Marathi Bible Reading | First Sunday of Advent | 1st December 2024

आगमनकाळातील पहिला रविवार

१ डिसेंबर २०२४

"सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा."
“तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे."
 because your redemption is at hand.



आशा  (Hope ) 

आशेचे किरण घेऊन प्रभू येशू येत आहे. 


यिर्मया संदेष्ट्याने इस्त्राएल आणि यहुदाच्या घराण्यातून धार्मिकतेचा अंकूर फुटेल असा संदेश दिला आहे. प्रभू येशूच्या आगमनाचा तो संदेश होता.  प्रभू येशूने देवाच्या योजनेप्रमाणे देह धारण केला व तारणाची योजना पूर्णत्वास नेली. प्रभू येशूने देवराज्याची शिकवण जगाला दिली आणि त्याप्रमाणे ती पाळण्यास आज्ञापिले. अंतिम समयी प्रभू येशूने अभिवचन दिले की, प्रभू पुन्हा येईल आणि सर्वांचा न्याय निवाडा होईल. प्रभू पुन्हा येईल, ह्या अभिवचनावर आपली सर्वांची श्रद्धा आहे. त्याच्या स्वागतास आम्ही तयार असावे म्हणूनच ख्रिस्तसभेने आपल्याला हा आगमन काळ दिला आहे.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू स्वतः आपल्या शिष्यांना काळाची लक्षणे ओळखण्यास सांगत आहे. प्रभू म्हणतो, “त्याकाळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल." तोच सर्वांचा मुक्तिसमय आहे. मुक्तिसमयाला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज  असावे म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, 'सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.'आगमन काळ म्हणजे प्रभूला सामोरे जाण्याची तयारी. ह्या काळात आपण  आतापर्यंत प्रभूच्या शिकवणुकीप्रमाणे जीवन जगत आहोत का, ह्यावर मनन  चिंतन करण्याचा काळ आहे.आपले मन, हृदय आणि संपूर्ण जीवन परिवर्तन करण्यासाठी आपण आपल्या जीवनाचे सिंहावलोकन करु या, कारण मुक्तिसमय जवळ आला आहे. 

✝️

पहिले वाचन :यिर्मया ३३: १४-१६
वाचक :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन ३३:१४-१६ 
“दावीदला धार्मिकतेचा अंकुर फुटेल असे मी करीन.”
प्रभू म्हणतो, “पहा इस्राएलच्या घराण्याला आणि यहुदाच्या घराण्याला जे अभिवचन मी दिले आहे ते पूर्ण करण्याचा काळ जवळ येत आहे
ते दिवस येतील तेव्हा तो काळ येईल तेव्हा राजा होण्यासाठी दावीदच्या एका नीतिमान अंकुराची मी निवड करीन. तो देशात न्यायनीती प्रस्थापित करील त्या काळी यहुदाचा उद्धार होईल येरुशलेम सुरक्षित वसेल 'प्रभूच आमचे नीतिनिधान' ह्या नावाने येरुशलेमला संबोधले जाईल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : : Jeremiah 33: 14-16
Behold the days come, saith the Lord, that I will perform the good word that I have spoken to the house of Israel, and to the house of Juda. In those days, and at that time, I will make the bud of justice to spring forth unto David, and he shall do judgment and justice in the earth. In those days shall Juda be saved, and Jerusalem shall dwell securely: and this is the name that they shall call him, The Lord our just one.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र २५:४-५,८-१०,१४
प्रतिसाद :  हे प्रभो, मी तुझ्यासाठी तळमळत आहे.

१) प्रभू, तुझे मार्ग मला दाखव तुझ्या वाटा मला प्रकट कर.
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव
 मला वळण लाव. कारण तूच तर माझा मुक्तिदाता देव आहेस.

२) प्रभू किती चांगला आणि सरळ आहे 
तो पापी जनांना सन्मार्गाने चालायला शिकवतो. 
नम्र लोकांना न्यायपरायणता दाखवतो, 
गरिबांना आपला मार्ग प्रकट करतो.

३) परमेश्वराच्या आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणाऱ्यांना 
प्रभूचे सर्व मार्ग प्रेमपूर्ण आणि विश्वसनीय आहेत. 
त्याचे भय धरणाऱ्यांशी प्रभूचे सख्य असते. 
तो आपला करार त्यांना प्रकट करतो.

 Psalms 25: 4-5, 8-9, 10, 14
R.  To you, O Lord, I lift my soul.

4 Let all them be confounded that 
act unjust things without cause. 
shew, O Lord, thy ways to me, and teach me thy paths.
5 Direct me in thy truth, and teach me; 
for thou art God my Saviour; 
and on thee have I waited all the day long.
R. To you, O Lord, I lift my soul.

8 The Lord is sweet and righteous: 
therefore he will give a law to sinners in the way.
9 He will guide the mild in judgment: 
he will teach the meek his ways.
R. To you, O Lord, I lift my soul.

10 All the ways of the Lord are mercy and truth, 
to them that seek after his covenant and his testimonies.
R. To you, O Lord, I lift my soul.

14 The Lord is a firmament to them that fear him: 
and his covenant shall be made manifest to them.
R. To you, O Lord, I lift my soul.

दुसरे वाचन थेस्सलनी ३:१२,४:२
वाचक : पौलाचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताच्या आगमनवेळी प्रभूने तुमची अंतःकरणे स्थिर पापविरहित आणि पवित्र करावीत."
बंधुजनहो, जशी आमची प्रीती तुम्हांवर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर आणि सर्वांवर वाढवून विपुल करो, त्याने तुमची अंतःकरणे स्थिर, पापविरहित आणि पवित्र करावीत म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व संतांबरोबर परत येईल त्यावेळी तुम्हाला देव आपला पिता याच्यासमोर निर्दोष असे उभे राहता येईल. बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो आणि प्रभू येशूमध्ये बोध करतो की, तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही त्याप्रमाणेवागत आहात त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी, कारण प्रभू येशूच्या वतीने ज्या आज्ञा आम्ही तुम्हांला दिल्या त्या तुम्हांला ठाऊक आहेत.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading:  
  First Thessalonians 3: 12 – 4: 2
And may the Lord multiply you, and make you abound in charity towards one another, and towards all men: as we do also towards you, To confirm your hearts without blame, in holiness, before God and our Father, at the coming of our Lord Jesus Christ, with all his saints. Amen. For the rest therefore, brethren, we pray and beseech you in the Lord Jesus, that as you have received from us, how you ought to walk, and to please God, so also you would walk, that you may abound the more. For you know what precepts I have given to you by the Lord Jesus.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                             

आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव दे. तू सिद्ध केलेले तारण आम्हांला प्रदान कर. 
 आलेलुया!

Acclamation: 
  Alleluia, alleluia.
 Show us, Lord, your love; and grant us your salvation.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक  २१:२५-२८,३४-३६
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 "तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे"
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले “आकाशात सूर्य चंद्र आणि तारे ह्यांच्यामध्ये अद्भुत चिन्हे दिसू लागतील, तसेच पृथ्वीवर समुद्र आणि लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे भयभीत होऊन गोंधळात पडतील. भयाने आणि जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे गर्भगळीत होतील. आकाशातील शक्ती कंपायमान होतील. त्याकाळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने मेघावरून येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे रहा आणि वर पहा, कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे."
“तुम्ही सावध रहा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंत: करणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांला फासाप्रमाणे अकस्मात पकडील; कारण तो साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवायला आणि मनुष्याच्या पुत्राप्रमाणे उभे रहायला समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत रहा."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 21: 25-28, 34-36
And there shall be signs in the sun, and in the moon, and in the stars; and upon the earth distress of nations, by reason of the confusion of the roaring of the sea and of the waves;
 Men withering away for fear, and expectation of what shall come upon the whole world. For the powers of heaven shall be moved;
 And then they shall see the Son of man coming in a cloud, with great power and majesty. But when these things begin to come to pass, look up, and lift up your heads, because your redemption is at hand.
And take heed to yourselves, lest perhaps your hearts be overcharged with surfeiting and drunkenness, and the cares of this life, and that day come upon you suddenly. For as a snare shall it come upon all that sit upon the face of the whole earth. Watch ye, therefore, praying at all times, that you may be accounted worthy to escape all these things that are to come, and to stand before the Son of man.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन :
आज आपण आगमनकाळात प्रवेश करीत असताना, शुभवर्तमान आपल्याला ख्रिस्ताच्या पुर्नआगमनाची आठवण करून देते. प्रार्थनेत सदैव जागृत राहण्याचे आवाहन केले आहे. यासाठी की जेव्हा प्रभूचा दिवस येईल तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटू नये. आजच्या क्षणाला जग देवापासून दूर आणि दूर जात आहे. जणू देव अस्तित्वात नाही. आपणही या जगाच्या विचारसरणीला अनुरूप आहोत का? परमेश्वराच्या पुर्न आगमनाची वेळ कोणालाच माहित नाही पण आपल्या मृत्यूच्या वेळी आपण त्याला नक्कीच भेटू आणि आपल्या जीवनाचा हिशोब ख्रिस्ताला द्यावा लागेल. देव त्याच्या वचनाशी एकनिष्ठ आहे आणि त्याच्या स्वर्गीय राज्यात आपली आतुरतेने वाट पाहत आहे. पण प्रश्न असा आहे की, आपण त्याला भेटायला तयार आहोत का? देवाचे वचन आपल्याला वेळोवेळी आठवण करून देते की जग हे आपले कायमचे घर नाही तर आपण स्वर्गाचे आहोत. आम्हाला ताकीद देण्यात आली आहे की, अनीतिमानांना देवाच्या राज्याचा वारसा मिळणार नाही.

प्रार्थना हे प्रभू येशू, सर्वदा तुझ्या आज्ञेत राहून वचनात वाढण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या