सामान्य काळातील तेरावा आठवडा
मंगळवार २ जुलै २०२४
मग उठून त्याने वारा आणि समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले.
Then he rose and rebuked the winds and the sea, and there was a great calm.
संत प्रोसेयुस व मार्टिनिअन
संत पीटर आणि पौल ह्यांना रोमच्या तुरुंगात टाकण्यात आले त्यावेळी तुरुंगाचे रक्षक म्हणून हे दोघे काम पाहात होते. संत पीटर आणि पौल ह्यांनी तुरुंगातदेखील ख्रिस्ती धर्माची सुवार्ता सांगितली आणि अनेक चमत्कार केले.
त्यांनी प्रभावित होऊन अनेकांनी ख्रिस्ती धर्माचा जाहीर स्वीकार केला. त्यात प्रोसेयुस आणि मार्टिनिअन हे सुद्धा होते. त्यांनी पीटर व पौल ह्यांना तुरूंगातून मुक्त होण्याची संधीदेखील देऊ केली होती. परंतु सत्यनिष्ठ प्रेषितांनी ती सरळसरळ नाकारली. पुढे स्नानसंस्कारासाठी आवश्यक असलेले पाणी त्या तुरूंगातील एका खडकातून अद्भुतरित्या धो धो वाहत राहिले.
तुरुंगाधिकारी पौलीनस ह्यांनी प्रोसेयुस आणि मार्टिनिअन ह्या दोघांना आपल्या नवीनतम श्रद्धेपासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते आपल्या दृढ विश्वासापासून तीळमात्र ढळत नाहीत हे पाहून त्यांचा क्रूर छळ करण्यात आला. त्यांच्या श्रद्धेचा अपमान करण्यासाठी त्यांना ज्युपिटरच्या मूर्तीपुढे धूप देण्यास सांगण्यात आले. त्यालाही त्यांनी साफ नकार दिला. संपूर्ण छळाच्या काळात त्यांच्या मुखी एकच वाक्य होते “परमेश्वर सदैव सुवंदित असो." शेवटी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
प्रभू येशू त्यांच्याबरोबर होता तरी शिष्यांना वादळाची भिती वाटली. आपण सुद्धा जीवनातील अनेक प्रकारच्या वादळांमध्ये व संकटांमध्ये सापडतो. आपल्याला सुद्धा अनेक प्रकारची भिती ग्रासत असते. मात्र प्रभू येशू आपल्या सोबतीला आहे, हे आपण विसरतो. येशूने म्हटले आहे, 'पाहा, युगाच्या समाप्तिपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे' (मत्तय २८:२० ). येशू आपल्याला सर्व संकटातून वाचविणारा प्रभू आहे, त्याची महानता आपण समजत नाही. | जीवनात संकटे, वादळे, दुःख, अपयश व आजार हे येणारच आहेत, तरी सुद्धा त्या सर्वांवर विजय मिळविणारा प्रभू येशू आपल्या सोबतीला आहे.
| प्रभू येशूने केवळ वाऱ्याला धमकाविले आणि वादळ शांत झाले. आपल्या जीवनातील सर्व वादळे शांत करणारा प्रभू येशू आपल्याबरोबर आहे. आज आपण प्रभू येशूवरील आपला विश्वास किती मजबूत आहे ते तपासून पाहू या. संत पौल प्रमाणे आपल्याला असे म्हणता येईल का ? 'मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो' (२ तिमथी १:१२).
पहिले वाचन : आमोस ३:१-८, ४:११-१२
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन
"प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल ?"
इस्राएल वंशजहो, तुम्हांविरूद्ध म्हणजे जे सर्व कूळ मी इजिप्त देशातून बाहेर आणले त्यांच्याविरूद्ध परमेश्वराने सांगितलेले वचन ऐका, ते असे:
“भूतलावरील सर्व कुळात केवळ तुमच्याबरोबर मी परिचय केला, म्हणून तुमच्या सर्व दुष्कृत्याबद्दल मी तुमची झडती घेईन."
“पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघेजण एकमेकांबरोबर चालतील काय ? पारध नसल्यास वनात सिंह गर्जना करतो काय? काही धरले नसल्यास तरुण सिंह आपल्या गुहेत गुरगुरतो काय ? पाशच मांडला नसल्यास पक्षी जमिनीवरल्या जाळ्यात अडकेल काय ? जाळ्यात काही अडकले नसल्यास ते जमिनीवरून वर उडेल काय ? नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरणार नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय ? प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण ? प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?
“देवाने सदोम आणि गमोरा यांचा नाश केला तसा तुमच्यातल्या काही जणांचा नाश केला आहे. तुम्ही अग्नीतून काढलेल्या कोलितासारखे झाला तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत." असे परमेश्वर म्हणतो.
"म्हणून हे इस्राएल, मी तुला असेच करीन; मी तुला असेच करीन; म्हणून हे इस्राएल आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध राहा."
First Reading :Amos 3:1-8; 4:11-12
Hear this word that the Lord has spoken against you, O people of Israel, against the whole family that I brought up out of the land of Egypt: "You only have I known of all the families of the earth; therefore I will punish you for all your iniquities. "Do two walk together, unless they have agreed to meet? Does a lion roar in the forest, when he has no prey? Does a young lion cry out from his den, if he has taken nothing? Does a bird fall in a snare on the earth, when there is no trap for it? Does a snare spring up from the ground, when it has taken nothing? Is a trumpet blown in a city, and the people are not afraid? Does disaster come to a city, unless the Lord has done it? For the Lord God does nothing without revealing his secret to his servants the prophets. The lion has roared; who will not fear? The Lord God has spoken; who can but prophesy?" "I overthrew some of you, as when God overthrew Sodom and Gomorrah, and you were as a brand plucked out of the burning; yet you did not return to me," declares the Lord. "Therefore thus I will do to you, O Israel; because I will do this to you, prepare to meet your God, O Israel!"
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र ५:५-८
प्रतिसाद : प्रभो, तू मला आपल्या न्यायपथाने ने.
१) तू दुष्टपणाची आवड धरणारा देव नाहीस;
दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही.
तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणारे नाहीत.
२) सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे.
असत्य भाषण करणाऱ्यांचा तू नाश करतोस.
खुनी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.
३) मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन.
तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे
तोंड करून दंडवत घालीन.
Psalm 5:5-8
Lead me, Lord, in your justice.
You are no God who delights in evil;
no sinner is your guest.
The boastful shall not stand their ground
before your eyes. R.
All who do evil you despise;
all who lie you destroy.
The deceitful and those who shed blood,
the Lord detests. R
Yet through the greatness of your merciful love,
I enter your house.
I bow down before your holy temple,
in awe of you.
Matthew 8:23-27
आलेलुया, आलेलुया!
प्रभु म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे;
कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून
घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
आलेलुया!
Acclamation:
I long for the Lord, in his word I hope.
शुभवर्तमान मत्तय ८:२३-२७
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“येशू उठला आणि त्याने वारा आणि समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले."
मग येशू तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले. तेव्हा पाहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले; येशू तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, "प्रभुजी, वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, "अहो, अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे?" मग उठून त्याने वारा आणि समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे आणि समुद्रही ह्याचे ऐकतात ?"
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 8:23-27
At that time: When Jesus got into the boat, his disciples followed him. And behold, there arose a great storm on the sea, so that the boat was being swamped by the waves; but he was asleep. And they went and woke him, saying, "Save us, Lord; we are perishing." And he said to them, "Why are you afraid, O you of little faith?" Then he rose and rebuked the winds and the sea, and there was a great calm. And the men marvelled, saying, "What sort of man is this, that even winds and sea obey him?
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: "येशू वादळ शांत करतो”
प्रत्येक चमत्काराच्या मागे येशूचा काहितरी उद्देश असतो. येशू वादळ शांत करतो, ह्या चमत्कारामागे काय हेतू होता? येशू तारवात असून देखील, त्याने हे वादळ का निर्माण केले ह्याला उत्तर देताना शिष्य म्हणाले, "हा कोणत्या प्रकारचा माणुस आहे की, वारा व समुद्रही ह्याचे ऐकतात." ह्याद्वारे येशूने स्पष्ट केले की तोच खरा मसीहा आहे, सर्व शक्तीमान प्रभू आहे ज्याचा निसर्गावर देखील अधिकार आहे. ह्या चमत्काराद्वारे प्रभूला त्याच्या बरोबर असलेल्या प्रेषितांचा विश्वास देखील बळकट करायचा होता. प्रेषितापैकी काहीजण व्यावसायीक मासे पकडणारे कोळी होते. अनेक वादळांना त्यांनी समर्थपणे तोंड दिले होते. पण हे वादळ त्यांच्या शक्तीपलीकडचे होते. हार पत्करून ते प्रभू येशूला शरण गेले. “प्रभो आम्हाला वाचवा.” प्रयत्न करून जेव्हा आपल्याला यश मिळत नाही, तेव्हा नम्र होऊन प्रभूचरणी शरण जाणे हे योग्य आहे. प्रभू परमेश्वर आपल्याला वाचविण्यासाठी सतत तयार असतो. आपण त्याला शरण जातो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनातील वादळ सदृश्य परिस्थितीत तू आमच्या बरोबर आहेस, असा विश्वास दृढ करण्यास आम्हाला शक्ती दे, आमेन.
0 टिप्पण्या