Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Friday 5th July 2024 | 13th Week In Ordinary Time

सामान्य काळातील तेरावा आठवडा

  शुक्रवार ५ जुलै  २०२४ 

"निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर आजाऱ्यांना आहे.

 "Those who are well have no need of a physician, but those who are sick


 संत अँथनी मेरी झॅकरी

•वर्तनसाक्षी (१५०२-१५३९)
 

चिंतन : आपल्याला विरोध करणारे स्वतःचेच नुकसान करीत असतात व देवाचा क्रोध आपणावर ओढवतात. त्यामुळे त्यांच्यावर रागावण्याऐवजी आपल्याला त्यांची कीव कराविशी वाटली पाहिजे. इतकेच काय त्यांच्या अशा वर्तनाने आपण अंतर्यामी भक्कम होत जातो त्यामुळे आपण त्यांचे आभार मानायला हवेत. - संत अँथनी मेरी झॅकरी
 
प्रभू येशू वेद्यांचा वैद्य, गुरुंचा गुरु आणि पापांची क्षमा करुन पापीजनांना जवळ करणारा प्रभू आहे. देवापासून बहकलेल्यांना आणि पापांच्या चिखलात रुतलेल्या सर्वांना तो त्याच्या करुणामय कृपेच्या झऱ्याजवळ बोलवित आहे.
आपण अपात्र असतांना सुध्दा प्रभू येशू आज आपल्याला सामर्थ्य व  कृपा बहाल करुन त्याच्या प्रीतीच्या कळपात राहण्यासाठी बोलवित आहे. त्या दयासागर प्रभूठायी आपले सर्वस्व समर्पित करुन शरण जाऊ या. 
  
पहिले वाचन :आमोस ८:४-६,९-१२
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी देशावर दुष्काळ आणीन, तो दुष्काळ अन्नाचा नव्हे तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबधीचा होईल."

जे तुम्ही गरजवंतांना गिळण्यासाठी तोंड उघडता अणि देशातील गरिबांना नष्ट करण्यास पाहता ते तुम्ही हे ऐका: तुम्ही म्हणता, “चंद्रदर्शन कधी आटोपेल ? म्हणजे आम्हांला धान्य विकायला सापडेल. शब्बाथ केव्हा संपेल ? म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, माप लहान करू, शेकेल मोठा करू आणि खोट्या तराजूंनी फसवू, म्हणजे आम्ही रुपे देऊन गरिबांना विकत घेऊ, एक जोडा देऊन गरजवंतांना विकत घेऊ आणि बुरसटलेला गहू विकून टाकू."
प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या समयी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधार करीन. तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेला गोणपाट गुंडाळीन, सर्वांच्या डोक्याचे मुंडण करीन, कोणी एकुलत्या एका पुत्राचा शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन."
प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यात मी देशावर दुष्काळ आणीन; तो दुष्काळ अन्नाचा नव्हे किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबधीचा होईल. ते ह्या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडतझडत जातील; ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील तरी त्यांना ते प्राप्त व्हावयाचे नाही.
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Amos 8:4-6, 9-12

Hear this, you who trample on the needy and bring the poor of the land to an endd the Sabbatheth will the new moon be over, that of the land grain? And the Sabbath, that we may offer wheat for sale, that we may make the ephah small and the shekel great and deal deceitfully with false balances, that we may buy the poor for silver and the needy for a pair of sandals and sell the chaff of the wheat?" "And on that day," declares the Lord God, "I will make the sun go down at noon and darken the earth in broad daylight. I will turn your feasts into mourning and all your songs into lamentation; I will bring sackcloth on every waist and baldness on y head; I will make it like the mourning for an only son and the end of it like a bitter every day. "Behold, the days are coming," declares the Lord God, "when I will send a famine on the land-not a famine of bread, nor a thirst for water, but of hearing the words of the Lord. They shall wander from sea to sea, and from north to east; they shall run to and fro, to seek the word of the Lord, but they shall not find it.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ११९:२,१०,२०-४०,१३१
प्रतिसाद :  मनुष्य परमेश्वराच्या वचनाने जगेल.

१) जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून
 त्याचा शोध करतात ते धन्य. 
अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे;
 तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.

२) तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे 
माझा जीव कासावीस झाला आहे. 
मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
मी सत्याचा मार्ग निवडला आहे

३) पाहा, मला तुझ्या आदेशांचा ध्यास लागून राहिला आहे;
 तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे.
 मी तोंड उघडून धापा टाकतो.
कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला आहे.


Psalm 119:2, 10, 20, 30, 40, 131

Man shall not live by bread alone, but by every word that comes from the mouth of God.

Blessed are those who keep his decrees! 
With all their hearts they seek him. R 

I have sought you with all my heart; 
let me not stray from your commands. R 

My soul is consumed with longing 
at all times for your decrees. R 
 
I have chosen the way of faithfulness; 
your decrees I have upheld. R 

See, I long for your precepts;
give me life by your justice. R

I have opened my mouth and I sigh, 
for I yearn for your commands. R


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
 तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना 
ज्योतीसारखे जगात दिसता.
 आलेलुया!

Acclamation: 
 Come to me, all who labour and are heavy laden, and I will give you rest, says the Lord.

शुभवर्तमान मत्तय :९-१३
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"निरोग्यांना वैद्यांची गरज नाही. मला दया पाहिजेयज्ञ नको."

येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्या मागे ये." तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला.
नंतर तो घरात भोजनाला बसला असता, बरेच जकातदार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले. हे पाहून परूशी त्यांच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?" हे ऐकून येशू म्हणाला, "निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर आजाऱ्यांना आहे. 'मला दया पाहिजे, यज्ञ 'नको' ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका. कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे."

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading 


Matthew 9:9-13


At that time as Jesus passed on, he saw a man called Matthew sitting at the tax booth, and he said to him, "Follow me." And he rose and followed him. And as Jesus reclined at table in the house, behold, many tax collectors and sinners came and were reclining with Jesus and his disciples. And when the Pharisees saw this, they said to his disciples, "Why does your teacher eat with tax collectors and sinners?" But when he heard it, he said, "Those who are well have no need of a physician, but those who are sick. Go and learn what this means: 'I desire mercy, and not sacrifice.' For I came not to call the righteous, but sinners.


 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन

"एका पापी माणसाला पाचारण"

संपूर्ण बायबलमध्ये हा प्रसंग खूप हृदयस्पर्शी आहे. संत मत्तय एक जकातदार. स्वतः आपली वैयक्तिक साक्ष देत आहे. यहूदी लोक जकातदार ह्यांना नीच पापी समजत, त्यांच्याबरोबर ते कसलाही व्यवहार करीत नसत. प्रभू येशूने मत्तय नावाच्या जकातदाराला पाहिले. येशूचे अंतःकरण भरून आले. ह्या माणसाला तारणाची गरज आहे, हे येशूने ओळखले, आणि त्याला म्हटले, "माझ्या मागे ये" तो उठून येशूच्या मागे गेला. त्यांने निर्णय घ्यायला वेळ मागितला नाही, कोणत्याच प्रकारचे प्रश्न त्याने येशूला विचारले नाहीत, तो उठून त्याच्या मागे गेला. ह्यावरून मत्तयचा येशूवरील संपूर्ण विश्वास व प्रिती प्रगट होते. आपल्या परिवर्तनाची साक्ष आपल्या मित्रांना सांगण्यासाठी, येशूबरोबर त्यांना देखील जेवणाचे तो आमंत्रण देतो. ह्या संधीचा फायदा घेऊन येशू त्यांना तो कश्यासाठी ह्या जगात आला व त्याचे मिशन कार्य काय हे सांगतो. माझ्यासारख्या पापी माणसासाठी येशू ख्रिस्त ह्या जगात आला, ही फार मोठी शुभवार्ता ! माझ्या पापाबद्दल पश्चात्ताप करून, संत मत्तय सारखे माझे परिवर्तन व्हावे, हीच अपेक्षा.

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या अमर्याद दयेबद्दल व प्रेमाबद्दल मी तुझे मनापासून आभार मानतो, आमेन.
✝️