Marathi Bible Reading | Satureday 3rd August 2024 | 17th Week In Ordinary Time

सामान्य काळातील सतरावा   आठवडा

शनिवार ३ ऑगस्ट  २०२४ 

हेरोदने आपला भाऊ फिलीप ह्याची बायको हेरोदिया, हिच्यासाठी योहानला धरून आणि बांधून कैदेत टाकले होते; Herod had seized John and bound him and put him in prison for the sake of Herodias, his brother Philip's wife, 



  संत वॉल्थेऊफ
- वर्तनसाक्षी (१९६०)


चिंतन : एखाद्या गोष्टीचा सार्वकालिक जीवनासाठी मला काय लाभ होणार असा प्रश्न आपण सतत आपल्या मनाला विचारला पाहिजे. - संत वॉल्थेऊफ -

✝️             
प्रभू येशूच्या म्हणजेच तारणाऱ्याच्या आगमनाचा संदेश देणारा व  पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देणारा योहान बाप्तिस्माच्या मृत्युचा वृतांत आजच्या  शुभवर्तमानात दिला आहे. हेदोराची कानउघाडणी करुन सत्याचा संदेश देणारा योहान बाप्तिस्ता निर्भिड आणि धैर्यवान होता. सत्यासाठी त्याला स्वत:चा प्राण  गमवावा लागला. देवाच्या सहवासाचा अनुभव घेऊन तो इतरांना देणारी माणसे सतत देवाचा शोध घेत असतात.
. देवाचा शोध करणाऱ्या माणसाला देव सामर्थ्याचा, समंजपणाचा, शहाणपणाचा,  सुसंकल्पाचा व धैर्याचा आत्मा बहाल करतो. अशी माणसे सत्य तेच जाहीर करतात त्यांना माणसांची भीती वटत नाही. कारण ते सर्वस्वी देवाचे बनलेले  असतात. सत्य जाहीर करणाऱ्याला आणि सत्याची साक्ष देणाऱ्याला आज सुद्धा  मरणाला सामोरे जावे लागते. कारण भीत्री माणसे सत्याचा सामना करु शकत नाहीत. त्यांना सत्याला दडपून टाकायचे असते. पण त्यांना हे कळत नाही की, सत्य कधीच मरत नाही.

 
पहिले वाचन : यिर्मया २६:११-१६,२४
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन

“वास्तविक ही सर्व वचने तुमच्या कानी पडावी म्हणून परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे. "

याजक आणि संदेष्टे सरदारांना आणि सर्व लोकांना म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडास पात्र आहे, कारण या नगराविरूद्ध याने संदेश दिला, तो तुम्ही आपल्या कानांनी ऐकला आहे. ' 
मग यिर्मया सर्व सरदारांना आणि सर्व लोकांना म्हणाला,"जी संदेशवचने तुम्ही ऐकली ती सर्व या मंदिराविरूद्ध आणि या नगराविरूद्ध सांगावी म्हणून परमेश्वराने मला पाठवले. म्हणून आता तुम्ही आपले मार्ग आणि आपली कर्मे सुधारा, परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हांवर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्याला अनुताप होईल. माझ्याविषयी म्हणाल तर पाहा, मी तुमच्या हाती आहे, तुम्हाला बरे आणि नीट दिसेल तसे माझे करा. एवढे मात्र पक्के समजा की तुम्ही मला जिवे माराल तर तुम्ही आपणावर, ह्या नगरावर आणि यातील रहिवाश्यांवर निर्दोष रक्त पाडल्याचा दोष आणाल; कारण वास्तविक हो सर्व वचने तुमच्या कानी पडावी म्हणून परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे."
तेव्हा सरदार आणि सर्व लोक याजकांना आणि संदेष्ट्यांना म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडास पात्र नाही; कारण परमेश्वर आमचा देव, याच्या नामाने तो आम्हांबरोबर बोलला आहे."
शाफानचा पुत्र अहीकाम याचे यिर्मयाला पाठबळ होते, म्हणून तो लोकांच्या हाती लागला नाही आणि त्यांनी त्याला ठार मारले नाही.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :

Jeremiah 26:11-16, 24

In those days the priests and the prophets said to the officials and to all the people, "This man deserves the sentence of death, because heal prophesied against this city, as you have heard with your own ears. Then Jeremiah spoke to all the officials and all the people, saying, "The Lord sent me to prophesy against this house and this city all the words you have heard. Now therefore mend your ways and your deeds, and obey the voice of the Lord your God, and the Lord will relent of the disaster that he has pronounced against you. But as for. me, behold, I am in your hands. Do with me as seems good and right to you. Only know for certain that if you put me to death, you will bring innocent blood upon yourselves and upon this city and its inhabitants, for in truth the Lord sent me to you to speak all these words in your ears." Then the officials and all the people said to the priests and the prophets, "This man does not deserve the sentence of death, for he has spoken to us in the name of the Lord our God." But the hand of Ahikam the son of Shaphan was with Jeremiah so that he was not given over to the people to be put to death.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : ६९:१५-१६, ३०-३१,३३-३४
प्रतिसाद : हे देवा, मला उत्तर दे. मला माझ्या द्वेष्ट्यांपासून मुक्त कर.

१) हे देवा, चिखलातून मला काढ,
 मला रुतू देऊ नकोस; 
खोल पाण्यातून मला काढ 
पाण्याचा लोढा माझ्यावरून जाऊ देऊ नकोस. 
दलदलीत मला खेचू देऊ नकोस, 
गर्तेच्या जाळ्यात मला गुंतून पडू देऊ नकोस.

२) मी तर दीन आणि दु:खी आहे;
हे देवा, तू सिद्ध केलेले तारण 
मला उच्चस्थानी नेऊन ठेवील,
गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन,
 त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन,

३) दीनजन हे पाहून हर्ष करतील; 
देवाचा शोध करणाऱ्यांनो, 
तुमच्या हृदयात नवजीवन येवो, 
कारण परमेश्वर दीनजनांचे ऐकतो;
 बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना 
तो तुच्छ मानत नाही.


 
Psalm 69:15-16, 30-31, 33-34
At an acceptable time, O Lord, answer me.

 Rescue me from sinking in the mud; 
from those who hate me, deliver me. 
Save me from the waters of the deep, 
lest the waves overwhelm me. 
Let not the deep engulf me,
nor the pit close its mouth on me. R 

As for me in my poverty and pain, 
let your salvation, O God, raise me up. 
Then I will praise God's name with a song; 
I will glorify him with thanksgiving. R 

The poor when they see it will be glad, 
and God-seeking hearts will revive; 
for the Lord listens to the needy, 
and does not spurn his own in their chains. R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा,
आपला मार्ग मला दाखव, 
मला सरळ मार्गाने ने.
 आलेलुया!

Acclamation: 
 Blessed are those who are persecuted for righteousness' sake, for theirs is the kingdom of heaven.
.


शुभवर्तमान   मत्तय  १४ : १-१२
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हेरोदने माणूस पाठवून योहानचा शिरच्छेद करवला. योहानच्या शिष्यांनी जाऊन येशूला ही गोष्ट सांगितली. "

मांडलिक हेरोदने येशूची कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकांना म्हटले, हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे; हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे, म्हणून ह्याच्या ठायी अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे. कारण हेरोदने आपला भाऊ फिलीप ह्याची बायको हेरोदिया, हिच्यासाठी योहानला धरून आणि बांधून कैदेत टाकले होते; कारण योहानाने त्याला म्हटले होते की, “तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही,” आणि तो त्याला जिवे मारायला पाहात असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानत होते. नंतर हेरोदचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदला खूष केले, त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की, जे काही तू मागशील ते मी तुला देईन. मग तिच्या आईने तिला सांगितल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या.” तेव्हा राजाला वाईट वाटले; तरी आपल्या शपथेमुळे आणि जे पंक्तीला बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते द्यावयाची आज्ञा केली आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानचा शिरच्छेद करवला. मग त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आपल्या आईजवळ नेले. नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले आणि त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :
Matthew 14:1-12

At that time: Herod the tetrarch heard about the fame of Jesus and he said to his servants, "This is John the Baptist. He has been raised from the dead; that is why these miraculous powers are at work in him." For Herod had seized John and bound him and put him in prison for the sake of Herodias, his brother Philip's wife, because John had been saying to him, "It is not lawful for you to have her." And though he wanted to put him to death, he feared the people, because they held him to be a prophet. But when Herod's birthday came, the daughter of Herodias danced before the company and pleased Herod, so that he promised with an oath to give her whatever she might ask. Prompted by her mother, she said, "Give me the head of John the Baptist here on a platter." And the king was sorry, but because of his oaths and his guests he commanded it to be given. He sent and had John beheaded in the prison, and his head was brought on a platter and given to the girl, and she brought it to her mother. And his disciples came and took the body and buried it, and they went and told Jesus. Reflection: The death of John the Baptist is a pointer to that of Jesus. Both are innocent.

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
पाप कधीच संपत नाही. आपण जर पापाच्या आहारी गेलो तर ते वाढतच जाते. मांडलिक हेरोदानेही पाप केले. त्याने आपला भाऊ फिलीप याची बायको हेरोदिया हिच्याशी संबंध ठेवले. ती दोघेही व्यभिचारी जीवन जगत होती. योहान बाप्तिस्ता न्यायाने व सत्याने चालणारा एक प्रामाणिक मनुष्य होता. त्याने मांडलिक हेरोदाला त्याची चूक सांगितली व तसे न करण्याचा सल्ला देखील दिला. पण हेरोदाला ते आवडले नाही. आपले एक पाप लपवण्यासाठी तो दुसरे पाप करतो. योहानाचा शिरच्छेद करतो. आपल्या दुष्टपणामुळे मांडलिक हेरोद देवाच्या पवित्र माणसाचा वध करतो. यिर्मया संदेष्टा देखील आपल्याला तेच सांगत आहे, तुम्ही आपले मार्ग आणि आपली कर्मे सुधारा. देवाची वाणी ऐका म्हणजे देव तुमच्यावर अरिष्ट आणणार नाही. देवाची वचने तुम्हाला पापापासून दूर ठेवतील. पापांचा मार्ग सोडा म्हणजे तुम्हाला पूण्य मिळेल आणि परमेश्वर तुम्हाला प्रसन्न होईल.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सत्याचे साक्षीदार बनण्यास व तुझी सुवार्ता  सांगण्यास आम्हाला धैर्याचा आत्मा बहाल कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या