सामान्य काळातील पंधरावा रविवार
१४ जुलै २०२४
वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. He charged them to take nothing for their journey except a staff-no bread, no bag, no money in their belts
✝️
“प्रभू येशूने प्रेषितांना कामगिरीवर पाठविले.”
✝️
पहिल्या वाचनातील आमोस संदेष्ट्याने धैर्याने आणि संयमाने बेथेल येथे परमेश्वराचा संदेश दिला. जे सत्य व जे देवाच्या योजनेप्रमाणे होणार असते त्याचा संदेश देताना कोणताच संदेष्टा घाबरला नाही, कारण प्रभूचे वचन आहे, 'घाबरु नकोस, मी तुझ्याबरोबर आहे.'
निवडलेल्या आपल्या बारा शिष्यांना प्रभू येशूने आशीर्वाद व अधिकार देऊन देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास आणि सेवाकार्य करावयास पाठविले. अगदी साध्या भोळ्या माणसांनी प्रभूवर विश्वास ठेवून प्रभूच्या आज्ञेप्रमाणे सेवाकार्य करण्यास सुरुवात केली. प्रभूच्या कृपेचे सामर्थ्य त्यांच्याठायी कार्य करीत होते. लोकांना त्यांनी पश्चाताप करण्यासाठी प्रवृत्त केले. प्रभूची तारणाची सुवार्ता सांगितली. 'त्यांनी पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करुन बरे केले.' सर्व शिष्यांचे जीवन ख्रिस्ताठायी जणू अनुरुप बनले आणि त्यांच्याद्वारे अनेकांच्या जीवनात देवराज्य प्रस्थापित झाले. पुष्कळांच्या जीवनात परिवर्तन घडून आले. जगात सर्वांनी आनंदी, सुखी आणि प्रभूठायी पवित्र जीवन जगावे म्हणून आपली निवड करुन प्रभू आपल्याला आज पाठवित आहे.
परमेश्वराचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू बोलवित आहे. त्याचा संदेश सर्वापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याच्या सार्वकालिक जीवनाचे वारस बनण्यासाठी आपण तयार होऊया.
✝️
पहिले वाचन : आमोस ७:१२-१५
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जा, माझे लोक इस्त्राएल यांना संदेश सांग."
अमस्या आमोसला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, जा, यहुदा देशात पळून जा, तेथे संदेश सांगून पोट भर; पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्र स्थान, ही राजधानी आहे."
तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, अंजिराच्या झाडाची निगा करणारा आहे. मी कळपामागे असता परमेश्वराने मला निवडले. परमेश्वर मला म्हणाला, "जा, माझे लोक इस्राएल यांना संदेश सांग."
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Amos 7:12-15
In those days: Amaziah the priest of Bethel said to Amos, "O seer, go, flee away to the land of Judah, and eat bread there, and prophesy there, but never again prophesy at Bethel, for it is the king's sanctuary, and it is a temple of the kingdom." Then Amos answered and said to Amaziah, "I was no prophet, nor a prophet's son, but I was a herdsman and a dresser of sycamore figs. But the LORD took me from following the flock, and the LORD said to me, 'Go, prophesy to my people Israel.'
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : ८५: ९-१४
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझी दया आणि तारण आम्हांला दे.
१) परमेश्वर देव जे काय बोलेले ते मी ऐकून घेईन;
कारण तो आपल्या लोकांशी आणि आपल्या भक्तांशी
क्षेमकुशल भाषण करील.
खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले
तारण समीप असते;
ह्यासाठी की, आमच्या देशात वैभव नांदावे.
२) दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत;
नीती आणि शांती ह्यांनी एकमेकींचे चुबंन घेतले आहे.
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे,
स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करत आहे.
३) जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि
आमची भूमी आपले फळ देईल.
त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल
आणि त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.
Psalm 85:9ab and 10, 11-12, 13-14 (B8)
R. Let us see, O Lord, your mercy, and grant us your salvation.
I will hear what the Lord God speaks;
he speaks of peace for his people and his faithful.
His salvation is near for those who fear him,
and his glory will dwell in our land. R.
Merciful love and faithfulness have met;
justice and peace have kissed.
Faithfulness shall spring from the earth,
and justice look down from heaven.
Also the Lord will bestow his bounty,
and our earth shall yield its increase.
Justice will march before him,
and guide his steps on the way.
दुसरे वाचन इफिसकरांस १:३-१४
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाने आपणांला जगाच्या स्थापनेपूर्वी निवडून घेतले. "
(आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे; त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले; त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान आणि बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे; ख्रिस्ताच्याठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले; ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.)
आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहो; ह्यासाठी ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्याठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाची हमी आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद..
Second reading : Ephesians 1:3-14
Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who has blessed us in Christ with every spiritual blessing in the heavenly places, even as he chose us in him before the foundation of the world, that we should be holy and blameless before him. In love he predestined us for adoption to himself as sons through Jesus Christ, according to the purpose of his will, to the praise of his glorious grace, with which he has blessed us in the Beloved. In him we have redemption through his blood, the forgiveness of our trespasses, according to the riches of his grace, which he lavished upon us, in all wisdom and insight making known to us the mystery of his will, according to his purpose, which he set forth in Christ as a plan for the fullness of time, to unite all things in him, things in heaven and things on earth. In him we have obtained an inheritance, having been predestined according to the purpose of him who works all things according to the counsel of his will, so that we who were the first to hope in Christ might be to the praise of his glory. In him you also, when you heard the word of truth, the gospel of your salvation, and believed in him, were sealed with the promised Holy Spirit, who is the guarantee of our inheritance until we acquire possession of it, to the praise of his glory.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
Acclamation:
May the God of our Lord Jesus Christ enlighten
the eyes of our heart that we may know what is the hope
शुभवर्तमान मार्क ६:७-१३
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशू त्याच्या बारा शिष्यांना बाहेर पाठवू लागला. "
बारा जणांना आपल्या जवळ बोलावून येशू त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला. त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला आणि त्यांना आज्ञा केली की, वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. तरी वहाणा घालून चाला; दोन अंगरखे घालू नका.
आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका." ते तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून बरे केले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: Mark 6:7-13
At that time: Jesus called the twelve and began to send them out two by two, and gave them authority over the unclean spirits. He charged them to take nothing for their journey except a staff-no bread, no bag, no money in their belts-but to wear sandals and not put on two tunics. And he said to them, "Whenever you enter a house, stay there until you depart from there. And if any place will not receive you and they will not listen to you, when you leave, shake off the dust that is on your feet as a testimony against them." So they went out and proclaimed that people should repent. And they cast out many demons and anointed with oil many who were sick and healed them.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: देवाची ख्रिस्ताठायी योजना”
संत पॉल इफिसकरांस देवाचा साऱ्या मानवजातीसाठी असलेला उद्देश स्पष्ट करतो. हा उद्देश देवाने त्याचा पुत्र येशू ह्याच्याद्वारे प्रगट केला आहे. आध्यात्मिक आशीर्वाद म्हणजे पवित्र आत्म्याची देणगी. जो आत्मा आपल्याला संकटात शक्ती देतो. ख्रिस्तामध्ये देवाने आपल्याला आशिर्वादीत केले आहे. ह्या आध्यात्मिक आशिर्वादाचा अनुभव घ्यायचा असेल, तर आपण ख्रिस्तात एक व्हायला पाहिजे. देवाने आपल्याला पवित्र व निर्दोषम्हणून निवडले आहे. देवाला वाटते की आपण देवा बरोबर असावे. "पवित्र” म्हणजे स्वतःला देवासाठी वेगळे करणे. "निर्दोष" म्हणजे सर्व पापापासून मुक्त होणे. हे तितके सोपे नाही. पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण पवित्र व निर्दोष राहू शकतो. दुसरा आशिर्वाद म्हणजे देवाने आपल्याला ख्रिस्ताठायी दत्तक मुले होण्याचा मान दिला आहे. तिसरा आशीर्वाद म्हणजे देवाने येशूच्या रक्ताद्वारे आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली आहे. चौथा आशीर्वाद म्हणजे देवाने आपल्याला ज्ञान व बुद्धी दिली आहे. ज्ञान व बुद्धी ही फक्त ख्रिस्ताठायीच आहे, जो ख्रिस्तावर संपूर्ण विश्वास ठेवतो, त्याला देव ही कृपा देत असतो.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी सुवार्ता सांगण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास आमची निवड केल्याबद्दल अनेक धन्यवाद, आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या