Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Thursday 4th July 2024 | 13th Week In Ordinary Time

सामान्य काळातील तेरावा आठवडा

  गुरुवार ४ जुलै  २०२४ 

"मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

"Take heart, my son; your sins are forgiven."



 पोर्तुगालची संत एलिझाबेथ

-राणी (१२७१-१३३६)
 
राणी एलिझाबेथ हिची दानशूरता तिच्या संपूर्ण आयुष्यभरात गोरगरीब, उपेक्षित आणि दुर्दैवी लोकांना सदैव आधार देण्यास कामी आली. हंगेरीची संत एलिझाबेथ हिच्या नावावर प्रसिद्ध झालेली एक घटना खरे पाहता पोर्तुगालच्या या राणीच्या जीवनात घडल्याचे सिद्ध झाले. ती हकिगत अशी : एकदा ती काही गरिबांना दररोजचे अन्न म्हणून काही पाव घेऊन जात होती. मनातल्या मनात ती त्या गोरगरिबांसाठी प्रार्थना करीत होती. अचानक त्या पावांची गुलाबे बनली. सर्वत्र सुंगंध पसरला. प्रत्यक्ष पिशवी उघडून पाहते तो आपल्याच पिशवीतील गुलाबांचा तो सुवास होता. तिने आपल्या पतीला धारेवर धरले कारण त्यांनीच बाजारहाट करताना पावांऐवजी थैलीत गुलाबे कोंबली असावीत असा तिचा समज झाला. घरी परतल्यानंतर आपण नक्कीच पावच आणलेले होते ह्याची साक्ष पतीकडून मिळाल्यानंतर हा चमत्कार झाल्याचे तिने आनंदाने मान्य केले.
अशा प्रकारे कार्य करीत असतानाच या गरिबांच्या कैवारिणीला देवाने ४ जुलै १३३६ साली आपल्याकडे बोलावून घेतले. २०० वर्षानंतर तिला संतपदाचा सन्मान बहाल करण्यात आला.  
चिंतन : हे कृपापूर्ण मरिये, हे दयामयी माते आमच्या शत्रूपासून आम्हांला सोडव आणि आमच्या मरणाचे वेळी आमच्या प्रार्थना ऐकून घे. संत एलिझाबेथ

पहिले वाचन आमोस  ७:१०-१७
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जा, माझ्या लोकांना संदेश सांग."

बेथेल येथील याजक अमस्या याने इस्राएलचा राजा यराबाम याला निरोप पाठवला की, "इस्राएली घराण्याच्या भरवस्तीत आमोसने फितुरी केली आहे, त्याची सर्व वचने देशाला सहन होत नाहीत. कारण आमोस म्हणतो, 'यराबाम तरवारीने मरेल, आणि इस्राएलला त्याच्या देशातून खात्रीने पकडून नेतील.'
मग अमस्या आमोसला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, जा, यहुदा देशात पळून जा, तेथे लोकांना संदेश सांगून पोट भर; पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्र स्थान, ही राजधानी आहे. तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, उबंराच्या झाडाची निगा करणारा आहे. मी कळपामागे असता परमेश्वराने मला निवडले. परमेश्वर मला म्हणाला, 'जा, माझे लोक इस्राएल यांस संदेश सांग.'
“तर आता परमेश्वराचे वचन ऐक. तू म्हणतोस, इस्राएलविरुद्ध संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नकोस, म्हणून परमेश्वर सांगतो: 'तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र आणि तुझ्या कन्या तरवारीने पडतील, तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अंमगळ देशात मरशील आणि इस्राएलला त्याच्या देशातून खात्रीने बंदिवान करून नेतील.'
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Amos 7:10-17
In those days: Amaziah the priest of Bethel sent to Jeroboam king of Israel, saying, "Amos has conspired against you in the midst of the house of Israel. The land is not able to bear all his words. For thus Amos has said, 'Jeroboam shall die by the sword, and Israel must go into exile away from his land." And Amaziah said to Amos, "O seer, go, flee away to the land of Judah, and eat bread there, and prophesy there, but never again prophesy at Bethel, for it is the king's sanctuary, and it is a temple of the kingdom." Then Amos answered and said to Amaziah, "I was no prophet, nor a prophet's son, but I was a herdsman and a dresser of sycamore figs. But the Lord took me from following the flock, and the Lord said to me, 'Go, prophesy to my people Israel. Now therefore hear the word of the Lord. "You say, 'Do not prophesy against Israel, and do not preach against the house of Isaac.' Therefore thus says the Lord: 'Your wife shall be a prostitute in the city, and your sons and your daughters shall fall by the sword, and your land shall be divided up with a measuring line; you yourself shall die in an unclean land, and Israel shall surely go into exile away from its land."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १९:८-११
प्रतिसाद :  परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत.

१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे,
 ते मनाचे पुनरुज्जीवन करते. 
परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे,
 तो भोळ्याना समंजस करतो.

२) परमेश्वराचे आदेश सरळ आहेत, 
ते हृदयाला आनंदित करतात. 
परमेश्वराची आज्ञा चोख आहे, 
ती नेत्रांना प्रकाश देते. 

३) परमेश्वराचे भय शुद्ध आहे,
 ते सर्वकाळ टिकणारे आहे.
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, 
ते संपूर्णतः न्याय्य आहेत.

४) ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या 
राशीपेक्षा इष्ट आहेत,
ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या 
मधापेक्षा गोड आहेत.


Psalm 19:8-11

The judgments of the Lord are true; they are, all of them, just.

The law of the Lord is perfect;
it revives the soul.
The decrees of the Lord are steadfast; 
they give wisdom to the simple. R

The precepts of the Lord are right; 
they gladden the heart.
The command of the Lord is clear;
it gives light to the eyes. R

The fear of the Lord is pure,
abiding forever.
The judgments of the Lord are true;
they are, all of them, just. R

They are more to be desired than gold, 
than quantities of gold.
And sweeter are they than honey, 
than honey flowing from the comb. R
जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता 
हा आमचे अंतःचक्षू प्रकाशित करो, 
म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे 
निर्माण होणारी आशा कोणती
 ही तुम्ही ओळखून घ्यावी.
 आलेलुया!

Acclamation: 
 In Christ, God was reconciling the world to himself, 
and entrusting to us the message of reconciliation.

शुभवर्तमान मत्तय :१-८
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 
 “ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला. "

येशू तारवात बसून पलीकडे गेला आणि आपल्या नगराला जाऊन पोहोचला. मग पाहा, खाटेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, "मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” मग पाहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करतो.” येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता ? कारण 'तुझ्या पापाची क्षमा झाली आहे' असे बोलणे, किंवा 'उठून चाल' असे बोलणे ह्यातून कोणते सोपे ? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून" मग तो पक्षपाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ, आपली खाट उचलून घेऊन घरी जा." मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याला आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading  

Matthew 9:1-8


At that time: Getting into a boat Jesus crossed over and came to his own city. And behold, some people brought to him a paralytic, lying on a bed. And when Jesus saw their faith, he said to the paralytic, "Take heart, my son; your sins are forgiven." And behold, some of the scribes said to themselves, "This man is blaspheming." But Jesus, knowing their thoughts, said, "Why do you think evil in your hearts? For which is easier, to say, 'Your sins are forgiven,' or to say, 'Rise and walk'? But that you may know that the Son of Man has authority on earth to forgive sins" - he then said to the paralytic - "Rise, pick up your bed and go home." And he rose and went home. When the crowds saw it, they were afraid, and they glorified God, who had given such authority to men.


 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनयेशू शरीर व आत्मा बरे करतो”

काही माणसे एका पक्षघाती माणसाला येशूकडे आणतात. गर्दीमुळे तसे करणे त्याना शक्य होत नाही, म्हणून ते छपरावर चढतात व येशूच्या समोर त्याला उतरवितात. त्यांचा तो विश्वास पाहून येशू थक्क होतो. विश्वासात चिकाटी हवी. जो पर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तो पर्यंत येशू मी तुझे पाय सोडणार नाही. हा खरा विश्वास. तो पक्षघाती माणूस पापी असून देखील येशू त्याला "मुला” म्हणून हाक मारून त्याच्या पापाची क्षमा करतो. आपण सर्व देवपित्याची लेकरे आहोत. आपण कितीही चुकलो तरी तो उधळ्या पुत्राप्रमाणे आपल्याला आलिंगण देतो. पापांची क्षमा करून येशूने त्यांना दाखवून दिले की, येशू हा देवाचा पुत्र आहे. पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार त्याला आहे. येशू या जगात आला तोकेवळ आजार बरे करण्यासाठी नाही, तर आत्म्यावरील पापांची जखम धुवून काढण्यासाठी. एकदा आपल्या पापांची क्षमा झाली की, शरीरावरील आजार बरे होण्यास वेळ लागत नाही. त्या लोकांनी देवाचा गौरव केला. नुसता देवाचा गौरव करून पापांची क्षमा होत नसते, त्यासाठी प्रभू येशूने स्थापन केलेल्या प्रायश्चित्त साक्रामेंतांचा आपण उपयोग करायला हवा.

प्रार्थना :हे प्रभू येशू, पापांबद्दल पश्चाताप करण्यास व तुझी कृपा अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️