सामान्य काळातील चौदावा आठवडा
गुरुवार ११ जुलै २०२४
'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.' रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठ रोग्यांना शुद्ध करा, भुते काढा.
The kingdom of heaven is at hand. Heal the sick, raise the dead, cleanse lepers, cast out demons.
संत बेनेडिक्ट ह्यांच्या ज्ञानाची कीर्ती त्या काळात दिगंतापर्यंत पसरलेली होती. त्यामुळे महागुरू, मठाधिकारी, सरदार, राजे, राजपुत्र आणि सामान्य जनता आपल्या जीवनातील प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्यासाठी या ज्ञानपिपासू व नीतिमान साधुपुरुषाकडे येत असत. त्यांच्या शांतचित्त, पवित्र, संयमी आणि समतोल विचारसरणीने थक्क होऊन जात. सार्वजनिक ठिकाणी ज्या व्यक्ती अधिकाराच्या जागी आहेत त्यांनी सामान्य जनतेमध्ये आपल्याविषयी धाक आणि भीती नव्हे तर प्रेम उत्पन्न करायला हवे असे त्यांना वाटे. गोरगरिबांना संत बेनेडिक्ट ह्यांच्याठायी एक सहानुभूती देणारा सत्पुरुष लाभलेला होता.
समाजातील सर्व थरातील लोकांचा आसरा आणि आश्रयदाता बनलेला ऋषीतुल्य संत बेनेडिक्ट २१ मार्च ५४७ रोजी हजारो लोकांच्या हृदयाचा ठोका चुकवून देवाघरी निघून गेला. मुख्य वेदीवरून पवित्र ख्रिस्तशरीर स्वीकारून आपले हात स्वर्गाकडे उंचावलेल्या अवस्थेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
चिंतन : प्रार्थनापूर्वक परिश्रम करा आणि परिश्रमपूर्वक प्रार्थना करा.• संत बेनेडिक्टचे ब्रीदवाक्य
शिष्यांच्या कार्याची रूपरेषा सांगताना प्रभू येशूने अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार शिष्यांना दिला. सर्व दुखणी म्हणजेच आजार बरे करण्याचा त्यांना अधिकार दिला. इतकेच नाही तर मेलेल्यांना उठविण्याचा अधिकार सुद्धा बहाल केला. हा अधिकार केवळ त्या बारा शिष्यांनाच नव्हे तर प्रभू येशूला स्वीकारणाऱ्या प्रत्येक ख्रिस्ती माणसाला देण्यात आला आहे. आपण सर्वजण प्रभू येशूच्या देवराज्याच्या सुवार्तेचे साक्षीदार व भागीदार बनू शकतो. प्रभू येशूने त्याच्या कृपेचे महान वरदान आपल्याला दिलेले आहे.आपण ख्रिस्ताशी एकनिष्ठ बनू या. त्याच्या कृपेच्या झऱ्यामध्ये न्हावून निघू या. त्याच्याशी एकरुप होऊन देवराज्य पसरविण्यासाठी पात्र बनावेत म्हणून प्रार्थना करु या.
पहिले वाचन :होशेय ११:१,३-४-८-९
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन"माझे हृदय खळबळले आहे.' "
परमेश्वर म्हणतो : इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून इजिप्तमधून बोलावले.
मीच एफ्राइमला चालायला शिकवले, मी त्यांना आपल्या कवेत वागवले आणि मी त्यांना बरे केले, पण ते त्यांना ठाऊक नाही. मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी, मी त्यांना ओढले; बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणाऱ्यासारखा मी त्यांना झालो; त्यांना मी ममतेने खाऊ घातले. माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. मी आपल्या क्रोधसंतापाप्रमाणे करणार नाही, मी एफ्राइमचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही; कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे; तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे ; मी क्रोधावेशाने येणार नाही.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Hosea 11:1-4, 8c-9
Thus says the Lord: When Israel was a child I loved him, and out of Egypt I called my son. The more they were called, the more they went away; they kept sacrificing to the Baals and burning offerings to idols. Yet it was I who taught Ephraim to walk; I took them up by their arms, but they did not know that I healed them. I led them with cords of kindness, with the bands of love, and I became to them as one who eases the yoke on their jaws, and I bent down to them and fed them. My heart recoils within me; my compassion grows warm and tender. I will not execute my burning anger; I will not again destroy Ephraim; for I am God and not a man, the Holy One in your midst, and I will not come in wrath.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८०:२-३,१५-१६
प्रतिसाद : हे परमेश्वरा, आपला मुखप्रकाश आम्हांवर पाड,
१) हे इस्राएलच्या मेंढपाळा, जो तू करूबारूढ आहेस
तो तू आपले तेज प्रकट कर.
तू आपला पराक्रम दाखव
आणि आम्हांला तारावयास ये.
२) हे सेनाधीश देवा, तू मागे फिर
असे आम्ही तुला विनवितो,
स्वर्गातून दृष्टी लावून पाहा
आणि ह्या द्राक्षवेलाचे संगोपन कर.
जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले,
जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली तिचे संगोपन कर.
Psalm 80:2ac and 3b, 15-16
Let your face shine on us, Lord, and we shall be saved.
O shepherd of Israel, hear us,
enthroned on the cherubim, shine forth.
Rouse up your might and
come to save us. R.
God of hosts, turn again, we implore;
look down from heaven and see.
Visit this vine and protect it,
the vine your right hand has planted.
The son of man
you have claimed for yourself. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा,
तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत;
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
आलेलुया!
Acclamation:
The kingdom of God is at hand; repent and believe in the gospel
शुभवर्तमान मत्तय १०:७-१५
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या."
येशूने आपल्या बारा शिष्यांना पुढीलप्रमाणे शिकवले, “जात असताना अशी घोषणा करीत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.' रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठ रोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका, वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका; कारण कामकऱ्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. घरात जाताना, तुम्हांला शांती असो! असे म्हणा. ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही आणि तुमची वचने ऐकणार नाही, त्यांच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. मी तुम्हास नक्की सांगतो. 'न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा ह्या प्रदेशांना सोपे जाईल. "
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 10:7-15
At that time: Jesus said to his apostles, "Proclaim as you go, saying, 'The kingdom of heaven is at hand. Heal the sick, raise the dead, cleanse lepers, cast out demons. You received without paying; give without pay. Acquire no gold or silver or copper for your belts, no bag for your journey, or two tunics or sandals or a staff, for the labourer deserves his food. And whatever town or village you enter, find out who is worthy in it and stay there until you depart. As you enter the house, greet it. And if the house is worthy, let your peace come upon it, but if it is not worthy, let your peace return to you. And if anyone will not receive you or listen to your words, shake off the dust from your feet when you leave that house or town. Truly, I say to you, it will be more bearable on the day of judgment for the land of Sodom and Gomorrah than for that town.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: "प्रेषितांना अधिकार"
येशू प्रेषितांना अधिकार देतो. प्रेषितीय कार्य खूप कठिण आहे, ह्याची जाणीव येशूला आहे. म्हणून येशू त्यांना काळजीपूर्वक सर्व गोष्टींचा उलगडा करून देतो. येशू त्यांना सर्व प्रकारच्या आजारातून बरे करण्याचा अधिकार देतो. ह्यावरून स्पष्ट होते की, देव आपली किती काळजी घेतो. येशूची अपेक्षा आहे की, कामकऱ्यांचे (प्रेषितांचे) पोषण लोकांनी करावे. म्हणून तो त्यांना काहीही बरोबर घेण्यास सांगत नाही. प्रेषितांनी आपले संपूर्ण लक्ष प्रेषितीय कार्यात घालवावे. खाण्या पिण्याची चिंता करू नये. देवावर पूर्णपणे अवलंबून राहावे. प्रत्येक नगरात नितिमानाप्रमाणे अनितिमान लोक सुद्धा आहेत. म्हणून त्यात योग्य कोण ते निवडावे. धार्मिक माणसाच्या सहवासात प्रेषितांचे मनोबल बळकट होण्यास मदत होते. एवाद्या घरात गेल्यावर “तुम्हास शांती असो" असे म्हणा. ह्यामुळे एक मैत्रीपूर्वक वातावरण निर्माण होते. अशा वातावरणात देवाची सुवार्ता घोषविण्यास मदत होते. जे प्रेषितांना नाकारतील, त्यांना न्यायाच्या दिवशी खूप कठिण जाईल. कारण त्यांनी प्रेषितांनाच नव्हे तर ज्यांने त्यांना पाठविले, त्या ख्रिस्ताला देखील ते नाकारतात. आपल्या धर्मग्रामात जे आजारी आहेत, त्यांची काळजी घेऊन, देवाचा शब्द त्यांना देणे तुम्हाला महत्वाचे वाटते का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, ख्रिस्ता, तुझ्या औदार्याबद्दल व कृपादानाबद्दल मी तुझे मनापासून आभार मानतो. इतरांपर्यंत तुझी सुवार्ता पसरविण्यासाठी मला सामर्थ्य व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या