Marathi Bible Reading |28th July 2024| 17th Sunday in Ordinary Time

सामान्य काळातील 

सतरावा  रविवार 

 जुलै २०२

येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्यांना बसलेल्यांना वाटून दिल्या.

esus then took the loaves, and when he had given thanks, he distributed them to those who were seated.

“प्रभू येशूचे पाच हजारांना जेवण. "


 अलीशाद्वारे देवाने केलेल्या चमत्काराचे  वर्णन आहे. जवाच्या वीस भाकरी आणि धान्याची काही कणसे ह्यांच्या साहाय्याने अलीशाने शेकडो लोकांची भूक भागविली. परमेश्वर सर्वांच्या गरजा  जाणतो आणि त्याच्या योजने प्रमाणे सर्वांसाठी सर्व गोष्टींचा पुरवठा करीत असतो.

प्रभू येशूने केलेल्या जवाच्या पाच भाकरी व दोन मासोळ्यांच्या चमत्कार कथन करण्यात आला आहे. लोकांचा मोठा  जनसमुदाय प्रभू येशूच्या मागे आला होता. प्रभूने त्याच्या सामर्थ्याने आणि  स्पर्शाने अनेकांना आरोग्यदान व मुक्ती दिली होती. शब्दाने आणि देवाच्या  वचनाने अनेकांना मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचे वरदान दिले होते. 
 पाच हजारांपेक्षा मोठा जनसमुदाय भोजन घेऊन तृप्त झाला प्रभू येशू अन्नदाता, जीवनदाता, आरोग्यदाता व मुक्तीदाता आहे हे  सर्वांनी अनुभवले. लोकांच्या विश्वासामुळे व येशू बरोबरच्या सहवासामुळे  त्यांना कृपा मिळाली.
समाजात आज सुद्धा अनेक माणसे भूकेने व्याकूळ आहेत. अनेकांना  शारीरिक व मानसिक आजार आहेत. अनेकजण ऐहिक सुखासाठी अनेक| प्रकारच्या बंधनात अडकलेले आहेत त्यांना प्रभू बोलावित आहे. 
✝️             

पहिले वाचन : २ राजांच्या ४:४२-४४

वाचक : राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन  
"त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही.”

बआल-शालीशा येथला कोणी मनुष्य आपल्या उपजातील जवाच्या वीस भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. अलिशा त्याला म्हणाला, "या माणसांना हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे." त्याचा सेवक म्हणाला, "काय ? शंभर माणसांना एवढेसे वाटून देऊ ?" तो म्हणाला, “हे लोकांना वाटून दे, त्यांना हे खाऊ दे; परमेश्वर म्हणतो, 'त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही.' तेव्हा त्याने ते लोकांना वाढले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर काही उरले.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Kings 4:42-44

In those days: A man came from Baal-shalishah, bringing the man of God bread of the first fruits, twenty loaves of barley and fresh ears of grain in his sack. And Elisha said, "Give to the men, that they may eat." But his servant said, "How can I set this before a hundred men?" So he repeated, "Give them to the men, that they may eat, for thus says the LORD, 'They shall eat and have some left." So he set it before them. And they ate and had some left, according to the word of the LORD.
This is the word of God 

Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र  १४५:१०-११,१५-१८
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू आपली मूठ उघडून आमची इच्छा पूरी करतोस.

१) हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात 
आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
 ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि
 तुझा पराक्रम कथन करतात.

२) सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात, 
आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस.
 तू आपली मूठ उघडून प्राणिमात्रांची इच्छा पूरी करतोस.

३) परमेश्वरा आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे,
तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे, 
जे कोणी त्याचा धावा करतात,
जे मनापासून त्याचा धावा करतात, 
त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.


Psalm 145:10-11, 15-16, 17-18 (R: 16)

You open your hand, Lord, and you satisfy us.

All your works shall thank you, O Lord, 
and all your faithful ones bless you. 
They shall speak of the glory of your reign, 
and declare your mighty deeds. R

The eyes of all look to you, 
and you give them their food in due season. 
You open your hand 
and satisfy the desire of every living thing.

The Lord is just in all his ways, 
and holy in all his deeds. 
The Lord is close to all who call him, 
who call on him in truth. R


दुसरे वाचन इफिसकरांस पत्र  ४:१-६

वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"शरीर एकच, प्रभू एकच, विश्वास एकच, स्नानसंस्कारही एकच."

जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की, तुम्हाला झालेल्या पाचारणाला शोभेल असे चाला; पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या; आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच आणि आत्माही एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वाच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद..

Second reading : Ephesians 4:1-6

Brethren: I, a prisoner for the Lord, urge you to walk in a manner worthy of the calling to which you have been called, with all humility and gentleness, with patience, bearing with one another in love, eager to maintain the unity of the Spirit in the bond of peace. There is one body and one Spirit-just as you were called to the one hope that belongs to your call-one Lord, one faith, one baptism, one God and Father of all, who is over all and through all and in all.

This is the word of God 

Thanks be to God 


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; 
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.

Acclamation: 
 A great prophet has arisen among us, and God has visited his people.

शुभवर्तमान  योहान  ६:१-१५
वाचक: योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "येशूने बसलेल्यांना पाहिजे तितके दिले. "

येशू गालिली म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग आला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून आणि आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलीपला म्हणाला, “ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या ?" हे तर त्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले; कारण आपण काय करणार आहो, हे त्याला ठाऊक होते. फिलीप्पने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील प्रत्येकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत ?” त्याच्या शिष्यांपैकी एकजण म्हणजे शिमोन पेत्रचा भाऊ आंद्रेया हा त्याला म्हणाला, "येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन मासे आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?” येशू म्हणाला, “लोकांना बसवा." त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरुष होते, ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्यांना बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यास पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय.”मग ते येऊन आपल्याला राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading: John 6:1-15

At that time: Jesus went away to the other side of the Sea of Galilee, which is the Sea of Tiberias. And a large crowd was following him, because they saw the signs that he was doing on the sick. Jesus went up on the mountain, and there he sat down with his disciples. Now the Passover, the feast of the Jews, was at hand. Lifting up his eyes, then, and seeing that a large crowd was coming toward him, Jesus said to Philip, "Where are we to buy bread, so that these people may eat?" He said this to test him, for he himself knew what he would do. Philip answered him, "Two hundred denarii worth of bread would not be enough for each of them to get a little." One of his disciples, Andrew, Simon Peter's brother, said to him, "There is a boy here who has five barley loaves and twofish, but what are they for so many?" Jesus said, "Make the people sit down." Now there was much grass in the place. So the men sat down, about five thousand in number. Jesus then took the loaves, and when he had given thanks, he distributed them to those who were seated. So also the fish, as much as they wanted. And when they had eaten their fill, he told his disciples, "Gather up the leftover fragments, that nothing may be lost." So they gathered them up and filled twelve baskets with fragments from the five barley loaves left by those who had eaten. When the people saw the sign that he had done, they said, "This is indeed the Prophet who is to come into the world!" Perceiving then that they were about to come and take him by force to make him king, Jesus withdrew again to the mountain by himself.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन" प्रभू येशू फार मोठा चमत्कार करून हजारो लोकांची भूक भागवितो. ह्या शुभवर्तमानानंतर येशू म्हणतो, "मीच जीवनाची भाकर आहे." पुढे भाकरीचे रूपांतर आपल्या शरीरात करून येशूने अनेक विश्वासू लोकांचे पोषण केले. मोठा लोकसमुदाय पाहून येशू त्यांच्या जेवणाचा विचार करू लागला. ह्यावरून समजते की, येशू लोकांच्या लहान सहान गरजांकडे देखील लक्ष देतो. हा चमत्कार शिष्यांना त्यांचा येशूवरील विश्वास वाढवण्यास नक्कीच मदत करणार होता. प्रेषित अंद्रियाला एका मुलाकडे पाच भाकरी व दोन मासे सापडले. एवढ्या लोकांसाठी ते पुरेसे नव्हते. शिष्यांनी खर म्हणजे समस्या पेक्षा येशूवर जास्त विश्वास ठेवायला हवा होता. येशूचा देवावर पूर्ण विश्वास होता. त्याक्षणी भूक हिच मोठी गरज होती. प्रभू पिता ती भागविणार ह्यावर येशूची श्रद्धा होती. देव आपल्या गरजा, भूक भागवित असतो. एवढेच की आपण मोठ्या विश्वासाने देवाकडे वळायला हवे.

प्रार्थना :    हे प्रभू येशू, तुझ्या आध्यात्मिक भोजनाची ओढ आम्हाला लागू दे, आमचे जीवन तुझ्या तारणदायी कृपेने भरुन टाक, आमेन.
✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या