Marathi Bible Reading | Tuesday 30th July 2024 | 17th Week In Ordinary Time

सामान्य काळातील सतरावा   आठवडा

मंगळवार ३० जुलै  २०२४ 

"जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. "

The Son of Man will send his angels, and they will gather out of his kingdom all causes of sin and all lawbreakers, and throw them into the fiery furnace. 


  संत पीटर क्रिस्तॉलॉगस

महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३८०-४५०)

चिंतन : पावित्र्याची शस्त्रे धारण करा. आपली कंबर शुद्धतेच्या कमरबंदाने कसा, ख्रिस्त तुमचे शिरस्त्राण बनो. ख्रिस्ताचा क्रूस तुमच्या मुखाचे रक्षण करो. आपल्या उरात ईश्वरी ज्ञानाचे भांडार साठवा, तुमच्या प्रार्थनांचा धूप उंचस्थानी पोहोचो. • संत पीटर क्रिस्तॉलॉगस

 'शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत.' तर निंदण हे त्या  दुष्टाचे पुत्र आहेत.' आपल्या समाजात, कुटुंबात व शेजोळात जर अत्याचार,  व्यभिचार व पापवासना वाढत असतील तर ते कार्य त्या दुष्ट सैतानाचे असू  शकते. आपल्यामध्ये असे निंदण वाढत आहे का ? प्रभू आपल्याला सल्ला देत आहे की निंदण जर वाढत असेल तर त्याची कापणी करुन ते जळत्या भट्टीत टाकले जाईल. आपल्यामध्ये परमेश्वराच्या राज्याचे चांगले बीज वाढत असेल तर प्रभू येशू म्हणत आहे की, 'नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सुर्या सारखे प्रकाशतील.' शुद्धतेचे व पावित्र्याचे जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारे देवाचे वचन परमेश्वराने आपल्या हृदयात अंकूरीत केलेले आहे. आपले जीवन फलदायी बनावे व देवाच्या राज्यात आपणा सर्वांचे स्वागत व्हावे म्हणून आपण देवाचे वचन आत्मसात करु या. वचनानुसार जीवन आचरण करण्यास प्रयत्नशील बनू  या. जे काही आपल्याला देवापासून दूर घेऊन जात असते त्याचा धिक्कार करु या.

✝️             

पहिले वाचन :  यिर्मया १४:१७-२२
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"हे परमेश्वरा, आमची आठवण ठेव आणि तुझा आम्हांशी केलेला करार मोडू नकोस."

"तू त्यांना हे वचन सांग: माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबोत; कारण माझ्या लोकांची कुवार कन्या भयंकर जखम लागून अति छित्रभित्र झाली आहे. मी वनात जातो तो तेथे तरवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तो दुष्काळाने पीडलेले मला आढळतात. कारण संदेष्टे आणि याजक हे अज्ञात देशांत भटकत आहेत."
तू यहुदाचा अगदी त्याग केला आहेस काय ? तुझ्या जिवाला सियोनचा वीट आला आहे काय ? आम्ही बरे होऊ नये, इतके तू आम्हांला का मारले आहेस ? आम्ही शांतीची अपेक्षा करतो, पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तो पहा दहशत.
हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म, आम्ही जाणतो; आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे. तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस;तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस; आम्हांशी केलेला करार आठव, तो मोडू नकोस;
विदेशांच्या निरुपयोगी दैवतांमध्ये कोणी पर्जन्य देणारी
आहेत काय ? आकाशाला वृष्टी करता येईल काय ?
हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना ? आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू ह्या सर्वांना उत्पन्न केले आहेस.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Jeremiah 14:17b-22

Let my eyes run down with tears night and day, and let them not cease, for the virgin daughter of my people is shattered with a great wound, with a very grievous blow. If I go out into the field, behold, those pierced by the sword! And if I enter the city, behold, the diseases of famine! For both prophet and priest ply their trade through the land and have no knowledge. Have you utterly rejected Judah? Does your soul loathe Sion? Why have you struck us down so that there is no healing for us? We looked for peace, but no good came; for a time of healing, but behold, terror. We acknowledge our wickedness, O Lord, and the iniquity of our fathers, for we have sinned against you. Do not spurn us, for your name's sake; do not dishonour your glorious throne; remember and do not break your covenant with us. Are there any among the false gods of the nations that can bring rain? Or can the heavens give showers? Are you not he, O Lord our God? We set our hope on you, for you do all these things.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : ७९:८-९,११,१३
प्रतिसाद : हे देवा, तू आम्हांला सहाय्य कर. 

१ आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मे आठवू नकोस.
 तुझी करूणा आमच्यावर सतत राहो,
 कारण आम्ही फार दुर्दशेत पडलो आहोत.
तू आपल्या नामाच्या थोरवीसाठी आम्हांला सहाय्य कर.

२) हे आमच्या उद्धारक देवा, 
आपल्या नामाकरिता आम्हांला सोडव 
आणि आमची पापे धुवून टाक.

३ )बंदिवानांचे कण्हणे तुझ्या कानी येवो; 
ज्यांचा वध करण्याचे ठरवले आहे 
त्यांना तू आपल्या बाहुबलाने वाचव. 
मग जे आम्ही तुझी प्रजा आणि 
तुझ्या कुरणातली मेंढरे ते आम्ही सर्वकाळ
 तुझे उपकारस्मरण. करीत राहू.
 तुझी कीर्ती पिढ्यान्पिढ्या वर्णीत जाऊ.

 Psalm 79:8, 9, 11, 13
For the sake of the glory of your name, free us O Lord.

Do not remember against us 
the guilt of former times.
Let your compassion hasten to meet us;
 for we have been brought very low. R

Help us, O God our saviour, 
for the sake of the glory of your name. 
Free us and forgive us our sins, 
because of your name. R

Let the groans of the prisoners
come before you, 
your strong arm reprieve 
those condemned to die. R

Then we, your people, the flock of your pasture, 
will give you thanks forever and ever. 
From age to age
we will recount your praise. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा ! 
तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
 आलेलुया!

Acclamation: 

The seed is the word of God, Christ is the sower; all who come to him will live forever.

शुभवर्तमान   मत्तय १३ : ३६-४३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. "
येशू लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निंदणाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा." त्याने उत्तर दिले की, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत, निंदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत, ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दुतांना पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्यांच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत ते ऐको."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :
Matthew 13:36-43

At that time: Jesus left the crowds and went into the house. And his disciples came to him, saying, "Explain to us the parable of the weeds of the field." He answered, "The one who sows the good seed is the Son of Man. The field is the world, and the good seed is the sons of the kingdom. The weeds are the sons of the evil one, and the enemy who sowed them is the devil. The harvest is the end of the age, and the reapers are angels, Just as the weeds are gathered and burned with fire, so will it be at the end of the age. The Son of Man will send his angels, and they will gather out of his kingdom all causes of sin and all lawbreakers, and throw them into the fiery furnace. In that place there will be weeping and gnashing of teeth. Then the righteous will shine like the sun in the kingdom of their Father. He who has ears, let him hear."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
चांगले बी"

प्रत्येक ख्रिस्ती माणसाला वाटते की, मी एक चांगले जीवन जगावे, पण ह्या आधुनिक युगात हे फार मोठे आव्हान आहे. आजच्या दाखल्यात पेरणारा देव आहे. बी म्हणजे चांगली माणसे, जमीन म्हणजे जग. देवाने चांगले तेच पेरले. सुंदर निसर्ग, माणूसकीने भरलेली माणसे तयार केली. पण शत्रू येऊन चांगल्या बियात निंदन पेरून गेले. निंदण म्हणजे वाईट गोष्ट. झोपेत असताना सैतान आपला फायदा घेतो. झोपेत असणे म्हणजे जागृत नसणे. सरासर विचार न करणे. वाईट संगत, वाईट चित्रपट माणसाच्या मनात निंदण पेरत असतात. नोकरांना निंदण काढण्याची इच्छा असते. पण मालक त्यांना कापणीपर्यंत थांबण्यास सांगतो कापणी म्हणजे जगाचा शेवट. देव कोणाचाही न्याय पटकन करीत नाही. दोघांना तो वाढू देतो. देवाने माणसाला बुद्धी व वेळ दिलेली आहे. चांगले व वाईट ते माणसांनी निवडावे. कापणीची वेळ म्हणजे मरण, शेवट. कापणीपर्यंत वाईट जीवन जगलो तर आपली रवानगी नरकात होणार. पण पश्चात्ताप करून चांगले जीवन जगलो तर आपल्याला कोठारात म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळणार. वाईटाचा शेवट वाईटच होणार. प्रत्येक वाईट बी आपल्याबरोबर स्वतःचा नाशघेऊन येत असते. अजून वेळ गेलेली नाही. कापणीची वेळ कधी येईल ते सांगता येत नाही. उद्याचा भरवसा नाही. म्हणून देवाला शरण जाऊन निंदणाचे रुपांतर चांगल्या गहूत करू

प्रार्थना :   हे प्रभू येशू, मरिया व मार्थासारखा विश्वास व प्रेम आमच्यामध्ये वाढीस लागावे व आमचे जीवन परिवर्तन घडावे म्हणून आम्हाला कृपा दे,
आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या