Marathi Bible Reading | 24th November 2024 |34th Sunday in Ordinary Time

सामान्य काळातील ३ वा रविवार किंवा शेवटचा रविवार 

२४ नोव्हेंबर २०२४

विश्वराजा प्रभू येशू ख्रिस्त याचा सोहळा

 "माझे राज्य ह्या जगाचे नाही, My kingdom is not of this world.

Thou sayest that I am a king. For this was I born, and for this came I into the world;


 ✝️  

 यहेज्केल संदेष्ट्याने स्पष्ट केले आहे की धार्मिक, सामाजिक आणि  राजकिय स्तरावर अराजकता व अस्थिरता आलेली आहे (यहेज्केल२२:२३-३०). तीच स्थिती आजसुद्धा आहे, कारण सर्व स्तरावर अन्याय,  अत्याचार, भ्रष्टाचार व दहशतीचे राज्य आहे. ही स्थिती पूर्वापार चालत आलेली  आहे. सामान्य जनांना वेठीस धरून राज्यकर्ते, राजे, धर्माचे पुढारी राज्य  प्रस्थापित करु पाहत आहेत. हे सर्व जगाचे राज्य आहे.

प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात पिलाताला सांगत आहे,  'माझे राज्य ह्या जगाचे नाही. पहिल्या वाचनात दानीएल संदेष्ट्यांने दृष्टांतात  म्हटले आहे की, 'त्याचे प्रभूत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी  आहे.' प्रभू येशूचे राज्य प्रेमाचे, शांतीचे, सेवेचे, परोपकाराचे व देवाच्या सामर्थ्याचे आहे. प्रभू येशूचे राज्य स्वर्गीय आनंदाचे व वैभवाचे राज्य आहे. ह्या  जगातील क्षणभंगूर राज्याशी त्याची तुलना करता येत नाही. आज विश्वाचा  राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा सोहळा साजरा करीत असताना आपण त्याच्यापुढे  नतमस्तक होऊ या. प्रभूला आपण शरण जाऊ या. ह्या जगातील विनाशकारी  राज्याचे पुढारी व राज्यकर्ते ह्यापासून फारकत घेऊन प्रभू येशूला आपला राजा  म्हणून स्वीकारू या.

प्रभू येशूला आपला तारणदाता, मुक्तीदाता व राजा म्हणून स्वीकार करीत असताना त्याच्या आज्ञेप्रमाणे व वचनाप्रमाणे जीवन आचरण  करण्यासाठी प्रेरणा मागू या. सार्वकालिक राज्यात प्रवेश मिळावा म्हणून अति  पवित्र ख्रिस्तशरीर साक्रामेंताची आराधना करु या. त्याच्या राज्याची सुवार्ता  पसरविण्यासाठी प्रयत्नशील बनू या.  

✝️

पहिले वाचन : दानियल ७ : १३-१४
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 “त्याचे प्रभुत्व अक्षय आहे."
मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तो आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला, तो त्या पुराणपुरुषाकडे आला आणि त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव आणि राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : : Daniel 7: 13-14
    I beheld therefore in the vision of the night, and lo, one like the son of man came with the clouds of heaven, and he came even to the Ancient of days: and they presented him before him.
And he gave him power, and glory, and a kingdom: and all peoples, tribes and tongues shall serve him: his power is an everlasting power that shall not be taken away: and his kingdom that shall not be destroyed.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  :९३:१,२,५
प्रतिसाद : परमेश्वर राज्य करतो.

१) परमेश्वर राज्य करतो, 
त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. 
परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे.

२) म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही.
तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे.
तू अनादिकालापासून आहेस.

३) तुझे निर्बंध अभंग आहेत, 
हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते

  Psalms 93: 1abc, 1d-2, 5
R. (1a) The LORD is king; he is robed in majesty.

1 The Lord hath reigned, he is clothed with beauty: 
the Lord is clothed with strength, and hath girded himself.
R. The LORD is king; he is robed in majesty.

1d For he hath established the world 
which shall not be moved.
2 Thy throne is prepared from of old: 
thou art from everlasting.
R. The LORD is king; he is robed in majesty.

5 Thy testimonies are become exceedingly credible: 
holiness becometh thy house, O Lord, unto length of days.
R. The LORD is king; he is robed in majesty.

दुसरे वाचन :प्रकटीकरण  १:५-८
वाचक :प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"पृथ्वीवरील राजांचा अधिपती ख्रिस्त ह्याने आपल्याला राज्य आणि आपला देव ह्याच्यासाठी याजक असे केले."

येशू ख्रिस्त हा विश्वसनीय साक्षी, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आणि पृथ्वीवरील राजांचा अधिपती आहे. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हांला पापातून मुक्त कलेले आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन, पाहा, तो मेघांसहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्यांच्यामुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार. आमेन.
    प्रभू देव जो आहे, जो होता आणि जो येणार, जो सर्वसमर्थ तो म्हणतो, “मी अल्फा आणि ओमेगा आहे.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading:  
 Revelation 1: 5-8
And from Jesus Christ, who is the faithful witness, the first begotten of the dead, and the prince of the kings of the earth, who hath loved us, and washed us from our sins in his own blood,
And hath made us a kingdom, and priests to God and his Father, to him be glory and empire for ever and ever. Amen.
Behold, he cometh with the clouds, and every eye shall see him, and they also that pierced him. And all the tribes of the earth shall bewail themselves because of him. Even so. Amen.
I am Alpha and Omega, the beginning and the end, saith the Lord God, who is, and who was, and who is to come, the Almighty.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                             

आलेलुया, आलेलुया! 
 प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! आमचा पूर्वज दावीद ह्याचे राज्य सुवंदित असो
 आलेलुया!

Acclamation: 
  Alleluia, alleluia.
Blessed is he who comes in the name of the Lord! 
Blessed is the kingdom of our father David that is to come!
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  योहान  १८:३३-३७
वाचक :योहानलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 “मी राजा आहे असे आपण म्हणता."
पिलात येशूला म्हणाला, “तू यहुद्यांचा राजा आहेस काय ?" येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः होऊन हे म्हणता, की दुसऱ्यांनी आपणांला माझ्याविषयी सांगितले?" पिलाताने उत्तर दिले, "मी यहुदी आहे काय ? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस?" येशूने उत्तर दिले, "माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य येथले नाही.” ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, "मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे आणि मी सत्याविषयी साक्ष द्यावी ह्यासाठी जगात आलो आहे. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : John 18: 33b-37
Pilate therefore went into the hall again, and called Jesus, and said to him: Art thou the king of the Jews?
Jesus answered: Sayest thou this thing of thyself, or have others told it thee of me?
Pilate answered: Am I a Jew? Thy own nation, and the chief priests, have delivered thee up to me: what hast thou done?
Jesus answered: My kingdom is not of this world. If my kingdom were of this world, my servants would certainly strive that I should not be delivered to the Jews: but now my kingdom is not from hence.
Pilate therefore said to him: Art thou a king then? Jesus answered: Thou sayest that I am a king. For this was I born, and for this came I into the world; that I should give testimony to the truth. Every one that is of the truth, heareth my voice.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन :
ख्रिस्तसभा आज विश्वाचा राजा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा यथोचित सन्मान करीत आहे. येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा राजा आहे का? ख्रिस्त राजाच्या या सणाच्या दिवशी आपण या प्रश्नावर मनन-चिंतन करतो. आपले जीवन, आपले विचार, आपली कृती, शब्द यावर पूर्णपणे येशूचे नियंत्रण आहे का ? आपल्या जीवनावर येशूशिवाय दुसऱ्याला नियंत्रण ठेवणे कठीण आहे. केवळ आणि केवळ येशूला आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू द्या. जीवनात आजुबाजुच्या गोष्टीवर, घडामोडीवर नियंत्रण ठेवायला आपल्याला आवडते कारण त्याद्वारे आपल्याला एकप्रकारे आनंद मिळतो. ख्रिस्त राजा, जो दयेचा उदार राजा आहे तो आपणांस आजच्या सणाच्या दिवशी आव्हान करीत आहे की, आपण स्वतःवरील नियंत्रण सोडून द्यावे व राजांच्या राजाला स्वाधीन व्हावे. हे जरी अवघड काम असले तरी अशक्य मात्र नाही. आज आपण ख्रिस्त राजाच्या सणाच्या दिवशी आपल्या जीवनातील एखादा पैलू येशूला नियंत्रण करून देण्यासाठी त्याच्या स्वाधीन करू या.

प्रार्थना हे विश्वाच्या राजा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुला शरण येण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला शक्ती दे, आमेन.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या