सामान्य काळातील तेरावा आठवडा
शनिवार ६ जुलै २०२४
"वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे त्यांना शक्य आहे काय ?"
"Can the wedding guests mourn as long as the bridegroom is with them?
संत मारिया गोरेटी
- कुमारिका, रक्तसाक्षी (१८९०-१९०२)
अगदी आधुनिक काळातील ही शुद्धतेचा आदर्श असलेली विसाव्या शतकातील इटालीतील मार्चे प्रांतातील कोरियाल्डो येथे एका शेतमजुराच्या घरात जन्मलेल्या सात भावंडांमध्ये मारियाचा क्रमांक तिसरा होता. घरच्या गरीब परिस्थितीमुळे ती कधीही शाळेत जाऊ शकली नाही.. तिच्या अशिक्षित आईने मात्र आपल्या माहितीतले सर्व प्रकारचे धर्मशिक्षण घरीच शिकवून तिच्यात ख्रिस्ती सद्गुणांची जोपासना केलेली होती. मारियेचे वडील मरण पावले. त्यामुळे शेतमजुरीच्या कामाचा संपूर्ण भार तिच्या आईवर येऊन पडला. आपल्या लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी मात्र मारियेने पूर्ण मनाने स्वीकारली.
वयाच्या ११ व्या वर्षी प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारला. त्याची पूर्वतयारी म्हणून तिने खास आध्यात्मिक तपसाधना केलेली होती. आतापर्यंत येशूला कोणत्याही पापाने तिने दुःखविण्याचे कौशल्याने टाळलेले होते. आज्ञाधारकपणा, नेमस्तपणा, शुद्धता आणि देवाचे भय तिच्याठायी ओतप्रोत भरून वाहात होते. परंतु आता तिने आपल्या प्रभूला संतोषविण्याचा आणि सर्वांना मदत करण्याचा जाणीवपूर्वक निश्चय केला.
कुमसाराला जायचे म्हणजे सात मैलांचे अंतर कापायचे आणि येताना तितकेच अंतर चालायचे. परंतु आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तिने तो त्याग सहजरित्या करून दाखविला.
तिच्या घराशेजारी आलेक्झांड्रो नावाचा एक विकृत मनोवृत्तीचा आणि वासनेने होरपळत असलेला तरुण राहात होता. अनैतिक कृत्य करण्यासाठी त्याने ११ वर्षीय मारिया हिला तीन वेळा मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्याने तिच्यावर १४ वेळा वार केले. मारिया रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि ६ जुलै १९०२ साली मरण पावली. मरता मरता तिने आपल्या आईजवळ एक इच्छा व्यक्त केली की, 'ज्या व्यक्तीने हे पापकृत्य केलेले आहे तिचे पूर्णपणे परिवर्तन व्हावे.'
देव नीतिमानांची प्रार्थना ऐकतो. आलेक्झांड्रोने हे कृत्य केल्यानंतर तो घरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले. २९ वर्षे तुरुंगात राहिला. परंतु त्या कालावधीत कित्येक वेळा त्याला मारिया गोरेटी हिने दर्शने देऊन आपल्या पापांबद्दल पूर्णपणे पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त केले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आलेक्झांड्रो एका मठात गेला. तेथे त्याने आपल्या पूर्वायुष्यातील सर्व पापांबद्दल पश्चात्ताप केला आणि धर्मगुरूपदाची दीक्षा स्वीकारली.
असे करता करता १९५० साल उजाडले. पोप पायस बारावे ह्यांनी २५ जून रोजी पवित्र वर्षानिमित्ते आयोजित केलेल्या एका सोहळ्यात मारिया गोरेटी हिला संतपद बहाल केले. त्यावेळी इतिहासात नोंदविल्या जाव्यात अशा तीन गोष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. पहिली गोष्ट म्हणजे रोमच्या इतिहासात पहिल्यांदाच संत पीटर बॅसिलिकामध्ये भाविकांची एवढी प्रचंड गर्दी जमलेली होती की हा अतिभव्य सोहळा संत पीटरच्या उघड्या मैदानावर घेण्यात आला.
दुसरी गोष्ट ह्या संताच्या संतीकरणासाठी स्वतः तिची वृद्ध, अर्धागवायूने पछाडलेली आई उपस्थित होती आणि तिसरी गोष्ट आलेक्झांड्रो हा धर्मगुरू होऊन या सोहळ्यासाठी उपस्थित होता. मारिया गोरेटीने केलेली प्रार्थना ऐकली गेली होती तर !
चिंतन : मरतेसमयी मारिया गोरेटीने आपल्या आईला सांगितले, “आई, जरी त्याने माझे तुकडे केले असते तरी मी कधीच पाप केले नसते. पापापेक्षा मला मरण आले तरी चालेल.” - संत मारिया गोरेटी
पहिले वाचन :आमोस ९:११-१५
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी आपल्या इस्त्राएल लोकांचा बंदिवास पालटीन आणि त्यांस त्याच्या भूमीत रुजवीन."
परमेश्वर असे म्हणतो, “दावीदचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन आणि त्याची भगदाडे बुजवीन, त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन, तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन; मग ते अदोमाच्या अवशेषाचा आणि ज्यांना माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील," असे हे कृत्य करणारा परमेश्वर म्हणतो.
परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की नांगरणारा कापणी करणाऱ्याला गाठील आणि द्राक्षे तुडवणारा बी पेरणाऱ्याला गाठील; डोंगरांवरून नवा द्राक्षरस वाहेल आणि सर्व टेकड्यांना पाझर फुटतील. मी आपल्या इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन, ते ओसाड झालेली नगरे बांधतील आणि त्यात वस्ती करतील; ते द्राक्षमळे लावतील आणि त्यांचा द्राक्षरस पितील, ते बाग लावतील आणि त्यांची फळे खातील. मी त्यांना त्यांच्या भूमीत रुजवीन आणि जी भूमी मी त्यांस दिली आहे तीतून त्यांस यापुढे उपटून टाकण्यात येणार नाही," असे परमेश्वर तुझा देव म्हणतो.
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Amos 9:11-15
Thus says the Lord: "In that day I will raise up the booth of David that is fallen and repair its breaches, and raise up its ruins and rebuild it as in the days of old, that they may possess the remnant of Edom and all the nations who are called by my name," declares the Lord who does this. "Behold, the days are coming," declares the Lord, "when the ploughman shall overtake the reaper and the treader of grapes him who sows the seed; the mountains shall drip sweet wine, and all the hills shall flow with it. I will restore the fortunes of my people Israel, and they shall rebuild the ruined cities and inhabit them; they shall plant vineyards and drink their wine, and they shall make gardens and eat their fruit. I will plant them on their land, and they shall never again be uprooted out of the land that I have given them," says the Lord your God.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८५:९,११-१४
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांशी क्षेमकुशलचे भाषण करील.
१) परमेश्वर देव जो काय बोलेल ते मी ऐकून घेईन,
कारण तो आपल्या लोकांशी आणि
आपल्या भक्तांशी क्षेमकुशल भाषण करील.
मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये.
२) दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत;
नीती आणि शांती ह्यांनी एकमेकांस आलिंगन दिले आहे.
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे;
स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करत आहे.
३) परमेश्वर आमची भरभराट करील
आणि आमची भूमी आपले फळ देईल.
त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल आणि
त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.
Psalm 85:9, 11-12, 13-14
The Lord speaks of peace for his people.
I will hear what the Lord God speaks;
he speaks of peace
for his people and his faithful,
and those who turn their hearts to him. R.
Merciful love and faithfulness have met;
justice and peace have kissed.
Faithfulness shall spring from the earth,
and justice look down from heaven. R
Also the Lord will bestow his bounty,
and our earth shall yield its increase.
Justice will march before him,
and guide his steps on the way. R.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना
ज्योतीसारखे जगात दिसता.
आलेलुया!
Acclamation:
My sheep hear my voice, says the Lord; and I know them, and they follow me.
शुभवर्तमान ९:१४-१७
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय ?"
योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही शिष्य आणि परुशी पुष्कळ उपवास करतो पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय?” येशू त्यांना म्हणाला, "वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे त्यांना शक्य आहे काय ?" तर असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपवास करतील. कोणी कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, कारण धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. तसेच कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात घालत नाहीत; घातला तर बुधले फुटून द्राक्षरस सांडतो आणि बुधले बिघडतात; तर नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 9:14-17
At that time the disciples of John came to Jesus, saying, "Why do we and the Pharisees fast, but your disciples do not fast?" And Jesus said to them, "Can the wedding guests mourn as long as the bridegroom is with them? The days will come when the bridegroom is taken away from them, and then they will fast. No one puts a piece of unshrunk cloth on an old garment, for the patch tears away from the garment, and a worse tear is made. Neither is new wine put into old wineskins. If it is, the skins burst and the wine is spilled and the skins are destroyed. But new wine is put into fresh wineskins, and so both are preserved."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
ख्रिस्ताची उपस्थिती"
उपवास, दानधर्म व प्रार्थना हे प्रत्येक धार्मिक माणसाचे महत्त्वाचे गुण आहेत. योहानाचे शिष्य उपवास करीत होते व त्यांना वाटत होते की, येशूच्या शिष्यांनी देखील उपवास करावा. त्या संबंधी ते येशूला प्रश्न विचारतात. येशू त्यांना वराचे उदाहरण देतो. जो पर्यंत वन्हाड्याबरोबर वर आहे तो पर्यंत तिथे आनंद व उल्हास असणारच. येशू हा "वर" आहे. त्याचे अस्तीत्व हे आनंद देण्यास कारणीभूत आहे. येशूची उपस्थिती म्हणजे आनंदाचा झरा, तिथे दुःखाला जागा नाही. जेव्हा ख्रिस्ताच्या उपस्थितीचा अनुभव आपल्याला येतो. तेव्हा उपवास करण्याची | काहीही गरज नाही. पण "वर” त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. येशू त्याच्या मरणाचे भाकित सांगतो की, एक दिवस येशू त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. येशूच्या जाण्याने ते दुःखी होतील व उपवास करतील. अनेक मार्गांनी येशूच्या उपस्थितीची जाणीवआपल्याला होते. पवित्र मिस्साबलीत, पवित्र वाचन व प्रार्थनेत. पण जेव्हा आपण आज्ञाभंग करतो. तेव्हा येशू आपल्यामधून काढून घेतला जातो. अशावेळी उपवास व पश्चात्ताप करून पुन्हा ख्रिस्ताकडे येणे आवश्यक आहे. येशू म्हणजे नवीन जीवन, नवीन यूग व नवीन करार आहे. त्याच्या उपस्थितीनेच खऱ्या नवीन जीवनाला सुरूवात होते.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यास व तुला अंत:करणापासून जाणण्यास आम्हाला कृपा दे, आमेन
✝️
0 टिप्पण्या