सामान्य काळातील
अठरावा रविवार
४ ऑगस्ट २०२४
जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही."
"I am the bread of life; whoever comes to me shall not hunger, and whoever believes in me shall never thirst.
जॉन मारी व्हियांनी सर्व फादरांचा आश्रयदा
“मीच जीवनाची भाकर आहे,
जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही
इस्त्राएली जनतेला परमेश्वराने आकाशातून अन्नवृष्टी केली. जरी इस्त्राएली जनतेने देवाविषयी कूरकूर केली तरी देव दयाळू आहे. तो सर्वांची काळजी वाटून सर्वांच्या गरजा पुरविणारा परमेश्वर आहे. परमेश्वराने मोशेच्या नेतृत्वाखाली जे अन्न पुरविले ते सर्वकाळ टिकणारे नव्हते, तर शरीराचीतात्पुरती भूक भागविणारे अन्न होते.
अन्नासाठी श्रम करावेच लागतात मात्र प्रभू येशू नाशवंत नव्हे तर सर्वकाळ टिकणारे अन्न आपल्याला देत आहे. प्रभू येशू स्वतःच आध्यात्मिक अन्न बनून आपली भूक भागवित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचे शरीर आपल्या सर्वांसाठी मोडले म्हणजेच समर्पित केले. ख्रिस्तशरीर कृपा संस्कारात प्रभू येशू जिवंत भाकरीच्या रुपात आपल्या जीवनात येत असतो. त्या आध्यात्मिक भाकरीने आपल्या जीवनाचे पोषण होत असते. ख्रिस्तामध्ये एकरुप झाल्यामुळे आपल्याला त्याचे सामर्थ्य, बळ व कृपा मिळते. प्रभूच्या भाकरीमध्ये सार्वकालिक जीवनाचे रहस्य दडलेले आहे.
प्रभू येशू ख्रिस्त आध्यात्मिक अन्नाद्वारे पोषण करुन आपल्याला स्वर्गीय जीवन देऊ इच्छित आहे. नाशवंत नाही तर सार्वकालिक जीवन देणाऱ्या ह्या अन्नाची भूक आपल्या सर्वांना लागावी म्हणून प्रभूकडे प्रेरणा मागू या
धर्मगुरूंसाठी प्रार्थना
हे प्रेमळ प्रभो, आमच्या धर्मगुरूंचा / सांभाळ कर./ ते तुझे आहेत. तुझ्या पवित्र मंदिरात / त्यांच्या जीवनाचे दीप तेवत आहेत./ ते जगाचे आहेत, / परंतु जगाचे नाहीत. / जेव्हा त्यांना ऐहिक सुखाचा/मोह होईल / तेव्हा तुझ्या हृदयात / तू त्यांना सुरक्षित ठेव. / ते एकाकी असताना, / तू त्यांना सांभाळ. / धर्मगुरू म्हणून / आपण करीत असलेला त्याग / व्यर्थ आहे, / असे त्यांना वाटू लागेल / तेव्हा त्यांना दिलासा दे. त्यांना तुझ्या शिवाय / कोणीच नाही, तरीही त्यांना संवेदनशील / मानवी हृदय आहे/ देहाचा दुर्बलपणा आहे, / ह्याची आठवण ठेव. / जी पवित्र भाकर / ते दररोज हाती घेतात/ त्या भाकरीसारखे / त्यांना अतिनिष्कलंक ठेव. / त्यांचे सर्व विचार, शब्द आणि कृती / ह्यांना तू आशीर्वाद दे. /आमेन.
(अनुमती कार्डिनल डोघेर्ती)
पहिले वाचन : निर्गम १६:२-४.१२-१५
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन."
त्या रानात इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे आणि अहरोन ह्यांच्यासंबंधाने कुरकुर केली. इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही इजिप्त देशात मांसाच्या भांड्यांभोवती बसून भरपूर जेवत होतो, तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर बरे झाले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे."
तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, "पाहा मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकएका दिवसाला पुरेल इतके जमा करावे, ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन.
इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. त्यांना सांग की, संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल, म्हणजे मी तुमचा देव आहे हे तुम्ही जाणाल."
संध्याकाळी लावे पक्षी येऊन सर्व छावणीवर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दव पडले. हे पडलेले दव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्त्राएल लोक हे पाहून एकमेकांना म्हणाले, "हे काय ?" कारण ते काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, “परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच."
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :xodus 16:2-4.12-15
In those days: The whole congregation of the people of Israel grumbled against Moses and Aaron in the wilderness, and the people of Israel said to them, "Would that we had died by the hand of the LORD in the land of Egypt, when we sat by the meat pots and ate bread to the full, for you have brought us out into this wilderness to kill this whole assembly with hunger." Then the LORD said to Moses, "Behold, I am about to rain bread from heaven for you, and the people shall go out and gather a day's portion everyday, that I may test them, whether they will walk in my law or not. I have heard the grumbling of the people of Israel. Say to them, 'At twilight you shall eat meat, and in the morning you shall be filled with bread. Then you shall know that I am the LORD your God." In the evening quail came up and covered the camp, and in the morning dew lay around the camp. And when the dew had gone up, there was on the face of the wilderness a fine, flake-like thing, fine as frost on the ground. When the people of Israel saw it, they said to one another, "What is it?" For they did not know what it was. And Moses said to them, "It is the bread that the LORD has given you to eat."
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र १७७:३-४,२३-२५,५४
प्रतिसाद : देवाने त्यांना स्वर्गातले अन्न दिले.
१) ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या, ज्या आम्हांला समजल्या,
आमच्या वडिलांनी ज्या आम्हांला सांगितल्या
त्या गोष्टी : परमेश्वराचा पराक्रम आणि
त्याने केलेली अद्भुत कृत्ये आम्ही पुढच्या पिढीला सांगू.
२) त्याने वरती आभाळाला आज्ञा केली आणि
आकाशद्वारे उघडली; खाण्याकरिता त्याने
त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला आणि
त्यांस स्वर्गातले धान्य दिले.
३) दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली.
त्याने त्यांना आपल्या पवित्र प्रदेशाकडे,
आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या डोंगराकडे आणले.
Psalm 78:3 and 4bc, 23-24, 25 and 54 (R 24b)
The Lord gave them bread from heaven.
The things we have heard and understood,
the things our fathers have told us,
but will tell them to the next generation:
the glories of the Lord and his might. R
Yet he commanded the clouds above,
and opened the gates of heaven.
He rained down manna to eat,
and gave them bread from heaven. R.
Man ate the bread of angels.
He sent them abundance of food.
So he brought them to his holy land,
to the mountain his right hand had won. R
दुसरे वाचन इफिसकरांस पत्र ४:१७.२०-२४
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. "
मी हे म्हणतो आणि प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही; तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल आणि येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे. तुम्ही मात्र आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व आणि पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.
सर्व : देवाला धन्यवाद..
Second reading : Ephesians 4:17.20-24
Brethren: This I say and testify in the Lord, that you must no longer walk as the Gentiles do, in the futility of their minds. But that is not the way you learned Christ!-assuming that you have heard about him and were taught in him, as the truth is in Jesus, to put off your old self, which belongs to your former manner of life and is corrupt through deceitful desires, and to be renewed in the spirit of your minds, and to put on the new self, created after the likeness of God in true righteousness and holiness.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे; तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
Acclamation:
Man shall not live by bread alone, but by every
word that comes from the mouth of God.
शुभवर्तमान योहान ६:२४-३५
वाचक: योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही."
येशू तेथे नाही आणि त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करीत कफर्णहूम येथे आले..तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, "गुरुजी, येथे कधी आला?" येशूने त्यांना उत्तर दिले, "मी तुम्हांला नक्की सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा." ह्यावरून ते त्याला म्हणाले, “देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे ?” येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवावा." ह्यावरून ते त्याला म्हणाले, "असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा ? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला.” असे लिहिले आहे की, “त्याने त्यांना स्वर्गातूनभाकर खायला दिली." ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला नक्की सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी , भाकर दिली असे नाही; तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. जी स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय." म्हणून ते त्याला म्हणाले, “प्रभो, ही भाकर आम्हांला नित्य द्या.” येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: John 6:24-35
At that time: When the crowd saw that Jesus was not there, nor his disciples, they themselves got into the boats and went to Capernaum, seeking Jesus. When they found him on the other side of the sea, they said to him, "Rabbi, when did you come here?" Jesus answered them, "Truly, truly, I say to you, you are seeking me, not because you saw signs, but because you ate your fill of the loaves. Do not work for the food that perishes, but for the food that endures to eternal life, which the Son of Man will give to you. For on him God the Father has set his seal." Then they said to him, "What must we do, to be doing the works of God?" Jesus answered them, "This is the work of God, that you believe in him whom he has sent." So they said to him, "Then what sign do you do, that we may see and believe you? What work do you perform? Our fathers ate the manna in the wilderness; as it is written, 'He gave them bread from heaven to eat." Jesus then said to them, "Truly, truly, I say to you, it was not Moses who gave you the bread from heaven, but my Father gives you the true bread from heaven. For the bread of God is he who comes down from heaven and gives life to the world." They said to him, "Sir, give us this bread always." Jesus said to them, "I am the bread of life; whoever comes to me shall not hunger, and whoever believes in me shall never thirst.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: " लहान मुल रडायला लागले की आईला बरोबर समजते, आपले बाळ उपाशी असेल, त्याला भूक लागली असेल. मग ती त्याला जवळ घेते आणि दूध पाजते. आजच्या पहिल्या वाचनात इस्रायली लोक मोशेविरुद्ध आणि देवाविरुद्ध कुरकुर करतात आणि म्हणतात, आम्हाला भूक लागली आहे. आम्ही उपाशी आहोत. या वाळवंटात आम्हाला काहीच खायला नाही. आम्ही गुलामगिरीत सुखी होतो. परमेश्वराने त्यांची अडचण दूर केली. त्यांना मान्ना खायला दिला. स्वर्गातून पडलेले अन्न खाऊन इस्रायली लोक तृप्त झाले. परमेश्वराने त्यांना स्वर्गीय अन्न पुरवून त्यांची काळजी घेतली. आजच्या शुभवर्तमानात येशू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर मीच आहे. जो कोणी या भाकरीस खाईल त्याला कधीही भूक लागणार नाही. या भाकरीने आपली आध्यात्मिकता दृढ होते. आपण येशूचे खरे शिष्य बनतो आणि आपल्याला ऐहिक सुखाची व भौतिक गोष्टींची भूक लागत नाही. आपल्याला पैशांची भूक लागते, ऐहिक सुखाची भूक लागते, दुष्कृत्यांची भूक लागते. पण आपल्याला सत्याची, न्यायाची कधी भूक लागते का? जी व्यक्ती येशूचे शरीर आणि रक्त स्वीकारते ती व्यक्ती सत्याने चालणार, न्यायासाठी झटणार असा त्याचा अर्थ आहे. मिस्साबलिदानात आपण येशूचे शरीर आणि रक्त स्विकारतो. येशूचे मिशन कार्य पूर्ण करण्यास, सत्याने आणि प्रेमाने न्यायाने चालण्यास हे स्वर्गीय अन्न आपल्याला प्रेरणा देते.
आज आपण संत जॉन मारी व्हियानीचा सण साजरा करीत आहोत. प्रार्थना, प्रबोधन आणि पापनिवेदन ह्यांनी आर्स ह्या गावाचा कायापालट केला. लोकांना स्वर्गीय अन्नाची (पवित्र मिस्साबलिदानाची) गोडी लावली. संत जॉन मारी व्हियानी हा धर्मप्रांतीय धर्मगुरूंचा आश्रयदाता संत आहे. ज्या धर्मगुरूने आपणांस स्वर्गीय अन्नाचा संस्कार (प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार) त्या धर्मगुरूसाठी आपण प्रार्थना करू या.
प्रार्थना : प्रभू येशू, आम्हाला सर्वदा तुझ्या स्वर्गीय भोजनाची भूक लागावी | म्हणून आमची अंत: करणे नवीन बनव, आमेन..
0 टिप्पण्या