Marathi Bible Reading | Monday 2nd December 2024 |1st Week of Advent

आगमनकाळातील पहिला सप्ताह 

सोमवार २ डिसेंबर २०२४

  ✝️

 "शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल."Lord, I am not worthy that thou shouldst enter under my roof: but only say the word, and my servant shall be healed.

  ✝️


 संत बिबियाना  
कुमारिका व रक्ताक्षी (३६३)

रोम शहरामध्ये पाचव्या शतकात संत विवियाना हिच्या नावाने एक ख्रिस्तमंदिर उभारण्यात आले होते. त्यामध्ये तिचा मृत देह अविनाशी अशा अवस्थेमध्ये ठेवण्यात आलेला होता. पोप संत सिम्प्लीसिऊस ह्यांनी ते मंदिर आशीर्वादित केले होते. तिचे दुःखसहन आणि त्यामागची पार्श्वभूमी ह्याविषयी इतिहासात काहीच माहिती उपलब्ध नाही.
एका मौखिक परंपरेनुसार रोम शहराचे माजी प्रमुख फ्लेवियन आणि त्याची पत्नी डॅफ्रोझा ह्यांची विवियाना ही मुलगी होती. दोघेही पती-पत्नी खूप श्रद्धाळू व धार्मिक वृत्तीचे जीवन जगत होते. त्यांच्या दृढ श्रद्धेमुळे संतापून मूर्तिपूजकांनी फ्लेवियन ह्याला तापत्या लोखंडी सळीने भाजून काढले. त्याचा चेहरा विद्रूप करून टाकला व त्याला एका जंगलात हाकलून दिले. तिथे जखमी अवस्थेत तो मरण पावला.
बिबियानाची आई हीसुद्धा आपल्या पतीप्रमाणे अतिशय भक्तिमान व साध्वी वृत्तीचे जीवन जगत होती, त्यामुळे तिचाही तसाच छळ करण्यात आला... तिला बराच वेळ एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले व शेवटी तिचा शिरच्छेद करण्यात आला.
त्यांच्या मागे उरलेल्या बिबियाना आणि डेमेट्रीया ह्या दोन बहिणींना खूप दारिद्र्याचे जीवन जगावे लागले. त्यांच्याकडची सर्व संपत्ती व मालमत्ता मूर्तिपूजकांनी व त्यांच्या मातापित्याच्या मारेकऱ्यांनी त्यांच्याकडून हिरावून घेतली. पाच महिने या दोन कुमारिका उघड्यावर वणवण हिंडू लागल्या. परंतु अशाही अवस्थेत उपवास व प्रार्थना करीत दोघींनी ते दिवस कृपावंत करून टाकले.
रोमचा राज्यपाल अॅप्रोनियानुस ह्याने ज्युलियन ह्या सम्राटाच्या काळात ह्या
दोन्ही बहिणींना आपणासमोर हजर होण्याचा हुकूम सोडला. विवियानाची बहीण डेमेट्रीया हिने न्यायालयामध्ये सर्वांसमक्ष आपली ख्रिस्ती श्रद्धा धैयाने प्रकट केली त्यानंतर ती थरथर कापू लागली आणि काही क्षणातच खाली पडली व मरण पावली.
विवियाना हिला त्या शहरातील कुप्रसिद्ध स्त्री रुफिना हिच्या ताब्यात देण्यात आले. ती चांगली कलावंतीण होती, परंतु तिने विवियानाला वेगळ्या पद्धतीने छळायला सुरुवात केली. परंतु रूफिनाचे सर्व प्रयत्न असफल ठरले. तिला श्रद्धेपासून आणि शुद्धतेपासून छळण्याचा रूफिनाने खूप खूप प्रयत्न केला पण सारे मुसळ केरात !
शेवटी बिबियाना हिला एका खांबाला बांधण्यात आले. काटेरी चाबकाने तिला फोडून काढण्यात आले. मरेपर्यंत तिला चाबकाचे फटके मारण्यात आले. हे सर्व तिने अगदी प्रसन्नमुखाने सहन केले आणि आपल्या मारेकल्यांच्या समोर तिने आपली मान टाकली.
बेवारशी कुत्र्यांनी तिचे शरीर फाडून खावे ह्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह उघड्यावर टाकून दिला. परंतु एकही कुत्रा तिच्या पवित्र शरीराला स्पर्श करण्यास धजला नाही. शेवटी दोन दिवसांनी तिच्या मातापित्यांच्या बहिणीच्या खाचेशेजारी जॉन नावाच्या धर्मगुरूंनी लिसिनिअस राजवाड्यानजीकच रात्रीच्या वेळी तिला पुरले. 

 येशूजवळ आलेला शताधिपती हा प्रचंड विश्वासाची देणगी लाभलेला माणूस होता. शताधिपतीने आपल्या आजारी चाकराला बरे करण्यासाठी चाकराकडे येण्याची विनंती न करता आपली अपात्रता व्यक्त करीत म्हटले, 'प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.  प्रभू येशूच्या सामर्थ्यावर आणि दयेवर शताधिपतीचा पूर्ण विश्वास होता. सामर्थ्यशाली प्रभूने आपल्या घरी यावे इतका मी योग्य नाही अशी कबुली त्याने दिली. केवळ त्याच्या श्रद्धेमुळेच त्याचा चाकर बरा झाला. प्रभू येशूच्या सामर्थ्यावर आणि दयेवर विश्वास ठेवून शरण जाणाऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणि चमत्कार घडू शकतात. 

आपण सर्वजण सुद्धा अपात्र असून प्रभू येशूने आपल्याकडे यावे एवढी पात्रता आपल्यात नाही. तरी सुद्धा प्रभू अतीपवित्र ख्रिस्तशरीर संस्कारामध्ये आपल्याकडे येत असतो. प्रभूच्या वचनात, शब्दात, स्पर्शात महान सामर्थ्य आहे. आपली प्रभू वरील श्रद्धा दृढ असायला हवी. ह्या आगमन काळात प्रभूला स्वीकारण्याची तयारी करीत असताना शताधिपतीसारखी आपली श्रद्धा मजबूत बनविण्यासाठी प्रभूला शरण जाऊ या.        ✝️
पहिले वाचन :यशया  २ :१-५
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन २:१-५
"प्रभू सर्व राष्ट्रांना परमेश्वराच्या चिरशांतीच्या राज्यात एकत्रित करतो." 
आमोजचा पुत्र यशया याला यहुदा आणि येरुशलेम याविषयी प्राप्त झालेले दृष्टान्तवचन शेवटल्या दिवसांत असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा पर्वत, पर्वतांच्या शिखरांवर स्थापण्यात येईल आणि सर्व पर्वतांहून तो उंच होईल. त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील, देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील आणि म्हणतील, “चला, परमेश्वराने आपले मार्ग आम्हांला शिकवावेत आणि आम्ही त्याच्या मार्गाने चालावे, म्हणून आपण त्याच्या पर्वताकडे, याकोबच्या देवाच्या निवासस्थानी जाऊ या.'  कारण सियोनातून धर्मशास्त्र आणि येरुशलेमातून परमेश्वराचे वचन निघेल तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील. देशोदेशीच्या लोकांचा न्याय करील आणि ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांवर तरवार उचलणार नाही. ते यापुढे युद्धकला शिकणार नाहीत. याकोबच्या घराण्या चल, ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. मेघ आणि रात्रीसाठी प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील. त्याच्या सर्व वैभवावर छत्र असेल आणि दिवसा ऊन लागू नये, सावली मिळावी आणि वादळ आणि पाऊस यापासून रक्षण व्हावे, निवारा आणि आश्रय असावा म्हणून हा मंडप घालण्यात येईल.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :: Isaiah 2: 1-5
The word that Isaias the son of Amos saw, concerning Juda and Jerusalem. And in the last days the mountain of the house of the Lord shall be prepared on the top of mountains, and it shall be exalted above the hills, and all nations shall flow unto it.
And many people shall go, and say: Come and let us go up to the mountain of the Lord, and to the house of the God of Jacob, and he will teach us his ways, and we will walk in his paths: for the law shall come forth from Sion, and the word of the Lord from Jerusalem. And he shall judge the Gentiles, and rebuke many people: and they shall turn their swords into ploughshares, and their spears into sickles: nation shall not lift up sword against nation, neither shall they be exercised any more to war. O house of Jacob, come ye, and let us walk in the light of the Lord.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १२२:१-२, ३-४, ८-९

प्रतिसाद :चला, आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ 

१) "चला, आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ"
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे येरुशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत

२) हे येरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी 
तू बांधलेली आहेस.
इस्राएलला घालून दिलेल्या निर्बंधांप्रमाणे 
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, 
परमेश्वराच्या नावाने उपकारस्मरण 
करण्यासाठी चढून येतात.

३) “माझे बंधू आणि माझे मित्र यांच्याकरिता 
तुझ्यामध्ये शांती वसो !” अशी मी प्रार्थना करीन. 
परमेश्वर आमचा देव याच्या मंदिराकरिता आणि
तुझ्या कल्याणाकरिता मी झटत जाईन.


Psalms 122: 1-2, 3-4b, 4cd-5, 6-7, 8-9
R. Let us go rejoicing to the house of the Lord.

1 I rejoiced at the things that were said to me: 
We shall go into the house of the Lord.
2 Our feet were standing in thy courts, O Jerusalem.
R. Let us go rejoicing to the house of the Lord.

3 Jerusalem, which is built as a city, 
which is compact together.
4ab For thither did the tribes go up, t
he tribes of the Lord.
R. Let us go rejoicing to the house of the Lord.

4cd The testimony of Israel, to praise the name of the Lord.
5 Because their seats have sat in judgment, 
seats upon the house of David.
R. Let us go rejoicing to the house of the Lord.

6 Pray ye for the things that are for the peace of Jerusalem: 
and abundance for them that love thee.
7 Let peace be in thy strength: 
and abundance in thy towers.
R. Let us go rejoicing to the house of the Lord.

8 For the sake of my brethren, and of my neighbours, 
I spoke peace of thee.
9 Because of the house of the Lord our God, 
I have sought good things for thee.
R. Let us go rejoicing to the house of the Lord.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
हे समर्थ देवा, आम्हांला पूर्व स्थितीवर आण तुझी कृपादृष्टी आम्हांवर वळव म्हणजे आमचे तारण होईल.
 आलेलुया!

Acclamation: 
Come and save us, LORD our God; let your face shine upon us, that we may be saved.

शुभवर्तमान मत्तय ८:५-११
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून अनेकजण स्वर्गराज्यात येतील "

येशू कफर्णहूम गावात आला, तेव्हा एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि याचना करू लागला, महाराज, माझा चाकर पक्षघाताने घरात पडून आहे आणि त्यालाभयंकर वेदना होत आहेत.
येशू त्याला म्हणाला, “मी येतो आणि त्याला बरे करतो."
पण तो शताधिपती त्याला म्हणाला, “महाराज, आपण माझ्या छपराखाली यावे एवढी माझी योग्यता नाही. आपण एक शब्द फक्त उच्चारा म्हणजे माझा चाकर बरा होईल. मी एक हुकमाचा ताबेदार आहे. माझ्या हाताखाली सेवक आहेत. एखाद्याला मी जी म्हणालो, की तो जातो; दुसऱ्याला ये म्हणालो, की तो येतो; चाकराला म्हटले, हे कर, की तो ते करतो."
हे ऐकूण येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्यामागे येणाऱ्यांना तो म्हणाला "मी तुम्हांला खरे सांगतो, एवढी जबरदस्त श्रद्धा मला इस्राएलातही आढळली नाही. मी तुम्हांला सांगतो, पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून अनेकजण येतील आणि आब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर स्वर्गराज्यात पंगतीला बसतील.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 8: 5-11
And when he had entered into Capharnaum, there came to him a centurion, beseeching him,And saying, Lord, my servant lieth at home sick of the palsy, and is grieviously tormented. And Jesus saith to him: I will come and heal him. And the centurion making answer, said: Lord, I am not worthy that thou shouldst enter under my roof: but only say the word, and my servant shall be healed. For I also am a man subject to authority, having under me soldiers; and I say to this, Go, and he goeth, and to another, Come, and he cometh, and to my servant, Do this, and he doeth it. And Jesus hearing this, marvelled; and said to them that followed him: Amen I say to you, I have not found so great faith in Israel. And I say to you that many shall come from the east and the west, and shall sit down with Abraham, and Isaac, and Jacob in the kingdom of heaven:
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतनआजच्या शुभवर्तमानात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या रोमी जमादाराचा येशूच्या शब्दांवर संपूर्ण विश्वास होय. आपल्या सेवकाला बरे करण्याचे सामर्थ्य येशूमध्ये नक्कीच आहे याची जमादाराला पूर्ण खात्री आहे. आपण पाहतो की जमादार आपणावर अवलंबून असलेल्या चाकराबद्दल किती काळजी आणि दया दाखवीत आहे. रोमी असला तरी जमादाराने (येशू) एका यहृदयाकडून मदत मागून स्वतःला नम्र केले. त्याकाळात रोमी यहूदींवर हुकूमत करत असल्यामुळे यहूदी लोक त्यांचा खूप तिरस्कार करत असत. आणि अशा वातावरणात रोमी जमादार आपल्या चाकरासाठी स्वतःचा मान सन्मान विसरून येशूला सांगतो की, तो त्याला स्वीकारण्यास देखील पात्र नाही. आणि येशू या परराष्ट्रीयांच्या विश्वासाने आश्चर्यचकित झाला आहे. आपल्यापैकी बरेच जण दररोज बायबल वाचत असतील. काहींना बायबलमधील अनेक वचनेही लक्षात ठेवता आली असतील. हे सर्व चांगले आहे पण पुरेसे नाही. कारण केवळ देवाच्या वचनावरील विश्वासामुळे उपचार, सुटका आणि जीवन परिवर्तन होतो. माझा त्या रोमी जमादारासारखा येशूच्या शब्दावर विश्वास आहे का ?

प्रार्थनाहे प्रभू येशू, तुला शरण येण्यास व श्रद्धेत दृढ बनण्यास मला कृपा दे, आमेन.


✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या