सामान्य काळातील अठरावा आठवडा
बुधवार ७ ऑगस्ट २०२४
“बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझी इच्छा सफळ होवो”
"O woman, great is your faith! Be it done for you as you desire."
प्रभू येशू हा तारणारा आहे आणि तो आपल्या मुलीला जीवनदान देईल अशा विश्वासाने कनानी स्त्री प्रभू येशूजवळ आली होती. ती परराष्ट्रीय होती म्हणून प्रभू येशूने तिच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दर्शविले. खरे पाहता प्रभू येशूला तिच्या श्रद्धेची कसोटी घ्यायची होती. त्या स्त्रीचा अपमान झाला असताना सुद्धा तिने प्रभू येशूला संपूर्ण विश्वासाने विनंती करीत म्हटले, 'प्रभूजी मला सहाय्य करा.' त्या कनानी स्त्रीचा विश्वास आणि कळकळीची विनंती मान्य केली व तिची मुलगी बारी झाली .
सहनशीलता, एकनिष्ठता आणि प्रभूपुढे शरणागती ह्या गुणांमुळे कनानी स्त्रीला देवाचा आशीर्वाद व कृपा प्राप्त झाली.
पहिले वाचन :यिर्मया ३१:१-७
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम केले आहे."
परमेश्वर म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलच्या सर्व वंशाचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”
परमेश्वर म्हणतो, “तरवारीपासून निभावलेल्या लोकांना रानात अनुग्रह मिळाला; या इस्राएलला विश्रांती देण्याची मला जाणीव आहे,” परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले, तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हे इस्राएलच्या कुमारी मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिऱ्यांनी भूषित होशील आणि उत्सव करणाऱ्यांबरोबर नृत्य करशील. शोमरोनच्या डोंगरांवर तू पुन्हा द्राक्षमळे लावशील; लावणारे लावतील आणि त्यांची फळे त्यांना लाभतील. कारण असा दिवस येत आहे की, त्यात एफ्राईम डोंगरावर पहारेकरी ओरडून सांगतील. “अहो ऊठा, आपण सियोनला आपला देव परमेश्वर याच्याकडे जाऊ."
परमेश्वर म्हणतो, “याकोबविषयी आनंदाचा गजर करा, राष्ट्रांच्या अग्रेसराचा जयजयकार करा; घोषणा करा, स्तवन करा आणि म्हणा, हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचा, इस्राएलच्या अवशेषाचा उद्धार कर."
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Jeremiah 31:1-7
"At that time, declares the Lord, "I will be the God of all the clans of Israel, and they shall be my people." Thus says the Lord: "The people who survived the sword found grace in the wilderness; when Israel sought for rest, the Lord appeared to him from far away. I have loved you with an everlasting love; therefore I have continued my faithfulness to you. Again I will build you, and you shall be built, O virgin Israel! Again you shall adorn yourself with tambourines and shall go forth in the dance of the merrymakers. Again you shall plant vineyards on the mountains of Samaria; the planters shall plant and shall enjoy the fruit. For there shall be a day when watchmen will call in the hill country of Ephraim: 'Arise, and let us go up to Sion, to the Lord our God." For thus says the Lord: "Sing aloud with gladness for Jacob, and raise shouts for the chief of the nations; proclaim, give praise, and say, 'O Lord, save your people, the remnant of Israel.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : यिमर्या ३१:१०, ११-१२,१३
प्रतिसाद :परमेश्वर आपली निगा राखील.
१) अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका,
दूरच्या द्वीपांत हे प्रसिद्ध करा
आणि म्हणा, ज्याने इस्राएलला विखुरले
तो त्यांना जमा करील;
मेंढपाळ आपल्या कळपाची निगा राखतो
तशी तो त्यांची निगा राखील.
२) कारण परमेश्वराने इस्राएलचा उद्धार केला आहे,
आणि त्याच्याहून जो बलवान त्याच्या
हातून त्याला मुक्त केले आहे.
ते येऊन सियोनच्या माथ्यावर आनंदाने गातील,
परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य,
नवा द्राक्षरस, ताजे तेल आणि
गुरांमेंढरांचे कळप यांकडे लोटतील.
३) त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील,
वृद्ध आणि तरुण एकत्र आनंद करतील.
मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद निर्माण करीन,
मी त्याचे सांत्वन करीन, त्यांच्या दुःखानंतर
त्यांनी आनंद करावा असे मी करीन.
Jeremiah 31:10, 11-12ab, 13
The Lord will keep us, as a shepherd keeps his flock.
Hear the word of the Lord, O nations,
and declare it in the coastlands far away;
say, 'He who scattered Israel will gather him,
and will keep him
as a shepherd keeps his flock. R
For the Lord has ransomed Jacob
and has redeemed him
from hands too strong for him.
They shall come and sing aloud
on the height of Sion,
and they shall be radiant
over the goodness of the Lord. R
Then shall the young women
rejoice in the dance,
and the young men and the old shall be merry.
I will turn their mourning into joy;
I will comfort them,
and give them gladness for sorrow. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने..
आलेलुया!
Acclamation:
A great prophet has arisen among us and God has visited his people!
शुभवर्तमान मत्तय १५ : २१-२८
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बाई, तुझा विश्वास मोठा आहे. "
येशू तेथून निघून सोर आणि सिदोन ह्या भागात गेला आणि पाहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, “हे प्रभो, दावीद पुत्र, माझ्यावर दया करा; माझी मुलगी भुताने फारच जर्जर केली आहे.” तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे.” त्याने उत्तर दिले, इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही." तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, "प्रभुजी, मला साहाय्य करा.” त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे." तिने म्हटले, "खरेच प्रभुजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले खरखटे खातात.” तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझी इच्छा सफळ होवो” आणि त्याच घटकेला तिची मुलगी बरी झाली.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :
Matthew 15:21-28
At that time: Jesus went away and withdrew to the district of Tyre and Sidon. And behold, a Canaanite woman from that region came out and was crying, "Have mercy on me, O Lord, Son of David; my daughter is severely oppressed by a demon." But he did not answer her a word. And his disciples came and begged him, saying, "Send her away, for she is crying out after us." He answered, "I was sent only to the lost sheep of the house of Israel." But she came and knelt before him, saying, "Lord, help me." And he answered, "It is not right to take the children's bread and throw it to the dogs." She said, "Yes, Lord, yet even the dogs eat the crumbs that fall from their masters' table." Then Jesus answered her, "O woman, great is your faith! Be it done for you as you desire." And her daughter was healed instantly.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:परमेश्वर इसरायलच्या लोकांबरोबर करार करतो. मी तुमच्या सर्व वंशाचा देव होईन आणि तुम्ही माझे लोक होणार. मी तुमची निगा राखीन, तुमच्यावर नितांत प्रेम करीन, मी तुम्हाला माझ्याजवळ घेईन अशाप्रकारे परमेश्वराने आपला करार पूर्ण केला. त्याची काळजी आणि चिंता सर्वदूर पसरावी म्हणून त्यांने आपल्या पुत्राला, येशूला या जगात पाठवले. येशू हा सर्वांचा तारणकर्ता आहे. 'जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला अनुसरतो त्या सर्वांना तो आपलेसे करतो. कनानी बाईचा विश्वास, चिकाटी आणि वचनबद्धता पाहून येशू तिची इच्छा पूर्ण करतो. तिच्या मुलीला बरे करतो. येशू कुणालाही अंतर देत नाही, तो सर्वांच्या विनंत्या, आकांक्षा पूर्ण करतो. आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. मग आपल्याही जीवनात चमत्कार होतील. येशूवरील आपला विश्वास वाढवा म्हणून आपण कोणते प्रयत्न करतो?
प्रार्थना : हे प्रभू येशू, श्रद्धेच्या कसोटीत उत्तीर्ण होण्यास व तुला शरण येण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या