Marathi Bible Reading | Friday 2nd August 2024 | 17th Week In Ordinary Time

सामान्य काळातील सतरावा   आठवडा

शुक्रवार २ ऑगस्ट  २०२४ 

"हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून मिळाले ? हा सुताराचा मुलगा ना ?'Where did the man get this wisdom and these miraculous powers? This is the carpenter's son, surely?




  संत पीटर एमार्ड 
(१८३४)
Born in La Mure d'Isere in southeastern France, Peter Julian's faith journey drew him from being a priest in the Diocese of Grenoble (1834) to joining the Marists (1839) to founding the Congregation of the Blessed Sacrament (1856). In addition to those changes, Peter Julian coped with poverty, his father's initial opposition to Peter's vocation, serious illness, a Jansenistic striving for inner perfection and the difficulties of getting diocesan and later papal approval for his new religious community.
✝️             
आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की नाझरेथ ह्या येशूच्या गावात त्याच्या स्वकीयांनी व जवळच्या लोकांनी त्याला नाकारले. येशू हा आपल्यातीलच एक सामान्य माणूस आहे असे त्यांना वाटत होते. येशूमध्ये | असलेले दैवी सामर्थ्य आणि देवत्व ह्यावरील त्यांचा विश्वास कमी पडला. त्याच्या गावातील माणसांनी येशूचा स्वीकार अंत:करणापासून केला नाही. म्हणूनच शुभवर्तमानात म्हटले आहे, 'तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्यांने फारशी अद्भूत कृत्ये केली नाहीत.' आपल्या जीवनात चमत्कार हवा असेल  तर देवावरील आपला विश्वास बळकट असायला हवा. विशेषतः ख्रिस्ती माणसांनी प्रभू येशूवरील आपला विश्वास वेळोवेळी पडताळून पहायला हवा.
आपल्या शेजोळात, समाजात व धर्मग्रामात सेवा कार्य करणाऱ्या सर्व सेवक नेत्यांचा येशूच्या नावाने आपण स्वीकार करु या. आपल्यातील पूर्वग्रह बाजूला सारुन देवाला प्राधान्य देऊ या. येशूची साक्ष जगाला देण्यासाठी प्रेरणा घेऊ या.

 
पहिले वाचन :  यिर्मया  २६:१-९
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात जमा झाले."

यहुदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या आरंभी परमेश्वरापासून जे वचन प्राप्त झालेः "परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा आणि यहुदाच्या सर्व नगरातून जे परमेश्वराच्या मंदिरात भजनपूजन करायला येतात त्यांना जे शब्द बोलण्याची मी तुला आज्ञा केली आहे ते सर्व त्यांना सांग; एकही शब्द वगळू नकोस. न जाणो ते कदाचित ऐकतील आणि त्यातला प्रत्येकजण आपल्या कुमार्गापासून फिरेल, म्हणजे मग त्यांच्या कृतीच्या दुष्टतेमुळे त्यांच्यावर जे अरिष्ट आणण्याचे
मी योजले आहे त्याविषयी मला अनुताप होईल. त्यांना सांग की, 'परमेश्वरा असे म्हणतो : तुम्ही माझे ऐकणार नाही, मी तुम्हांपुढे ठेवलेल्या नियमांप्रमाणे तुम्ही चालणार नाही, माझे सेवक जे संदेष्टे त्यांना मी मोठ्या निकडीने तुम्हांकडे पाठवले असता त्यांचे तुम्ही ऐकले नाही, त्यांची वचने आता तुम्ही ऐकणार नाही; तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन आणि हे नगर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमुक्त करीन."

ही वचने परमेश्वराच्या मंदिरात यिर्मयाला बोलताना याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सर्व लोकांनी ऐकले. ती वचने सर्व लोकांना कळवावी म्हणून यिर्मयाला परमेश्वराने सांगितले होते; ती सर्व त्याने बोलण्याची संपवल्यावर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सर्व लोकांनी यिर्मयाला पकडून म्हटले, "तू मेलाच पाहिजेस. 'हे मंदिर शिलोप्रमाणे होईल आणि हे नगर उजाड आणि निर्जन होईल,' असा संदेश तू परमेश्वरांच्या नावाने का दिलास ?" मग सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात यिर्मयाच्या भोवती जमले. 
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :

Jeremiah 26:1-9

In the beginning of the reign of Jehoiakim the son of Josiah, king of Judah, this word came from the Lord: "Thus says the Lord: Stand in the court of the Lord's house, and speak to all the cities of Judah that come to worship in the house of the Lord all the words that I command you to speak to them; do not hold back a word. It may be they will listen, and every one turn from his evil way, that I may relent of the disaster that I intend to do to them because of their evil deeds. You shall say to them, 'Thus says the Lord: If you will not listen to me, to walk in my law that I have set before you, and to listen to the words of my servants the prophets whom I send to you urgently, though you have not listened, then I will make this house like Shiloh, and I will make this city a curse for all the nations of the earth." The priests and the prophets and all the people heard Jeremiah speaking these words in the house of the Lord. And when Jeremiah had finished speaking all that the Lord had commanded him to speak to all the people, then the priests and the prophets and all the people laid hold of him, saying, "You shall die! Why have you prophesied in the name of the Lord, saying, This house shall be like Shiloh, and this city shall be desolate, without inhabitant?" And all the people gathered around Jeremiah in the house of the Lord.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : ६९:५,८-१०,१४
प्रतिसाद : हे देवा, तू मला उत्तर दे.

१ विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या 
डोक्याच्या केसापेक्षा अधिक आहेत. 
अन्यायाने माझ्याशी वैर करणारे, 
माझा जीव घेऊ पाहणारे, बलिष्ठ आहेत; 
मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले.

२ तुझ्याकरिता मी निंदा सहन केली आहे, 
लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे, 
मी आपल्या भावांना नवखा, 
माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे. 
कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, 
निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे.

३ मी तर, हे परमेश्वरा, 
तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो, 
हे देवा,
तू आपल्या अमाप दयेला अनुसरून 
आणि आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्याला 
अनुसरून मला उत्तर दे.


 
Psalm 69:5, 8-10, 14

In your great mercy, answer me, O Lord.

More numerous than the hairs on my head
are those who hate me without cause. 
Many are those who attack me, 
enemies with lies.
What I have never stolen, 
how can I restore? R

It is for you that I suffer taunts, 
that shame has covered my face.
To my own kin I have become an outcast,
 a stranger to the children of my mother.
 Zeal for your house consumes me, 
and taunts against you fall on me. R 

But I pray to you, O Lord,
for a time of your favour.
In your great mercy, answer me, 
O God, with your salvation that never fails. R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
 हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, 
ती नेत्रांना प्रकाश देतात. 
 आलेलुया!

Acclamation: 
 I am the light of the world, says the Lord; whoever follows me will have the light of life.
.


शुभवर्तमान   मत्तय  १३:५४-५८ 
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हा सुताराचा मुलगा आहे ना ? मग हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून मिळाले ?"

स्वतःच्या गावी आल्यावर येशूने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, "हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून मिळाले ? हा सुताराचा मुलगा ना ? ह्याच्या आईला मरिया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन आणि यहुदा हे त्याचे भाऊ ना ? ह्यांच्या बहिणी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय ? मग हे सर्व ह्याला कोठून प्राप्त झाले ?" असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, "संदेष्ट्याला आपला देश आणि आपले घर ह्यात सन्मान मिळत नाही.” तेथे त्याच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :
Matthew 13:54-58

Coming to his home town, Jesus taught the people in their synagogue in such a way that they were astonished and said, 'Where did the man get this wisdom and these miraculous powers? This is the carpenter's son, surely? Is not his mother the woman called Mary, and his brothers James and Joseph and Simon and Jude? His sisters, too, are they not all here with us? So where did the man get it all?' And they would not accept him. But Jesus said to them, 'A prophet is despised only in his own country and in his own house,' and he did not work many miracles there because of their lack of faith.

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 

परमेश्वर त्याच्या निवडलेल्या लोकांना कधीच अंतर देत नाही. तो त्यांना नेहमी मार्गदर्शन करतो, त्यांची सतत काळजी घेतो, त्यांचे संरक्षण करतो व त्यांना आशीर्वाद देतो. आजची दोन्ही वाचने देवाच्या वचनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगत आहेत. येशू सर्वांसाठी एक मोठा आशीर्वाद होता. देवाची वचने, त्याच्या योजना येशूने पूर्ण केल्या. देवाच्यासामर्थ्याने त्याने अनेकांना बरे केले, खूप चमत्कार केले आणि हेच कार्य करण्यासाठी तो जेव्हा आपल्या गावी जातो तेव्हा तेथे त्याला चांगली वागणूक मिळत नाही; त्याला सन्मान मिळत नाही. कारण त्यांनी येशूवर विश्वासच ठेवला नाही. त्यांच्या अविश्वासामुळे येशू आपल्या गावात फारसे चमत्कार करू शकला नाही. त्यांच्या संकुचित वृत्तीने त्यांनी येशूला, त्याच्या संदेशाला व त्याच्या चमत्कारांना गृहीत धरले; म्हणून ते देवाच्या कृपेपासून वंचित राहिले. येशू आपल्याला देवाचा मार्ग दाखवतो. आपण त्याच मार्गावर चालायला हवे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, विश्वासात दृढ राहून तुझी साक्ष देण्यास आम्हाला प्रेरणा  व शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या