Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Wednesday 3rd July 2024 | 13th Week In Ordinary Time

सामान्य काळातील तेरावा आठवडा  

बुधवार  ३जुलै २०२४ 

तूं मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे; पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे ते धन्य.'You believe because you can see me. Blessed are those who have not seen and yet believe.'

✝️



 संत थॉमस -भारताचा प्रेषित

- प्रेषित व रक्तसाक्षी (पहिले शतक)

जुळा (दिदुम) म्हटलेला थॉमस हा गालीलमधील एक अशिक्षित व साधा कोळी होता. येशूने त्याला आपल्या बारा प्रेषितांमध्ये निवडून घेतले होते. लाझरसच्या आजाराची बातमी येशूला कळली तेव्हा येशू बेथानी येथे जाण्यास निघाला परंतु यहुदी लोक आपल्याला दगडमार करतील ह्या भीतीने इतर शिष्य येशूबरोबर बेथानीस जायला घाबरले होते. अशा वेळी केवळ येशूवरील प्रेमापोटी थॉमस आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, चला आपणही जाऊ आणि त्याच्याबरोबर मरू. 

प्रभुजी आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही मग मार्ग कसा ठाऊक असणार? असा प्रश्न शेवटच्या भोजनसमयी विचारणारा शिष्य हा थॉमसच होता. येशूने त्याला उत्तर दिले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.” 

पवित्र आत्म्याच्या आगमनानंतर सर्व प्रेषित जगाच्या कानाकोपऱ्यात येशूची सुवार्ता सांगण्यासाठी निघून गेले. थॉमस मिडेस, पर्शिया, भारत आणि आसपासच्या परिसरात जाऊन पोहोचले त्यावेळी सिरीया आणि भारत ह्यांच्यात व्यापारी दळणवळण सुरू होते असे मानले जाते. इ. स. ३२५ साली नायसिया येथे भरलेल्या ख्रिस्ती धर्मपरिषदेत जे सिरियन चॅल्डीयन बिशप उपस्थित होते ते भारत आणि पर्शिया येथले होते अशीदेखील नोंद इतिहासात आढळले.

मद्रासमधील मैलापूर, (आताचे सान्त थोमे) येथे थॉमस ह्यांना भाल्याने भोसकण्यात आले अशी श्रद्धावंतांची समजूत आहे. त्यामुळे ज्या क्रूसरूपी खांबावर त्याला मारण्यात आले तो खांब आज भाविकांच्या भक्तीचा विषय बनलेला आहे. 

संत लूकने पवित्र मरियेचे चितारलेले एक चित्र संत थॉमसने भारतात येताना आपल्याबरोबर आणले होते. तेही चित्र आपल्याला मद्रास मैलापूर येथे पाहावयास मिळते.

संत जॉन क्रिझोस्तोम ह्यांच्या काळात संत थॉमस ह्याची खाच सिरीयातील एडेसा येथे होती. पुढे त्याच्या शरीराचे उर्वरित अवशेष इटाली व पोर्तुगाल येथे नेण्यात आले.

भारतात आल्यानंतर कोणा एका राजपुत्राने थॉमसला मोठा राजवाडा उभारण्यासाठी बयापैकी रक्कम देऊ केली. परंतु “ह्या पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साठवू नका तर स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा" असा सल्ला देऊन थॉमसने त्या राजपुत्राला आपली संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकण्यास प्रवृत्त केले. आर्किटेक्ट आणि बिल्डर्स हे संत थॉमस ह्यांना आपला आश्रयदाता संत मानतात.

            ✝️             

पहिले वाचन :  प्रेषितांची  कृत्ये १०:२४-३५

वाचक : प्रेषितांची  कृत्ये  या पुस्तकातून घेतलेले वाचन 

 कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यांत आली आहे

तिसऱ्या दिवशीं तो कैस रियास पोहंचला तेव्हां कर्नेल्य आपल्या नात लगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता.  पेत्र आंत जात असतां कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्यानें त्याच्या पायां पडून त्याला नमन केलें;  पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, उभे राहा; मीहि मनुष्यच आहें.  मग तो त्याच्या बरोबर बोलत बोलत आंत गेला, तेव्हां त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले.  त्याने त्यांना म्हटलें, तुम्हांला ठाऊकच आहे कीं, यहूदी मनुष्यानें अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्या कडे जाणेयेणें ठेवणें हें त्याच्या रितीरिवाजाविरुद्ध आहे; तथापि कोणाहि मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणूं नये असें देवानें मला दाखविले आहे;  म्हणून मला बोलाविल्या बरोबर मी कांकूं न करितां आलो आहे. तर मी विचारतों, तुम्हीं मला कशासाठी बोलावलें ?

तेव्हां कर्तेल्य म्हणाला, आज चार दिवस झाले, मी आपल्या घरीं तिसऱ्या प्रहरीं प्रार्थना करीत होतों; तेव्हां पाहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष मजपुढे उभा राहून म्हणाला, कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यांत आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यांत आलें आहे;  तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन ह्याला बोलावून आण; तो समुद्राच्या कांठी कातडें कमावणाऱ्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे. म्हणून मी आपणांकडे .माणसांना तत्काळ पाठविलें. आपण आलां हें बरें केलें. तर आतां प्रभूनें जें कांहीं आपणाला आज्ञापिलें आहे तें ऐकावे म्हणून आम्ही सर्व. जण येथें देवासमोर हजर आहों.तेव्हां पेत्रानें बोलण्यास आरंभ केला : 'देव पक्षपाती नाही,' हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भीत बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Acts 10:24-35 

In those days: Peter and brothers from Joppa entered Caesarea.
Cornelius was expecting them and had called together his relatives and close friends. When Peter entered, Cornelius met him and fell down at his feet and worshipped him. But Peter lifted him up, saying, "Stand up: I too am a man." And as he talked with him, he went in and found many persons gathered. And he said to them, "You yourselves know how unlawful it is for a Jew to associate with or to visit anyone of another nation, but God has shown me that I should not call any person common or unclean. So when I was sent for, came without objection. I ask then why you sent for me." And Cornelius said, "Four days ago, about this hour, I was praying in my house at the ninth hour, and behold, a man stood before me in bright clothing and said, 'Cornelius, your prayer has been heard and your alms have been remembered before God. Send therefore to Joppa and ask for Simon who is called Peter. He is lodging in the house of Simon, a tanner, by the sea. So sent for you at once, and you have been kind enough to come. Now therefore we are all here in the presence of God to hear all that you have been commanded by the Lord." So Peter opened his mouth and said: "Truly I understand that God shows no partiality, but in every nation anyone who fears him and does what is right is acceptable to him.

This is the word of God 

Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र   ४२ : २-३,४३:३-४

प्रतिसाद : माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; 

१) हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी
लुलपते तसा हे देवा,
माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. 

२) माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी
तान्हेला झाला आहे; 
मी केव्हां देवासमोर येऊन त्याचें दर्शन घेईन ?

३) तुझा देव कोठे आहे, असे ते मला सतत म्हणतात,
म्हणून अहोरात्र माझे अश्रु माझा आहार झाले आहेत.

४) तूं आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर; 
ती मला मार्ग दाखवोत;
 तुझ्या पवित्र डोंगरावर, 
तुझ्या निवासस्थानी मला पोहंचवोत;

) म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, 
देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन;
आणि हे देवा, माझ्या देवा,  वीणेवर मी तुझें गुणगान गाईन..


Psalm:  Psalm 42:2-3; 43:3, 4

R My soul is thirsting for God, the God of my life. 

Like the deer that yearns for running streams,
so my soul is yearning for you, my God.
My soul is thirsting for God, the living God;
when can I enter and appear before the face of God? R

O send forth your light and your truth; 
they will guide me on.
They will bring me to your holy mountain,
 to the place where you dwell. R

And I will come the altar of God, 
to God, my joy and gladness. 
To you will I give thanks on the harp,
O God, my God. R


दुसरे वाचनइब्री १:२-३

वाचक :इब्री लोकांना पत्र यातून घेतलेले वाचन

"देव पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे."

देव ह्या काळाच्या शेवटी पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हे त्याच्या गौरवाचे तेज आणि त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second reading : Hebrews 1:2-3

In our time, the final days, he has spoken to us in the person of his Son, whom he appointed heir of all things and through whom he made the ages. He is the reflection of God's glory and bears the impress of God's own being, sustaining all things by his powerful command; and now that he has purged sins away, he has taken his seat at the right hand of the divine Majesty on high.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
  आलेलुया!

Acclamation: 
Have you believed, Thomas because you have seen me? says the Lord: blessed are those who have not seen and yet have believed.

शुभवर्तमान योहान  २०:२४-२९
वाचक : योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

तूं मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे;

येशू आला तेव्हां बारांतील एक म्हणजे दिदुम' म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितलें, आम्हीं प्रभूला पाहिलें; पण त्यानें त्यांना म्हटलें, त्याच्या हातांत खिळ्यांचे वण पाहिल्यावांचून, खिळे होते त्या जागीं आपलें बोट घातल्यावांचून व त्याच्या कुशींत आपला हात घातल्यावांचून मी विश्वास धरणारच नाहीं.

 मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदां आंत असतां त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हां दारें बंद असतांना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हांस शांति असो.  नंतर त्यानें थोमाला म्हटलें, तूं आपलें बोट इकडे कर व माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असूं नको, तर विश्वास ठेवणारा ऐस.  थोमानें त्याला म्हटलें, माझा प्रभु व माझा देव ! येशूनें त्याला म्हटलें, तूं मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे; पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे ते धन्य.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading: John 20:24-29

Thomas, called the Twin, who was one of the Twelve, was not with the disciples when Jesus came. So the other disciples said to him, 'We have seen the Lord, but he answered, 'Unless I can see the holes that the nails made in his hands and can put my finger into the holes they made, and unless I can put my hand into his side, I refuse to believe.' Eight days later the disciples were in the house again and Thomas was with them. The doors were closed, but Jesus came in and stood among them. 'Peace be with you,' he said. Then he spoke to Thomas, 'Put your finger here; look, here are my hands. Give me your hand; put it into my side. Do not be unbelieving any more but believe.' Thomas replied, 'My Lord and my God!' Jesus said to him: 'You believe because you can see me. Blessed are those who have not seen and yet believe.'
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन:प्रेषित संत थॉमस"

संत थॉमस हा भारताचा प्रेषित म्हणून ओळखला जातो. इ.स. ५२साली त्यांनी भारतभूमिवर पहिले पाऊल टाकले. इ.स. ७२ साली क्षेत्रईच्या टेकडीवर त्यांनी ख्रिस्तासाठी रक्त सांडिले. संत थॉमसला श्रद्धेचे जनक म्हणून ओळखले जाते. श्रद्धा ही परमेश्वराची देणगी आहे. श्रद्धेशिवाय देवाला संतोषविणे अशक्य आहे. श्रद्धेशिवाय आपण देवाकडे काहीही मागू शकत नाही. आपल्या जिवनात विश्वासाला फार मोठे स्थान आहे. दररोज आपला विश्वास दृढ करणे, हे प्रत्येक ख्रिस्ती माणसाचे कर्तव्य आहे. खऱ्या विश्वासाची बांधणी ही आपल्या कुटुंबात होत असते. आई-वडील, पती-पत्नी एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांना क्षमा करतात, तेव्हा त्यांची मुले ते पाहतात. आमचे आई-वडील जर एवढे प्रेमळ असतील तर स्वर्गीय पिता किती प्रेमळ असेल. ह्या अशा अनुभवांतूनच त्यांचा विश्वास बळकट होतो. संत थॉमसचा प्रवास हा अविश्वासातून विश्वासाकडे होता. पण जेव्हा त्याचा विश्वास ख्रिस्तावर भक्कम झाला. तेव्हा ख्रिस्तासाठी तो मरावयास देखील तयार झाला आणि तो ख्रिस्तासाठी मरण पावला सुद्धा. आज संत थॉमस भारताचा प्रेषित ह्याचा सण साजरा करताना, त्याच्याकडे आपण विश्वासाची देणगी मागया

प्रार्थनाहे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, हे माझ्या स्वामी, तुजवर प्रेम करुन विश्वासाने तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला कृपा दे, ही प्रार्थना संत थॉमसच्या मध्यस्थीने करतो, आमेन..     

✝️