सामान्य काळातील सतरावा आठवडा
गुरुवार १ ऑगस्ट २०२४
जे चांगले ते भांड्यात जमा केले, व वाइट ते फेकून दिले.
men drew it ashore and sat down and sorted the good into containers but threw away the bad.
संत अल्फोन्सस ह्यांना नीतिशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षकांचा व प्रायश्चित्त संस्कार देणाऱ्या धर्मगुरूंचा आश्रयदाता संत मानले जाते.
चिंतन : ज्याला फळ हवं आहे त्याने झाडाकडे गेले पाहिजे. ज्यांना ख्रिस्त हवा आहे त्यांनी मरियेकडे आले पाहिजे आणि ज्याची मरियेशी भेट होते त्याला निश्चितच ख्रिस्त सापडतो. संत अल्फोन्सस डी लिगरी
ख्रिस्तसभा आज संत अल्फन्सस लिगरी ह्यांचा स्मृती दिन साजरा करीत आहे. एक महान कायदेतज्ञ आणि नीतिशास्त्राचे अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती. साक्रामेंतातील येशूच्या भक्तीचा त्याने प्रसार केला. रिडेंप्टरीस्ट धर्मगुरु संघाची त्याने स्थापना करुन आपले सुवार्ताकार्य बलशाली व प्रभावी बनवले. प्रभू येशू आपण सर्वजण त्याच्या नावाने जेव्हा एकत्र जमा होतो तेव्हा आपल्यामध्ये हजर असतो. प्रभू येशूचे अस्तित्व आपण जाणावे, ओळखावे आणि अनुभवावे म्हणून प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन : यिर्मया १५:१०,१६-२१
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन १८:१-६ "कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात."
जे वचन परमेश्वरापासून यिर्मयाला प्राप्त झाले ते हे: ऊठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा कुंभार चाकावर काम करत होता. कुंभार मातीचे पात्र घडवत होता; ते त्यांच्या हाती असतानाच बिघडून गेले, मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडवले.तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले "हे इस्राएलच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय ? असे परमेश्वर म्हणतो. हे इस्त्राएलच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात."
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Jeremiah 18:1-6
The word that came to Jeremiah from the Lord. "Arise, and go down to the potter's house, and there I will let you hear my words." So I went down to the potter's house, and there he was working at his wheel. And the vessel he was making of clay was spoiled in the potter's hand, and he reworked it into another vessel, as it seemed good to the potter to do. Then the word of the Lord came to me: "O house of Israel, can I not do with you as this potter has done? declares the Lord. Behold, like the clay in the potter's hand, so are you in my hand, O house of Israel."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : १४५:२,३-४,५-६
प्रतिसाद : याकोबचा देव ज्याचा सहाय्यक आहे, तो धन्य.
१ माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन
माझ्या हयातीपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.
२ अधिपतींवर भरवसा ठेवू नका, मनुष्यांवर भरवसा ठेवू नका;
त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही.
त्यांचा प्राण जातो,
ते आपल्या मातीला पुन्हा मिळतात;
त्याच वेळी त्यांच्या योजनांचा शेवट होतो.
३ याकोबचा देव ज्याचे सहाय्यक आहे,
ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य;
त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले.
Psalm Psalm 146:1b-2, 3-4, 5-6ab
Blessed is he who is helped by Jacob's God.
My soul, give praise to the Lord;
I will praise the Lord all my life,
sing praise to my God while I live. R
Put no trust in princes,
in mortal man who cannot save.
Take their breath, they return to the earth,
and their plans that day come to nothing. R
Blessed is he who is helped by Jacob's God,
whose hope is in the Lord his God,
who made the heavens and the earth,
the seas and all they contain.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत;
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
आलेलुया!
Acclamation:
Open our hearts, O Lord, that we may pay attention to the words of your Son.
शुभवर्तमान मत्तय १३:४७-५३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
त्यांनी चांगले मासे भांड्यात जमा केले, व वाईट फेकून दिले.
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र सापडतात त्यासारखे आहे; ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्यावर ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, व वाइट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे आणि दात खाणे चालेल."
"तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?" ते त्याला म्हणाले, "होय." तेव्हा तो त्यांना म्हणाला, "प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे."
नंतर हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :
Matthew 13:47-53
At that time: Jesus said to the crowds, "Again, the kingdom of heaven is like a net that was thrown into the sea and gathered fish of every kind. When it was full, men drew it ashore and sat down and sorted the good into containers but threw away the bad. So it will be at the end of the age. The angels will come out and separate the evil from the righteous and throw them into the fiery furnace. In that place there will be weeping and gnashing of teeth. "Have you understood all these things?" They said to him, "Yes." And he said to them, "Therefore every scribe who has been trained for the kingdom of heaven is like a master of a house, who brings out of his treasure what is new and what is old." And when Jesus had finished these parables, he went away from there.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
इसरायली प्रजा जरी परमेश्वरापासून दूर गेली असली तरी परमेश्वराने त्यांना टाकले नाही. त्यांच्याबद्दलची काळजी आणि कळकळ यिर्मया संदेष्ट्याद्वारे त्याने व्यक्त केली. ज्याप्रमाणे कुंभार एखाद्या मडक्याला घडवतो, त्यास गुळगुळीत करतो आणि ते बिघडल्यास दुरूस्त करतो; त्याचप्रमाणे परमेश्वर त्याच्या लोकांना घडवतो. त्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवतो ते चुकले असल्यास त्यांना क्षमा करतो आणि प्रेमाने त्यांना वेंगेत घेतो. बायबलमध्ये परमेश्वराला बऱ्याचशा उपमा वापरलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे कुंभार. परमेश्वर आपला कुंभार आहे आणि आपण त्याच्या हातातली माती. तो त्याच्या इच्छेनुसार आपल्याला घडवतो. त्याचे संपूर्ण लक्ष आपल्या जडणघडणीकडेच असते. आजच्या शुभवर्तमानात स्वर्गाच्या राज्याविषयीचा शेवटचा दृष्टांत सांगितला आहे. स्वर्गाचे राज्य हे सर्वांसाठी खुले आहे. पण जो देवाच्या वचनानुसार वागतो, त्याची - शिकवण पाळतो व त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यालाच परमेश्वर स्वर्गाचे राज्य बहाल करतो. देवाच्या दृष्टीने ती व्यक्ती एक उत्तम निर्मिती आहे.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, खरे ख्रिस्ती जीवन जगण्यांस व तुझ्या स्वर्गराज्यांचे वारसदार बनण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन.
0 टिप्पण्या