Marathi Bible Reading | Wednesday 31st July 2024 | 17th Week In Ordinary Time

सामान्य काळातील सतरावा   आठवडा

बुधवार ३१ जुलै  २०२४ 

त्याला एक अति मौल्यवान मोती आढळले; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले.”on finding one pearl of great value, went and sold all that he had and bought it."


लोयोलाचे संत इग्नेशिअसचा सण  :

वर्तनसाक्षी (१४९१-१५५६)  

उत्तर स्पेनमधील लोयोला येथल्या राजघराण्यात इनिगो ह्याचा जन्म झाला. पाम्पलोना येथल्या युद्धात जखमी झाल्यानंतर आपल्या बिछान्यात विश्रांती घेत असताना त्याने ख्रिस्ताचे चरित्र आणि संतांची जीवनचरित्रे ह्यांचे वाचन केले. त्यावरून आपले जीवन किती पोकळ आणि अर्थहीन आहे ह्याची जाणीव इग्नेशिअस ह्यांना झाली. त्याने स्वतःशी प्रश्न केला, “जर ही सगळी माणसे संतपदाला जाऊन पोहोचू शकत असतील तर मी का नाही?”

आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर इग्नातीने मानरेसा येथील एकांतवासात एक वर्ष घालविले. देवाची आपल्याबाबत काय इच्छा आहे ते त्याने शोधण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पवित्र भूमीची तीर्थयात्रा केली. बार्सेलोना येथील प्रशिक्षण केंद्रात त्याने लॅटीन भाषेचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे वय ३३ वर्षे एवढे होते. त्यापुढील ११ वर्षे इग्नाती ह्याने तत्वज्ञान आणि ईशज्ञान या विषयांचा अभ्यास करण्यात खर्ची घातली.

पॅरीस शहरातील विश्वविद्यालयात इ. स. १५३५ साली त्याने पदवी संपादन केली. त्यावेळी आत्मक्लेश, गरिबी आणि आध्यात्मिक साधना या गुणांनी सजविलेल्या जीवनपद्धतीने त्यांनी ६ तरुणांना आपणाकडे आकर्षून घेतले. त्यातील दोघे पुढे संतपदाला पोहोचले. एक होते संत पीटर फेबर आणि दुसरे संत फ्रान्सिस झेवियर (सण ३ डिसेंबर).

ह्या सात जणांनी पोप पॉल दुसरे ह्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगण्याचे ठरविले, ख्रिस्तसभेच्या शत्रूंशी मुकाबला करण्यासाठी ह्या जगाच्या आकर्षणात अडकून पडलेल्या भाविकांना शाश्वत सुखाची ओळख करून देण्यासाठी ह्या सात जणांच्या समुहातून परमेश्वर एका नवीन सोसायटीची योजना हळूहळू आपणासमोर साकार करीत आहे ह्याची जाणीव पोपमहाशयांना झाली.

इ. स. १५४० साली पोपमहाशयांनी “द सोसायटी ऑफ जिझस" जेसुईट्स किंवा येशूसंघ, ह्या धार्मिक व्रतस्थांच्या संस्थेला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर इग्नाती लोयोलाकर ह्यांना या संस्थेचे पहिले जनरल म्हणून निवडण्यात आले. त्यांनी लगेच आपल्या संस्थेची आचारसंहिता तयार केली. त्यात कोणत्याही एका विशिष्ट पेहरावाचा समावेश करण्याचे त्यांनी टाळले. दैनंदिन भक्तीच्या प्रार्थना आपल्या आचारसंहितेतून वगळली. त्याऐवजी आपल्या धर्मगुरूंनी आत्मपरीक्षण- चिंतन- ध्यान-साधना करावी, प्रवचने दयावीत, कुमसार ऐकावे, शाळा कॉलेजांतून मुलामुलींना शिक्षण दयावे, यासाठी तपसाधना आयोजित करावी ह्यावर त्यांनी भर दिला.

लवकरच ही संस्था झपाट्याने फोफावत गेली. येशूसंघीय धर्मगुरू इटालीच्या रस्त्यारस्त्यांतून साध्यासोप्या भाषेत प्रभूची सुवार्ता घोषवू लागले. आजारी व गरीब ह्यांची सेवा करू लागले. लोकांना वारंवार संस्कार स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करू लागले. युरोपातील इतर देशांतही त्यांच्या कार्याचा प्रभाव पडला. आफ्रिका, अमेरिका, भारत व जपान इत्यादी देशात येशूसंघीय धर्मगुरूंचे कार्य व संख्या भराभर वाढत गेली.१६ वर्षांनंतर ३१ जुलै १५५६ रोजी जेव्हा इग्नेशिअस लोयोलाकर मरण पावले तेव्हा येशू संघीयामध्ये १,००० धर्मगुरू आणि जगभर संस्थाच्या १०० शाखा इत्यादींचे कार्य सुरू होते. पोप ग्रेगरी पंधरावे ह्यांनी येशूसंघाचे कार्य पाहून इ. स. १६६२ साली इग्नेशियस ह्यांना संतपद बहाल केले.

चिंतन : जितकी परिस्थिती निराशाजनक भासेल तितकी अधिक आशा व भरवसा आपण परमेश्वरावर दाखवला पाहिजे. जेव्हा मानवी श्रम व सहाय्य कमी पडते तेव्हा ईश्वरी कृपा कार्यरत होते. - लोयोलाचे संत इग्नेशिअस


 आजच्या शुभवर्तमानात प्रभूयेशू स्वर्ग राज्याचे महत्त्व दोन उदाहरणांद्वारे स्पष्ट करून सांगत आहे. शेतात सापडलेली ठेव मिळविण्यासाठी  माणूस जसे सर्वस्व पणाला लावून ते शेत विकत घेतो, तसेच स्वर्गराज्याची वचने आत्मसात करण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवे. 
दुसऱ्या  उदाहरणात प्रभू येशू मोत्याचा शोध घेणाऱ्या व्यापाऱ्यासारखे आपण असावे अशी शिकवण देत आहे. परमेश्वराचे अनमोल मोती म्हणजेच त्याची अमर  वचने आहेत. प्रभू येशूच्या आजच्या दोन्ही दृष्टांतावर चिंतन करीत असताना आपणास देवाचे स्वर्गीय राज्य मिळविण्याचा प्रयत्न करू या. 
✝️             

पहिले वाचन :  यिर्मया १५:१०,१६-२१
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मला सतत दुःख का ? जर तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहशील. "

अग माझ्या आई! हाय हाय ! सर्व जगाबरोबर झगडा आणि विवाद करणाऱ्या अशा मला तू जन्म दिला आहेस. मी कोणाशी सावकारीचा व्यवहार केला नाही आणि कोणी माझ्याशी सावकारी केली नाही; तरी सर्व मला शाप देतात.
मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली; तुझीवचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्हास अशी होती;
हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी स्वतः ला तुझा म्हणवतो. विनोद करणाऱ्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही; तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकान्ती बसलो; कारण तू मला अस्वस्थ केले आहेस. मला सतत दुःख का ? माझी जखम भारी आणि असाध्य का? फसवणारा ओहोळ, आटून जाणारे पाणी, यांसारखा तू खरोखर मला होशील काय ? ह्याकरिता परमेश्वर असे म्हणतो:
"तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन. तू हिणकसापासून मौल्यवान वेगळे करशील, तर तू माझे मुख होशील. ते तुझ्याकडे परत येतील, पण तू त्यांच्याकडे जाणार नाहीस. तुला, या लोकांसंबंधाने मी पितळेची मजबूत भिंत करीन;
म्हणजे ते तुझ्याबरोबर लढाई करतील, तरी तुझ्यावर वरचढ होणार नाहीत; कारण तुझा बचाव करायला आणि तुला सोडवायला मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.
मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्काराच्या तावडीतून मुक्त करीन.”
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Jeremiah 15:10, 16-21

Woe is me, my mother, that you bore me, a man of strife and contention to the whole land! I have not lent, nor have I borrowed, yet all of them curse me. Your words were found, and I ate them, and your words became to me a joy and the delight of my heart, for I am called by your name, O Lord, God of hosts. I did not sit in the company of revellers, nor did I rejoice; Issat alone, because your hand was upon me, for you had filled me with indignation. Why is my pain unceasing, my wound incurable, refusing to be healed? Will you be to me like a deceitful brook, like waters that fail? Therefore thus says the Lord: "If you return, I will restore you, and you shall stand before me. If you utter what is precious, and not what is worthless, you shall be as my mouth. They shall turn to you, but you shall not turn to them. And I will make you to this people a fortified wall of bronze; they will fight against you, but they shall not prevail over you, for I am with you to save you and deliver you, declares the Lord. I will deliver you out of the hand of the wicked, and redeem you from the grasp of the ruthless.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : ५९:२-५अ, १०-११अ, १७, १८
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू माझा आधार आहेस.

१) हे माझ्या देवा, माझ्या वैऱ्यांपासून मला सोडव; 
जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचव.
 दुष्कर्म करणापासून मला सोडव; 
घातकी मनुष्यांपासून माझा बचाव कर.

२ )पहा, ते माझा जीव घ्यायला टपले आहेत;
 हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा दोष नसता 
दांडगे लोक माझ्याविरूद्ध एकत्र जमले आहेत.
 माझा दोष नसता ते धावून सज्ज होत आहेत.

३)  हे माझ्या सामर्थ्या,मी तुझी प्रतीक्षा करीन;
कारण देवच माझा उंच गड आहे,
माझा प्रेमळ देव मला भेटेल

४)  मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईन, 
पहाटेस तुझ्या दयेचा गजर करीन; 
कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड 
आणि शरणस्थान झाला आहेस.

५)  हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तोत्रे गाईन. 
कारण देव माझा उंच गड आहे; 
माझा देव दयामय आहे.

 
Psalm 59:2-3, 4-5a, 10-11, 17, 18 

R. God is my refuge in the day of my distress.

Rescue me from my foes, O God; 
protect me from those who attack me. 
O rescue me from those who do evil, 
and save me from bloodthirsty men. R 

See, they lie in wait for my life; 
the strong band together against me. 
For no offence, no sin of mine, O Lord, 
for no guilt of mine they rush to take their stand. R 

O my Strength, for you will I watch, 
for you, O God, are my stronghold, 
the God who shows me merciful love.
Now God will proceed before me; 
God will let me look upon my foes. R

As for me, I will sing of your strength, 
and acclaim your mercy in the morning, 
for you have been my stronghold, 
a refuge in the day of my distress. R 

O my Strength, to you I will sing praise, 
for you, O God, are my stronghold, 
the God who shows me merciful love. R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
तुम्ही आपली हृदये आज कठोर करू नका 
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या. 
 आलेलुया!

Acclamation: 
 I have called you friends, says the Lord; for all that I have heard from my Father I have made known to you.

शुभवर्तमान   मत्तय १३ :४४-४६
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तो आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे, ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.
"आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोण्या व्यापाऱ्यासारखे आहे; त्याला एक अति मौल्यवान मोती आढळले; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :
Matthew 13:44-46

At that time: Jesus said to the crowds, "The kingdom of heaven is like treasure hidden in a field, which a man found and covered up. Then in his joy he goes and sells all that he has and buys that field. Again, the kingdom of heaven is like a merchant in search of fine pearls, who, on finding one pearl of great value, went and sold all that he had and bought it."

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
खजिना"

प्रभू येशूने स्वर्गाच्या राज्याचे रहस्य उलगडण्यासाठी अनेक दाखल्याचा वापर केला. आजचा लपविलेल्या ठेवीचा व अती मौलवान मोतीचा दाखला तितकाच महत्वाचा आहे. ह्या दोन्ही दाखल्यांचा अर्थ एकच आहे. तो म्हणजे प्रभू ख्रिस्ताचे मूल्य. ह्या दाखल्यात येशू एक मौल्यवान ठेव किंवा खजिना आहे. शेत हे शुभवर्तमान आहे. ह्या शुभवर्तमानात हा लपविलेल्या ठेविसारखा आहे. एखाद्या येशू हा माणसाला जेव्हा येशूचे महत्त्व समजते, तेव्हा तो शुभवर्तमानामध्ये येशूला शोधण्याचा प्रयत्न करतो. शुभवर्तमानाचा तो खोल अभ्यास करतो. मग तो खजिना म्हणजे प्रभू येशूला आपल्या अंतःकरणात लपवून ठेविल. आनंदाच्या भरात तो जातो. तो ख्रिस्ताकडे जातो व आपले जीवन त्याच्या चरणी वाहण्याचा निर्णय घेतो. तो आपले सर्वस्व विकतो. ख्रिस्तासाठी सर्व गोष्टींचा तो त्याग करतो. आपले पापी जीवन सोडून तो आता ख्रिस्ताकडे वळत आहे. तो ते विकत घेतो. ख्रिस्ताला तो आपल्या हृदयात ठेवतो. ख्रिस्ताशी तो वचनबद्ध होतो. ख्रिस्त हा खजिना सापडल्यावर त्याला जगण्याचा खरा अर्थ जमजतो. एवढी वर्षे ख्रिस्ती जीवन जगताना खरोखर ख्रिस्त मला सापडलेला आहे का ? की मी अजून ख्रिस्ताला शोधतो आहे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तू आम्हासाठी दिलेली तुझी अमर वचने व देवराज्याच्या दिशेने घेऊन जाणारी शिकवण आम्ही आत्मसात करावी म्हणून आम्हाला प्रेरणा  दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या