and they shall say to the mountains, "Cover us," and to the hills, "Fall on us." Sow for yourselves righteousness; reap steadfast love; break up your fallow ground, for it is the time to seek the Lord, that he may come and rain righteousness upon you.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्रस्तोत्र १०५:२-७
प्रतिसाद :   परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहा.

१) त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा; 
त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. 
त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा; 
ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे
 त्यांचे हृदय हर्षित होवो.

२) परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा,
 त्याच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा, 
त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार 
आणि त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. 

३) त्याचा सेवक आब्राहाम ह्याचे वंशजहो, 
त्याचे निवडलेले याकोबचे वंशजहो, 
तो प्रभू आमचा देव आहे:
साऱ्या जगावर त्याचीच सत्ता चालते.


Psalm 105:2-7

R. Constantly seek the Lord's face.

O sing to him, sing his praise;
tell all his wonderful works!
Glory in his holy name;
let the hearts that seek the Lord rejoice. R

Turn to the Lord and his strength;
constantly seek his face.
Remember the wonders he has done, 
his marvels and his words of judgment. R

O children of Abraham, his servant,
O descendants of the Jacob he chose,
he, the Lord, is our God;
his judgments are in all the earth. R


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही आपली हृदये आज कठोर करू नका, 
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
 आलेलुया!

Acclamation: 
The kingdom of God is at hand; repent and believe in the gospel

शुभवर्तमान मत्तय १०:१-७
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 
 “इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा."
येशूने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या बारा प्रेषितांची नावे अशी आहेत: पहिला पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया, जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान, फिलीप आणि बार्थोलोम्यू, थोमा आणि मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब आणि तद्दय, शिमोन कनानी आणि त्याला (येशूला) धरून देणारा यहुदा इस्कार्योत.
ह्याबारा जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की, “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका आणि शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका; तर इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.'
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading 

Matthew 10:1-7


At that time Jesus called to him his twelve disciples and gave them authority over unclean spirits, to cast them out, and to heal every disease and every affliction. The names of the twelve apostles are these: first, Simon, who is called Peter, and Andrew his brother; James the son of Zebedee, and John his brother; Philip and Bartholomew; Thomas and Matthew the tax collector; James the son of Alphaeus, and Thaddaeus; Simon the Zealot, and Judas Iscariot, who betrayed him. These twelve Jesus sent out, instructing them, "Go nowhere among the Gentiles and enter no town of the Samaritans, but go rather to the lost sheep of the house of Israel. And proclaim as you go, saying, 'The kingdom of heaven is at hand.'

 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन"प्रेषितीय कार्य"

अनेक लोकांमधून तो प्रेषितांची निवड करतो. येशू त्यांना प्रेषितीय कार्यासाठी पाठवतो. हे त्यांचे एक प्रकारचे प्रशिक्षण होते. बारा प्रेषितांना त्यांच्या कार्यासाठी पाठविताना, येशू त्यांना काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. पहिली म्हणजे, इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराकडे जा, देवाच्या योजनेत इस्राएलला फार मोटे स्थान होते. यहुद्यामधूनच तारक जन्माला येणार होता. पण इस्राएल लोकांची अवस्था मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होती. अशांना शुभसंदेश देण्यासाठी येशू प्रेषितांना त्यांच्याकडे पाठवितो. दुसरे कार्य येशू त्यांना सांगतो की, स्वर्गाच्या राज्याची घोषणा करा. स्वर्गाचे राज्य म्हणजे काय ? संत पॉल म्हणतो, "खाणे, पिणे ह्यात देवाचे राज्य नाही, तर नितिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे." (रोम. १४:१७) देवाचे राज्य हे खाणे पिणे ह्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते, तर ते अंतःकरणाशी संबंधीत असते. देव व मानव ह्यांना संतुष्ट करणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्या अंतःकरणात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. तेच देवाचे राज्य आहे. आपण प्रत्येक जण प्रभू येशूचे प्रेषित आहोत. देवापासून दूर गेलेल्या लोकांना प्रभू येशूचा शुभसंदेश देऊन त्यांना देवाकडे वळविणे, हे आपले खरे प्रेषितीय कार्य आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी सुवार्ता शब्दाद्वारे व कृतीद्वारे इतरांपर्यंत योहोच विण्यास आम्हाला कृपा व धैर्याचा आत्मा बहाल कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या